Saturday, October 10, 2020

 

हवामानावर आधारित फळपिक विमा

योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे  

नांदेड (जिमाका) दि. 10 :- हवामानावर आधारित फळपिक विमा योजना ही नांदेड जिल्हयात केळी, आंबा, मोसंबी या पिकांसाठी लागु केली आहे. या योजनेंतर्गत सन 2020 हंगामात कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांच्या फळपिकांना अवेळी पाऊस, कमी-जास्त तापमान, आर्द्रता, वेगाचा वारा व गारपीट या हवामान धोक्यापासुन संरक्षण मिळणार आहे. शेतकऱ्यांनी पुढीलप्रमाणे विमा हप्ता रक्कम भरुन पिक संरक्षित करणे आवश्यक आहे. 

आबिंया बहार विमा हप्ता दर पुढीलप्रमाणे आहेत. केळी फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम नियमित 1 लाख 40 हजार रुपये तर गारपीटसाठी 46 हजार 667 रुपये एवढी आहे. तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता नियमित 7 हजार रुपये तर गारपीट 2 हजार 333 रुपये आहे. हा विमा हप्ता भरण्याचा अंतिम दिनांक 31 ऑक्टोबर 2020 आहे. 

आंबा फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम नियमित 1 लाख 40 हजार रुपये तर गारपीट 46 हजार 667 रुपये एवढी आहे. तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता नियमित 7 हजार रुपये तर गारपीट 2 हजार 333 रुपये आहे. हा विमा हप्ता भरण्याचा अंतिम दिनांक 15 ऑक्टोबर 2020 आहे. 

मोसंबी फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम नियमित 80 हजार रुपये तर गारपीट 26 हजार 667 रुपये एवढी आहे. तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता नियमित 4 हजार रुपये तर गारपीट 1 हजार 333 रुपये आहे. हा विमा हप्ता भरण्याचा अंतिम दिनांक 31 डिसेंबर 2020 आहे. 

ही योजना नांदेड जिल्ह्यात अधिसुचित फळपिकांसाठी पुढीलप्रमाणे अधिसुचित महसुल मंडळांना लागू राहिल. यात अधिसुचित केळी फळपिकासाठी नांदेड तालुक्यात तरोडा बु., तुप्पा, वसरणी, लिंबगाव, विष्णुपुरी. अर्धापुर तालुक्यात अर्धापुर, दाभड, मालेगाव. मुदखेड तालुक्यात मुदखेड, मुगट, बारड. लोहा तालुक्यात शेवडी बा. हदगाव तालुक्यात हदगाव, तामसा, मनाठा, आष्टी. भोकर तालुक्यात भोकर. देगलुर तालुक्यात मरखेल, हाणेगाव. किनवट तालुक्यात किनवट, इस्लापुर, शिवणी, बोधडी. उमरी तालुक्यात  उमरी तर नायगाव  तालुक्यात बरबडा ही मंडळे आहेत.   

आंबा फळपिकासाठी अर्धापुर तालुक्यात दाभड, पाळेगाव. कंधार तालुक्यात कंधार, मुखेड तालुक्यात मुक्रामाबाद.  तर मोसंबी फळपिकासाठी अर्धापुर तालुक्यात मालेगव. नांदेड तालुक्यात लिंबगाव, विष्णुपुरी तर मुदखेड तालुक्यात बारड या अधिसुचित महसूल मंडळाचा यात समावेश आहे. 

प्रधानमंत्री फसल बिमा योजना हवामानावर आधारित फळपिक विमा आंबिया बहारमध्ये वरील अंतिम दिनांकापुर्वी जास्तीत जास्त संख्येने शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी व नजीकच्या बँकेशी तसेच संबंधित विमा कंपनीशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर.बी. चलवदे यांनी केले आहे.

0000

 283 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

130 बाधितांची भर तर चार जणांचा मृत्यू   

 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- शनिवार 10 ऑक्टोंबर 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 283 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 130 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 44 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 86 बाधित आले. 

आजच्या एकुण 1 हजार 342 अहवालापैकी  1 हजार 166 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 17 हजार 300 एवढी झाली असून यातील  14  हजार 192 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 2 हजार 551 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 46 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. 

या अहवालात चार जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. शुक्रवार 9 ऑक्टोंबर रोजी वाजेगाव नांदेड येथील 45 वर्षाच्या एका पुरुषाचा, कंधार येथील 70 वर्षाच्या एका पुरुषाचा, शिवाजी चौक माहूर येथील 75 वर्षाच्या एका महिलेचा, शनिवार 10 ऑक्टोंबर रोजी बाबानगर नांदेड येथील 38 वर्षाच्या एका महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 452 झाली आहे.  

