Monday, November 19, 2018


लोहा नगरपरिषदेसाठी
नामनिर्देशनपत्र भरण्यास मुदतवाढ
नांदेड, दि. 19 : लोहा नगरपरिषदेच्या अध्यक्ष व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र वेबसाईटवर भरण्यासाठी व नामनिर्देशनपत्र स्विकारण्याचा कालावधी वाढविण्यात आला आहे.
लोहा नगरपरिषदेसाठी नामनिर्देशनपत्रे राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्यासाठी व ही नामनिर्देशनपत्रे स्विकारणे 12 ते मंगळवार 20 नोव्हेंबर 2018 या कालावधीत सकाळी 11 ते सायं 5 वाजेपर्यंत राहील. नामनिर्देशनपत्रांची छाननी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध बुधवार 21 नोव्हेंबर 2018 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून होईल.
मुळ कार्यक्रमातील नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक ते निकाल जाहीर करण्याचा दिनांक यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. तसेच अपरिहार्य परिस्थितीत लोहा नगरपरिषदमध्ये नामनिर्देशनपत्र व त्यासोबतचे शपथपत्र वेबसाईटवर भरुन त्याची प्रींट घेऊन सादर करणे शक्य नसल्यास ते ऑनलाईन पद्धत व पारंपारिक या दोन्ही पैकी कोणत्याही पद्धतीने स्विकारण्यास सुधारित कार्यक्रमानुसार आयोगाची मान्यता देण्यात येत आहे, असे राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
00000

Sunday, November 18, 2018


महावॉकेथॉनद्वारे रस्ता सुरक्षा जनजागृती
नांदेड दि. 18 :- रस्ता सुरक्षा विषयक प्रबोधनासाठी परिवहन विभाग, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, CASI व CSR Diary यांच्या संयुक्त विद्यमाने "रस्ता सुरक्षा महावॉकेथॉन"  आयोजन आज करण्यात आले होते. या महावॉकेथॉनला कॅम्ब्रीज स्कूल शिवाजीनगर नांदेड येथे प्रभारी जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त लहुराज माळी, अपर पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांनी हिरवी झेंडी दाखवली.
यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत, सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी, कार्यकारी अधिकारी, कार्यालयीन कर्मचारी, मोटार ड्रायव्हींग स्कूलचे संचालक, प्रतिनिधी, पोलीस विभागाचे कर्मचारी तसेच शहरातील कॅम्ब्रीज स्कुल, पॅनेसिया इंटरनॅशनल स्कुल, ग्यानमाता विद्या विहार आदी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. तसेच नांदेड रोटरी क्लबचे श्री. देशमुख, त्यांचे पदाधिकारी, नागरिकांनी सहभाग घेतला.  सदर महावॉकेथॉनला सुमारे 450 विद्यार्थी सहभागी झाले होते.
महावॉकेथॉन ही शहरातील कॅम्ब्रीज स्कूल शिवाजीनगर नांदेड येथून यशवंत अर्बन सोसायटी-आयटीआय पेट्रोलपंप-कुसुम सभागृह-यशवंत कॉलेज रोड-सार्वजनिक बांधकाम विभाग ते आयटीआय येथे संपन्न झाली. या महावॉकेथॉनमध्ये सहभागी व्यक्तीनी 2 किमी अंतर चालले आहेत. या मार्गावर पोलीस विभागाच्या वाहतुक शाखेने वाहतुक सुरळित होण्याकरिता सहकार्य केले.
या महावॉकेथॉनद्वारे सुरक्षात्मक जबाबदार ड्रायव्हींगद्वारे रस्ता सुरक्षा, ध्वनीप्रदूषणावर निर्बंध याबाबत संदेश देऊन जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या हातामध्ये रस्ता सुरक्षाबाबतचे स्लोगनचे हॅन्डबिलचे फलक व बॅनर प्रर्दशित करण्यात आले होते.
महावॉकेथॉन परिवहन विभाग, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग CASI व CSR Diary यांच्या संयुक्त विद्यमाने यशस्वीरित्या पार पाडली असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
000000

