Tuesday, May 24, 2022

 शालेय शिक्षणासाठी लागणारे विविध

प्रमाणपत्र वेळेत काढून घेण्याचे आवाहन

 

नांदेड, (जिमाका) दि. 24 :- इयत्‍ता दहावी व बारावीच्‍या परीक्षा नुकत्‍याच संपलेल्‍या आहेत. त्‍यानुसार सर्व जण निकालाची वाट पाहत आहेत. निकालानंतर पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेण्‍यासाठी विविध दाखल्‍याची गरज असते. तहसिल कार्यालयामार्फत उत्‍पन्‍नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, राष्‍ट्रीयत्‍व प्रमाणपत्र, शेतकरी असल्‍याचे प्रमाणपत्र, भुमिहिन प्रमाणपत्र इत्‍यादी दाखले  वितरित करण्‍यात येत असतात.  याअनुषंगाने प्रमाणपत्राची आवश्‍यकता असल्‍यास विनाविलंब तात्‍काळ सेतु सुविधा केंद्रामार्फत विहित नमुन्‍यात ऑनलाईन अर्ज दाखल करुन प्रमाणपत्र प्राप्‍त करुन घ्‍यावे, असे आवाहन नांदेड तहसिल कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.  

 

निकालानंतर पुढील प्रवेशासाठी असणारा मर्यादित कालावधी त्‍याचवेळी तहसिल कार्यालयात विविध दाखल्‍यासाठी प्राप्‍त होणाऱ्या  अर्जांचे प्रमाण मोठया प्रमाणात राहु शकते. त्‍यामुळे सर्व अर्जांची तपासणी करण्‍यास वेळ लागतो तसेच सदर केलेल्‍या अर्जात काही त्रुटी असल्‍यास त्‍याची पुर्तता करण्‍यासाठी आपणास पुरेसा वेळ मिळत नाही. तसेच सर्व सेतु केंद्रामार्फत मोठया प्रमाणात प्रमाणपत्रांची आवक वाढून ऑनलाईन प्रमाणपत्र ज्‍या सर्व्‍हरद्वारे देण्‍यात येतात ते सर्व्‍हर युजर्सच्‍या संख्‍या जास्‍त असल्‍यामुळे हॅंग होणे होणे या अडचणी निर्माण होण्‍याची शक्‍यता नाकरता येत नाही. त्‍यामुळे विनाविलंब तात्‍काळ पुढील प्रवेशासाठी लागणाऱ्या प्रमाणपत्रासाठी अर्ज करुन वेळेआधीच प्रमाणपत्र प्राप्‍त करुन घ्‍यावे, असेही आवाहन नांदेड तहसिल कार्यालयाने तालुक्‍यातील सर्व पालक, विद्यार्थी, नागरीक, शिक्षकांना केले आहे.

00000 

 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रोजगार मेळाव्याचे आयोजन

नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी सहभाग नोंदवावा

 

नांदेड, (जिमाका) दि. 24:- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्राच्यावतीने 1 जुन 2022 रोजी सकाळी 11 वा. शासकीय औद्योगिक  प्रशिक्षण संस्था नांदेड येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

 

नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी या रोजगार मेळाव्यामध्ये वेळेवर उपस्थित राहुन संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे. याबाबत काही अडचण असल्यास 02462-251674 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा किंवा nandedrojgar@gmail.com या कार्यालयातील मेल आयडीवर संपर्क साधावा असे प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.

0000000

 शासकीय कार्यालयासाठी भाड्याने जागा हवी आहे 

नांदेड, (जिमाका) दि. 24:- शासकीय कार्यालयासाठी  नांदेड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व सोयींनी युक्त सुसज्ज अशी जागा भाड्याने हवी आहे.

 

कार्यालयासाठी कमीत कमी पंधराशे ते दोन हजार स्क्वेअर फुट जागा अपेक्षित आहे. तसेच कार्यालयातील चार चाकी वाहनासाठी पार्किग असणे आवश्यक आहे. उपयुक्त जागा असल्यास संबंधितांनी 8830131197,  8888988093 या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

