Monday, March 8, 2021

जिल्हाधिकारी कार्यालयात महिला दिन साजरा

कोरोनाच्या आव्हानात्मक काळात

1 हजार 54 मोतीबिंदूच्या यशस्वी शस्त्रक्रिया 

पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केला महिलांच्या कार्याचा गौरव  

नांदेड (जिमाका), दि. 8 :- आजच्या काळातील कोणतेही असे क्षेत्र सुटले नसून सर्वच क्षेत्रात महिलांनी आपला अपूर्व ठसा उमटवला आहे. कोरोना सारख्या आव्हानात्मक काळात महिलांनी आपले कसब व योगदान पणाला लावून जे आव्हान पेलून दाखविले त्याला तोड नाही या शब्दात पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या शुभसंदेशात महिलांच्या योगदानाचा गौरव केला. आज जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ध्वजारोहण कार्यक्रम व वैद्यकिय क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या महिला कोरोना वॉरीयर्स यांचा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रातपवार व जिल्हाधिकारी कार्यालय, आरोग्य विभागातील सर्व महिला अधिकारी, कर्मचारी उपस्थित होत्या. 

कोरोनासमवेत इतर वैद्यकिय सेवा-सुविधा सामान्य जनतेसाठी तत्पर ठेवणे हे शासनाचे कर्तव्यच आहे. नांदेड जिल्ह्यातील लोकसंख्या लक्षात घेत ग्रामीण भागात सेवा-सुविधा पोहचविण्यासमवेत आरोग्य विभागाने तब्बल 1 हजार 58 कॅट्रॅक्स आणि मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करून यासाठी योगदान देणाऱ्या डॉ. रोशन आरा तडवी यांच्यासह इतर महिला अधिकाऱ्यांचा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी गौरव केला. कोरोनाच्या काळात नेत्रशल्यचिकित्सा विभाग सांभाळणाऱ्या डॉ. कल्पना वाकोडे, डॉ. सुजाता राठोड, डॉ. खान साबा अशरफ, डॉ. अर्चना बजाज, प्रयोगशाळा तज्ज्ञ ज्योती बागल, परिचारिका मालती वाघमारे, जयश्री वाघ, अहवाल नोंदणी विभागातील शुभधा गोसावी, अर्पणा जाधव, रुग्ण व्यवस्थापक डॉ. मसरत सिद्दीकी, स्वच्छता विभागातील किरण हटकर, कोमल दुलगच, समुपदेशक ज्योती पिंपळे, संतोषी रतनसिंघ मंगोत्रा, विशाखा आर. बापटे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी हॅपी क्लबचे कार्यकर्ते मोहमंद शोएब यांच्या आई शबाना बेगम यांचाही प्रातिनिधक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मिना सोलापूरे यांनी केले. यावेळी महिलांच्या आरोग्य तपासणीचे शिबिर जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने आयोजित केले होते. 

कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी दिपाली मोतियळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदिप कुलकर्णी, शरद मंडलिक, अनुराधा ढालकरी, संतोषी देवकुळे व सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात महिला अधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

0000









Sunday, March 7, 2021

 

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू

नांदेड (जिमाका) दि. 7 :- नांदेड जिल्ह्यात 8 मार्च रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 22 मार्च, 2021 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात सोमवार 8 मार्च 2021 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 22 मार्च 2021 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

000000

 

 नांदेड जिल्ह्यात 229 व्यक्ती कोरोना बाधित तर एकाचा मृत्यू  

1 हजार 369 अहवालापैकी 1 हजार 109 निगेटिव्ह 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- रविवार 7 मार्च 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 229 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 98 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 131 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 114 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. 

आजच्या 1 हजार 369 अहवालापैकी 1 हजार 109 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 24 हजार 538 एवढी झाली असून यातील 22 हजार 818 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 899 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 22 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. 

शनिवार 6 मार्च 2021 रोजी अय्यप्पा स्वामी नगर किनवट येथील 78 वर्षाच्या एका महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्याल विष्णूपूरी  येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 606 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 3, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 81, देगलूर कोविड रुग्णालय 1,  किनवट कोविड रुग्णालय 2, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 8, भोकर तालुक्याअंतर्गत 4, खाजगी रुग्णालय 15 असे एकूण 114 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 92.99 टक्के आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 57,  अर्धापूर तालुक्यात 8, हिमायतनगर 1, किनवट 6, मुखेड 3, उमरी 5, नांदेड ग्रामीण 1, देगलूर 1, कंधार 4, लोहा 9, नायगाव 1, यवतमाळ 2 असे एकूण 98 बाधित आढळले. 

