Wednesday, September 12, 2018


साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक समितीचे
उपाध्यक्ष तथा सदस्य सचिव मधुकरराव कांबळे यांचा दौरा
      नांदेड, दि. 12 :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष तथा सदस्य सचिव मधुकरराव कांबळे  (राज्यमंत्री दर्जा) हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
      सोमवार 17 सप्टेंबर 2018 रोजी रात्री 10 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व मुक्काम.
      मंगळवार 18 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी 10 वा. विश्रामगृह नांदेड येथे स्थानिक कार्यकर्त्या समवेत बैठक (वेळ राखीव). दुपारी 1.30 वा. विश्रामगृह नांदेड येथून शासकीय वाहनाने लातूरकडे प्रयाण करतील.
00000


महाराष्ट्र विधानपरिषद विरोधी पक्षनेता
धनंजय मुंडे यांचा दौरा
      नांदेड, दि. 12 :- महाराष्ट्र विधानपरिषद विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
      गुरुवार 13 सप्टेंबर 2018 रोजी मुंबई येथून दुपारी 2.30 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. दुपारी 2.45 वा. नांदेड विमानतळ येथून शासकीय मोटारीने परळी वैजनाथ जि. बीडकडे प्रयाण करतील.
000000


मतदार यादी तयार करताना बीएलओ
अत्यंत महत्वाचा व जबाबदार घटक 
- जिल्हाधिकारी अरूण डोंगरे
नांदेड,दि. 12 :- मतदार यादी तयार करताना बीएलओ अत्यंत महत्वाचा व जबाबदार घटक, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
नांदेड उत्तर व नांदेड दक्षिण मतदारसंघातील बीएलओची एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा येथील डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात आज पार पडली. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. डोंगरे मार्गदर्शन करतांना बोलत होते.
यावेळी अपर जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी व तहसिलदार  किरण अंबेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी बीएलओ यांच्याशी संवाद साधत पर्यवेक्षक, बीएलओ यांच्या कामाचा आढावा घेतला. काही प्रश्न विचारून बीएलओ यांच्या ज्ञानाची व त्यांच्या कामाची तपासणी ही केली. बीएलओ हे पद अत्यंत महत्वाचे असून त्यांनी स्वतःचे कर्तव्य, जबाबदारी व्यवस्थित पार पाडावीत. मतदार यादी अचूक, शुद्ध करण्यात मोलाची भूमिका निभवावी असाही संदेश जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी यानिमित्ताने दिला. यावेळी बीएलओ यांनी आपापल्या केंद्रात केलेल्या कामाची माहिती दिली.
ऑक्सफर्ड द ग्लोबल शाळेतील निवडणूक साक्षरता मंडळाच्यावतीने स्पर्धेतील सर्वोत्तम सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. या शाळेचे जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी कौतूक केले व असे उपक्रम ईलसी क्लब मार्फत सर्वस्तरावर राबविले जावेत, असे आवाहन केले.
प्रास्ताविकात तहसिलदार किरण अंबेकर यांनी प्रशिक्षणाचा उद्देश सांगून मतदार यादी अद्यावतीकरणाच्या विविध पैलूंवरील प्रगतीची माहिती दिली.
यावेळी नायब तहसिलदार स्नेहलता स्वामी यांनी सादरीकरणाद्वारे मतदार यादी अद्यावतीकरण, संविधानिक तरतूदी व कायदेशीर बाबीसह बीएलओ कोण, त्यांच्या जबाबदाऱ्या, कर्तव्य यासोबतच विविध अर्जाची माहिती सांगून पुर्नरिक्षण कार्यक्रमात करावयाचे कामकाज याबाबत प्रशिक्षण दिले. सुरुवातीला जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांचे हस्ते दीपप्रज्वलन झाले.
याप्रसंगी दोन्ही मतदारसंघातील सर्व पर्यवेक्षक व 590 बीएलओ उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व सुत्रसंचलन नायब तहसिलदार निवडणूक स्नेहलता स्वामी यांनी केले.
000000


