Tuesday, July 6, 2021

 

माजी सैनिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी बैठकीचे आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 6 :-  जिल्ह्यातील माजी सैनिकांचे व सेवारत सैनिकांच्या कुटूंबातील सदस्यांच्या अडी-अडचणी व विविध विभागात प्रलंबित असलेली प्रकरणे निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार 22 जुलै  2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सकाळी 11.30 वा. बैठकीचे आयोजन केले आहे.  

प्रलंबित प्रकरणाचा वेळेत व तातडीने निपटारा करण्यासाठी प्रत्येक महिण्याच्‍या तिसऱ्या बुधवारी या बैठकीचे आयोजन करण्यात येते. माजी सैनिकांनी त्यांच्याकडील प्रलंबित अर्जांची  एक  प्रत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सोमवार 12 जुलै  पर्यंत सादर करावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे.  

00000

 

दहावी परीक्षेच्या सुधारित मुल्यमापन कार्यपद्धतीनुसार

संगणकीय प्रणालीत गुणांच्या नोंदी घेण्याचे आवाहन  

 

नांदेड (जिमाका) दि. 6 :- माध्यमिक शाळांना संगणक प्रणालीत विद्यार्थ्यांच्या गुणांची नोंद करताना काही अडचणी आल्या आहेत, त्यांनी त्या संबंधिच्या मूळ अभिलेखासह शुक्रवार 9 जुलै 2021 पर्यंत संबंधित विभागीय मंडळाशी त्यांनी निश्चित केलेल्या नियोजनानुसार संपर्क साधावा, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.

 

इयत्ता दहावी परीक्षा सन 2021 सुधारित मूल्यमापन कार्यपद्धती संदर्भात तपशिलवार सूचना सर्व संबंधित माध्यमिक शाळा व विभागीय मंडळांना एका परिपत्रकाद्वारे यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. विद्यार्थी निहाय गुण नोंदणी करण्यासाठी मंडळामार्फत प्रथमच संगणकीय प्रणाली उपलब्ध करुन देण्यात आली होती. या प्रणालीमध्ये विद्यार्थी निहाय गुणांची नोंद करताना शाळा स्तरावर काही त्रुटी / चुका राहिल्याची बाब निदर्शनास आली आहे. या त्रुटी / चुकांची पडताळणी करुन यथानियम कार्यवाही करण्याबाबत विभागीय मंडळाना तपशीलवार सूचना देण्यात आल्या आहेत.

 

शाळांना संगणक प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणांची नोंद करताना आलेल्या अडचणी या पुढीलप्रमाणे आहेत. संगणक प्रणालीमध्ये विहित मुदतीत काही विद्यार्थ्यांचे गुण भरलेले नाहीत. विद्यार्थी निहाय गुण भरले, निश्चित केले नाहीत. विद्यार्थी निहाय गुण भरले, निश्चित केले पण त्रुटी राहिल्या व चुका झाल्या आहेत. विद्यार्थ्यांचे एखाद्या विषयाचे / भागाचे गुण / श्रेणी भरलेले नाहीत. इयत्ता 9 वी, इयत्ता 5 वी ते 9 वी (लागू असल्याप्रमाणे) टक्केवारी भरलेली नाही. पुनर्परिक्षार्थीच्या बाबतीत श्रेणी विषयाची श्रेणी दर्शवितांना सध्याच्या तीन श्रेणी विषयांव्यतिरिक्त विद्यार्थ्यांचे जुने श्रेणी विषय असल्यास 4 श्रेणी / 1,2,3 श्रेणी दर्शविण्यात आलेली आहे. उशीराने अर्ज भरल्यामुळे बैठक क्रमांक प्राप्त झाला नाही व त्यामुळे संगणक प्रणालीत विद्यार्थ्याचे गुण / श्रेणी भरता आले नाही. आवेदन पत्र भरताना परीक्षार्थी प्रकार (जसे नियमित, पुनर्परिक्षार्थी, खाजगी, तूरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी) चुकल्याने संगणक प्रणालीत गुण / श्रेणी भरता आले नाही. अर्ज भरताना विद्यार्थ्यांना विषयास सूट असताना प्रविष्ट दाखविणे / प्रविष्ट असताना सूट दाखविणे यामुळे संगणक प्रणालीत गुण / श्रेणी भरता आले नाही. याबाबत जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक, माध्यमिक शाळा, शिक्षक व इतर सर्व संबंधित घटकांनी नोंद घ्यावी, असेही आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे.

