Monday, April 12, 2021

1 हजार 294 कोरोना बाधित बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी नांदेड जिल्ह्यात 1 हजार 798 व्यक्ती कोरोना बाधित 26 जणांचा मागील चार दिवसांत मृत्यू कोरोनाबाबत जनजागृतीसाठी जागरुक नागरिकांना योगदान देण्याचे आवाहन

 

1 हजार 294 कोरोना बाधित बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी 

नांदेड जिल्ह्यात 1 हजार 798 व्यक्ती कोरोना बाधित

 26 जणांचा मागील चार दिवसांत मृत्यू

कोरोनाबाबत जनजागृतीसाठी जागरुक नागरिकांना योगदान देण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 12 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 5 हजार 967 अहवालापैकी 1 हजार 798 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 1 हजार 41 तर अँटिजेन तपासणीद्वारे 757 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 59 हजार 408 एवढी झाली असून यातील 45 हजार 191 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 12 हजार 859 रुग्ण उपचार घेत असून 188 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी                   डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

दिनांक 8 ते 11 एप्रिल या चार दिवसांच्या कालावधीत 26 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 103 एवढी झाली आहे.   दिनांक 8 एप्रिल रोजी  जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे दिलीपसिंग कॉलनी नांदेड येथील 33 वर्षाची महिला, वामन नगर नांदेड येथील 60 वर्षाची महिला, उमरी येथील 70 वर्षाचा पुरुष, लंबकानी ता. भोकर येथील 40 वर्षाचा पुरुष, गोळेगाव येथील 30 वर्षाचा पुरुष, रामदरी ता. अर्धापूर येथील 65 वर्षाचा पुरुष, रुई ता. नायगाव येथील 55 वर्षाचा पुरुष, आसरा नगर येथील नांदेड 65 वर्षाचा पुरुष, माणिक नगर नांदेड येथील 85 वर्षाचा पुरुष, दिनांक 9 एप्रिल रोजी संभाजी चौक सिडको येथील 65 वर्षाचा पुरुष, उमरी येथील 38 वर्षाचा पुरुष, मुगट येथील 60 वर्षाचा पुरुष, हिवरा ता. देगलूर येथील 50 वर्षाचा पुरुष, दिनांक 10 एप्रिल रोजी मुखेड कोविड रुग्णालय येथे 43 वर्षाची महिला, जहूर येथील 43 वर्षाची महिला, देगलूर कोविड रुग्णालयात आझाद कॉलनी येथील 55 वर्षाची महिला, लख्खा ता . देगलूर येथील 65 वर्षाचा पुरुष, दिनांक 11 एप्रिल रोजी गोदावरी कोविड रुग्णालय येथे मंत्री नगर नांदेड येथील 70 वर्षीय पुरुष, टिळक नगर नांदेड येथील 73 वर्षीय महिला, अपेक्षा कोविड रुग्णालय येथे हडको येथील 65 वर्षीय महिला, हुंडा ता. उमरी येथील 65 वर्षीय पुरुष, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे शिक्षक कॉलनी ता. लोहा येथील 64 वर्षाचा पुरुष, विकास नगर नांदेड येथील 68 वर्षीय महिला, हडको नांदेड येथील 70 वर्षीय पुरुष, आसर्जन नांदेड येथील 86 वर्षीय महिला, कंधार येथील 67 वर्षीय पुरुष, मुदखेड येथील 53 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76.6 टक्के आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 372, नांदेड ग्रामीण 31, अर्धापूर 9, बिलोली 2, देगलूर 45, धर्माबाद 15, हदगाव 103, हिमायतनगर 1, कंधार 129, किनवट 24, लोहा 75, माहूर 6, मुदखेड 5, मुखेड 40, नायगाव 147, उमरी 32, हिंगोली 3, लातूर 1, यवतमाळ 1 असे  एकूण 1 हजार 41 बाधित आढळले.

