Monday, May 18, 2026

 वृत्त क्रमांक 

देगलूर येथील अपंग प्रशिक्षण केंद्रात 30 जून पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड दि. 18 मे :- दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे यांच्यामार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र देगलूर या संस्थेत म.रा. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मार्फत मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी 18 ते 40 वयोगटातील दिव्यांग, अस्थिव्यंग, मुकबधीर, अंध, मतिमंद, मुला-मुलींना प्रवेश देण्यात येत आहे. या प्रशिक्षण केंद्रात विद्युत तारतंत्री, सर्व्हिसिंग ऑफ इलेक्ट्रीक डोमेस्टिक ऍप्लायसेंस, मोबाईल रिपेअरिंग ॲड सर्व्हिसिंग, फीटर, एलिमेंट ऑफ कॉम्प्युटर इंजिनिअरींग, कॉम्प्युटर ऑपरेशन विथ एम.एस.ऑफीस, डेस्क टॉप पब्लिशिंग (DTP) कॉम्प्युटर अकाँटिंग व ऑफिस ऑटोमेशन व अगरबत्ती, खडु, धुप बनवणे इत्यादी अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात येत आहे. 

इच्छूक दिव्यांग, अस्थिव्यंग, मुकबधीर, अंध, मतिमंद मुला-मुलींनी किंवा पालकांनी 30 जून 2026 पर्यंत प्राचार्य तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, भायेगाव रोड, देगलूर जि. नांदेड येथे पत्रव्यवहार करावा किंवा समक्ष भेटावे. अधिक माहितीसाठी मो. 9960900369, 9403207100, 7378641136 वर संपर्क साधावा, असे आवाहन कर्मशाळा अधिक्षक तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र देगलूर यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक   हवामान विभागाच्या सूचना  जिल्ह्यात 20 मे रोजी येलो अलर्ट जारी नांदेड, दि. 19 मे : प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांन...