तत्पर व युध्दपातळीवरील आरोग्य यंत्रणेच्या सतर्कतेमुळे विष बाधेतील बाधित रुग्णांची प्रकृती स्थिर
- कोणतीही जीवीतहानी नाही
तत्पर व युध्दपातळीवरील आरोग्य यंत्रणेच्या सतर्कतेमुळे विष बाधेतील बाधित रुग्णांची प्रकृती स्थिर
महासंस्कृती महोत्सवामध्ये शिवकालीन
पारंपारीक खेळ सादर करण्याची खेळाडूंना संधी
नांदेड (जिमाका) दि. 7 :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन, तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात लढवय्यांची माहिती इ.बाबी जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी, 2024 या कालावधीत पाच दिवसीय "महासंस्कृती महोत्सवाचे" आयोजन करण्याचे शासनाचे निर्देश आहेत.
त्याअनुषंगाने नांदेड जिल्हामध्ये जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 15व 16 फेब्रुवारी 2024 या कालावधीत पोलीस कवायत मैदान, वजिराबाद, नांदेड येथे महासंस्कृती महोत्सव अंतर्गत शिवकालीन पारंपारीक खेळाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये खो-खो व कबड्डी या खेळामध्ये सन 2023-24 या वर्षातील शालेय तालुकास्तरावर 19 वर्षाआतील मुले-मुली संघनी प्रथम क्रमांक संपादन केलेल्या संघास संधी देण्यात येणार आहे. कुस्ती या खेळ प्रकारासाठी 19 वर्षाआतील मुले-मुली खेळाडूंना आपली नांवे नोंदविता येईल व आटयापटया, लेझीम, लाठीकाठी, रस्सीखेच, गतका, लगोरी व मल्लखांब (पुरुष व महिला खुला गट) या खेळाचा समावेश करण्यात आला आहे.
या क्रीडा प्रकारात पारंगत असणाऱ्या जिल्हयातील जास्तीत जास्त खेळाडूंनी 13 फेब्रुवारी, 2024 पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज भरुन खेळाडूची/ संघाची प्रवेशिका ई-मेल आयडी dsonanded@rediffmail.com यावर किंवा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉल नांदेड येथे प्रत्यक्ष सादर करावेत.
उक्त कालावधी नंतर प्राप्त प्रवेशअर्जाची छानणी होऊन समितीद्वारे अंतिम करण्यात येवून, निवडक खेळाडूं/ संघास "महासंस्कृती महोत्सवात" सहभाग घेता येईल. वैयक्तिक व सांघीक खेळ प्रकारात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक संपादन करणाऱ्या खेळाडू/ संघास रोख पारीतोषीक व सन्मानचिन्ह मान्यवरांच्या शुभ- हस्ते पुरुष व महिला गटात स्वतंत्र देण्यात येणार आहे असे महासंस्कृती महोत्सव समिती नांदेड तर्फे निवासी उपजिल्हाधिकारी व जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.
0000
वृत्त क्र. 112
रस्ता सुरक्षा विषयी माहिती व प्रबोधनासाठी
जिल्ह्यात एलईडी वाहनाद्वारे जनजागृती
वृत्त क्रमांक 111
अडचणीतल्या महिलांसाठी हक्काचा शासकीय आधार
नांदेड (जिमाका) दि. 7 :- महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत नांदेड शहरात माता अनुसया शासकीय महिला वसतिगृह (राज्यगृह) ही शासकीय संस्था अनाथ, निराधार, निराश्रीत व अडचणीतल्या महिलांसाठी कार्यरत आहे. येथे 18 ते 60 वर्षापर्यंत निवाऱ्याची आवश्यकता असणाऱ्या निराधार, विधवा, कुमारी माता, परित्यक्ता, अत्याचारीत महिलांसाठी विनाशुल्क अन्न, वस्त्र, निवारा, समुपदेशन व पुर्नवसनाची व्यवस्था केली जाते. त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाते. येथे आवश्यकतेनुसार कायदेशीर सल्ला व मदत दिली जाते.
