Friday, July 9, 2021

मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत

नांदेड जिल्ह्यातील 600 युवकांना मिळणार प्रशिक्षण

 

नांदेड (जिमाका) दि.9 :- कोविड-19 मुळे वैद्यकीय क्षेत्रात विविध मनुष्यबळाची निर्माण झालेली गरज लक्षात घेवून आवश्यक असलेली तंत्र कुशलता इच्छूक विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी महत्वाकांक्षी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. याचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमास कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री नवाब मलिक, उद्योग मंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपेद्रसिंह कुशवाह उपस्थित होते.

 

तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकित्सक तसेच प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षणार्थी उमेदवार उपस्थित होते.

 

हे प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य विकास रोजगार व उद्योजगता विभागातर्गंत महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांचा प्रशिक्षण केंद्र म्हणून समावेश करण्यात आला आहे. यानुसार नांदेड जिल्ह्यात डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. याच बरोबर एसजीजीएस स्मारक शासकीय रुग्णालय नांदेड, शासकीय महिला रुग्णालय शामनगर नांदेड, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नांदेड आणि क्रिसेंट ब्लड सेंटर येथे हे प्रशिक्षण दिले जाईल. प्रत्येक केंद्रावर वेगवेगळया विषयाचे प्रशिक्षण पुढीलप्रमाणे आहे.

 

डॉ.  शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय विष्णुपूरी नांदेड येथे 12 विज्ञान शाखेसाठी एमरजंसी मेडीकल टेक्निशीएन  बेसीक, फ्लेबोटॉमीस्ट मेडिकल, रिकॉर्ड ॲन्ड हेल्थ इंन्फॉरमेशन टेक्निशिअन 8 वी उत्तीर्ण युवकांसाठी जनरल ड्यूटी असिस्टंटõ, होम हेल्थ एड÷, एसजीजीएस स्मारक शासकीय रूग्णालय येथे 12 विज्ञान युवकांसाठी सेंन्ट्रल स्ट्राइल सर्व्हिस डिपार्टमेंट असिस्टंट, हॉस्पीटल फ्रंट डेस्क कॉर्डिनेटर, मेडिकल रिकॉर्ड हेल्थ इंन्फॉरमेशन टेक्निशिअन तसेच आयटीआय / डीप्लोमा क्षेत्राशी मेडिकल इक्युपमेंट टेक्नालॉजी असिस्टंट. शासकीय महिला रूग्णालय श्यामनगर नांदेड 12 वी फ्लेबोटॉमीस्ट, 12 विज्ञानसाठी मेडिकल रिकॉर्ड ॲन्ड हेल्थ इंन्फॉरमेशन टेक्निशिअन, 10 वीसाठी जनरल ड्यूटी असिस्टंट-ॲडव्हॉन्स, सॅनेटरी हेल्थ ॲड, ड्रेसर (मेडीकल), 8 वीसाठी जनरल ड्यूटी असिस्टंट तर शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय वजिराबाद येथे 12 वी साठी योगा वेलनेस ट्रेनरú, योगा थेरपी असिस्टंट, पंचकर्मा टेक्निशियन, 10 वीच्या युवकांसाठी क्षारा कर्मा टेक्निशियन, कूपिंग थेरपी असिस्टंट, आयुर्वेदा आहार ॲन्ड पोशक सहायक, 8 वीच्या युवकांसाठी असिस्टंट योगा इंन्स्ट्रक्टर, बीएएमएसच्या विद्यार्थ्यांसाठी आयुर्वेदा डायटीशीयन तर द क्रिसेंट ब्लड सेंटर येथे 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी जनरल डयुटी असिटंट (ॲडव्हान्स) या अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षण होणार आहे.

