Thursday, August 27, 2020

वृत्त क्र. 795

154 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

148 बाधितांची भर तर नऊ जणांचा मृत्यू   

 

नांदेड (जिमाका) दि. 27 :- बुधवार 27 ऑगस्ट 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 154 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 148 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 46 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 102 बाधित आले. 

आजच्या एकुण 480 अहवालापैकी  313 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 5 हजार 640 एवढी झाली असून यातील 3 हजार 894 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 1 हजार 503 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 214 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.  

मंगळवार 25 ऑगस्ट 2020 रोजी गुरुद्वारा परिसर नांदेड येथील 55 वर्षाचा एक पुरुष यांचा खाजगी रुग्णालय, नांदेड येथे तर बुधवार 26 ऑगस्ट, 2020 रोजी देगलूर तालुक्यातील करडखेड येथील 58 वर्षाचा एक पुरुष यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी नांदेड येथे, नगीनाघाट नांदेड येथील 67 वर्षाचा एक पुरुष व सिडको नांदेड येथील 75 वर्षाचा एक पुरुष यांचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल नांदेड येथे तर लोहा येथील 70 वर्षाचा एक पुरुष यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी नांदेड येथे, गुरुवार 27 ऑगस्ट 2020 रोजी धर्माबाद तालुक्यातील धानोरा येथील 65 वर्षाचा एक पुरुष, देगलूर येथील 76 वर्षाचा एक पुरुष यांचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल नांदेड येथे वसंत नगर नांदेड येथील 40 वर्षाची एक महिला , रवीनगर नांदेड येथील 65 वर्षाची एक महिला यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी नांदेड येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

  

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी नांदेड येथील 4, नांदेड जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथील 14, हदगाव कोविड केअर सेंटर 8, अर्धापूर कोविड केअर सेंटर 1, लोहा कोविड केअर सेंटर 23, धर्माबाद कोविड केअर सेंटर 27, पंजाब भवन कोविड केअर सेंटर नांदेड 55, देगलूर जैनब कोविड केअर सेंटर 2, खाजगी रुग्णालय 3, बिलोली कोविड केअर सेंटर 7,मुदखेड कोविड केअर सेंटर 3, नायगाव कोविड केअर सेंटर 7 असे एकूण 154 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.    

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 25, अर्धापूर तालुक्यात 1, देगलूर तालुक्यात 3, किनवट तालुक्यात 4, नायगाव तालुक्यात 1, परभणी 1, नांदेड ग्रामीण 2, हदगाव तालुक्यात 1, लोहा तालुक्यात 4, धर्माबाद तालुक्यात 2, लातूर 1, हिंगोली 1 असे एकुण 46 बाधित आढळले.  

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपाक्षेत्र 46, मुदखेड तालुक्यात 4, देगलूर तालुक्यात 1, लोहा तालुक्यात 6, कंधार तालुक्यात 12, उमरी तालुक्यात 3, अकोला 1 , नांदेड ग्रामीण 2, बिलोली तालुक्यात 3, हदगाव तालुक्यात 2, किनवट तालुक्यात 7, मुखेड तालुक्यात 7, धर्माबाद तालुक्यात 8 असे एकुण 102 बाधित आढळले.  

जिल्ह्यात 1 हजार 503 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 176, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 483, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 58, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 27, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 41, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 132,  देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 47, लोहा कोविड केअर सेंटर येथे 54, हदगाव कोविड केअर सेंटर 47, भोकर कोविड केअर सेंटर 18,  कंधार कोविड केअर सेंटर येथे 29,  किनवट कोविड केअर सेंटर येथे 54, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 21, मुदखेड कोविड केअर सेटर 22,  माहूर कोविड केअर सेंटर येथे 9, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 21, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 43,उमरी कोविड केअर सेंटर 33, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 2, बारड कोविड केअर सेंटर 4, खाजगी रुग्णालयात 170 बाधित, औरंगाबाद येथे संदर्भित 10, निजामाबाद 1, मुंबई येथे 1 बाधित संदर्भित झाले आहेत.  

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

सर्वेक्षण- 1 लाख 51 हजार 467,

घेतलेले स्वॅब- 42 हजार 570,

निगेटिव्ह स्वॅब- 34 हजार 721,

आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 148,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 5 हजार 640,

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-11,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 4,

एकूण मृत्यू संख्या- 206,

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 3 हजार 894,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 503,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 341, 

आज रोजी गंभीर प्रकृती असलेले बाधित- 214. 

 

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   

00000

 


 


वृक्ष लागवडीतुन प्रादेशिक परिवहन कार्यालय

परिसराचा कायापालट करु  

-         प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत

 

नांदेड (जिमाका) दि. 27:- प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या  रिकाम्या परिसरात असलेल्या जागेवर जी वृक्ष लागवड केली आहे त्याची काळजीपुर्वक निगा राखून सर्वांच्या प्रयत्नातून या परिसराचा कायापालट केला जाईल, असे प्रतिपादन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले. राज्य शासनाच्या ''अटल आनंदवन घनवन योजना 2020'' अंतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात सहाशे वृक्षांची मियावाकी (सघन वन) पध्दतीने दोन प्लॉटवर लागवड नुकतीच करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

 

नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यावर्षी एकत्र येऊन श्रमदानातून प्रादेशिक परिवहन कार्यालयात वृक्षांची जोपासना केली आहे. वृक्ष लागवडीसाठी सुमारे 25 ते 30 प्रजातींची 600 रोपे मियावाकी पध्दतीने लावण्यात आले. रोपांच्या लागवडीसाठी परिसराची साफसफाई, वृक्ष लागवड व जोपासना या संपूर्ण प्रक्रियेत या कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. दैनंदिन कार्यालयीन कर्तव्य सांभाळून श्रमदानाद्वारे त्यांनी यावर्षीचा वृक्ष लागवडीचा कार्यक्रम यशस्वी केला आहे.

 

इच्छाशक्ती असेल तर प्रयत्नातून कार्यालयाचा परिसर हिरवागार करता येऊ शकतो हे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कृतीतून दाखवले आहे. कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी नियमित आपल्या कामाचा काही वेळ लागवड केलेल्या वृक्षांची निगा राखण्यासाठी देतात. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करुन प्रोत्साहन दिले. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी राहूल जाधव, रोहीत काटकर व अनंत भोसले सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी परिश्रम घेतले.

0000

 

नीट व जेईईच्या परिक्षा पुढे ढकलण्याची मागणी रास्त

-         पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड (जिमाका) दि. 27:-  कोविड-19 मुळे जगभरात आव्हान निर्माण झाले असून यात सर्व क्षेत्र ढवळून निघाले आहे. भारतात शैक्षणिक परिक्षांचा कालावधी आणि दोन महिन्यानंतर नवे शैक्षणिक वर्षे सुरु होण्याचा कालावधीत हा कोविड-19 च्या चक्रात अडकल्याने विद्यार्थ्यांसह पालकांची मोठी गैरसोय झाली आहे. हा संसर्गजन्य आजार असल्याने शासनही यात अत्यंत सावधन भुमिका घेत असून नीट व जेईईच्या परिक्षा पुढे ढकल्याव्यात अशी होणारी मागणी रास्त असल्याची भुमिका पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी घेतली आहे. पालक म्हणून जे काळजीचे वातावरण आहे त्याच्याशी आम्ही सहमत आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले.

00000

Wednesday, August 26, 2020

 वृत्त क्र. 792 

202 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

216 बाधितांची भर तर पाच जणांचा मृत्यू    

नांदेड (जिमाका) दि. 26 :- बुधवार 26 ऑगस्ट 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 202 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 216 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 88 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 128 बाधित आले. 

आजच्या एकुण 737 अहवालापैकी  514 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 5 हजार 492 एवढी झाली असून यातील 3 हजार 740 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 1 हजार 518 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 174 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.  

मंगळवार 25 ऑगस्ट  रोजी कंधार तालुक्यातील कुरुळा येथील 65 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे, काबरानगर नांदेड येथील 66 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे तर बुधवार 26 ऑगस्ट रोजी हदगाव येथील 79 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे, कंधार येथील 62 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे, देगलूर येथील 58 वर्षाच्या एका महिलेचा खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.  

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथील 7, पंजाब भवन कोविड केअर सेंटर नांदेड येथील 45, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथील 1, देगलूर कोविड केअर सेंटर येथील 23, मुखेड कोविड केअर सेंटर येथील 33, खाजगी रुग्णालयात 9, अर्धापूर कोविड कोविड केअर सेंटर येथील 14,बिलोली कोविड केअर सेंटर येथील 1, लोहा कोविड केअर सेंटर येथील 4, माहूर कोविड केअर सेंटर येथील 1, नायगाव कोविड केअर सेंटर येथील 23, उमरी कोविड केअर सेंटर येथील 10, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथील 28, औरंगाबाद येथे संदर्भित 3 असे एकूण 202 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.    