 

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे मनपा क्षेत्रात 225, बिलोली 1, हिमायतनगर 6, मुदखेड 20, हिंगोली 2, नांदेड ग्रामीण 16, देगलूर 35, कंधार 7, मुखेड 76, अर्धापूर 57, धर्माबाद 22, किनवट 101, नायगाव 24, हदगाव 43, लोहा 38, उमरी 22, माहूर 21, लातूर 1, भोकर 37, परभणी 2, नंदुरबार 1 व्यक्ती असे एकूण अँन्टिजेन तपासणीद्वारे 757 बाधित आढळले.

 

आज 1 हजार 294 कोरोनाबाधित रुग्णांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी 20, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 47, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 16, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण 840, मुखेड कोविड रुग्णालय 34, हदगाव कोविड रुग्णालय 34, कंधार तालुक्याअंतर्गत 3 , नायगाव तालुक्याअंतर्गत 17, भोकर तालुक्याअंतर्गत 25, किनवट कोविड रुग्णालय 27, बारड कोविड केअर सेंटर 18, उमरी तालुक्याअंतर्गत 22, हिमायतनगर तालुक्याअंतर्गत 7, अर्धापूर तालुक्याअंतर्गत 20, लोहा तालुक्याअंतर्गत 50, खाजगी रुग्णालय 114 यांचा समावेश आहे.

 

जिल्ह्यात 12 हजार 859 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 259, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 117, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 222, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 179, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 135, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 177, देगलूर कोविड रुग्णालय 50, जैनब हॉस्पिटल कोविड केअर सेंटर 66, बिलोली कोविड केअर सेंटर 91, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 31, नायगाव कोविड केअर सेंटर 77, उमरी कोविड केअर सेंटर 83, माहूर कोविड केअर सेंटर 43, भोकर कोविड केअर सेंटर 12, हदगाव कोविड रुग्णालय 48, हदगाव कोविड केअर सेंटर 126, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 105, कंधार कोविड केअर सेंटर 71, धर्माबाद कोविड केअर सेंटर 124, मुदखेड कोविड केअर सेंटर 19, अर्धापूर कोविड केअर सेंटर 25, बारड कोविड केअर सेंटर 22, मांडवी कोविड केअर सेंटर 11, महसूल कोविड केअर सेंटर 97, एनआरआय कोविड केअर सेंटर 92, पंजाब भवन कोविड केअर सेंटर 275, नांदेड मनपाअंतर्गत गृहविलगीकरण 5 हजार 163, नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 3 हजार 362, खाजगी रुग्णालय 1 हजार 777 असे एकूण 12 हजार 859 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

आज रोजी सांयकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 5, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 2, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 10 खाटा उपलब्ध आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 3 लाख 80 हजार 558

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 3 लाख 13 हजार 684

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 59 हजार 408

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 45 हजार 191

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 103

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76.6 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-41

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-65

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-397

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-12 हजार 859

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-188.

00000

 

रस्त्याने मोकाट फिराल तर जागेवरच कोरोना तपासणीसह

आणि आकारला जाईल दंड

-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नांदेड, (जिमाका) दि. 12 :- नांदेड महानगरातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी व्यापाऱ्याच्या कोविड चाचणीवर भर दिल्यानंतर आता विविध भागात मोकाट फिरणाऱ्या व्यक्तींवर कायदेशिर कारवाईसाठी सहा पथके नियुक्त करण्यात आले आहेत. दोषीविरुध्द जागेवरच आर्थिक दंड आकारण्यासाठी हे पथक उद्या दि. 13 एप्रिल 2021 पासून महानगरात  कार्यरत होणार आहे. अशा व्यक्तींमध्ये कुणाबद्दल जर शंका आली तर त्या व्यक्तींची तात्काळा कोरोना टेस्ट करुन त्यांना उपचारासाठी कोविड केअर सेंटरमध्ये रवाना केले जाईल असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.