 

नांदेड येथून या कार्यक्रमास डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयचे डॉ. पी. टी. जमदाडे, सहयोगी प्राध्यापक डॉ. आय. एफ. ईनामदार, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, शासकीय आर्युवेदिक महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. यशवंत पाटील, डॉ. शितल चव्हाण तसेच संबंधित सर्व कोर्सेसचे प्राध्यापक व सहायक प्राध्यापक, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार, गौरव इंगोले, जिल्हा कौशल्य विकास समन्वयक इरफान खान, राहुल गजभारे, विरेंद्र चव्हाण, रजाक सय्यद हे उपस्थित होते.

 

यावेळी जिल्ह्यातील इच्छूक पात्र युवक-युवतीनी प्रवेश प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व मार्गदर्शन केंद्र नांदेड येथे प्रत्यक्ष अथवा 02462-251674 या दूरध्वनीवर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त रेणूका तम्मलवार यांनी केले आहे.







0000

Thursday, July 8, 2021

 

जिल्ह्यातील 62 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण

 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 62 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. शुक्रवार 9 जुलै 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

 

मनपा क्षेत्रातील शासकीय श्री गुरु गोविंद सिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, स्त्री रुग्णालय या 3 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर श्री गुरु गोविंद सिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, रेल्वे हॉस्पिटल, पोर्णिमानगर, सांगवी, खडकपुरा, करबला, अरबगल्ली, तरोडा, विनायकनगर या 19 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत.

 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत.  ग्रामीण रुग्णालय बिलोली, मुदखेड, उमरी या 3 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस, उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 14 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. तर उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा, ग्रामीण रुग्णालय लोहा या केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 50 डोस उपलब्ध आहेत.

 

जिल्ह्यातील 24 प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर 3 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 50 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. 

 

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

 

जिल्ह्यात 7 जुलै पर्यंत एकुण 6 लाख 54 हजार 428 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर 8 जुलै पर्यंत कोविड-19 लसीचा साठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 5 लाख 31 हजार 830 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 79 हजार 360 डोस याप्रमाणे एकुण 7 लाख 11 हजार 190 डोस प्राप्त झाले आहेत.

 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले. 

00000

 

पॉलिटेक्निक अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया सुरू

दहावीच्या निकालापूर्वीच प्रवेश इच्छूक विद्यार्थी करू शकतात नाव नोंदणी 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी दहावी नंतरच्या पॉलिटेक्निक डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया 30 जून 2021 पासून शासकीय तंत्रनिकेतन येथे सुरू करण्यात आली आहे. सिव्हिल, मेकॅनिकल, इलेट्रीकल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलजी, प्रॉडक्शन, मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स या शाखांचे प्रत्येकी तीन वर्षांचे अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम चालवले जातात. या केन्द्रीभूत प्रवेश प्रक्रियेत दहावीच्या निकालापुर्वीच प्रवेश इच्छूक विद्यार्थ्यांनी सहभागी होण्यासाठी dtemaharashtra.gov.in या वेबसाईटवर शुक्रवार 23 जुलै 2021 पर्यंत ऑनलाईन नोंदणी करुन प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन शासकीय तंत्रनिकेतन प्राचार्य डॉ. गोरक्ष गर्जे यांनी केले आहे. 

यावर्षी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पॉलिटेक्निक प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा (सीईटी) नसल्याने विद्यार्थ्यांना केवळ दहावीच्या गुणांनुसार प्रथम वर्षात प्रवेश मिळणार आहे. प्रथम वर्षात प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थी व त्यांचे पालकांना मार्गदर्शन व सहाय्य करण्यासाठी शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथे विनामूल्य सुविधा केंद्र स्थापन करण्यात आले आहे. 