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 25, नांदेड ग्रामीण 7, देगलूर तालुक्यात 6, हदगाव तालुक्यात 3, किनवट तालुक्यात 6, लोहा तालुक्यात 13, मुखेड तालुक्यात 8, कंधार तालुक्यात 2, नायगाव तालुक्यात 6, धर्माबाद तालुक्यात 5, परभणी 1, हिंगोली 5, लातूर 1 असे एकुण 88 बाधित आढळले.  

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपाक्षेत्र 41,  नांदेड ग्रामीण 1, अर्धापूर तालुक्यात 2, भोकर तालुक्यात 1, लोहा तालुक्यात 1, हदगाव तालुक्यात 8, कंधार तालुक्यात 9, किनवट तालुक्यात 17, मुखेड तालुक्यात 19, माहूर तालुक्यात 1, बिलोली तालुक्यात 3, मुखेड तालुक्यात 8, नायगाव तालुक्यात 3, धर्माबाद तालुक्यात 13, हिंगोली 1 असे एकुण 128 बाधित आढळले.  

जिल्ह्यात 1 हजार 518 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 181, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 548, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 63, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 35, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 40, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 122,  देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 44, लोहा कोविड केअर सेंटर येथे 45, हदगाव कोविड केअर सेंटर 56, भोकर कोविड केअर सेंटर 14,  कंधार कोविड केअर सेंटर येथे 28,  किनवट कोविड केअर सेंटर येथे 14, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 22, मुदखेड कोविड केअर सेटर 24,  माहूर कोविड केअर सेंटर येथे 06, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 32, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 70, उमरी कोविड केअर सेंटर 31, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 2, बारड कोविड केअर सेंटर 2, खाजगी रुग्णालयात 127 बाधित तर औरंगाबाद येथे 10, निजामाबाद 1, मुंबई येथे 1 बाधित संदर्भित झाले आहेत.  

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

सर्वेक्षण- 1 लाख 51 हजार 222,

घेतलेले स्वॅब- 38 हजार 656,

निगेटिव्ह स्वॅब- 31 हजार 389,

आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 216,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 5 हजार 492,

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-7,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- निरंक,

एकूण मृत्यू संख्या- 197,

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 3 हजार 740,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 518,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 265, 

आज रोजी गंभीर प्रकृती असलेले बाधित- 174.  

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   

00000

 

पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा दौरा 

नांदेड (जिमाका) दि. 26 :- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार 27 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 10.45 वा.  नांदेड येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील. दुपारी 12 वा. मुंबई विमानतळ येथे आगमन होईल.

00000

Tuesday, August 25, 2020

 

डॉ. शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षानिमित्त

भोसी येथे लवकरच प्रशिक्षण केंद्र

-         पालकमंत्री अशोक चव्हाण

 नांदेड (जिमाका) दि. 25 :- इतर तालुक्याच्या तुलनेत भोकर तालुक्यातील आव्हाने वेगळी आहेत. इथली सर्वसामान्य जनता आजही आर्थिकदृष्ट्या किमान पातळीवरही सक्षम नाही. येथील वाडे, तांडे व आदिवासी बहुल लोकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी, त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यासाठी शासन स्तरावर जे काही शक्य आहे ते सर्व उपलब्ध करुन देण्यासाठी मी प्रयत्नरत असल्याची ग्वाही पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. 

भोकर येथे सुमारे साडेपाच कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विभागीय कार्यालयाच्या भुमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती मंगाराणी अंबुलगेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे, जिल्हा परिषदेचे कृषि व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर, प्रकाशराव देशमुख भोसीकर, नागनाथराव घिसेवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

भोकरच्या विकासाला चालना देण्याच्या दृष्टिने मी सुरुवातीपासूनच यथाशक्य मदत करीत आलो आहे. आजही त्याच जबाबदारीने या भागात अधिक विकास कामे कसे होतील यासाठी प्रयत्नशील आहे. जिल्हा ठिकाणापासून दूर असलेल्या गावांमध्ये जनतेच्या सुविधेसाठी ज्या काही आवश्यक शासकीय कार्यालयांची गरज आहे ती-ती कार्यालये त्या-त्या गावात जर आपण उपलब्ध केली तर सर्वसामान्यांचा जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्या-येण्याच्या त्रासासह त्याला त्यांच्या तालुक्याच्या ठिकाणी शासनासंदर्भातील कामे पूर्ण करुन घेता येतील हा उद्देश मी डोळ्यासमोर ठेवला आहे. यादृष्टिने विचार करुन लवकरच नवीन न्यायालयाच्या इमारतीचे बांधकामही आपण सुरु करणार आहोत. यासाठी आर्थिक तरतुदही करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालयही लवकरच भोकर येथे सुरु करु असे सुतोवाचही त्यांनी केले. 