000000

 

जिल्ह्यातील 52 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण

 

नांदेड (जिमाका) दि. 6 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 52 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. बुधवार 7 जुलै 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

 

मनपा क्षेत्रातील शासकीय डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे कोविशील्ड लसीचे 100 डोस तर श्री गुरु गोविंद सिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, रेल्वे हॉस्पिटल, पोर्णिमानगर, सांगवी, खडकपुरा, करबला, अरबगल्ली, तरोडा, विनायकनगर या 19 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत.

 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत.  ग्रामीण रुग्णालय बिलोली, मुदखेड येथे कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस, उपजिल्हा रुग्णालय हदगाव, ग्रामीण रुग्णालय मांडवी, उमरी या केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 50 डोस उपलब्ध आहेत. तर उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, नायगाव, उमरी या 14 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत.

 

जिल्ह्यातील 13 प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर 6 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 50 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. 

 

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

 

जिल्ह्यात 5 जुलै पर्यंत एकुण 6 लाख 40 हजार 203 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर 5 जुलै पर्यंत कोविड-19 लसीचा साठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 5 लाख 13 हजार 530 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 79 हजार 360 डोस याप्रमाणे एकुण 6 लाख 92 हजार 890 डोस प्राप्त झाले आहेत.

 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले. 

00000

Monday, July 5, 2021

सुधारित वृत्त

 

डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी संचालक वैद्यकिय शिक्षण पदाचा स्विकारला अतिरिक्त कार्यभार    

नांदेड (जिमाका) दि. 5 :-  डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दिलीप म्हैसेकर यांना संचालक वैद्यकिय शिक्षण व संशोधन मुंबई या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. यापूर्वी या पदाचा कार्यभार डॉ. तात्याराव लहाने यांच्याकडे होता. त्यांच्या सेवानिवृत्तीमुळे हे पद रिक्त झाले होते. वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सहसचिव शिवाजी पाटणकर यांनी हे आदेश निर्गमीत केले. 

श्वसन विकास शास्त्र या विषयात त्यांचे पदव्युत्तर शिक्षण झाले आहे. यापुर्वी त्यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठ, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठ नांदेड येथील अतिरिक्त कुलगुरु म्हणून कार्यभार पाहिलेला आहे.  



00000

 

योजनेसाठी पात्र असलेले कोणतेही कुटूंब वंचित राहता कामा नये -         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर  

नांदेड (जिमाका) दि. 5 :- जिल्ह्यातील कोरोना संक्रमनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांची अधिक ओढा ताण होऊ नये यासाठी शासनाने महसूल विभाग, महिला व बालविकास योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना आणि सामाजिक न्याय विभागाच्या योजना तत्परतेने राबविण्याची मोहिम हाती घेतली आहे. यानुसार शासनातर्फे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबांना भेटून माहिती गोळा केली जात आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील 1 हजार 20 मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाची पाहणी केली आहे. यातील विविध योजनांच्या अटी व शर्तीनुसार पात्र असलेली एकही व्यक्ती योजनेच्या लाभापासून वंचित राहता कामा नये याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले.  

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना विविध शासकिय योजनांचा लाभ मिळावा यासाठी कोविड-19 टास्क फोर्सची बैठक जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या बैठकीस मनपा आयुक्त सुनिल लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदिप कुलकर्णी, महिला व बालविकास अधिकारी श्रीमती आर. पी. काळम, जिल्हा आरोग्य विभागाचे डॉ. शिवशक्ती पवार, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंघ बिसेन, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, मनपा उपायुक्त अजितपाल संधू उपस्थित होते. याचबरोबर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे तहसिलदार यांनी या बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभाग घेऊन आपआपल्या तालुक्यातील माहिती दिली. 