000000

 आझादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार लाभधारकांशी संवाद

▪️31 मे रोजी राष्ट्रीय संवादाचे आयोजन
▪️नांदेड जिल्हा प्रशासनातर्फे पूर्व तयारी
नांदेड, (जिमाका) दि. 24:- विविध विकास योजनांच्या माध्यमातून शासनाने सर्वसामान्यांच्या विकासासाठी कटिबद्धता ठेऊन विविध योजना राबविल्या आहेत. या योजनेत प्रामुख्याने प्रधानमंत्री आवास योजना, किसान सन्मान निधी, उज्जवला योजना, पोषण अभियान, मातृ वंदना योजना, स्वच्छ भारत मिशन, जलजीवन मिशन, आणि अमृत, स्वनिधी योजना, वन नेशन वन रेशन कार्ड, गरीब कल्याण अन्न योजना, जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत, मुद्रा योजनांचा समावेश आहे. दुर्गम भागातील लाभार्थ्यांपासून महानगरापर्यंतच्या लाभार्थ्यांपर्यंत या योजनांचा लाभ देण्यात आला आहे. आझादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने या योजनांच्या लाभार्थ्यांशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या 31 मे रोजी प्रत्येक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधणार आहेत. या संवाद कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आढावा बैठक घेऊन सर्व संबंधित यंत्रणेला निर्देश दिले.
डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे झालेल्या या आढावा बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, भोकरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे, देगलूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी जगताप व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
या आढावा बैठकीत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हाती घेतलेल्या अमृत सरवर योजना व इतर योजनांचाही आढावा घेण्यात आला. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतांना विविध लोकोपयोगी व पर्यावरण संतुलनाशी निगडीत असलेल्या योजनांमध्ये लोकांचाही सहभाग अपेक्षित आहे. हा लोकसहभाग घेण्यासमवेत सामाजिक बांधिलकीतून जिल्ह्यातील विविध उद्योगांची यात सहकार्य घेता येईल. शासकीय अधिकाऱ्यांनी केवळ याला नोकरीचा भाग न समजता आपलीही व्यक्तीगत बांधिलकी या नात्याने पुढे सरसावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.
000000



Friday, May 20, 2022

 सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी संकेतस्थळ कार्यान्वित 

·         संकेतस्थळावरील सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन 

नांदेड, (जिमाका) दि. 20 :- राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी मतदार याद्यांचे अधीक्षण, निर्देशन, नियंत्रण करणे व सहकारी संस्थांच्या निवडणुका चांगल्यारितीने पार पाडण्यासाठी https://scea.maharashtra.gov.in/ हे संकेतस्थळ कार्यान्वित केले आहे.   

जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या सहकारी संस्था (250 सभासद व त्यापेक्षा कमी सभासद असणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्था), सर्व कृषि उत्पन्न बाजार समित्याचे निवडणूक कामकाजाचे संनियंत्र प्राधिकरणामार्फत करण्यात येणार आहे. https://scea.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर सहकारी संस्था आणि कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे सभासद, निवडणूक कामकाजाची विविध टप्यांची माहिती, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाची संरचना, निवडणुकांची कार्यपद्धती, त्यासंबंधित अद्यावत कायदे व नियम, हस्त पुस्तिका, जिल्हा  सहकारी निवडणूक अधिकारी / तालुका सहकारी निवडणूक अधिकारी यांची संपर्क यादीसह अन्य उपयुक्त माहिती सुलभरितीने उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

या संकेतस्थळाचा नांदेड जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्था, कृषि उत्पन्न बाजार समित्या, सभासद आणि पदाधिकारी / कर्मचारी यांना कार्यान्वित केलेल्या https://scea.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावरील सुविधेचा लाभ होणार आहे. या संकेतस्थळास राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे यांच्याशी संबंधित सहकार आयुक्त व निबंधक, साखर आयुक्त, पणन संचालक, दुग्धव्यवसाय विकास आयुक्त, वस्त्रोद्योग आयुक्त, गृहनिर्माण विभाग, यांच्या संकेतस्थळाची लिंक देखील उपलब्ध आहे. त्यामुळे संबंधित कामांसाठी नागरिक, सहकारी संस्था व त्यांचे सभासद यांनी या संकेतस्थळाचा वापर करावा, असे आवाहन नांदेडचे जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक डॉ. मुकेश बारहाते यांनी केले आहे.

000000

 प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन   

नांदेड, (जिमाका) दि. 20 :- आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असंघटीत व अनोंदणीकृत अन्नप्रक्रिया उद्योगासाठी असून एक जिल्हा एक उत्पादन या धर्तीवर राबविली जात आहे. ही योजना मोहिम स्वरुपात राबविण्यात येत असून अर्ज करण्यास इच्छुक लाभार्थ्यांनी दर बुधवारी सकाळी 11 ते दुपारी 2 यावेळेत आवश्यक कागदपत्रासह (आधारकार्ड, पॅनकार्ड, वीज बिल, बँक पासबुक, यंत्रसामुग्रीचे कोटेशन, जुना उद्योग असल्यास 2 वर्षापूर्वी स्थापन झालेला असावा व त्याचा पुरावा असावा, इतर परवाने असल्यास ते आणावे) प्रकल्प संचालक आत्मा कार्यालय, संतोष बीज भांडारच्यावर, नवीन मोंढा, नांदेड किंवा संबंधित तालुका कृषि कार्यालयात उपस्थित रहावे. इच्छुकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे. 

