वृत्त क्रमांक 1208
मुलींना जन्म घेऊ द्या, मुलींना शिकू द्या, मुलींना खेळू द्या घोषणांनी नांदेड शहर दुमदुमले
वृत्त क्रमांक 1208
मुलींना जन्म घेऊ द्या, मुलींना शिकू द्या, मुलींना खेळू द्या घोषणांनी नांदेड शहर दुमदुमले
वृत्त क्रमांक 1207
जवाहर नवोदय विद्यालयातील विविध
विकास कामांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
वसतीगृहातील विद्यार्थ्यांशी साधला संवाद
नांदेड, दि. 14 नोव्हेंबर : जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रबंधन समितीची अर्धवार्षिक बैठक शंकरनगर येथे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या अध्यक्षतेखाली 13 नोव्हेंबर रोजी पार पडली. बैठकीत विद्यालयातील विविध विकास कामांचा सविस्तर आढावा घेऊन अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
बैठकीस बिलोलीच्या उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, विद्यालयाचे प्राचार्य सुहास मांदळे, रामतीर्थ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तसेच समितीचे इतर सदस्य उपस्थित होते.
नवीन इमारत, पायाभूत सुविधा व क्रीडासाधनांसाठी मान्यता
जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी विद्यालयाच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश दिले, जेणेकरून पुढील प्रक्रियेअंतर्गत विद्यालयाला नवीन इमारत उपलब्ध होऊ शकेल. विद्यालयाचा एक्सप्रेस फिडर कनेक्शन विद्यालयापासून दूर असल्यामुळे ते तातडीने दुरुस्त करून पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
सोलार वॉटर हिटर, खेळाच्या मैदानाचे सपाटीकरण, कबड्डी मॅट, बास्केटबॉल कोर्ट, ओपन जीम, योगा मॅट व सिन्थेटिक रनिंग ट्रॅकची निर्मिती या बाबीना मान्यता दिली. तसेच विद्यार्थ्यांसाठी नवीन कॉम्प्यूटर, फॅन व टेबल्स जिल्हास्तरीय बजेटमधून घेण्यात यावेत याबाबत सूचना केल्या.
वसतीगृहातील विद्यार्थ्यांशी साधला संवाद
बैठकीनंतर जिल्हाधिकारी श्री. कर्डीले यांनी विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला, त्यांच्या समस्यांची माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांच्या दैनंदिन साफसफाई, आरोग्य, निवास व इतर सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक त्या सूचना नवोदय विद्यालयाच्या प्राचार्याना दिल्या. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसह उपस्थित पालकांशी संवाद साधत त्यांनी मांडलेल्या अडचणींचे त्वरित निराकरण केले.
00000
वृत्त क्रमांक 1206
नगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचे
नामनिर्देशपत्र शनिवार 15 नोव्हेंबरला स्विकारली जाणार नांदेड, दि. 14 नोव्हेंबर :- नांदेड जिल्ह्यातील 12 नगरपरिषदा व 1 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीचे नामनिर्देशनपत्र सादर करावयाच्या कालावधीतील शनिवार 15 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र स्विकारण्यात यावेत, असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाले आहेत. याअनुषंगाने कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिले आहेत. या निवडणूक कार्यक्रमात रविवार या सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात येणार नाही असे नमूद आहे. त्यामुळे शनिवार 15 नोव्हेंबर 2025 रोजी नामनिर्देशन पत्र स्विकारण्यात यावेत का यासंदर्भात विचारणा होत असल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाकडून वरीलप्रमाणे हे निर्देश प्राप्त झाले आहेत.
