Friday, June 24, 2022

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती

सामाजिक न्याय दिन म्हणून होणार साजरी 

26 जून रोजी राज्यभर साजरा होणार सामाजिक न्याय दिन 

नांदेड (जिमाका) दि. 24 :- बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आपल्या राजसत्तेच्या माध्यमातून प्रयत्नरत असलेले व स्वत:च्या आचरणातून सामाजिक न्यायाचा संदेश समाजात रूजविणारे थोर लोककल्याणकारी राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती येत्या 26 जून रोजी शासनातर्फे साजरी केली जात आहे. त्यांची ही जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी केली जाणार असून सामाजिक न्यायाच्या त्यांनी दिलेल्या योगदानाला या दिनाच्या माध्यमातून अधोरेखित केले जात आहे. 

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जन्म तारीख निश्चित करण्यासाठी तज्ज्ञ समितीची स्थापना सन 2005-2006 मध्ये करण्यात आली होती. सदर समितीने संशोधन करून पुराभिलेख संचालनालयाला अहवाल सादर केला होता. या समितीच्या अहवालानुसार राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जन्म तारीख संशोधनाअंती 26 जून 1874 अशी घोषित केली आहे. हा दिन अर्थात त्यांची जयंती ही सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्याचा शासना निर्णय घेतला.

00000   

 


 नांदेड जिल्ह्यात 3 व्यक्ती कोरोना बाधित   

नांदेड (जिमाका) दि. 24 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या  210 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे 2 व ॲटीजन तपासणीद्वारे 1 अहवाल असे एकूण 3 कोरोना बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 845 एवढी झाली असून यातील 1 लाख 131 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या घडीला 22 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृहविलगीकरणातील 2 रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 2 व ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 1 असे एकुण 3 कोरोना बाधित आढळले आहेत. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 4, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणात 18 असे एकुण 22 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

 

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 7 हजार 200

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 87 हजार 40

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 845

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 131

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.36 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-1

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-22

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक.

 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. “मिशन कवच कुंडल” अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

0000

 भ्रष्ट कामकाजाबाबत पुराव्यासह

निवेदने सादर करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 24 :-भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्यावतीने नांदेड जिल्ह्यातील सरकारी किंवा निमसरकारी कार्यालयातील भ्रष्ट कामकाजाचे निवारण करण्यासाठी मंगळवार 28 जुन 2022 रोजी सकाळी 10.30 वा. जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात लेखी निवेदने / तक्रारी सादर करता येतील.

 

इच्छुक नागरिकांनी आपली निवेदने अध्यक्ष, जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती समोर लेखी स्वरूपात सादर करावीत. तसेच आपल्याकडे काही सबळ पुरावे असल्यास त्याच्या  दोन प्रती सोबत असणे आवश्यक आहे. या बैठकीला शासनाचे सर्व विभाग प्रमुख उपस्थित राहणार असल्यामुळे  आपल्या निवेदनाची तातडीने दखल घेण्यात येईल व नियमानुसार भ्रष्टाचार करणाऱ्यास अथवा भ्रष्टाचारास वाव देणाऱ्या जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्या विरूद्ध कार्यवाही करण्यात येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी सांगितले आहे.

000000

 राष्ट्रीय परवाना प्राधिकारचे शुल्क व संयुक्त शुल्क आता ऑनलाईन  

नांदेड (जिमाका) दि. 24 :- नांदेड जिल्ह्यातील सर्व चालक, मालक व वाहतूक संघटना यांनी राष्ट्रीय परवाना प्राधिकाराचे शुल्क व संयुक्त शुल्क www.parivahan.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन भरावे, असे आवाहन नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने आहे.

 

अर्जदाराला प्राधिकारपत्रासाठी 1 हजार रुपये शुल्क भरल्यानंतर ते स्वयंचित पद्धतीने मान्य झाल्यानंतर अर्जदारांनी 16 हजार 500 रुपये संयुक्त शुल्क भरण्यासाठी दुरध्वनी संदेश पाठविल्यानंतर ते ऑनलाईन भरता येणार आहेत. यानंतर अर्जदारांना प्राधिकारपत्राची संगणकावर प्रत काढुन सर्व नोंदणी प्राधिकरणांनी ई-स्वाक्षरी केलेले प्राधिकारपत्र ग्राह्य धरण्यात येईल, याची सर्वानी नोंद घ्यावी असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी केले आहे.