कोविड-19 मुळे मृत्यू पावलेल्या कुटुंबातील व्यक्तींची अधिक आर्थिक हेळसांड होऊ नये यासाठी शासनाने प्राधान्याने सर्व विभागातील योजना एकत्रीत राबवून जे लाभार्थी ज्या योजनेला पात्र होतील त्या योजना त्यांना देण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही योजना अत्यंत महत्वाची असून प्रत्येक तहसिलदारांनी आपल्या तालुक्यातील माहिती युद्ध पातळीवर गोळा करुन ती तात्काळ सादर करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी दिले. 

सद्यस्थितीत कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या 1 हजार 20 व्यक्तींच्या परिवाराला भेट देऊन माहिती गोळा करण्यात आली आहे. यातील 712 व्यक्तींच्या परिवारासाठी विविध शासकिय योजनांचे लाभ मिळावेत याबाबत प्रस्ताव सादर केले जात असल्याची माहिती महिला व बालविकास अधिकारी श्रीमती आर. पी. काळम यांनी दिली.

00000



 

जिल्ह्यातील 53 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण

 

नांदेड (जिमाका) दि. 5 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 53 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. मंगळवार 6 जुलै 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

 

मनपा क्षेत्रातील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शहरी दवाखाना कौठा या 3 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर श्री गुरु गोविंद सिंघजी जिल्हा रुग्णालय कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 80 डोस उपलब्ध आहेत.

 

श्री गुरु गोविंद सिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, पोर्णिमानगर, सांगवी, खडकपुरा, करबला, अरबगल्ली, तरोडा, विनायकनगर या 18 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस तर रेल्वे हॉस्पिटल नांदेड येथे कोव्हॅक्सीन लसीचे 80 डोस उपलब्ध आहेत.

 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय हदगाव, ग्रामीण रुग्णालय बिलोली, मांडवी, लोहा, मुदखेड या 5 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर उपजिल्हा रुग्णालय देगलूर, ग्रामीण रुग्णालय उमरी या केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 50 डोस उपलब्ध आहेत.

 

उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, कंधार, हिमायतनगर, मांडवी, माहूर, मुदखेड, बारड, उमरी या 14 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत.

 

जिल्ह्यातील 16 प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर 3 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 50 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. 

 

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

 

जिल्ह्यात 4 जुलै पर्यंत एकुण 6 लाख 33 हजार 457 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर 5 जुलै पर्यंत कोविड-19 लसीचा साठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 5 लाख 13 हजार 530 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 79 हजार 360 डोस याप्रमाणे एकुण 6 लाख 92 हजार 890 डोस प्राप्त झाले आहेत.

 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले. 

00000

 

नांदेड जिल्ह्यात 3 व्यक्ती कोरोना बाधित तर 17 कोरोना बाधित झाले बरे   

नांदेड (जिमाका) दि. 5 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 610 अहवालापैकी  3 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 2 तर अँटिजेन तपासणीद्वारे 1 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 91 हजार 277 एवढी झाली असून यातील 88 हजार 697 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 79 रुग्ण उपचार घेत असून 4 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 906 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 2 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 1 असे एकूण 3 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 17 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 1, बिलोली तालुक्यांतर्गत 6, मुखेड कोविड रुग्णालय 3, लोहा कोविड रुग्णालय 5, मनपा अंतर्गत एनआरआय भवन, गृह विलगीकरण व जम्बो कोविड सेंटर मधील 2 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 79 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी  5, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 3, खाजगी रुग्णालय 1, देगलूर कोविड रुग्णालय 2, हदगाव कोविड रुग्णालय 2, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 41, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 25 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 126, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 145 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 6 लाख 17 हजार 783

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 5 लाख 14 हजार 777

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 91 हजार 277

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 697

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 906

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.17 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-11

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-80

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-79

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-4                       

00000

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...