भारतीय दंड संहिता 1860, साथरोग प्रतिबंध कायदा 1897, फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार यापूर्वी काढलेल्या आदेशानुसार कारवाई केली जाईल. नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर मोकाट फिरणे टाळून स्वत: व  आपल्या कुटूंबातील सदस्यांना कोरोनाची बाधा होणार नाही यांची काळजी घ्यावी असे, आवाहन डॉ. विपीन इटनकर यांनी केले.  कारवाईसाठी नियुक्त करण्यात आलेल्या प्रत्येक पथकात आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

00000

 

कोरोनातून बरे होण्यासाठी वेळेवर उपचार अत्यावश्यक

प्रत्येक बाधितांना नसते रेमडेसिवीरची आवश्यकता

                                        - जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर

              जिल्ह्यात कोव्हिड-19 लसीकरण बहुमाध्यम जनजागृती अभियानास प्रारंभ




नांदेड, (जिमाका) दि. 12 :- जनतेने मनामध्ये कोणतीही शंका न बाळगता कोव्हिड -19 चे लसीकरण करून घ्यावे, तसेच उपलब्ध असलेल्या दोन्ही प्रकारच्या लस सुरक्षीत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो महाराष्ट्र आणि गोवा राज्य, पुणे यांच्यावतीने कोव्हिड -19 लसीकरण तसेच आत्मनिर्भर भारत अभियान या विषयावर बहुमाध्यम चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती अभियानाच्या उदघाटन प्रसंगी आज जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा माहीती अधिकारी विनोद रापतवार, क्षेत्रीय लोकसंपर्क ब्यूरो, नांदेडचे प्रचार अधिकारी माधव जायभाये, सहायक प्रचार अधिकारी सुमीत दोडल आदी मान्यवर उपस्थित होते.

सुरक्षित अंतर व शासनाने निर्गमित केलेल्या सूचना लक्षात घेवून जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांपर्यत कोरोना लसीकरण व उपाययोजनाबाबत वेळोवेळी संदेश पोहचणे तेवढेच अत्यावश्यक आहे असे जिल्हाधिकारी        डॉ. विपीन इटनकर यांनी  स्पष्ट करुन कोरोना बरा करण्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनच लागते ही निर्माण झालेली अंधश्रध्दा प्रत्येकाने दूर केली पाहीजे असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.

 जनजागृतीच्या या उपक्रमातून जनतेच्या मनातील लसीकरणाबाबातच्या शंका दुर होऊन अधिकाधिक जनता लसीकरण करून घेईल. असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.  कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी जनतेने आवश्यकतेनुसार घराबाहेर पडावे तसेच  मास्कचा वापर, किमान 6 फुटाचे अंतर तसेच वेळोवेळी हाताची स्वच्छता करणे या त्रीसूत्रीचा अवलंब करणे गरजेचे आहे असे सांगून या त्रीसूत्रिचा वापर आणि लसीकरण केले तरच आपल्याला कोरोना आजारावर मात करता येईल यासाठी जनतेने सहकार्य करावे असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी  केले. 

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात या बहुमाध्यम चित्ररथाचे उदघाटन आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून तसेच फित कापून करण्यात आले. या बहुमाध्यम चित्ररथामध्ये शाहीर रमेश गीरी आणि सहकारी यांच्याद्वारे गीत व नाटक सादरीकरणाच्या माध्यमातून कोरोना लसीकरण, आत्मनिर्भर भारत, शासनाच्या विविध योजना आणि उपक्रमांची जनजागृती करण्यात येणार आहे. या प्रचार मोहिमेचा मुळ उद्देश हा लोकांपर्यत लसीकरण मोहिमेची खरी माहिती देऊन त्यांचा संभ्रम दूर करणे हा आहे.

“लोकल फॅार व्होकल ” हे ब्रीद वाक्य घेऊन राबविण्यात येत असलेल्या आत्मनिर्भर भारत अभियान या योजनेची माहिती ग्रामीण भागातील लोकांना देण्याचे अमुल्य कार्य या जनजागृती अभियानातून केले जाणार आहे. तसेच एलईडी डिस्प्लेच्या माध्यमातूनही संदेश दाखविण्यात येणार आहेत.  तसेच श्राव्य संदेशाचाही समावेश या चित्ररथात करण्यात आला आहे.

पुढील 20 दिवस नांदेड जिल्ह्यातील लोहा, कंधार, मुखेड, भोकर, उमरी, हदगाव तसेच नांदेड या तालुक्यातील ग्रामीण भागात तसेच शहरी भागातून या चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे.

