Friday, February 28, 2020


     जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 
नांदेड, दि. 282 :- जिल्ह्यात शनिवार 14 मार्च 2020 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात शनिवार 29 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते शनिवार 14 मार्च 2020 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.  
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
00000


लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन
नांदेड, दि. 28 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. लोकशाही दिन सोमवार 2 मार्च 2020 दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय बचत भवन येथे लोकशाही दिन आयोजित केला आहे.
यासाठी अर्ज स्विकारण्याचे व न स्विकारण्याबाबतच्या निकषांचीही नागरिकांनी नोंद घ्यावी. तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. त्यामुळे केवळ वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारी, निवेदन, अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्या‍त आले आहे.
या दिवशी महसूल, गृह, ग्रामविकास, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभागाचे जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी उपस्थित राहतील. सकाळी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकूण घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल.
न्याय प्रविष्ट, राजस्व तसेच अपील, सेवाविषयक, आस्थापना विषयक तसेच विहीत नमुन्यात नसलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार असलेले अर्ज, तक्रार निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. अर्ज स्विकृतीसाठी विहीत नमुन्यात तसेच तक्रार व निवेदन वैयक्तीक स्वरुपाचेच असावे. अर्जदाराने विहीत नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज पाठविणे आवश्यक आहे. तालुकास्तरावर अर्ज दिल्यानंतर एक महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनामध्ये अर्ज करता येणार आहे.
लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील. ज्या प्रकरणात कालावधी लागणार आहे अशा प्रकरणी पुढील महिन्याच्या होणाऱ्या लोकशाही दिनात मागील अर्जावर कार्यवाहीची माहिती देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
00000


डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना  
पात्र यादीमध्ये नाव नसलेल्या
विद्यार्थ्यांनी त्रुटीची पूर्तता करुन घ्यावी
नांदेड, दि. 28 :- अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत सन 2019-20 या वर्षासाठी अर्ज केलेल्या पात्र विद्यार्थ्यांची यादी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय नांदेड येथे प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांची नावे पात्र यादीमध्ये नाहीत अशा विद्यार्थ्यांनी शुक्रवार 6 मार्च 2020 पर्यंत कार्यालयात येऊन कार्यालयीन वेळेत त्यांच्या अर्जातील त्रुटीची पुर्तता करुन घ्यावी. अन्यथा 6 मार्च 2020 नंतर आलेल्या विद्यार्थ्यांचा त्रुटी पुर्ततेसाठी विचार केला जाणार नाही याची नोंद, घ्यावी असे अवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले.  
00000

Thursday, February 27, 2020


कृषि विभागाच्या लोगो सुधारीत
करण्यासाठी जाहीर आवाहन
नांदेड, दि. 27 :- कृषि विभागाचा लोगो प्रचलित असून कार्यालयीन कामकाजासाठी वापरण्यात येतो. सद्या कृषि क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान, माहिती तंत्राज्ञनाचा वापर करुन शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना राबविण्यात येतात.
प्रचलित लोगोमध्ये बदल करुन नव्याने लोगो करण्याचे प्रस्तावित आहे. या लोगोमध्ये सुधारणा करुन डीटीपी डिझाईनची सॉफ्ट व हार्ड रंगीत कॉपी कृषि माहिती विभाग कृषि भवन दुसरा मजला शिवाजीनगर पुणे येथे समक्ष व ddinfor@gmail.com या ईमेलद्वारे 25 मार्च 2020 पर्यंत पाठविण्यात यावा. उत्कृष्ट लोगो तयार करणाऱ्या व्यक्ती, संस्था, फर्म्सला 1 लाख रुपये रक्कम पारितोषिक देऊन विजेता म्हणून घोषित करण्यात येईल. तसेच हा लोगो वापरण्याचे स्वामित्व हक्क कृषि विभागाकडे राहील याची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी कृषि उपसंचालक (माहिती) कृषि भवन, कृषि आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे- 5 कार्यालय नंबर 020-25537865 मो. नं. 9823356835 वर संपर्क साधावा, असे आवाहन कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण) कृषि आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी केले आहे.              
000000


