Wednesday, July 19, 2023

प्रवाशी बस तपासणी मोहिमेत 150 दोषी वाहनांवर कारवाई

 प्रवाशी बस तपासणी मोहिमेत 150 दोषी वाहनांवर कारवाई

§  दोषी वाहनांवरील कारवाईत 2 लाख 31 हजार रुपयांचा दंड वसूल

नांदेड (जिमाका) दि. 18 :- प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाद्वारे प्रवासी बसची विशेष तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे. परिवहन आयुक्त, मुंबई यांनी खाजगी प्रवासी बसेसची तपासणी काटेकोरपणे करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्याअनुषंगाने या मोहिमेत 1 जुलै  ते 16 जुलै 2023 या कालावधीत 150 दोषी वाहनांवर कारवाई करुन 2 लाख 31 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

प्रवासी बसची तपासणी मोहिम कारवाईत प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकामार्फत प्रामुख्याने वाहनांची कागदपत्रे वैध नसणे, वाहन तांत्रिकदृष्टया दोषमुक्त व सुस्थितीत नसणे, विना परवाना अथवा परवान्याच्या अटींचा भंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे, प्रवासी बसमधून अवैधरित्या मालवाहतूक करणे, रिफ्लेक्टर, इंडिकेटर, टेल लाईट, वायपर इ. व्यवस्थित नसणे, वाहनामध्ये बेकायदेशीर केलेले फेरबदल, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतुक, जादा भाडे आकारणे, अग्निक्षमन यंत्रणा कार्यरत नसणे, वेगमर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणे बाबत कारवाई करण्यात आली.

मोटार वाहन कायदा 1988 व 2019 तसेच अनुषंगिक नियम यानुसार या बसेस सर्व अटी/शर्ती पूर्तता करतात का याबाबत तपासणी करण्यात आली. तसेच ब्रेथ अनालायझरद्वारे 115 वाहन चालकांची तपासणी करण्यात आली व यामध्ये कोणीही दोषी आढळून आलेले नाही. प्रवासी बस चालक/मालक यांनी या सर्व बाबींची नोंद घेऊन त्याप्रमाणे वाहनाची कागदपत्रे व इतर सर्व बाबींची पूर्तता होईल याबाबत दक्षता घ्यावी, अन्यथा तपासणी दरम्यान दोषी आढळून आल्यास वाहनावर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000

संभाव्य पूर परिस्थितीसाठी प्रशासन दक्ष

संभाव्य पूर परिस्थितीसाठी प्रशासन दक्ष

 

नांदेड (जिमाका) दि. 18 :-  नांदेड जिल्ह्यात गोदावरी, पैनगंगा, मांजरा, आसना, लेंडी, कयाधू, मन्याड या प्रमुख नद्या असून जिल्ह्यातील 337 गावे पूरप्रवण आहेत. जिल्ह्यात पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण होऊन अनेक संकटे उद्भवतात. राज्यशासनाने एनडीआरएफच्या धर्तीवर राज्यात येणाऱ्या विविध आपत्तींचा सामना करण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची (एसडीआरएफ) ची स्थापना केलेली आहे. आगामी पूरपरिस्थितीचा धोका लक्षात घेऊन मराठवाडा क्षेत्रासाठी एसडीआरएफची धुळे येथील एक तुकडी नांदेड येथे तैनात करण्यात आलेली आहे.

 

14 जुलै 2023 रोजी रात्री 8 वाजता या तुकडीचे नांदेड येथे आगमन झाले आहे. 15 जुलै  ते 31 ऑगस्ट 2023 या कालावधीसाठी ही तुकडी नांदेड येथे तैनात राहणार आहे. या तुकडीमध्ये एकूण 36 जणांचा समावेश आहे. यात पोलीस उप निरीक्षक दर्जाचे तीन अधिकारी व बाकी ३३ जवान आहेत. या तुकडीचे नेतृत्व पोलीस निरीक्षक मनोज जितेंद्र परीहार हे करीत आहेत. पोलीस उपनिरीक्षक विजय यशवंत गावंडे, दिनेश मधुकर तायडे व शंकर लक्ष्मण उकांडे हे त्यांना सहाय्य करीत आहेत. या दलाची राहण्याची व्यवस्था जिल्हा क्रीडा संकुल नांदेड येथे करण्यात आलेली आहे. ही तुकडी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व  निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहे.  समन्वय अधिकारी म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे हे काम पाहत असून 9422875808  हा त्यांचा मोबाईल क्रमांक आहे.


0000

 

 

Friday, July 14, 2023

 राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर

 

            मुंबई, दि. १४:  राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.

            मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले  विभाग .

            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.

            उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन हे खाते राहील.

इतर २६ मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे: 

छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण.

दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील –सहकार.  

राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास.

सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार – वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय.

हसन मियाँलाल मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य.

चंद्रकांतदादा बच्चू पाटील –उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य.

विजयकुमार कृष्णराव गावित – आदिवासी विकास.

गिरीष दत्तात्रय महाजन – ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन.

गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा व स्वच्छता.

दादाजी दगडू भुसे – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम).

संजय दुलिचंद राठोड – मृद व जलसंधारण.

धनंजय पंडितराव मुंडे – कृषि.

सुरेशभाऊ दगडू खाडे – कामगार.

संदीपान आसाराम भुमरे– रोजगार हमी योजना व फलोत्पादन.

उदय रवींद्र सामंत –उद्योग.