00000

 

 

 

 

 

 

Sunday, April 11, 2021

रेमेडिसिव्हीर इंजेक्शनच्या व्यवस्थापन व यातील काळा बाजार रोखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश

 

रेमेडिसिव्हीर इंजेक्शनच्या व्यवस्थापन व यातील काळा बाजार रोखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश  

 

नांदेड (जिमाका) दि. 11 :- कोरोना विषाणूमुळे जिल्ह्यात असलेला प्रादुर्भाव लक्षात घेता केवळ भितीपोटी रेमेडिसिव्हीर इजेंक्शनबाबत ज्यांना आवश्यकता नाही ते सुध्दा यासाठी आग्रह करतांना दिसून येत आहेत. कोविड बाधित रुग्णांच्या प्रकृतीनुसार आरोग्य विभागातर्फे काळजीपूर्वक गरजू असलेल्या बाधितांना रेमेडिसिव्हीर इजेंक्शनचा उपचार केला जात आहेत. मात्र याची मागणी केवळ भितीपोटी मोठ्या प्रमाणात वाढल्याने याचा तुटवडा निर्माण होणे स्वाभाविक आहे. अशा स्थितीत याच्या प्रभावी नियोजनासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा -2005 आणि भारतीय साथ रोग अधिनियम 1897 अन्वये रेमडिसिव्हीर इजेंक्शन औषधाचे वितरण व विक्री यातील गैरप्रकार रोखण्यासाठी पुढीलप्रमाणे आदेश निर्गमित केले आहेत.

1)     कोविड रुग्णालयाने त्यांचे रुग्णालय शासन मान्यता प्राप्त असलेले प्रमाणपत्र त्यांचे सलग्न असलेले मेडिकल स्टोअरचे परवाने यांच्यासह घाऊक विक्रेता किंवा सी.ॲन्ड.एफ एजंट यांच्याकडे लेखी मागणी नोंदवावी.

2)     रेमेडिसिव्हीर इजेंक्शनची मागणी करतांना रुग्णालयातील रुग्ण संख्या विचारात घेवून व ज्या रुग्णांना खरोखरच रेमडिसिव्हर इजेंक्शनची आवश्यकता आहे, अशी संख्या विचारात घेवून तीन दिवस पुरेल एवढ्या रेमेडिसिव्हीर इजेंक्शनची मागणी नोंदवावी. या औषधाची मागणी नोंदविण्यापुर्वी केंद्र व राज्य शासनाचा कोविड क्लिक मॅनेजमेंट प्रोटोकॉल विचारात घेण्यात यावा.

3) घाऊक औषध विक्रेत्यांनी किंवा सी.ॲन्ड.एफ  एजंट यांनी रुग्णाची कागदपत्राची योग्य प्रकारे

    शहानिशा केल्यानंतर संबंधित रुग्णालयाच्या मागणीप्रमाणे औषध पुरवठा करावा. त्याबाबतचे लेखी

   अभिलेख जतन करावे.

3)     औषध दुकानावरुन थेट रेमेडिसिव्हीर औषधाची विक्रीवर बंदी घालण्यात येत असून रेमडिसिव्हर औषधाचा पुरवठा स्टॉकिस्टद्वारा केवळ कोविड हॉस्पिटल, हॉस्पिटलला संलग्न असलेल्या मेडिकल येथे करण्यात यावा.

5) सर्व घाऊक विक्रेत्यांनी किंवा सी.आय.ॲन्ड.एफ  एजंट यांनी दररोज विक्री केलेल्या रेमेडिसिव्हीर

    इंजेक्शन माहिती उदा :- कोविड रुग्णालयाचे नाव , संलग्न मेडिकलचे नाव, बिल क्रमांक, दिनांक, 

   एकूण विक्री संख्या इत्यादीबाबतची माहिती अन्न व औषध प्रशासन कार्यालयास दररोज सादर

   करावी.

