Monday, June 11, 2018


शासनाच्या विविध योजनेचा लाभ
वंचितांपर्यंत पोहचवावा
- राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष अरुण देशपांडे  
नांदेड, दि. 11 :- शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्व विभागांनी वंचितापर्यंन्त पोहचवाव्यात. ग्राहक हा राजा समजून त्यांची फसवणूक होवू नये यासाठी सर्व स्तरातून प्रबोधन करण्याचे आवाहन केले. ग्राहक चळवळीत अधिकाधिक लोकांनी सक्रिय व्हावे, असे निर्देश राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण वसंतराव देशपांडे यांनी दिले .  
नांदेड येथील कै. शंकरराव चव्हाण नियोजन भवनाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर, समिती सदस्य संजय भोसरीकर , संजय जोशी , तहसीलदार किरण अंबेकर तसेच समिती सदस्य, जिल्हा परिषद, कृषि, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, शिक्षण, महावितरण यांच्यासह समिती सदस्य, प्रतिनिधी, जिल्ह्यातील विविध विभागांचे प्रमुख अधिकारी आदींची उपस्थिती होती.
राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण वसंतराव देशपांडे म्हणाले की, ग्राहक जागृतीसाठी विविध पातळ्यावर कार्य होत आहे. ग्राहकांना न्याय मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सुविधा सत्वर देण्याचा प्रयत्न करीत आहे. वस्तू खरेदी करताना तीची किंमत, वजन आणि प्रमाणाबाबत माहिती घेवून ग्राहकांनी जागरुक राहून खरेदी करावी . ग्राहकांनी खरेदी करतेवेळी आपली फसवणूक होणार नाही याची दक्षता घेवून खरेदी करावी. सेवा पुरवठादार आणि ग्राहक यांच्यात समन्वय असणे फार महत्वाचे असते. 
तसेच ग्राहकांच्या हिताच्या दृष्टीने 1986 चा कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी. या कायद्यातंर्गत ग्राहकांच्या अडीअडचणी सोडविण्याचा प्रयत्न विभाग करीत आहेत. ग्राहकांच्या काही तक्रारी असतील, तर त्या जिल्हा पुरवठा अधिकारी अथवा त्या विभागाच्या विभाग प्रमुख यांच्याकडे लेखी सादर कराव्यात . त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. ग्राहकांच्या सुविधासाठी टोल फ्री क्रमांक 1800-222-365 असा आहे. या टोल फ्री क्रमांकावर आपली तक्रार नोंदवू शकता. ही सुविधा 24 तास कार्यरत आहे.
शेतकऱ्यांच्या तक्रारी असतील , तर त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दाद मागता येते. यावेळी शैक्षणिक सुविधांचाही उहापोह करण्यात आला.
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या मासिक बैठकीस सक्षम अधिकारी यांनी आपल्या सोबत संचिका फाईल सोबत ठेवावी. तसेच त्याचा अहवालही यासोबत पाठविण्यात यावा. ग्राहकांचे प्रश्न तात्काळ सोडविता यावेत यासाठी पाठपुरावाही करण्यात यावा. तसेच समिती सदस्यांनी समन्वयाने कामे करावीत , असेही राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी सांगितले.  या बैठकीत विविध विषयांची जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर यांनी सादरी करणाद्वारे माहिती यावेळी दिली.
0000


माजी सैनिकांची बैठक
नांदेड, दि. 11 :- औरंगाबाद येथील ब्रिगेडियर डी के पत्रा, स्टेशन कंमाडर हे बुधवार 13 जुन रोजी ई.सी.एच.एस व जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे भेट देणार आहेत. माजी सैनिकांशी संवाद साधून अडीअडचणी जाणून  चर्चा  करणार आहेत. जिल्हयातील माजी सैनिकांची बैठक बुधवार 13 जुन रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे सकाळी 10.30 वा. आयोजित करण्यात आली आहे. माजी सैनिकांनी विशेषत: विरनारी, विरमाता-पिता व संघटनेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने यांनी  केले आहे.
00000



जिल्ह्यात गत 24 तासात
सरासरी 49.67 मि. मी. पाऊस
नांदेड, दि. 11 :- जिल्ह्यात सोमवार 11 जून 2018 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 49.67 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 794.69 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 171.21 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 18.33 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 11 जून 2018 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुका निहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 75.63 (240.76), मुदखेड- 82.67 (304.67), अर्धापूर- 58.67 (215.67), भोकर- 92.75 (281.75), उमरी- 69.67 (148.99), कंधार- 42.33 (155.00), लोहा- 57.00 (175.98), किनवट- 22.71 (102.70), माहूर- 28.00 (125.25), हदगाव- 35.57 (232.29), हिमायतनगर- 39.33 (231.67), देगलूर- 15.50 (52.16), बिलोली- 46.20 (120.80), धर्माबाद- 57.00 (130.32), नायगाव- 50.80 (153.00), मुखेड- 20.86 (68.28). आज अखेर पावसाची सरासरी 171.21 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 2739.29) मिलीमीटर आहे.
00000


