Monday, June 23, 2025

21.6.2025.

नांदेड जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व विविध योग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस कवायत मैदान येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, मनपा आयुक्त डॉ महेश कुमार डोईफोडे, आदींची उपस्थिती होती.





👆 व्हिडिओ👆

21.6.2026

 आंतरराष्ट्रीय योगा दिवस कार्यक्रम भक्ती लॉन्स नांदेड

 राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, आमदार बालाजी कल्याणकर, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, मनपा आयुक्त डॉ महेश कुमार डोईफोडे, आदींची उपस्थिती होती.








👆 व्हिडिओ👆


21 जून 2025

 


Friday, June 20, 2025

वृत्त क्र. 645   

पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते

जिल्ह्यातील 7 पंचायत समित्यांना शासकीय वाहनांचे वितरण

 

नांदेड 20 जून - नांदेड जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांना नवीन शासकीय वाहनांचे वितरण आज करण्यात आले. जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते या वाहनांचा लोकार्पण समारंभ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पार पडला. याप्रसंगी पालकमंत्री अतुल सावे यांनी हिरवा झेंडा दाखवून सदर वाहने संबंधित तालुक्यांकडे रवाना केली.

 

माहूर, हदगाव, कंधार, देगलूर, बिलोली, उमरी व नायगाव या सात पंचायत समित्यांना हे वाहन देण्यात आले आहेत. या वाहनांच्या माध्यमातून तालुकास्तरावरील प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान व परिणामकारक होईल, असा विश्वास पालकमंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला.

 

यावेळी खासदार डॉ. अजित गोपछडे, खासदार रविंद्र चव्हाण, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर,  आमदार भिमराव केराम, आमदार राजेश पवार, आमदार जितेश अंतापुरकर, आमदार आनंदराव बोंढारकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, जिल्‍हा परिषदेचे अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना, सामान्‍य प्रशासन विभागाचे उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्‍कावार, पंचायत विभागाच्‍या उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, जिल्हा परिषदेचे विभाग प्रमुख आणि संबंधित पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी उपस्थित होते.

0000





 

वृत्त क्र. 644

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना 

विद्यार्थ्यांना 20 जुलै पर्यंत अर्ज करण्याची मुदत 

नांदेड दि. 20 जून :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थ्यांनी येत्या 20 जुलै 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत संपूर्ण कागदपत्रासोबत जिल्हा कार्यालयात संपर्क करावा. उशिरा मुदतीनंतर आलेले कागदपत्रे अर्जाचा जिल्हा कार्यालयामार्फत स्विकार करण्यात येणार नाही, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे. 

सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात 10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना सरासरी 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त टक्केवारी गुण प्राप्त झाले असतील अशा उत्तीर्ण झालेल्या मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना महामंडळाकडून ज्येष्ठता व जास्त गुण क्रमांकानुसार उपलब्ध निधीच्या अधीन राहून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. 

पुढीलप्रमाणे मुळ कागदपत्रे दोन प्रतीत आणावीत. मार्कशिट, शाळा सोडल्याचा दाखला, रेशनकार्ड, जातीचा दाखला, उत्पनाचा दाखला, आधारकार्ड, दोन फोटो, पुढच्या वर्गात प्रवेश घेतल्याची पावती किंवा बोनाफाईड सर्टिफिकीटसह व जिल्हा व्यवस्थाकाच्या नावे शिष्यवृत्ती मागणीचा अर्ज इत्यादी कागदपत्रासह संपर्क साधावा.

जिल्हा कार्यालयाचा पत्ता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ग्यानमाता शाळेच्या समोर नांदेड दूरध्वनी 02462-220088 मो.नंबर 9309151060 हा आहे.    

0000

वृत्त क्र. 643

फळपिक विमा कंपनीकडे  

नुकसानीची तक्रार नोंदवा : कृषि कार्यालय 

नांदेड दि. 20 जून :- अर्धापूर तालुक्यात 9 जून रोजी झालेल्या वेगाचा वारा व पावसामुळे फळपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या तालुक्यातील शेतकऱ्यांनी फळपिक विमा कंपनीकडे नुकसानीची तक्रार नोंदवावी, असे आवाहन तालुका कृषि अधिकारी अर्धापूर यांनी केले आहे. 

अर्धापूर तालुक्यातील फळपिक नुकसानग्रस्त शेतकरी बांधवाना पुर्व सूचना देण्यात आली आहे. आपण रब्बी हंगामातील फळपिक विमा भरला असेल व आपल्या (केळी पपई, आंबा-आंबिया बहार) या पिकाचे नुकसान वादळी वाऱ्याने झाले असल्यास wind speed वरील पर्याय निवडून पिक विमा कंपनीस पूर्व सूचना द्यावी. 

पूर्व सूचना दिल्याशिवाय स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकाअंतर्गत विमा मिळत नाही. आपण आपल्या पिकाच्या नुकसानीची पुर्व सूचना टोल फ्री नंबर 14447 वर फोन करून किंवा क्रॉप इन्सुरन्स अॅपद्वारे द्यावी. पिक नुकसानीची पूर्व सूचना ही पिकांचे नुकसान झाल्यापासून 72 तासाच्या आत (3 दिवसाच्या आत) देणे गरजेचे आहे. पूर्व सुचना दिल्यानंतर उपलब्ध झालेला docket Id सांभाळून ठेवावा जेणे करून फळपिक विमा योजनेचा लाभ मिळणे सोयीचे होईल, असेही आवाहन तालुका कृषि अधिकारी अर्धापूर यांनी केले आहे.

000

वृत्त क्र. 642

राज्यमंत्री  मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा दौरा   

नांदेड दि. 20 जून :- राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर शनिवार 21 जून 2025 रोजी नांदेड दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

शनिवार 21 जून 2025 रोजी मुंबई येथून नंदिग्राम एक्सप्रेसने सकाळी 5 वा. नांदेड रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. सकाळी 5.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सकाळी 6 वा. 11 वा आंतरराष्ट्रीय भव्य योग दिन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- भक्ती लॉन्स मंगल कार्यालय मालेगाव रोड नांदेड. सकाळी 7 वा. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भव्य योग शिबीर स्थळ- श्री गुरूग्रंथ साहिब हॉल यात्री निवास नांदेड. सकाळी 9 वा. ब्रम्हकुमारी सद्भावना भवन 1/11/774 रुपा गेस्ट हॉऊस रोड वसंतनगर नांदेड येथे आगमन व राखीव. त्यानंतर सोयीनुसार परभणीकडे प्रयाण करतील. 

0000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...