6) ज्या रुग्णालयाच्या आवारात संलग्न मेडिकल स्टोअर नाही त्यांनी स्वत: रेमेडिसिव्हीर इंजेक्शन

    खरेदी घाऊक औषध विक्रेते किंवा सी.आय.ॲन्ड.एफ  एजंट यांच्याकडून करावी. तसेच औषधे व

    सौंदर्य प्रसाधने कायद्यातील तरतुदीनुसार औषध खरेदी व वितरणाबाबत अभिलेख ठेवावा. व

    त्यामध्ये खरेदी केलेला साठा औषधाचे नांव, समुह क्रमांक , औषध पुरवठ्याचा दिनांक , रुग्णाचा  

    तपशिल , पुरविलेले इंजेक्शन, डॉक्टरांचे नाव, आकारलेली किंमत इत्यादी माहिती अद्यायावत

    ठेवावी. इंजेक्शन खरेदी वापर, विक्री व शिल्लक साठा याचा ताळमेळ ठेवावा.

7) रुग्णालयांनी स्वत: कोविड  रुग्णांना औषधे उपलब्ध करुन द्यावीत. रुग्णांच्या नातेवाईकास बाहेरुन

     घेवून येण्यास सांगू नये.

8) कोविड रुग्णालयांनी रुग्णांना औषधाची किंमत शासनमान्य दरानेच आकारावी.

9) कांही कारणाने रेमडिसिव्हर इंजेक्शन या औषधाचा पूर्ण डोस देण्यास आला नाही, तर त्याचा

    उर्वरित साठा हॉस्पिटल , मेडिकल स्टोअरमध्ये परत करण्यात यावा. व त्यांचा अभिलेख ठेवावे.

10) कोविड रुग्णालयामध्ये काम करणारे कर्मचारी यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्यात यावे.

     रुग्णालयामध्ये गैरप्रकार हाणार नाही याची दक्षता घ्यावी. रुग्णालयात गैरप्रकार आढळून आल्यास

    रुग्णालय व्यवस्थापनास जबाबदार धरण्यात येईल.

11) सर्व कोविड रुग्णालयांनी ज्या रुग्णांकरिता रेमडिसिव्हर इंजेक्शन वापरले गेले आहेत. त्या

    औषधाच्या बाटलीवरील लेबल काढून रुग्णाच्या केस पेपरसोबत लावावेत.

12) सर्व कोविड रुग्णालयाशी संलग्नित असलेले मेडिकल दुकानदारांनी रेमडिसिव्हर औषधाचा  

     काळाबाजार, गैरवापर रोखणे अनुषंगाने मा. प्रधानसचिव यांनी यांच्या मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत

     पालन करावे व परिशिष्ठ ब मध्ये संबंधित रुग्णालयामार्फत माहिती भरुन दिल्याशिवाय रुग्णांना

    औषध विक्री करु नये.

 या आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय साथ रोग  नियंत्रण अधिनियम 1897 तसेच भारतीय दंडविधान 1860 चे कलम 188 व औषध व सौंदर्य  प्रसाधने कायदा 1940 व नियम 1945 प्रमाणे सर्व दंडनिय कार्यवाहीस पात्र राहतील.

 00000

 

 

 

 

 आम्ही आणखी प्रयत्नांची शर्त करु

नांदेड जिल्हा वासियांनो गतवर्षीसारखे सहकार्य द्या

--- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

 

नांदेड (जिमाका) दि. 11 :-  जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी खांद्याला-खांदा लावून प्रयत्नांची शर्त करीत आहेत. गतवर्षी कोरोनाचे आव्हान नवीन असूनही नागरिकांच्या सहकार्यावर कोरोनाचा प्रादुर्भाव आपण लवकर आटोक्यात आणू शकलो.  यावर्षीही चाचण्यांचे प्रमाण आपण खुप मोठ्या प्रमाणात वाढविले आहे. तात्काळ निदान आणि लवकर उपचार यावर आपण भर देत आहोत. असंख्य आव्हाने असूनही आजवर नागरिकांचे सहकार्य निर्विवाद राहिले आहे. आणखी आपला सर्वांना एकमेकांच्या आरोग्याची काळजी घेत आपले कर्तव्य पार पाडावयाचे आहे. जिल्हा प्रशासनाच्यावतीने ( आम्ही सर्व प्रयत्नांची शर्त करीत असून नांदेड जिल्हा वासियांनो गतवर्षीसारखेच आपले सहकार्य द्या) या शब्दात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नागरिकांना साद घातली आहे. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडणे, फारच गरज असेल तर योग्य मास्क घालून जे काम आहेत ते तात्काळ उरकून घरी परतणे, बाहेर सॅनिटायझरचा वापर करणे, घरी व वेळोवेळी साबणाने हात स्वच्छ करणे हे सुत्र पाळलेच पाहिजे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