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथील 5, बिलोली कोविड केंअर सेंटर 1, उमरी कोविड केंअर सेंटर 10, हदगाव कोविड केंअर सेंटर 5, कंधार कोविड केंअर सेंटर 2, देगलूर जैनब कोविड केंअर सेंटर 9, मुखेड कोविड केंअर सेंटर 9, खाजगी रुग्णालय 21, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड 9,  एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन/होम आयसोलेशन 188, धर्माबाद कोविड केंअर सेंटर 3, नायगाव कोविड केंअर सेंटर 4,किनवट कोविड केंअर सेंटर 5, लोहा कोविड केंअर सेंटर 3, मुदखेड कोविड केंअर सेंटर 5, अर्धापूर कोविड केंअर सेंटर 4 असे 283 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 84.76 टक्के आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 27, भोकर तालुक्यात 3,  किनवट 1, नायगाव 2, कंधार 1, हिंगोली 4, नांदेड ग्रामीण 2, मुदखेड 1, देगलूर 1, मुखेड 1, परभणी 1 असे एकुण 44 बाधित आढळले.  

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 31, लोहा तालुक्यात 6, माहूर 4,  भोकर 3, उमरी 1, अर्धापूर 1, मुखेड 18, धर्माबाद 1, नांदेड ग्रामीण 4, मुदखेड 3, देगलूर 1, कंधार 4, बिलोली 3, नायगाव 3, हिंगोली 2, परभणी 1 असे एकूण 86 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 2 हजार 551 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 151, एनआरआय व पंजाब भवन, महसूल भवन/होम आयसोलेशन एकत्रित 1 हजार 558, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 61, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड नवी इमारत येथे 49, आयुर्वेदिक शासकीय महा.कोविड रुग्णालय सेंटर 11, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 46, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 29, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 69,  देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 11, लोहा कोविड केअर सेंटर येथे 29, हदगाव कोविड केअर सेंटर 29, भोकर कोविड केअर सेंटर 27,  बारड कोविड केअर सेंटर 4, मुदखेड कोविड केअर सेटर 10, माहूर कोविड केअर सेंटर 25, किनवट कोविड केअर सेंटर येथे 21, धर्माबाद कोविड केअर सेंटर 33, उमरी कोविड केअर सेंटर 79, कंधार कोविड केअर सेंटर येथे 20, अर्धापूर कोविड केअर सेंटर 58, खाजगी रुग्णालयात दाखल 222, लातूर येथे संदर्भित 3, निजामाबाद येथे संदर्भित 4, आदिलाबाद येथे संदर्भित 2 झाले आहेत. 

शनिवार 10 ऑक्टोंबर 2020 रोजी 5.30 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 62, आयुर्वेदिक शासकीय महाविद्यालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 48, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 56 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 92 हजार 216,

निगेटिव्ह स्वॅब- 71 हजार 558,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 17 हजार 300,

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 14 हजार 192,

एकूण मृत्यू संख्या- 452,

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 84.76

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-25,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 3,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 611, 

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 2 हजार 551,

आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 46.  

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   

0000


Friday, October 9, 2020

 

 222 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी 170 बाधितांची भर 

नांदेड (जिमाका) दि. 9 :- शुक्रवार 9 ऑक्टोंबर 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 222 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 170 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 58 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 112 बाधित आले. 

आजच्या एकुण 1 हजार 352 अहवालापैकी  1 हजार 171 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 17 हजार 170 एवढी झाली असून यातील एकूण 13 हजार 909 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 2 हजार 710 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 63 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.  

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथील 7, बिलोली कोविड केंअर सेंटर 7, भोकर कोविड केंअर सेंटर 1, हदगाव कोविड केंअर सेंटर 2, कंधार कोविड केंअर सेंटर 1, मुखेड कोविड केंअर सेंटर 6,  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड 30,  एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन/होम आयसोलेशन 112, धर्माबाद कोविड केंअर सेंटर 7, नायगाव कोविड केंअर सेंटर 15, अर्धापूर कोविड केंअर सेंटर 7, खाजगी रुग्णालय 27 असे 222 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 83.69 टक्के आहे. आज रोजी एकाही रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू नाही. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील बाधित मृत रुग्णांची संख्या एकूण 448 आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 46, हिमायतनगर तालुक्यात 1, बिलोली तालुक्यात 1, कंधार तालुक्यात 1, नांदेड ग्रामीण 4, हदगाव तालुक्यात 1 , मुखेड  तालुक्यात 3, हिंगोली 1 असे एकुण 58 बाधित आढळले.  

