Friday, October 22, 2021

 देगलूर विधानसभा पोटनिवडणूक मतदानासाठी

30 ऑक्टोंबर रोजी सार्वजनिक सुट्टी

 

नांदेड (जिमाका) 22 :- 90-देगलूर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुकीचे मतदान शनिवार 30 ऑक्टोंबर 2021 रोजी होणार आहे. या निमित्ताने 30 ऑक्टोंबर या मतदानाच्या दिवशी शासनाने सुट्टी जाहिर केली आहे. ही शासकीय सुट्टी देगलूर मतदारसंघाच्या क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे इत्यादी लागू राहील.

 

मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या -त्या मतदारसंघाच्या बाहेर असतील त्यांना देखील ही सुट्टी लागू राहील. तसेच केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका इत्यादीना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील, असे उपसचिव ज.जि.वळवी यांनी अधिसूचनेद्वारे कळविले आहे.

0000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...