Wednesday, June 8, 2022

 जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदांच्या अंतिम प्रभाग रचना,

प्रभाग दर्शक नकाशे संकेतस्थळावर प्रसिद्ध


नांदेड, (जिमाका) दि. 8 :- राज्य निवडणूक आयुक्त मुंबई यांनी दिलेल्या आदेशान्वये दिलेल्या प्रभाग रचना कार्यक्रमानुसार नांदेड जिल्ह्यातील नगरपरिषदाच्या अंतिम प्रभाग रचना व नकाशे प्रसिद्ध करण्यात आले आहेत. सुधारीत प्रभाग रचनेच्या कार्यक्रमानुसार मुखेड, कंधार, बिलोली, कुंडलवाडी, धर्माबाद, उमरी, भोकर, मुदखेड व हदगाव या नगरपरिषदाच्या अंतिम प्रभाग रचना व प्रभाग दर्शक नकाशे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. तसेच हे नकाशे संबंधित नगरपरिषद कार्यालयात 9 जून 2022 रोजी पाहवयास उपलब्ध आहेत, संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...