0000
वृत्त क्रमांक 1205
जिल्हा रुग्णालयात जागतिक मधुमेह दिन साजरा
नांदेड दि. 14 नोव्हेंबर:- नांदेड जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संजय पेरके व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ पांडुरंग पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक मधुमेह दिन साजरा करण्यात आला. यावेळी रुग्ण व त्यांचे नातेवाईकांना वैद्यकीय अधिकारी डॉ. चांदू पाटील यांनी मधुमेहाची लक्षणे, मधुमेहामुळे मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम तसेच मधुमेह आजारासंबंधी घ्यावयाची काळजी याबाबत विद्यार्थी, उपस्थित रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोपाच्या अनुषंगाने बोलतांना एनसीडी नोडल अधिकारी डॉ. हनुमंत पाटील म्हणाले की, दिवसेंदिवस व्यक्तीचे शारीरिक (कष्टाची कामे) कमी होत आहेत, त्यामुळे त्यांना मधुमेहासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीने दररोज किमान अर्धा तास तरी शारीरिक व्यायाम तसेच कष्टाची कामे केले पाहिजे. तसेच आहारात मिठ आणि साखरेचे प्रमाण कमी ठेवावे, संतुलित आहार घ्यावा जेणेकरून व्यक्तींना मधुमेह सारखा आजार नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल. यावेळी तंबाखूमुक्त युवा अभियान ३.० जनजागृती करण्यात आली.
या कार्यक्रमास निवासी वैद्यकीय अधिकरी डॉ. एच.के. साखरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी माने, डॉ.सुमित लोमटे, डॉ. शाहू शिराढोणकर, डॉ.सुजाता राठोड, डेंटल सर्जन डॉ. दीप्ती सूर्यवंशी, एनसीडी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. उमेश मुंडे, मेट्रन सुनिता राठोड, प्राचार्या सुनिता बोथीकर, इंचार्ज श्रीमती नारवाड, श्रीमती बंडेवार तसेच जिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी, नर्सिंग महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी तसेच रुग्ण व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्यकीय अधिकारी डॉ. विखारुनिसा खान यांनी तर सूत्रसंचालन बालाजी गायकवाड यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रकाश आहेर, सदाशिव सुवर्णकार, सुनिल तोटेवाड व चंद्रभान कंधारे यांनी परिश्रम घेतले.
00000
वृत्त क्रमांक 1204
उद्योजकांनी मैत्री कक्षाद्वारे उपलब्ध सेवांचा लाभ घ्यावा : जिल्हा उद्योग केंद्र
नांदेड दि. 14 नोव्हेंबर :- जिल्ह्यातील उद्योजकांनी शासनाच्या मैत्री सहाय्य प्रणालीचा लाभ घ्यावा. यासाठी नोंदणी, सहभाग व लाभाच्या विविध सुविधेबाबत काही अडचण, समस्या असल्यास सल्ला व मार्गदर्शनासाठी महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र उद्योग भवन सहकारी औद्योगिक वसाहत शिवाजीनगर नांदेड येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.
सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSME ) हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. राज्यामध्ये त्यांचे महत्व विशेष आहे. नांदेड जिल्हयात सध्या १ लाख १२९ सुक्ष्म, ७२० लघु व ४१ मध्यम असे नोंदणीकृत उद्योग आहेत.
महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था सन २०२७ पर्यंत १ ट्रिलीयन डॉलर्स पर्यंत पोहंचविण्याचे शासनाचे ध्येय आहे. शासनाच्या या ध्येयपूर्तीसाठी आणि राज्यात उद्योग स्थापनेकरिता उद्योग, व्यापार व सेवाक्षेत्रातील गुंतवणूकदारांना सर्व आवश्यक परवाने, मंजूरी, ना-हरकती, सवलती
· एक खिडकी अर्ज प्रणाली https://maitri.
· तक्रार/समस्या निवारण
· हेल्पलाइन मदत कक्ष क्रमांक 18002332033
· गुंतवणूकदारांचा मार्गदर्शक
· प्रोत्साहन गणना
नांदेड जिल्ह्यातील उद्योजकांनी या सेवांचा लाभ घ्यावा जेणेकरून जिल्ह्यात उद्योगांची वाढ होईल व जिल्हयाच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल. जिल्हयातील उद्योग व गुंतवणूकदारांनी मैत्री या सहाय्य प्रणालीचा लाभ घेवून पोर्टलवर सक्रीय सहभाग नोंदवावा.
000000
वृत्त
श्री गुरू तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन
वृत्त क्रमांक 1203
जिल्हाधिकाऱ्यांनी राहाटी गावाला भेट देवून #पशुसंवर्धन विभागाच्या विविध कामांची केली पाहणी
वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...