0000

 

या आठवड्यात नांदेडच्या वैद्यकीय सुविधेत दोनशे खाटांच्या जंबो कोविड सेंटरची भर

युध्द पातळीवर काम पूर्णत्वाकडे

ऑक्सिजन व व्हेंटेलिटरची सुविधा

 


नांदेड (जिमाका) दि.
11 :-

नांदेड जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात जिल्हा प्रशासनाने वाढविले असून वेळेच्या आत निदान आणि तात्काळ उपचार सुरु करण्यावर आरोग्य विभागाने भर दिलेला आहे. प्रकृती खालावेपर्यंत रुग्णांनी वाट न पाहता त्वरीत तपासणीनंतर उपचारावर भर हे अत्यावश्यक आहे. जिल्ह्यातील ज्या व्यक्तींनी कोविड संसंर्गाकडे दुर्लक्ष केले आहे अशा व्यक्तींची प्रकृती अतिगंभीर झालेली निदर्शास येत आहे. जिल्ह्यातील शासकीय आरोग्य सेवा सुविधांमध्ये अधिक भर पडावी या उद्देशाने नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड येथे जंबो कोविड हॉस्पिटल पूर्णत्वास आले असून येत्या चार ते पाच दिवसात ते अतिगंभीर रुग्णांच्या उपचारासाठी सुरु होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने शर्थीचे प्रयत्न केले जात असून आवश्यकता नसताना जनतेने घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.

 

000

1 हजार 135 कोरोना बाधित बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी नांदेड जिल्ह्यात 1 हजार 859 व्यक्ती कोरोना बाधित 27 जणांचा मागील तीन दिवसांत मृत्यू कोरोनाबाबत जनजागृतीसाठी जागरुक नागरिकांना योगदान देण्याचे आवाहन

 

1 हजार 135 कोरोना बाधित बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी  

नांदेड जिल्ह्यात 1 हजार 859 व्यक्ती कोरोना बाधित

 27 जणांचा मागील तीन दिवसांत मृत्यू

कोरोनाबाबत जनजागृतीसाठी जागरुक नागरिकांना योगदान देण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 11 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 6 हजार 679 अहवालापैकी 1 हजार 859 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 857 तर अँटिजेन तपासणीद्वारे 1 हजार 2 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 57 हजार 610 एवढी झाली असून यातील 43 हजार 897 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 12 हजार 382 रुग्ण उपचार घेत असून 230 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी                   डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