Saturday, November 17, 2018

देगलूर, मुखेड, उमरी तालुक्यात
दुष्काळ सदृश्य परिस्थिती ;
विविध उपाययोजना, सवलती लागू
नांदेड, दि. 17 :- जिल्ह्यातील देगलूर, मुखेड व उमरी या तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी जाहिर केली आहे. शासन निर्णयान्वये सन 2018-19 च्या खरीप हंगाम Trigger-2 लागू झालेल्या देगलूर, मुखेड व उमरी तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करुन विविध उपाययोजना व सवलती लागू करण्यात आल्या आहेत.  
दुष्काळसदृश्य परिस्थिती देगलूर, मुखेड व उमरी तालुक्यामध्ये जमीन महसूलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू विजबिलात 33.5 टक्के सुट. शालेय / महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता. आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर. टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे या सवलती लागू राहतील.
00000

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणात बैठक संपन्न
ज्येष्ठ नागरिकांनी सन्मानाने जीवन जगावे
-         न्या. वसावे
नांदेड दि. 17 :- ज्येष्ठ नागरिकांनी सन्मानाने, आनंदाने जीवन जगावे असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश डी. टी. वसावे यांनी केले.
ज्येष्ठ नागरीकांना मोफत विधीसेवा सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड येथे प्राधिकरणाचे सचिव न्या. वसावे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी समिती सदस्य डॉ. हंसराज वैद्य, अॅड. व्ही. डी. पाटनुरकर व अशोक तेलकर हे उपस्थित होते.   
न्या. वसावे म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांची तक्रार किंवा समस्या असेल तर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोबत आहे. कोणालाही त्यांचे हक्क व अधिकार हिरावून घेता येत नाहीत. ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्याची वेळेत तपासणी करुन औषध अनियमितपणे घ्यावीत. त्यांना आपले हक्क व अधिकार माहीत असणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरीकांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती न्या. वसावे यांनी यावेळी दिली.
ज्येष्ठ नागरीकांच्या समस्या जाणून दाखलपूर्व प्रकरणांचा विचार व आवश्यक विधी सेवा उपलब्ध करुन देण्याबाबत सूचित केले. जेष्ठ नागरीकांचे न्यायालयीन प्रकरणे लवकर निकाली काढण्याबाबत संबधित न्यायालयास सुचना देण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नागरीकांना आवश्यक त्यांना मोफत वकिल देण्यात आला होता.
0000




शेतकरी सन्मान योजनेंतर्गत
एक वेळ समझोतासाठी मुदतवाढ
नांदेड दि. 17 :- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत एकवेळा समझोतासाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, प्रवीण फडणीस यांनी केले आहे.
या योजनेंतर्गत मुद्दल व व्याजासह 1 लाख 50 हजार रुपयापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकवेळ समझोता (वन टाईम सेटलमेंट) योजनेखाली पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्याची संपूर्ण रक्कम भरण्याचा कालावधी 31 डिसेंबर 2018 पर्यत वाढविण्यात आला आहे. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.
00000

Friday, November 16, 2018


महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाचे अध्यक्ष 
न्यायाधिश के. यु. चांदीवाल यांचा दौरा
नांदेड दि. 16 :- महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण मुंबईचे अध्यक्ष न्यायाधिश के. यु. चांदीवाल हे 3 नोव्हेंबर 2018 ते 2 डिसेंबर 2018 या कालावधीत महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण औरंगाबाद येथे असून सदर कालावधीत या न्यायाधिकरणातील बेंच क्रमांक 1 सदस्य (न्यायीक) रिक्त असल्याने बेंच क्रमांक 1 च्या प्रकरणामध्ये मा. अध्यक्ष सुनावणी घेणार आहेत, अशी माहिती औरंगाबाद महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाचे उपप्रबंधक यांनी दिली.
00000



नांदेड जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथे दिवाळी अंकाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिध्द साहित्यीक सुरेश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, प्रताप सुर्यवंशी, संजय कर्वे, को. मा. गाडेवाड आदी. 

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...