प्रादेशिक परिवहन कार्यालयातील
अनुज्ञप्ती चाचणी शिबिराच्या दिनांकात बदल
नांदेड, दि. 27 :- शासनाने राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांना महिन्यातील प्रत्येक शनिवारी सुट्टी निश्चित केल्यामुळे 29 फेब्रुवारी 2020 ते 4 एप्रिल 2020 पर्यंतच्या शनिवार रोजी शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणीसाठी ज्यांनी अपॉईटमेंट घेतलेल्या आहेत त्यांच्या अपॉईंमेंट पुढीलप्रमाणे बदलून देण्यात आली आहे.
कंसाबाहेर अपॉईंटमेंट घेतलेले दिनांक (कंसात बदल केलेले दिनांक) कंसाबाहेर स्लॉट क्रमांक (कंसात स्लॉट वेळ) याप्रमाणे 29 फेब्रुवारी 2020 (2,3,4,5 मार्च 2020) 1,2,3,4 (9.30 ते 11, 11 ते 12.30, 12.30 ते 14, 14.30 ते 15 वा.) 7 मार्च 2020 (9, 11 मार्च 2020) 1 व 2, 3 व 4 (9.30 ते 12.30, 12.30 ते 15, 9.30 ते 12.30). 21 मार्च 2020 (23, 24 मार्च 2020)  1 व 2, 3 व 4 (9.30 ते 12.30, 12.30 ते 15.00). 4 एप्रिल 2020 (7 एप्रिल 2020) सर्व स्लॉट (9.30 ते 15.00).
नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिपत्याखाली घेण्यात येणारे माहूर येथील अनुज्ञप्ती चाचणी शिबीर शनिवार 29 फेब्रुवारी 2020 रोजी चालू राहणार आहे, याची नोंद घ्यावी असे आवाहन नांदेडचे सहा प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी केले आहे.
00000


