Thursday, March 23, 2017

आधार कार्ड शिष्यवृत्ती खात्याशी जोडण्याबाबत
मुख्याध्यापकांना समाज कल्याणचे आवाहन
नांदेड दि. 23 :- जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडून देण्यात येणाऱ्या सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती (इयत्ता पाचवी ते दहावी) तसेच मॅट्रिक पुर्व भारत सरकार शिष्यवृत्ती, अस्वच्छ व्यवसाय या शिष्यवृत्तीसाठी सन 2013-14 पासून ऑनलाईन प्रदान केल्या जातात. जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिनस्त सर्व मुख्याध्यापकांची बैठक बोलावून आधार कार्ड संबंधीत शिष्यवृत्तीच्या बँक खात्याशी संलग्न करुन घ्याव्यात, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी उमाकांत तोटावाड यांनी केले आहे.
या शिष्यवृत्तीचा लाभ योग्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावा यासाठी विद्यार्थ्यांचा आधार कार्ड क्रमांक संकलीत करुन तो योग्य असल्याची तपासणी करुन आधार कार्ड क्रमांक त्यांच्या शिष्यवृत्ती योजनेशी संलग्न करण्याच्या सूचना आयुक्त समाज कल्याण पुणे यांनी दिल्या आहेत.

000000
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार
योजनेअंतर्गत अर्ज करण्यास मुदतवाढ
         नांदेड दि. 23 :-  शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना " योजनेंतर्गत अर्ज 23 मार्च 2017 पर्यंत मागविण्यात आले होते. आता अर्ज करण्यासाठी मुदत शुक्रवार 31 मार्च 2017 पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी दिली आहे.  
             या योजनेच्या लाभ मिळण्यासाठी पुढील विद्यार्थी पात्र आहेत. विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील असावा. विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली शैक्षणीक संस्था ज्या ठिकाणी आहे अशा स्थानिक ठिकाणचा रहिवासी नसावा. सन 2016-17 या वर्षामध्ये इयत्ता आकरावीचे विद्यार्थी इयत्ता बारावी नंतर प्रथम वर्षात प्रवेश घेणारे पदविका, पदवीचे विद्यार्थी आणि प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या पदव्युत्तर पदवी पदवी, पदवीकाचे विद्यार्थ्यांना हा लाभ दिला जाणार आहे.  सन 2017-18 पासून पुढे हा लाभ 11 वी व 12 वीचे विद्यार्थी आणि 12 वीनंतर प्रथम वर्ष पदविका ,पदवी व पदव्युत्तर पदवीका व पदवीच्या विद्यार्थ्यांना सुध्दा हा लाभ दिला जाणार आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 3 टक्के आरक्षण असेल व त्यांच्या पात्रतेची किमान टक्केवारी 50 टक्के असावी. दिव्यांग विद्यार्थी वगळता इतर विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 10 वी, 12 वीमध्ये  किमान 60 टक्के गुण असणे आवश्यक आहे.  त्यापेक्षा कमी गुण असणारे विद्यार्थी या योजनेस पात्र होणार नाहीत. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा व कुंटूबांचे, पालकांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्यांने स्वत:च्या नावे राष्ट्रीयकृत, शेडयुल  बँकेत खाते उघडणे व आधार क्रमांकाशी सलग्न करणे अनिवार्य आहे. विद्यार्थी शासन निर्णयातील तरतुदी प्रमाणे इयत्ता 10 वी किंवा 12 वीनंतरचे अभ्यास क्रमामध्ये प्रवेशित असावा त्यास कोणत्याही शासकिय वसतिगृहामध्ये प्रवेश मिळालेला नसावा. बारावी नंतरच्या तसेच पदवी नंतर पदव्युत्तर पदवी, पदवीका अभ्यासक्रम हा दोन वर्षा पेक्षा कमी कालावधीचा नसावा व विद्यार्थी केवळ प्रथम वर्षात प्रवेशित असावा. विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेले महाविद्यालय व अभ्यासक्रम यास राज्य शासन वा संबधीत तत्सम सक्षम प्राधिकारी यांची मान्यता असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेनुसार करण्यात येईल. निवडलेला विद्यार्थी संबधीत अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहील. ही सवलत शैक्षणीक कालावधीत जास्तीजास्त 7 वर्षापर्यंत घेता येईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी  प्रत्येक वर्षी किमान 60 टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे अन्यथा तो या योजनेस अपात्र होईल.  विद्यार्थ्यांने खोटी माहिती व कागदपत्र देवून या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास किंवा शैक्षणीक अभ्यासक्रम पूर्ण न केल्यास अथवा नौकरी व व्यवसाय करीत असल्यास किंवा इतर मार्गाने या योजनेचा लाभ घेवून गैर वापर केल्याचे निदर्शनास आल्यास तो कारवाईस पात्र राहील तसेच त्यास दिलेल्या रक्कमेची 12 टक्के व्याजासह वसुली केली जाईल.
वरील अटीची तसेच  शासन निर्णयातील तरतुदीची पुर्तता करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विहित जोडपत्र क्रमांक 1 मधील अर्ज त्यासोबत जोडपत्र क्रमांक 2 मध्ये नमुद कागदपत्राच्या सांक्षाकिंत प्रती जोडून परिपूर्ण अर्ज शुक्रवार 31 मार्च 2017 पर्यंत समाज कल्याण कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे. विहित नमुन्यातील अर्ज व जोडपत्र तसेच शासन निर्णय दिनांक 6 जानेवारी 2017 हा सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या सुचना फलकावर लावण्यात आलेला आहे. अधिक माहितीसाठी संबंधीत विद्यार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन , ग्यानमाता शाळे समोर, नांदेड या कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.

000000
गृह (शहरे), नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचा दौरा
नांदेड दि. 23 :- राज्याचे गृह (शहरे), नगरविकास, विधी व न्याय, संसदिय कार्य, माजी सैनिकांचे कल्याण, कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शुक्रवार 24 मार्च 2017 रोजी मुंबई येथून देवगिरी एक्सप्रेसने सकाळी 8.40 वा. नांदेड येथे आगमन व शासकीय विश्रामगृह नांदेड येथे राखीव. सकाळी 11 वा. नांदेड वाघाळा महानगरपालिकेस सदिच्छा भेट व आढावा बैठक. दुपारी 3 वा. डिजीधन मेळाव्यास उपस्थिती. स्थळ- नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड. सायंकाळी 6.05 वा. नांदेड येथून देवगिरी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.

0000000

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...