तसेच नियमित आरोग्य तपासणी केली जाते. 18 वर्षापुढील महिलांना मानसिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनविण्यासाठी, पुनर्वसनाच्यादृष्टिने त्यांच्या विवाहकरीता संस्थेत सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. येथे शिक्षण व प्रशिक्षण घेत असलेल्या महिलांना आवश्यकतेनुसार प्रवेश दिला जातो. समस्याग्रस्त 18 वर्षापुढील महिलांनी संकटकाळी चुकीच्या मार्गाने न जाता समस्येचे निराकरण होईपर्यंत अल्प कालावधीसाठी या संस्थेत दाखल होण्याचा लाभ घ्यावा. प्रवेशाकरीता फोटोसह ओळखपत्र आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी कामकाजाच्या दिवशी दुपारी 1 ते 3 यावेळेत अधिक्षक माता अनुसया शासकीय महिला वसतिगृह (राज्यगृह) हॉटेल भाईजी पॅलेसच्या पाठीमागे शिवाजीनगर उड्डाणपुल परिसर शिवाजीनगर नांदेड येथे किंवा दुरध्वनी क्रमांक 02462-233044 येथे संपर्क साधावा, असे आवाहन शासकीय महिला राज्यगृहचे अधीक्षक वर्ग-2 एस. एम. पुजलवार यांनी केले आहे.
00000
वृत्त क्रमांक 110
सीसीआय मार्फत जिल्ह्यात 5 कापूस खरेदी केंद्र सुरू
· भोकर केंद्रावर किमान हमी दराने कापूस खरेदी केंद्र उघडण्याची कार्यवाही सुरु
नांदेड (जिमाका) दि. 6 :- नांदेड जिल्ह्यात धर्माबाद, कुंटुर, नांदेड, नायगाव, तामसा अशा एकूण 5 कापूस खरेदी केंद्रांवर भारतीय कापूस महामंडळ (सी.सी.आय.) मार्फत एफ.ए.क्यु. प्रतिच्या कापसाची किमान हमी दराने कापूस खरेदी सुरु आहे. याव्यतिरीक्त सी.सी.आय.मार्फत नांदेड जिल्ह्यात भोकर या 1 केंद्रावर किमान हमीदराने कापूस खरेदी केंद्र उघडण्याची कार्यवाही सुरु आहे. कापूस पणन महासंघाच्या नांदेड विभागातील कापूस उत्पादक शेतकरी बांधवांनी आपला कापूस आवश्यक त्या कागदपत्रांसह सीसीआयच्या नजिकच्या केंद्रांवर विक्री करावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचे प्र. विभागीय व्यवस्थापक यांनी केले आहे.
00000
वृत्त क्रमांक 109
जिल्ह्यातील वृद्ध कलावंतांनी मानधन योजनेसाठी
आधार कार्ड, मोबाईल नंबर सादर करावेत
· जिल्हा समाज कल्याण कार्यालयाचे आवाहन
नांदेड (जिमाका) दि. 6 :- महाराष्ट्र राज्यातील राजर्षी शाहू मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधन योजना सन 1954-55 पासून संपूर्ण राज्यात सांस्कृतिक संचालनालयामार्फत राबविली जाते. शासनाने सदर योजना डीबीटी मार्फत राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व वृध्द कलावंताची आपले आधार कार्ड, मोबाईल क्रमांक गुरूवार 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत सदर पंचायत समिती गटविकास अधिकारी कार्यालयाकडे सादर करावीत. जिल्हयातील सर्व वृध्द कलावंतानी आधार कार्ड, मोबाईल क्रमांक सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्यातील राजर्षी शाहू मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधन योजना सन 1954-55 पासून संपूर्ण राज्यात सांस्कृतिक संचालनालयामार्फत राबविली जाते. शासनाने सदर योजना डीबीटी मार्फत राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने संचालक सांस्कृतीक कार्य संचालनालय मुंबई यांनी केलेल्या सुचनेनुसार डीबीटी DBT (Direct Benifishri Transfer) मार्फत योजना राबविण्यासाठी सर्व वृध्द कलावंताचे आधार कार्ड, मोबाईल क्रमांक प्राप्त करुन घेण्याविषयी सुचना केली आहे.