दिनांक 7 ते 10 एप्रिल या चार दिवसांच्या कालावधीत 27 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 996 एवढी झाली आहे.   दिनांक 7 एप्रिल रोजी  जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल हडको नांदेड येथील 68 वर्षाचा पुरुष, व्यंकटेश नांदेड येथील 50 वर्षाचा पुरुष, लक्ष्मी नगर नांदेड येथील 60 वर्षाची महिला, भोकर तालुक्यातील भोसी येथील 60 वर्षाची महिला, शिवनगर नांदेड येथील 60 वर्षाचा पुरुष, नायगाव तालुक्यातील नर्सी येथील 60 वर्षाचा पुरुष, निजाम कॉलनी येथील 65 वर्षाचा पुरुष, बिलोली येथील 70 वर्षाचा पुरुष, साईबाबा नगरी उमरी येथील येथील 79 वर्षाचा पुरुष, दिनांक 8 एप्रिल रोजी कृष्णा नगर नांदेड येथील 38 वर्षाचा पुरुष,  सिडको नांदेड येथील 54 वर्षाचा पुरुष, भावसार चौक नांदेड येथील 67 वर्षाचा पुरुष, उमरी कोविड केअर सेंटरे येथे उमरी तालुक्यातील धानोरावाडी येथील 75 वर्षाचा पुरुष, गोदावरील कोविड रुग्णालय सन्मित्र कॉलनी नांदेड येथील 70 वर्षाच्या पुरुष, दिनांक 9 एप्रिल रोजी शासकीय आयुर्वदिक महाविद्यालय येथे राज कॉर्नर नांदेड येथील 50 वर्षाची महिला, विवेक नगर नांदेड येथील 50 वर्षाची महिला, हनुमानगड नांदेड येथील 61 वर्षाची महिला, मुखेड कोविड रुग्णालय मुखेड तालुक्यातील दापका येथील 60 वर्षाची महिला, यशोसाई कोविड रुग्णालय बालाजी नगर नांदेड येथील 68 वर्षाची महिला, दिनांक 10 एप्रिल रोजी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी येथे उमरी तालुक्यातील सिंधी येथील 60 वर्षाची महिला, हडको नांदेड येथील 65 वर्षाची महिला, प्रकाश नगर नांदेड येथील 73 वर्षाचा पुरुष, लोहा येथील 60 वर्षाचा पुरुष, कंधार तालुक्यातील मंगल सांगवी येथील 78 वर्षाचा पुरुष, सराफा नांदेड येथील 71 वर्षाचा पुरुष, वानेगांव ता. नांदेड येथील 60 वर्षाचा पुरुष उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76.19 टक्के आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 448, बिलोली 43, हिमायतनगर 26, मुदखेड 4, हिंगोली 4, नांदेड ग्रामीण 29, देगलूर 39, कंधार 2, मुखेड 34, परभणी 2, अर्धापूर 7, धर्माबाद 2, किनवट 4, नायगाव 64, भोकर 23, हदगाव 52, लोहा 37, उमरी 37 असे  एकूण 857 बाधित आढळले.

 

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 351, बिलोली 29, नांदेड ग्रामीण 66, देगलूर 9, अर्धापूर 48, धर्माबाद 7, भोकर 26, हदगाव 21, हिमायतनगर 6, माहूर 36, उमरी 32, कंधार 26, मुदखेड 63, हिंगोली 3, किनवट 109, मुखेड 82, परभणी 2, लोहा 53, नायगाव 33 असे एकूण 1 हजार 2 व्यक्ती अँन्टिजेन तपासणीद्वारे बाधित आले आहेत.

 

जिल्ह्यात 12 हजार 382 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 267, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 116, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 226, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 177, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 144, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 183, देगलूर कोविड रुग्णालय 50, जैनब हॉस्पिटल कोविड केअर सेंटर 66, बिलोली कोविड केअर सेंटर 374, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 28, नायगाव कोविड केअर सेंटर 102, उमरी कोविड केअर सेंटर 96, माहूर कोविड केअर सेंटर 35, भोकर कोविड केअर सेंटर 20, हदगाव कोविड रुग्णालय 48, हदगाव कोविड केअर सेंटर 129, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 114, कंधार कोविड केअर सेंटर 26, धर्माबाद कोविड केअर सेंटर 120, मुदखेड कोविड केअर सेंटर 19, अर्धापूर कोविड केअर सेंटर 38, बारड कोविड केअर सेंटर 35, मांडवी कोविड केअर सेंटर 11, महसूल कोविड केअर सेंटर 101, एनआरआय कोविड केअर सेंटर 91, पंजाब भवन कोविड केअर सेंटर 146, नांदेड मनपाअंतर्गत गृहविलगीकरण 4 हजार 978, नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 2 हजार 984, खाजगी रुग्णालय 1 हजार 658 असे एकूण 12 हजार 382 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

आज रोजी सांयकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 8, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 5, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 10 खाटा उपलब्ध आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 3 लाख 74 हजार 158

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 3 लाख 9 हजार 940

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 57 हजार 610

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 43 हजार 897

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 77

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76.19 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-48

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-88

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-376

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-12 हजार 382

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-230.

00000

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...