000000

Thursday, June 23, 2022

 नांदेड जिल्ह्यात अकरा व्यक्ती कोरोना बाधित   

नांदेड (जिमाका) दि. 23 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या  257 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे 8 व ॲटीजन तपासणीद्वारे 3 अहवाल असे एकूण 11 कोरोना बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 842 एवढी झाली असून यातील 1 लाख 129 रुग्णांना उपचारा नंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या घडीला 21 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृहविलगीकरणातील एका रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 5, कंधार 1, किनवट 1, यवतमाळ 1 व ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 2, धर्माबाद 1 असे एकुण 11 कोरोना बाधित आढळले आहेत. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 6, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणात 15 असे एकुण 21 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

 

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 6 हजार 890

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 86 हजार 834

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 842

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 129

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.37 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-8

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-1

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-21

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक.


कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. “मिशन कवच कुंडल” अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

0000

 गटई लाभार्थ्यांना लोखंडी पत्र्याचे स्टॅाल वाटप

योजनेत 8 जुलै पर्यत अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 23:- शासन निर्णय 13 फेब्रुवारी 2008 अन्वये अनुसूचित जातीतील अनु. क्र. 11 या प्रवर्गातील गटई लाभार्थ्यांना लोखंडी पत्र्याचे स्टॉल (100 टक्के) अनुदानावर वाटप योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी (यापुर्वी लाभ देण्यात आलेले लाभार्थी वगळुन) आपले अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ग्यानमाता शाळे समोर, नांदेड या कार्यालयात 8 जुलै 2022 पर्यंत अर्ज स्वत: स्वसाक्षाकींत करुन सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले आहे.

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे पुढील प्रमाणे आहेत. अर्जदाराचा स्वत:चा प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखला. चालु आर्थिक वर्षातील उत्पन्नाचा दाखला (तहसिलदाराने निर्गमित केलेला). अर्जदाराचे अथवा कुटूबांचे रेशनकार्ड (सांक्षाकित प्रत). गटई कामाचे प्रमाणपत्र / अस्वच्छ व्यवसाय प्रमाणपत्र (ग्रामसेवक / तहसिलदार / मुख्याधिकारी, नगर परिषद क्षेत्र) यांनी निर्गमित केलेले प्रमाणपत्र. जागा नाहरकत प्रमाणपत्र (ग्रामसेवक / तहसिलदार / मुख्याधिकारी, नगर परिषद क्षेत्र) यांनी निर्गमित केलेले प्रमाणपत्र. आधार कार्ड, मतदान कार्ड, वयाचा दाखला, (टी.सी),जागेचा दाखला (नमुना नं. 8), करारनामा (100 च्या बॉडवर).

00000

 जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 6.8 मि.मी. पाऊस 

नांदेड (जिमाका) दि. 22:- जिल्ह्यात गुरुवार 23 जून  रोजी सकाळी  10 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 6.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 94.3 मिलीमीटर पाऊस झाला आहे. 


जिल्ह्यात गुरुवार 23 जून रोजी सकाळी 10 वा. संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 17.2 (100.5), बिलोली-00 (58.1), मुखेड- 5.7 (110.7), कंधार-12.8 (120.5), लोहा-6.7 (76.2), हदगाव-6.2 (80.7), भोकर- 2 (71.9), देगलूर-4.5 (132.5), किनवट- 2.1 (102.1), मुदखेड- 26 (156.7), हिमायतनगर-9 (105.3), माहूर- 0.5 (89.5), धर्माबाद- 00 (50.3), उमरी- 6.4 (107.1), अर्धापूर- 13.9 (78.4), नायगाव- 0.4 (51.8) मिलीमीटर आहे.

0000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...