Sunday, June 10, 2018



स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीराचे मंगळवारी आयोजन   
मराठी व्याकरण विषयावर
डॉ. आशालता गुट्टे यांचे मार्गदर्शन
नांदेड, दि. 10 :- "उज्ज्वल नांदेड" या मोहिमेअतंर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, सेतू समिती, नांदेड मनपा व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने मंगळवार 12 जून 2018 रोजी डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, स्टेडियम परिसर नांदेड याठिकाणी एक दिवसीय स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन ‍शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. आशालता गुट्टे या मराठी व्याकरण विषयावर सकाळी 10 ते दुपारी 12.30 यावेळात मार्गदर्शन करणार आहेत.  
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या शिबीरास प्रमुख अतिथी म्हणून मनपा आयुक्त लहुराज माळी, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या शिबिरास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी केले आहे.
00000

Friday, June 8, 2018


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या
गट-क परीक्षेविषयी उमेदवारांना सूचना
नांदेड, दि. 8 :- महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्‍ट्र गट-क (पूर्व) परीक्षा-2018 ही रविवार 10 जून 2018 रोजी नांदेड जिल्ह्यातील 34 शाळा, महाविद्यालय केंद्रात घेण्‍यात येणार आहे. आयोगामार्फत दिलेल्‍या खालील सूचनांचे उमेदवारांनी दक्षता घ्‍यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.  
उमेदवारांनी परीक्षेला येताना प्रवेशपत्र, दोन मुळ ओळखपत्र व त्‍या ओळखपत्राची छायांकीत प्रत  सोबत आणावी. उमेदवारांने ओळखीचा पूरावा (दोन) मूळ स्‍वरुपातीलच सादर करणे आवश्‍यक आहे. मूळ पूराव्‍याच्‍या ऐवजी साक्षांकीत प्रती, कलर झेरॉक्‍स स्‍वीकारण्‍यात येणार नाही. प्रवेश प्रमाणपत्र व्‍यतीरीक्‍त उमेदवाराने ओळखीचा कोणताही मूळ पुरावा सादर न केल्‍यास संबंधित उमेदवाराला परीक्षेस प्रवेश नाकारण्‍यात येईल. परीक्षा कक्षात भ्रमणध्‍वनी, क्‍यॅल्‍क्‍युलेटर, ब्‍ल्‍युटूथ इ. इलेक्‍ट्रानिक साहित्‍याचा वापर करु नये. परीक्षेत कॉपी / गैरप्रकाराचा प्रयत्‍न करणा-या उमेदवारांवर फौजदारी स्‍वरूपाचे गुन्‍हे दाखल करण्‍याच्‍या आयोगाच्‍या सूचना आहेत. परीक्षा उपकेंद्रावर उमेदवारांची पोलीस कर्मचारी यांचेकडून तपासणी करण्‍यात येणार आहे. आयोगाकडून परीक्षेच्‍या पर्यवेक्षणासाठी विशेष निरीक्षक / भरारी पथकाची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. जिल्‍हा प्रशासनामार्फत पोलीस बंदोबस्‍त व कलम 144 प्रतिबंधात्‍मक आदेश लागू करण्‍यात आले आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
00000


शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत
संलग्नतेबाबत ऑनलाईन प्रक्रिया सुरु
नांदेड, दि. 8 :- शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत संलग्नतेबाबत नवीन ऑनलाईन प्रक्रिया सुरु केली आहे, असे प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड यांनी कळविले आहे.
शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या अभ्यासक्रमास राज्य शासनाची मान्यता प्राप्त झाली आहे अशा संस्थांच्या अभ्यासक्रमास संलग्नता प्राप्त करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा http://ncvtmis.gov.in या वेबपोर्टलवर उपलब्ध आहे. या प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती पुस्तिका डीजीटी नवी दिल्ली यांचे https://ncvtmis.gov.in व www.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिली आहे. संलग्नीकरणासाठी आकारण्यात येणारे शुल्क निश्चित झाले नसून इच्छूक संस्थांनी अर्ज करताना शुन्य रक्कम टाकून भरावा तसेच संलग्नतेबाबत अडचण आल्यास त्या प्रादेशिक कार्यालयास कळवाव्यात, असे आवाहन प्राचार्य यांनी केले आहे.   राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत संलग्नतेबाबत डीजीटी नवी दिल्ली यांच्या आदेशान्वये यापुढील प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहेत. यापुढे संलग्नीकरणाची प्रक्रिया ही राज्य शासनाद्वारे राबविण्याचे धोरण डीजीटी नवी दिल्ली यांनी निश्चित केले आहे. डीजीटी यांनी संलग्नीकरणासाठी वेब पोर्टल सुरु केले आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
00000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...