विविध शैक्षणिक योजना, यशकथांचा समावेश
असलेला लोकराज्य सप्टेंबर अंक प्रकाशित
नांदेड दि. 12 :- लोकराज्य सप्टेंबर विशेषांकाचे जिल्हास्तरीय प्रकाशन उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती दिपाली मोतियेळे यांच्या हस्ते येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील सिनेट हॉल येथे झाले.
यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. रमजान मुलानी, विद्यार्थी कल्याण विभाग प्रमुख राजेश्वर डूडूकनाळे, दुरशिक्षण विभागाचे डॉ. राम जाधव, राष्ट्रीय सेवा योजन कार्यक्रम समन्वयक डॉ. डी. डी. पवार, नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाचे डॉ. कल्पना कदम, पीपल्स महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अशोक सिद्धेवाड, छायाचित्रकार विजय होकर्णे यांची प्रमुख उपस्थिती होती.
लोकराज्य सप्टेंबर 2018 या विशेषांकात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शैक्षणिक सामाजिक कार्याविषयी विशेष लेखांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये द्रष्टा राजर्षी,  शैक्षणिक क्रांतिचे जनक, गाव तेथे शाळा, सामाजिक समतेचा अधिष्ठाता अशा लेखांचा समावेश आहे.
शैक्षणिक योजनांची माहिती
या अंकात राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना, शेतीपूरक कौशल्य प्रशिक्षण, छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य प्रशिक्षण अभियान आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती संवर्गातील विद्यार्थ्यांच्यासाठी राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात आली आहे. ज्या व्यक्ती व विद्यार्थ्यांना या योजनांचा लाभ झाला अशा लाभार्थ्यांच्या प्रेरणादायी यशकथा हे या अंकाचे वैशिष्ट्य आहे. ही माहिती वाचकांना उपयुक्त ठरेल. अंकाची किंमत दहा रुपये असून हा अंक सर्वत्र उपलब्ध आहे.
प्रकाशन कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, प्राध्यापक, विविध महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते. जिल्हा माहिती कार्यालयाचे श्रीमती अलका पाटील, काशिनाथ आरेवार, म. युसूफ यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.     
00000


स्वा. रा. तीर्थ मराठवाडा विद्यापिठात लोकराज्य वाचक अभियान संपन्न
लोकराज्य अंक शासकीय योजनांच्या
माहितीसाठी उपयुक्त  - उपजिल्हाधिकारी मोतीयेळे 
नांदेड, दि. 12 :- राज्य शासनाचे मुख्यपत्र म्हणून ओळख असलेला लोकराज्य अंक शासकीय योजनांच्या माहितीसाठी उपयुक्त आहे, असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती दिपाली मोतीयेळे यांनी केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, जिल्हा माहिती कार्यालय नांदेड आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने लोकराज्य वाचक अभियान कार्यक्रम येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील सिनेट हॉल येथे घेण्यात आला. त्यावेळी श्रीमती मोतीयेळे बोलत होत्या.  

यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. रमजान मुलानी, विद्यार्थी कल्याण विभाग प्रमुख राजेश्वर डूडूकनाळे, दुरशिक्षण विभागाचे डॉ. राम जाधव, राष्ट्रीय सेवा योजन कार्यक्रम समन्वयक डॉ. डी. डी. पवार, नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाचे डॉ. कल्पना कदम, पीपल्स महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अशोक सिद्धेवाड, छायाचित्रकार विजय होकर्णे यांची प्रमुख उपस्थित होते.
श्रीमती मोतीयेळे म्हणाले, राज्य शासनाचे मुखपत्र म्हणून ओळख असलेला लोकराज्य अंक आता दर्जेदार स्वरुपात निघत असून या अंकातून विविध विषयांचा सविस्तर आढावा घेतला जातो. स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसह सर्वांनी लोकराज्य अंक नियमित वाचला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. 
कुलसचिव डॉ. मुलानी यांनी लोकराज्य अंकात नवीन बदल झाला असून विशेषांक स्वरुपात वाचकांना तो उपलब्ध होत आहे. लोकराज्य अंकाची नोंदणी करावी, असे आवाहन केले.
डॉ. सिद्धेवाड यांनी सप्टेंबर विशेषांकात राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्तीसह विविध योजनेची माहिती दिली आहे. विद्यालयाने लोकराज्य नोंदणीसाठी उत्स्फुर्तपणे सहभाग घ्यावा असे सांगितले. डॉ. जाधव यांनी लोकराज्य अंकाची किंमत कमी असून तो संग्रही ठेवण्यासारखा आहे, असे सांगितले.
प्रास्ताविकात छायाचित्रकार होकर्णे यांनी लोकराज्य अंक हा शासकीय संदर्भ म्हणून ओळखला जातो. विविध क्षेत्रात करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा अंक उपयुक्त आहे. लोकराज्य अंकातील नवीन बदलाची तसेच लोकराज्य अभियानाविषयी त्यांनी माहिती दिली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. शिवराज बोकडे यांनी केले तर शेवटी विवेक डावरे यांनी आभार मानले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, प्राध्यापक, विविध महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाचे श्रीमती अलका पाटील, काशिनाथ आरेवार, म. युसूफ, बालनरसय्या अंगली  यांनी परिश्रम घेतले.
लोकराज्य अंकाचे प्रदर्शन व विक्री
यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने लोकराज्य मासिकाच्या गेल्या चार वर्षातील अंकांचे प्रदर्शन मांडण्यात आले. अनेक संग्राह्य दुर्मिळ अंकाचा यात समावेश होता. या प्रदर्शनाला मान्यवरांनी तसेच राष्ट्रीय सेवा योजनचे कार्यक्रम अधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी भेट दिली. लोकराज्य अंक विक्री व वार्षिक वर्गणीदार नोंदणी करण्यात आली. या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला.
00000

Tuesday, September 11, 2018


मंडप पेंडाल तपासणी
समितीमध्ये अंशत: बदल
नांदेड, दि. 11 :- महानगरपालिका क्षेत्रासाठी मंडप / पेंडाल तपासणी सनियंत्रण समितीमध्ये जिल्हाधिकारी नांदेड यांनी अंशत: बदल करुन मनपा उपआयुक्त संतोष कंदेवाड  ऐवजी (क्षे.का.क्र. 1 ते 6) मनपा उपआयुक्त विलास भोसीकर यांची नियुक्ती आदेश काढले आहेत.  
00000


श्री गणेश उत्सव कालावधीत
डॉल्बी सिस्टीम वापरास प्रतिबंध
नांदेड, दि. 11 :- जिल्ह्यात श्री गणेश उत्सव 13 ते 24 सप्टेंबर या कालावधीत डॉल्बी मालक / धारक / गणेश मंडळाचे पदाधिकारी यांनी त्यांचे कब्जातील डॉल्बी सिस्टीम वापरात / उपयोगात आण्यास प्रतिबंध आदेश जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी काढला आहेत.  
जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील कलम 144 (1) अन्वये 13 सप्टेंबर रोजी गणेशाचे आगमन ते 24 सप्टेंबर रोजी श्रीचे विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत नांदेड जिल्ह्यात कोणत्याही डॉल्बी मालक / धारक / गणेश मंडळाचे पदाधिकारी यांनी त्यांचे कब्जातील डॉल्बी सिस्टीम वापरात / उपयोगात आण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या डॉल्बी मशीन व यंत्रसामुग्री संबंधितांनी स्वत:चे कब्जात सिलबंद स्थितीत ठेवावी. हा आदेश 13 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी 7 ते 24 सप्टेंबर 2018 रोजी श्रीचे विसर्जन होईपर्यंतच्या कालावधीसाठी लागू राहील,
डॉल्बीचे आवाजामुळे व कंपनामुळे लहान मुले, वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक तसेच आजारी व सामान्य नागरीक यांच्या कानास, ऱ्हदयास आरोग्यास,जिवितास धोका होण्याची तसेच सामाजिक स्वास्थ बिघडण्यास व मालमत्तेस हानी पोहचण्याची शक्यता असल्याने सार्वजनिक शांतता व सुरीक्षततेस बाधा उत्पन्न होण्याची शक्यता असल्याने गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये डॉल्बी मालक / धारक यांचेवर बंदी घालण्यात आली आहे. असेही आदेशात नमुद केले आहे.
00000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...