नांदेड जिल्ह्यासाठी हळद व इतर मसाले पदार्थ हे उत्पादन मंजुर आहे. या योजनेअंतर्गत वैयक्तिक अन्न प्रक्रिया उद्योगाकरिता, सामाईक पायाभुत सुविधा केंद्रासाठी 35 टक्के अनुदान, ब्रॅडींग व मार्केटींगसाठी एकूण खर्चाच्या 50 टक्के अनुदान स्वयंसहाय्यता गटांना बीज भांडवल लहान उपकरणे खरेदीसाठी 40 हजार प्रती सभासद (4 लाख) पर्यंत अनुदान देय राहील. तसेच या योजनेंतर्गत यापुढे वैयक्तिक नवीन अन्नप्रक्रिया उद्योग आणि सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या वैयक्तिक अन्न प्रक्रिया प्रकल्पांच्या विस्तारीकरणासाठी (जसे गुळ उद्योग, दाळ मिल आदी ) एक जिल्हा एक उत्पादनाच्या व्यतिरीक्त इतर प्रस्ताव देखील या योजनेमध्ये सादर करण्यास मान्यता मिळाली आहे, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी दिली आहे.

000000

 मानव विकास कार्यक्रमांतर्गत गांडुळ कल्चर युनिट,

कृषि औजारे बँक, हळद पिकासाठी औजारे बँक

व सोयाबीन टोकन यंत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड, (जिमाका) दि. 20 :- मानव विकास कार्यक्रम सन 2021-22 अंतर्गत निवडलेल्या तालुक्यात प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील मुदखेड, लोहा, देगलूर, धर्माबाद, बिलोली, किनवट, हदगाव, हिमायतनगर, भोकर, उमरी असे 9 तालुक्यात योजनेअंतर्गत लाभ दिल्या जातो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी या तालुक्यातील नोंदणीकृत गटांनी मंगळवार 31 मे 2022 पर्यंत तालुका कृषि कार्यालयामध्ये अर्ज दाखल करावे. या योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी संबधित तालुका कृषि अधिकारी, कार्यालयाशी संपर्क साधून या योजनेचा सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे. 

कृषि विभागामार्फत मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत गांडुळ कल्चर युनिट उभारणे याबाबीचे 199 आत्मा अंतर्गत नोंदणीकृत गटांचे लक्षांक प्राप्त आहे. तसेच लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लॉटरी पध्दतीने लक्षांकाच्या अधिन राहून लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल. मार्गदर्शक सुचनेप्रमाणे काम पुर्ण करणाऱ्या गटांना 75 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. (प्रकल्‍प खर्च 1 लाख रुपये व अनुदान 75 टक्के जास्तीत जास्त  75 हजार रुपये राहील).‍

कृषि औजारे बँक उभारणे या बाबीसाठी मुदखेड व धर्माबाद या तालुक्यात 3 नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपनींना लाभ देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुदखेड व धर्माबाद तालुक्यातील नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपनी यांनी दिनांक 31 मे 2022 पर्यंत तालुका कृषि कार्यालयामध्ये अर्ज दाखल करावे. तसेच लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लॉटरी पध्दतीने लक्षांकाच्या अधिन राहून लाभार्थी निवड करण्यात येईल. मार्गदर्शक सुचनेप्रमाणे काम पुर्ण करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपनींना 75 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. (प्रकल्‍प खर्च 19.39 लाख रुपये व अनुदान 75 टक्के जास्तीत जास्त रू. 14.54 लाख राहील). 

हळद पिकासाठी औजारे बँक उभारणे या बाबीसाठी लोहा, बिलोली, उमरी, हिमायतनगर, धर्माबाद, मुदखेड व भोकर या तालुक्यामध्ये प्रत्येकी 01 याप्रमाणे लक्षांक प्राप्त आहे. त्यानुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपनी यांनी तालुका कृषि कार्यालयामध्ये दिनांक 31 मे 2022 पर्यंत अर्ज करावे. तसेच लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लॉटरी पध्दतीने लक्षांकाच्या अधिन राहून लाभार्थी निवड करण्यात येईल. मार्गदर्शक सुचनेप्रमाणे काम पुर्ण करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपनींना 75 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. (प्रकल्‍प खर्च   रू. 20.02 लाख व अनुदान 75 टक्के जास्तित जास्त रू. 15.02 लाख राहील).

सोयाबीन टोकन यंत्र पुरवठा करणे या बाबीसाठी मुदखेड तालुक्यातील 25 आत्मा अंतर्गत महिला शेतकरी बचत गटांना लाभ देण्यात येणार आहे. त्यानुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणीकृत महिला शेतकरी गटांनी तालुका कृषि कार्यालयामध्ये दिनांक 31 मे 2022 पर्यंत अर्ज करावे. तसेच लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लॉटरी पध्दतीने लक्षांकाच्या अधिन राहून लाभार्थी निवड करण्यात येईल. मार्गदर्शक सुचनेप्रमाणे सोयाबीन टोकन यंत्राचे टेस्ट रिपोर्ट घेणे बंधनकारक आहे. अशा महिला शेतकरी गटांनाप्रकल्प खर्चाच्या 75 टक्के अनुदान देण्यात येणार आहे, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.

00000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...