कोरोना आजाराच्या प्रतिबंधासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
नांदेड, दि. 27 :- जिल्हा समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटणकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आज घेण्यात आली. यावेळी कोरोना विषाणूजन्य आजाराच्या प्रतिबंधसाठी महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली.  
कोरोना सदृश लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांसाठी नांदेड जिल्हा रुग्णालय येथे विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. वरील प्रकारची लक्षणे आढळलेल्या रुग्णांनी जिल्हा रुग्णालय नांदेड संबंधित आरोग्य तपासणी सेवेचा तात्काळ लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.आय. भोसीकर व जिल्हा आरोग्य अधिकारी बालाजी शिंदे यांनी केले आहे.
बैठकीस अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण मुंढे, डॉ. विद्या झिने, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. आर. बिसेन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी पवार, श.च.वै.म. (Dean) यांचे प्रतींनिधी डॉ. भुरके हे उपस्थित होते.
जगातील चीन या देशात मानवी आरोग्यास अत्यंत घातक अशा करोना विषाणुचा प्रसार मोठ्या प्रमाणात  झाल्याचे दिसून आले आहे. चीन या  देशात न्युमोनियाच्या रुग्ण संख्येत अचानकपणे मोठ्या प्रमाणात झालेली  वाढ ही (करोना) या विशानुजन्य आजाराचे मुख्य कारण असल्याचे सिद्ध झाले आहे.
या प्रकारचे रुग्ण चीन मधील हुबेई प्रांतातील वुहान या शहरात 31 डिसेंबर 2019 मध्ये आढल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर थायलंड,जपान व इटली या शहरातूनही  या आजाराची रुग्ण आढळून आल्याचे दिसून आले. या विषाणूची आतापर्यंत 80 हजार 239  इतक्या रुग्णांना याची लागण झाली असून यामुळे 2 हजार 700 इतक्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून मुंबई, दिल्ली व कलकत्ता या आंतरराष्ट्रीय विमानतळावर अशा बाधित देशातून येणाऱ्या प्रवाशांचे स्क्रीनिंग (आरोग्य तपासणी)  सुरु केलेली आहे.
अशा प्रवाशामधून आढळलेल्या संशयित रुग्णांचा  व त्यांच्या निकट सहवासितांचा पाठपुरावा व आवश्यक कार्यवाही ही एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमामार्फत (आयडीएसपी ) करण्यात येत असून राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था पुणे येथे या आजाराच्या निदानाची सुविधा उपलब्ध आहे.
कोरोना विषाणूचा रोगप्रसार : या विषाणूचा प्रसार नक्की कशामुळे होतो याची निश्चित माहिती आजच्या घडीला उपलब्ध नाही. मात्र लक्षणांचे सवरूप पाहता, शिंकणे खोकणे या वाटे हवे मार्फत या विषाणूचा प्रसार होत असावा असा एक अंदाज आहे.
            या विषाणुकारिता कोणतेही लस किंवा विशिष्ट औषध उपलब्ध नाही. कोरोना विषाणू हा प्राणीजन्य आजार असला तरी हा नवीन विषाणू नक्की कोणत्या प्राण्यांच्या संपर्कातून पसरतो याबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही.
कोरोना विषाणू आजाराची सर्वसामान्य लक्षणे : अचानक येणारा तीव्र ताप, खोकला, दमा लागणे, घसा बसने, श्वासास अडथळा, पचन संथेची लक्षणे.
कोरोना प्रतिबंधात्मक खबरदारी : या विषाणूचा उद्भव कसा झाला आणि त्याचा प्रसार कसा होतो हे निश्चितपणे माहित नसल्याने या संदर्भात निश्चित प्रतिबंधात्मक खबरदारी कशी घ्यावी यावर भाषा करणे कठीण असले तरी सर्वसाधारणपणे  आजाराचे स्वरूप लक्षात घेता हा आजार होऊ नये यासाठी पुढीलप्रमाणे खबरदारी घेणे आवशयक आहे.
श्वसन संस्थेचा आजार असलेल्या व्यक्तींशी निकट सहवास टाळणे. हाताची नियमित स्वच्यता ठेवणे. न शिजवलेले अथवा अपुरे शिजवलेले मांस खाऊ नये. खोकताना शिंकताना नका- तोंडावर रुमाल / टिश्यू पेपरचा वापर करावा
खालील प्रकारच्या व्यक्तिनी विनाविलंब वैद्यकीय सल्ला घ्यावा : स्वस्नास त्रास होणाऱ्या व्यक्ती, प्रतिकार शक्ती कमी असलेल्या आजारी व्यक्ती आणि ज्यांनी नुकताच नवीन करोना विषाणू,बाधित देशात प्रवास केला असे व्यक्ती.
00000


  मोटार सायकलसाठी नवीन मालिका
नांदेड, दि. 27 :- मोटार सायकलसाठी MH 26-BT ही नविन मालिका सोमवार 2 मार्च 2020 पासून सुरु होत आहे. ज्या अर्जदारांना पसंती क्रमांक घ्यावयाचा आहे त्यांचे (आधारकार्ड, पॅनकार्ड मोबाईल नंबर व ई-मेलसह) अर्ज 3 मार्च 2020 रोजी दुपारी 2.30 पर्यंत स्विकारण्यात येणार आहेत. त्यानंतर पसंती क्रमांकासाठी अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत.
ज्या पसंती क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास 4 मार्च 2020 रोजी सकाळी 11.30 वा. कार्यालयात त्याची यादी प्रदर्शित करण्यात येईल व Text message द्वारे संबंधीत अर्जदारास कळविण्यात येईल. नागरिकांनी याबाबतची नोंद घ्यावी , असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
000000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...