जिल्ह्यातील सर्व वृध्द कलावंताची आपले आधार कार्ड, मोबाईल क्रमांक गुरूवार 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत सदर पंचायत समिती गटविकास अधिकारी कार्यालय यांच्याकडे सादर करावीत. पंचायत समितीने सदर माहिती गुगल शीट Google Sheet मध्ये मंगळवार 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत समाज कल्याण विभागाकडे सादर करावेत. जे कलावंत आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक सादर करणार नाहीत त्यांच्या बँक खात्यावर मानधन जमा होणार नसल्याबाबत सुचना आहेत, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी कळविले आहे.
00000
वृत्त क्रमांक 108
अनाथ बालकांचे प्रतिपालकत्व स्विकारण्यास समाजाने पुढे यावे
- जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर. आर. कांगणे
नांदेड (जिमाका) दि. 6 :- नांदेड जिल्ह्यातील बालगृहामध्ये
असलेल्या अनाथ व निराधार बालकांना बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 च्या
तरतुदीनूसार प्रतिपालकत्व योजनेंतर्गत जी बालके कुटुंबापासून वंचीत आहेत, अशा
बालकांना कुटुंबाचे वातावरण, प्रेम मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. अशा अनाथ बालकांचे
प्रतिपालकत्व स्विकारण्यास समाजाने पुढे आले पाहिजे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल
विकास अधिकारी आर. आर. कांगणे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे स्वनाथ फाऊंडेशन व महिला बाल विकास विभाग यांची नुकतीच बैठक घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी महिला व बालकांसाठीच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. तर स्वनाथ फाउंडेशनच्या संस्थापक व कार्यकारी विश्वस्त श्रीम. श्रेया भारतीय यांनी प्रतिपालकत्व योजनेविषयी चर्चा व स्वनाथ फाऊंडेशनच्या सामाजिक कार्याविषयी माहिती दिली. या बैठकीमध्ये जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर. आर. कांगणे यांनी प्रतिपालकत्व योजनेविषयी माहिती व मार्गदर्शन केले.
यावेळी कुटुंबातच बालकांचा सर्वांगीण विकास होऊ शकतो, त्यास आई-वडिलांचे प्रेम मिळते. त्याचा तो अधिकार आहे, ज्यामुळे बालकाच्या सर्वांगीण विकास होतो. यामुळे अनाथ बालकांना प्रतिपालकत्व योजनेंतर्गत इच्छूक कुटुंबात पुन:स्थापीत करण्यास प्राधान्य देण्यात येईल, असे मत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर. आर. कांगणे यांनी व्यक्त केले.
प्रतिपालकत्व स्विकारण्यास इच्छूकांनी जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, नांदेड यांच्याशी संपर्क साधल्यास इच्छुक कुटुंबाला कायदेशीररित्या प्रतिपालकत्वाच्या नियम व अटी-शर्तीच्या अधिन राहून मुल दिले जाते, असे मत संदीप फुले यांनी व्यक्त केले. यावेळी सर्व सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या बैठकीस परिवीक्षा अधिकारी गजानन जिंदमवार, संरक्षण अधिकारी संदीप फुले, कल्पना राठोड, सामाजिक कार्यकर्ता शितल डोंगे, धानाजी कोंडेवाड तसेच वनस्टॉप सेंटरच्या प्रेमला निलेवार प्रशासक व ताई दर्शने केस वर्कर हे उपस्थित होते.
000000
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी Maharashtra DGIPR ...