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 51, लोहा तालुक्यात 3, माहूर तालुक्यात 8, भोकर तालुक्यात  1, उमरी 1, अर्धापूर तालुक्यात 4, मुखेड तालुक्यात 15, हिंगोली 1, नांदेड ग्रामीण 7, किनवट तालुक्यात 12, धर्माबाद तालुक्यात 1, कंधार तालुक्यात 2, बिलोली तालुक्यात 2, परभणी 3, यवतमाळ 1 असे एकूण 112 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 2 हजार 710 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 156, एनआरआय व पंजाब भवन, महसूल भवन/होम आयसोलेशन एकत्रित 1 हजार 665, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 62, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड नवी इमारत येथे 38, आयुवैदिक शासकीय महा.कोविड रुग्णालय सेंटर 12, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 47, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 31, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 71,  देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 18, लोहा कोविड केअर सेंटर येथे 32, हदगाव कोविड केअर सेंटर 34, भोकर कोविड केअर सेंटर 24, बारड कोविड केअर सेंटर येथे 4,  मुदखेड कोविड केअर सेटर 15, माहूर कोविड केअर सेंटर 15, किनवट कोविड केअर सेंटर येथे 27, धर्माबाद कोविड केअर सेंटर 36, उमरी कोविड केअर सेंटर 75, कंधार कोविड केअर सेंटर 20, अर्धापूर कोविड केअर सेंटर 58, खाजगी रुग्णालयात दाखल 261, लातूर येथे संदर्भित 3, निजामाबाद येथे संदर्भित , आदिलाबाद येथे संदर्भित 2 झाले आहेत. 

आज रोजी 5-30 वाजताची सद्यस्थितीत खालील रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी 68, आर्येुवेदिक शासकीय महाकोविड रुग्णालय सेंटर 35,जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल नांदेड 55. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 91 हजार 20,

निगेटिव्ह स्वॅब- 70 हजार 564,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 17 हजार 170,

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 13 हजार 909,

एकूण मृत्यू संख्या- 448,

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 83.69

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-0,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 2,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 623, 

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 2 हजार 710,

आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 63.  

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   

0000

 

 

सतत अनधिकृतरित्या गैरहजर राहिल्याने नांदेड येथील चौकीदार

बाबुराव उमाजी पवार यांची शासकिय सेवेतुन सक्तीने सेवानिवृत्ती 

नांदेड (जिमाका) दि. 9 :- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट जिल्हा नांदेड या कार्यालयांतर्गत आदिवासी मुलांचे शासकिय वसतिगृह, नांदेड क्र. 02 जि. नांदेड येथील श्री बाबुराव उमाजी पवार (चौकीदार) हे सतत अनधिकृतरित्या गैरहजर राहिल्याने मा. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट यांचे आदेश क्र. 2588 दि.08/09/2016 नुसारदि.22/11/2014 पासुन शासकिय सेवेतुन सक्तीने सेवानिवृत्ती केली आहे. सदर आदेशाची प्रत संबंधीत गृहपाल आदिवासी मुलांचे शासकिय वसतिगृह, नांदेड क्र. 02 जि. नांदेड यांना संबंधीतास तामिल करण्यासाठी पाठविण्यात आली होती. पवार हे त्यांच्या कार्यरत असताना ज्याठिकाणी राहत होते त्या निवासाच्या ठिकाणी गेले असता त्या ठिकाणी ते राहत नसल्याचे निदर्शनास आले. आणि सदर आदेशाची संबंधीतास तामिल करता आली नसल्याचे कळविले आहे.संबंधीताच्या वैयक्तिक नस्तीमधुन दिसुन आलेल्या दस्ताऐवजानुसार त्यांचे मुळ गांव मु.सायाळवाडी पो.निमगांव ता.हदगांव जि. नांदेड येथे या र्यालयामार्फत सदर आदेशाची संबंधीतास तामिल करणसाठी प्रतिनिधी पाठविले असता तेथील पोलिस पाटिल श्री रामराव धर्मा राठोड यांनी संबंधीताने सुमारे15 वर्षापुर्वीपासुनच त्यांचे मुळ गांव सोडले असल्याचे लिखीत स्वरुपात कळविले आहे.तरी या बात्मीद्वारे श्री.पवार यांना पुन्हा अंतिमरित्या कळविण्यात येते की आपण या बात्मीची दखल घ्यावी आणि सात दिवसात याबाबत आपले उत्तर सादर करावे अन्यथा आपल्याला सेवानिवृत्तीविषयी लाभाची गरज नाही असे समजून सदर प्रकरण आपणास दिलेल्या मुदतीअंती बंद करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट जिल्हा नांदेड यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

 

 


वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...