प्रा.तानाजी जयवंत सावंत – सार्वजनिक आरोग्य व  कुटुंब कल्याण.

रवींद्र दत्तात्रय चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून).

अब्दुल सत्तार – अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन.

दीपक वसंतराव केसरकर – शालेय शिक्षण व  मराठी भाषा.

धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम – अन्न व औषध प्रशासन.

अतुल मोरेश्वर सावे – गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण.

शंभूराज शिवाजीराव देसाई – राज्य उत्पादन शुल्क.

कु. अदिती सुनील तटकरे – महिला व बालविकास.

संजय बाबुराव बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे.

मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता.

अनिल पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन.

०००००

 चंद्रयान-3 च्या यशस्वी उड्डाणाने विष्णुपूरीतील विद्यार्थ्यांनी घेतले बळ ! 

  • जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी उड्डाणाचा अनुभवला वैज्ञानिक प्रवास 

नांदेड (जिमाका) दि. 14 :- चंद्रयाण-3 च्या उड्डाणाची उलटगणती जशी सुरु झाली तशी विष्णुपूरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या मनात उत्सुकता व उत्कंठा यशस्वी उड्डाण होईपर्यंत शिगेला पोहचली होती. ज्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्टेशनवरुन चंद्रयान-3 अवकाशात झेपावले त्या लॉचिंग पॅड व इस्त्रो सेंटरला या शाळेतील दोन विद्यार्थिनींना प्रत्यक्ष शैक्षणिक सहली अंतर्गत भेट देण्याची संधी मिळालेली होती. यामुळे या शाळेतील इतर मुलांच्या मनातही चंद्रयान-३ बद्दल कमालीची उत्सुकता होती. केंद्र शासनाने हे उड्डाण विद्यार्थ्यापर्यंत पोहचावे व याला साक्षीदार होता यावे यासाठी थेट प्रक्षेपणाचा निर्णय घेतला. या थेट प्रक्षेपणाची दुहेरी अनुभुती विष्णुपूरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेसह इतर शाळांनाही घेता आली. शाळेतील विद्यार्थ्यांना या उड्डाणाला साक्षीदार होता यावे यासाठी शाळेने हे थेट प्रक्षेपण मोठया स्क्रिनद्वारे विद्यार्थ्यांपर्यत पोहोचविले.

 

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदतर्फे शालेय विद्यार्थ्यांना इस्त्रो केंद्राला भेट देता यावी यासाठी एक विशेष उपक्रम घेतला होता. जिल्ह्यातील 50 गुणवंत विद्यार्थ्यांची परिक्षेद्वारे निवड केली होती. इयत्ता 5 वी ते 8 वी या वर्गातील निवडक 50 विद्यार्थ्यांमध्ये 27 मुली व 23 मुले यांची निवड करण्यात आली. विष्णुपूरी येथील जिल्हा परिषद शाळेतील कु. सृष्टी सोनटक्के व अश्लेषा केंद्रे या दोन विद्यार्थीनी पात्र झाल्या. ही प्रत्यक्ष अनुभुती या विद्यार्थिनीसमवेत इतर मुलांनाही घेता यावी यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.सविता बिरगे यांनी चंद्रयान-3 च्या औचित्याने हे प्रक्षेपण शाळेत मुलांना दाखविण्याचे सूचित केले होते. त्यानुसार हा अभिनव उपक्रमांतर्गत राबविला गेला. यातून इतर मुलांच्या मनात विज्ञानाचा विश्वास निर्माण करण्यात यश आले.

 

“नांदेड जिल्हा परिषदेने मागील परिक्षेद्वारे पात्र ठरलेल्या 50 विद्यार्थ्यांना मागील मे महिन्यात श्रीहरीकोटा येथील इस्त्रोच्या संशोधन केंद्राला भेट देण्याची संधी दिली होती. या भेटीमुळे वैज्ञानिक दृष्टीकोनातून हे केंद्र व आपल्या देशाचे संशोधन व प्रगती आम्हाला अनुभवता आली. ज्या केंद्राला आम्ही भेट दिली होती. प्रत्यक्ष पाहणी केली होती तेथून चंद्रयान-3 च्या यशस्वी उड्डाणामुळे आम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासानेही अप्रत्यक्ष झेप घेतली आहे” अशी प्रतिक्रिया या शाळेतील विद्यार्थीनी अश्लेषा केंद्रे व सृष्टी सोनटक्के या विद्यार्थीनीनी दिली.

00000







 दहावी, बारावी परीक्षा केंद्र

परिसरात 144 कलम  

 

नांदेड, (जिमाका) दि. 14 :-  जिल्ह्यात इयत्ता 10 वी व 12 वीची परीक्षा विविध केंद्रावर 18 जुलै 2023 पासून सुरू होत आहे. तसेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा (दहावी) 10 केंद्रावर व इयत्ता 12 वी परीक्षा 9 केंद्रावर सुरु होणार आहे. ही परीक्षा 8 ऑगस्ट 2023 पर्यत सुरू राहणार आहे.  या कालावधीत (सुटीचे दिवस वगळून) परीक्षा केंद्रापासून 100 मीटरच्या परिसरात सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी-कर्मचारी याव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. यावेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स/ एस.टी.डी/ आय.एस.डी/भ्रमणध्वनी/फॅक्स/झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. याबाबतचा आदेश जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये निर्गमित केला आहे.

000000

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...