इथल्या लोकांचे आर्थिक उत्पन्न जर वाढवायचे असेल तर कृषि विभागाला अधिक सक्षम करावे लागेल. शेतीला पाणी कसे उपलब्ध होईल हेही पहावे लागेल. याचदृष्टिने शासन स्तरावर विचार करुन आम्ही गोदावरी खोऱ्यातील जवळपास 29 टिएमसी पाणी ग्रामीण भागात पोहचवून लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागावा यासाठी मनापासून पाठपुरावा करीत असल्याचे त्यांनी सांगितले. 

भोकर रस्त्याचे काम अनेक कारणांमुळे आजवर रेंगळाले आहे. त्यातल्या त्यात भोकर-रहाटी हा रस्ता विविध अपघातांनाही निमंत्रण देत आहे. रस्ते विकासाच्या कामात जवळपास 18 ठिकाणी फेल झाले आहेत. या ठिकाणच्या रस्ते विकासाबाबत केंद्र सरकारच्या पातळीवरुन हे काम कसे करता येईल याबाबत मी प्रयत्नशील आहे. भोकर ते रहाटी हे काम आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करुन हा प्रलंबित असलेला रस्ता सुमारे दिडशे कोटी रुपयांचा निधी लावून लवकरच पूर्ण करु असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भोकर तालुक्यात बोरुड समाज मोठ्या प्रमाणात आहे. याचबरोबर वनामध्ये रोजगार अवलंबून असणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे. अशा ग्रामीण भागातील स्वयंरोजगाराच्या नव्या वाटा शोधणाऱ्यांना इथल्या नैसर्गिक संशाधनाशी मिळते-जुळते नवीन उद्योगाचे प्रशिक्षण त्यांना देता यावे यादृष्टिने नारवट येथे लवकरच बांबु प्रशिक्षण केंद्र व विक्री केंद्र साकारले जाईल, असे ते म्हणाले. म्हैसारोड ते किनवट नवा बायपास, नांदेड-मुदखेड-भोकर रस्ता, भोकर तालुक्यातील दलितवस्ती सुधार योजना यासाठी सुमारे चारशे कोटी रुपयांची कामे प्रस्तावित केली आहे. सद्यस्थितीला रस्त्यांची बिकट स्थिती लक्षात घेता ज्या-ज्या ठिकाणी अपघाताला निमंत्रण देणारे मोठे खड्डे तयार झाले आहेत त्या ठिकाणी साधा मुरुम, खडी टाकून तात्पुरत्या स्वरुपात या मार्गाचे रखरखाव करण्याचे निर्देशही त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. येत्या सहा महिन्यात रस्ते विकासाचे काम सुरळीत होईल असे सांगत त्यांनी हे वर्षे सर्वच दृष्टिने कठीन असून कोरोनाच्या काळातही आपण सर्वच बाजू सांभाळत जिल्ह्यात आरोग्याच्या सुविधा अधिक चांगल्या कसा उपलब्ध होतील यावर भर दिला. जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात आपण जुन्या इमारतीच्या जागेवर दोनशे खाटांचे बाह्य रुग्ण विभाग युद्ध पातळीवर पूर्ण करुन आपण सुरु केल्याचेही त्यांनी सांगितले. भोकरसाठी चार नवीन रुग्णवाहिका आपण दिल्या असून विकासासाठी जो मी निश्चय केला आहे तो मी पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे यांनी केले तर कार्यकारी अभियंता प्रशांत कोरे यांनी प्रस्ताविक इमारतीची माहिती दिली. 

या भुमिपूजन समारंभासमवेत त्यांनी जिल्हा न्यायालयात वकील दिनानिमित्त वकिलांशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या. समाजात जाणीव जागृतीचे काम व कायदेविषयक साक्षरतेचे काम वकिलांनी हाती घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यावेळी भोकर येथील जिल्हा न्यायाधीश मुजिब शेख, उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे, ॲड बी. डी. कुलकर्णी आदि मान्यवर उपस्थित होते. 

00000



वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...