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 101, अर्धापूर तालुक्यात 1, देगलूर 1, कंधार 1, लोहा 10, मुदखेड 1, यवतमाळ 2, नांदेड ग्रामीण 2, भोकर 1, धर्माबाद 6, किनवट 2, माहूर 1, उमरी 1, हिंगोली 1 असे एकूण 131 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 899 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 55, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 68, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 55, किनवट कोविड रुग्णालयात 38, मुखेड कोविड रुग्णालय 10, हदगाव कोविड रुग्णालय 4, महसूल कोविड केअर सेंटर 58, देगलूर कोविड रुग्णालय 4, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 330, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 170, खाजगी रुग्णालय 107 आहेत. 

रविवार 7 मार्च 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 134, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 15 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 40 हजार 437

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 11 हजार 502

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 24 हजार 538

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 22 हजार 818

एकुण मृत्यू संख्या-606

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी (गृहविलगीकरण) बरे होण्याचे प्रमाण 92.99 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-16

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-6

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-239

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-899

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-22.

0000

Saturday, March 6, 2021

 

जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतचे 10 एप्रिलला आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 6 :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे शनिवार 10 एप्रिल 2021 रोजी नांदेड येथील जिल्हा न्यायालय, जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय व सहकार न्यायालय नांदेड येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीत मोठया संख्येने प्रकरणात तडजोड होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे श्रीराम रा. जगताप, व न्यायाधीश जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. एस. रोटे यांनी केले आहे. 

या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दिवाणी, मो.अ.दावा, भूसंपादन, किरकोळ दिवाणी अर्ज, तसेच बॅंकांची प्रकरणे इत्यादी न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे या लोकन्यायालयात ठेवण्यात येणार आहेत. या लोकअदालतीत विद्युत कंपनी, विविध बॅंका, भारतसंचार निगम यांचे थकीत बाकी येणे बाबतची दाखल पुर्व प्रकरणे तसेच, विविध मोबाईल कंपन्यांचीही थकित रकमेबाबतची प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. 

या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जिल्हयातील सर्व विधीज्ञ आणि विविध विमा कंपनीचे अधिकारी, भूसंपादन अधिकारी, मनपा, महसुल विभागाचे अधिकारी यांचा सहभाग राहणार आहे. प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे श्रीराम रा. जगताप व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश आर. एस. रोटे यांनी केले असुन सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. सर्व संबंधित पक्षकारांनी शनिवार 10 एप्रिल 2021 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रकरणे ठेवुन आलेल्या संधीचा लाभ घ्यावा, असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

00000

 

कोरोनाची खबरदारी घेत

जागतिक महिला दिन साजरा करण्याच्या सुचना

नांदेड (जिमाका) दि. 6 :- कोविड-19 अर्थात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जागतिक महिला दिन साजरा करतांना काळजी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने देण्यात आलेले आहेत. येत्या 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त दिलेल्या निर्देशाचे पालन करीत हा महिला दिन साजरा करावा, असे स्पष्ट करुन जिल्हा प्रशासनाने विविध कार्यालयांना सूचित केले आहे. 

जागतिक महिला दिन हा केंद्र व राज्य शासनाने कोविड संदर्भात निर्गमित केलेल्या सुचनांच्या अधिन राहून तसेच जिल्ह्यात कोविड-19 कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असल्याने सुरक्षा उपाययोजना संबंधी आवश्यक ती खबरदारी घेऊन सोमवार 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे, असेही निर्देश दिले आहेत. 

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने जागतिक महिला दिन साजरा करण्याबाबत शासन परित्रकाद्वारे सूचना निर्गमीत केल्या आहेत. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहलिसदार, जिल्हा व सत्र न्यायालय प्रबंधक, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाचे कुलसचिव, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जि. प., जिल्हा महिला बालविकास अधिकारी जि.प., बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प, शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक जि. प., उपजिल्हाधिकारी (सामान्य) नांदेड यांना पत्राद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयाने सुचना निर्गमीत केली आहे.

शासन परिपत्रकातील दिलेल्या सुचनेप्रमाणे सोमवार 8 मार्च 2021 रोजी जागतीक महिला दिनानिमित्त विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजन करुन केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल शासन व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असेही पत्रात नमूद केले आहे.