दहावीच्या निकालापूर्वीच प्रवेश इच्छूक विद्यार्थ्यांना dtemaharashtra.gov.in या वेबसाईटवर नोंदणी व अर्ज करता येईल. अर्जात विद्यार्थ्यांना शालांत परीक्षेचा आसन क्रमांक अचूकपणे टाकायचा आहे. शालांत परीक्षेच्या निकालानंतर माध्यमिक शिक्षण मंडळाकडुन संबंधित विद्यार्थ्यांचे गुण प्राप्त होतील व अर्जदार विद्यार्थ्यांचा प्रवेश अर्ज अपडेट होईल. ऑनलाईन फॉर्म भरताना मुळ कागदपत्रे अपलोड करावयाची आहेत. प्रवेश अर्ज भरण्यासाठी ई-स्क्रुटिनी व प्रत्यक्ष स्क्रुटिनी (म्हणजे संस्थेत जाऊन) असे पर्याय उपलब्ध आहेत. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी ई-स्क्रुटिनी या पर्यायाची निवड करता येईल. इ-स्क्रुटिनीमध्ये विद्यार्थी स्वतःच्या संगणकाद्वारे किंवा मोबाईलद्वारे प्रत्यक्ष सुविधा केंद्रावर न जाता  घरूनच अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करू शकतात. प्रत्यक्ष स्क्रुटिनीसाठी  विद्यार्थ्यांना मूळ कागदपत्रांसह सुविधा केन्द्रावर उपस्थित राहावे लागेल.

शासकीय तंत्रनिकेतन नांदेड या 1964 मध्ये सुरू झालेल्या संस्थेत सिव्हिल, मेकॅनिकल, इलेट्रीकल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलजी, प्रॉडक्शन, मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स या शाखांचे प्रत्येकी तीन वर्षांचे अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम चालवले जातात. अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. तसेच या अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या अनेक शिष्यवृत्या उपलब्ध आहेत. रोजगाराभिमुख अभियांत्रिकी शिक्षण ही काळाची गरज असून शालांत परीक्षा निकालापूर्वीच सुरू झालेल्या प्रवेश प्रक्रियेत इच्छुक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असेही आवाहन शासकीय तंत्रनिकेतन प्राचार्य डॉ.गोरक्ष गर्जे यांनी केले आहे.

0000

 

जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 36.2 मि.मी. पाऊस 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- जिल्ह्यात गुरुवार 8 जुलै 2021 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 36.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात दिवसभरात एकुण 47.9 मिलीमीटर पाऊस झाला आहे. 

जिल्ह्यात गुरुवार 8 जूलै रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुका निहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 23.5 (25.4), बिलोली- 42.3 (57.2), मुखेड- 27.9 (63.2), कंधार- 20.3 (23.1), लोहा- 23.5 (27.7), हदगाव-38.8 (39), भोकर- 59 (62.8), देगलूर- 33.6 (52.3), किनवट- 57.7 (80.5), मुदखेड- 36.6 (39), हिमायतनगर-28 (30.2), माहूर- 21.4 (34.9), धर्माबाद- 45 (65.1), उमरी- 56.3 (75.6), अर्धापूर- 26.6 (27.9), नायगाव- 52.4 (70.4) मिलीमीटर आहे.

0000

Wednesday, July 7, 2021

 

जिल्ह्यातील 67 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण

 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 67 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. गुरुवार 8 जुलै 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

 

मनपा क्षेत्रातील शासकीय श्री गुरु गोविंद सिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड या 3 केंद्रावर कोविशील्ड लसीचे 100 डोस तर श्री गुरु गोविंद सिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, रेल्वे हॉस्पिटल, पोर्णिमानगर, सांगवी, खडकपुरा, करबला, अरबगल्ली, तरोडा, विनायकनगर या 19 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत.

 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत.  ग्रामीण रुग्णालय बिलोली व मुदखेड येथे कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस, ग्रामीण रुग्णालय मांडवी येथे 50 डोस तर उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 15 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत.  

 

जिल्ह्यातील 28 प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर 5 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 50 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. 

 

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

 

जिल्ह्यात 6 जुलै पर्यंत एकुण 6 लाख 46 हजार 874 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर 7 जुलै पर्यंत कोविड-19 लसीचा साठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 5 लाख 13 हजार 530 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 79 हजार 360 डोस याप्रमाणे एकुण 6 लाख 92 हजार 890 डोस प्राप्त झाले आहेत.

 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले. 

00000

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...