0000

 

नांदेड जिल्ह्यात 150 व्यक्ती कोरोना बाधित तर एकाचा मृत्यू  

1 हजार 318 अहवालापैकी 1 हजार 160 निगेटिव्ह

नांदेड (जिमाका) दि. 6 :- शनिवार 6 मार्च 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 150 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 73 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 77 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 92 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

 

आजच्या 1 हजार 318 अहवालापैकी 1 हजार 160 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 24 हजार 309 एवढी झाली असून यातील 22 हजार 704 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 785 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 23 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

 

शनिवार 6 मार्च 2021 रोजी सिद्धार्थनगर देगलूर येथील 65 वर्षाच्या एका महिलेचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 605 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 8, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 61, किनवट कोविड रुग्णालय 2, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 6, खाजगी रुग्णालय 15 असे एकूण 92 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 93.39 टक्के आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 50, देगलूर तालुक्यात 4, कंधार 1, मुदखेड 2, नायगाव 1, नांदेड ग्रामीण 1, हिमायतनगर 6, लोहा 3, मुखेड 1, उमरी 4 असे एकुण 73 बाधित आढळले. ॲटीजन किट्स तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 48, अर्धापूर तालुक्यात 8, देगलूर 1, किनवट 7, मुखेड 2, औरंगाबाद 1, नांदेड ग्रामीण 1, बिलोली 2, धर्माबाद 3, हिमायतनगर 2, पुसद 2 असे एकूण 77 बाधित आढळले.

 

जिल्ह्यात 785 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 49, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 61, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 47, किनवट कोविड रुग्णालयात 34, मुखेड कोविड रुग्णालय 9, हदगाव कोविड रुग्णालय 3, महसूल कोविड केअर सेंटर 59, देगलूर कोविड रुग्णालय 5, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 282, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 147, खाजगी रुग्णालय 89 आहेत.

 

शनिवार 6 मार्च 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 140, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 12 एवढी आहे.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 38 हजार 704

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 10 हजार 77

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 24 हजार 309

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 22 हजार 704

एकुण मृत्यू संख्या-605

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी (गृहविलगीकरण) बरे होण्याचे प्रमाण 93.39 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-2

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-6

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-179

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-785

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-23.

0000

Friday, March 5, 2021

 नांदेड जिल्ह्यात 128 व्यक्ती कोरोना बाधित तर एकाचा मृत्यू  

2 हजार 60 अहवालापैकी 1 हजार 910 निगेटिव्ह

नांदेड (जिमाका) दि. 5 :- शुक्रवार 5 मार्च 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 128 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 58 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 70 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 96 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. 

आजच्या 2 हजार 60 अहवालापैकी 1 हजार 910 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 24 हजार 159 एवढी झाली असून यातील 22 हजार 612 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 729 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 19 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

गुरुवार 4 मार्च 2021 रोजी भावसार चौक नांदेड येथील 50 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 604 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 3, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 66, भोकर तालुक्यांतर्गत 3, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 9, देगलूर कोविड रुग्णालय  1, खाजगी रुग्णालय 14 असे एकूण 96 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 93.59 टक्के आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 31, देगलूर तालुक्यात 4, लोहा 2, मुदखेड 5, नायगाव 1, यवतमाळ 1, नांदेड ग्रामीण 2, हिमायतनगर 8, माहूर 1, मुखेड 2, परभणी 1 असे एकुण 58 बाधित आढळले. ॲटीजन किट्स तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 37, भोकर तालुक्यात 2, धर्माबाद 5, बिलोली 1, किनवट 9, माहूर 2, उमरी 1, नांदेड ग्रामीण 3, देगलूर 3, हदगाव 3, हिमायतनगर 2, लोहा 1, मुखेड 1 असे एकूण 70 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 729 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 43, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 62, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 36, किनवट कोविड रुग्णालयात 35, मुखेड कोविड रुग्णालय 7, हदगाव कोविड रुग्णालय 6, महसूल कोविड केअर सेंटर 47, देगलूर कोविड रुग्णालय 5, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 268, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 139, खाजगी रुग्णालय 89 आहेत. 

शुक्रवार 5 मार्च 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 146, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 12 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 37 हजार 66

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 8 हजार 651

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 24 हजार 159

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 22 हजार 612

एकुण मृत्यू संख्या-604

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी (गृहविलगीकरण) बरे होण्याचे प्रमाण 93.59 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-10

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-09

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-122

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-729

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-19.

0000

वृत्त क्रमांक   स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त नांदेडसाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक – पालकमंत्री अतुल सावे •‘स्वच्छ नांदेड – सुंदर नांदेड’ मोहिमे...