Tuesday, January 4, 2022

मुख्यालय वृत्त


राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार - 2021 साठी

प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

 

        मुंबई, दि. 4 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2021 ते 31 डिसेंबर, 2021 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी 2022 असा आहे.

                        उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2021 चे माहितीपत्रक/अर्जाचे नमुने शासनाच्या www.maharashtra.gov.inआणि महासंचालनालयाच्या dgipr.maharashtra.gov.inया संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेचराज्यातील विविध भागातील स्पर्धकांना संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांना, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घेता येईल.

            राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या पुरस्कारामध्ये 11 राज्यस्तरीय तर, 8 विभागीय स्तरावरील पुरस्कार असे एकूण 19 पुरस्कार प्रदान करण्यात येतात. त्याची माहिती पुढीलप्रमाणे : -

 

पुरस्कारांची माहिती

अ.क्र

पुरस्काराचेनाव

पारितोषिक

1

बाळशास्त्रीजांभेकरपुरस्कार (मराठी) (राज्यस्तर)

51 हजाररुपये

(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)

2

अनंतगोपाळशेवडेपुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर)

 

51 हजाररुपये

(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)

3

बाबूरावविष्णूपराडकरपुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर)

51 हजाररुपये

(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)

4

मौलानाअबुलकलामआझादपुरस्कार(उर्दू) (राज्यस्तर)

51 हजाररुपये

(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)

5

यशवंतरावचव्हाणपुरस्कार

शासकीयगट (मराठी) (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर)

51 हजाररुपये

(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)

6

पु.ल.देशपांडेउत्कृष्टदूरचित्रवाणीवृत्तकथापुरस्कार(राज्यस्तर)

51 हजाररुपये

(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)

7

तोलारामकुकरेजाउत्कृष्टवृत्तपत्रछायाचित्रकारपुरस्कार (राज्यस्तर)

51 हजाररुपये

(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)

8

केकीमूसउत्कृष्टछायाचित्रकारपुरस्कारशासकीयगट (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर)

51 हजाररुपये

(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)

9

समाज माध्यम पुरस्कार(राज्यस्तर)

51 हजाररुपये

(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)

10

स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर)

51 हजाररुपये(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)

11

पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार (राज्यस्तर)

51 हजाररुपये

(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)


विभागीय पुरस्कार

 

12

दादासाहेबपोतनीसपुरस्कार,

नाशिकविभाग

 

51 हजाररुपये

(मानचिन्हवप्रशस्तीपत्र,

याव्यतिरिक्तरुपये 10 हजारदै.गावकरीनेपुरस्कृतकेलेआहेत.)

13

अनंतरावभालेरावपुरस्कार,

औरंगाबादआणि लातूर विभाग

51 हजाररुपये

(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)

14

आचार्यअत्रेपुरस्कार,

मुंबईविभाग

51 हजाररुपये

(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)

15

 

नानासाहेबपरूळेकरपुरस्कार,

पुणेविभाग

51 हजाररुपये

(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)

16

शि.म.परांजपेपुरस्कार,

कोकणविभाग

51 हजाररुपये

(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)

17

ग.गो.जाधवपुरस्कार,

कोल्हापूरविभाग

51 हजाररुपये

(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)

18

लोकनायकबापूजीअणेपुरस्कार,

अमरावतीविभाग

51 हजाररुपये

(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)

19

ग.त्र्यं.माडखोलकरपुरस्कार,

नागपूरविभाग

51 हजाररुपये

(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)

 

या पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्यासाठीच्या नियम व अटी पुढीलप्रमाणे :-

 

नियम व अटी

राज्य / विभागीय पुरस्कार

 

        पुरस्कारांसाठी पत्रकारांचीमागील पाच वर्षाचीकामगिरी, त्यांचीसामाजिकबांधिलकी, शासनाच्याविकासविषयकप्रसिद्धीसाठी, जनतेमधीलविकासविषयकजाणिवांच्याजागृतीसाठीत्यांनीकेलेलेप्रयत्नआणिपुरस्कारदेण्यातयेणाऱ्यावर्षातीलत्यांचीकामगिरीयाचाविचारकेलाजाईल. मराठी, इंग्रजी, हिंदीआणिउर्दूभाषेतीलराज्य/विभागीयपुरस्कारांसाठी पत्रकारांचीनिवडयाचपद्धतीनेकेलीजाईल. यास्पर्धेतफक्तमराठीभाषेसाठीवराज्यवविभागीयस्तरआहेत. इंग्रजी, हिंदी,उर्दूयाभाषेतीलपुरस्कारतसेच समाज माध्यम पुरस्कारआणिस्वच्छमहाराष्ट्रजनजागृतीपुरस्कारहेकेवळराज्यस्तरीयआहेत.पुरस्कारासाठीनिवडझाल्यासपुरस्कारस्वीकारण्याचीतयारीअसल्याचेसंबंधितपत्रकाराचेसंमतीपत्रप्रवेशिकेसोबतजोडणेआवश्यकआहे.

            उत्कृष्ट लेखन पुरस्कारासाठीपाठवावयाच्याप्रवेशिकेसोबतमूळ लेखनाचेकात्रणत्याच्यादोनप्रतीसहपाठवावे. मूळ लेखनाच्यावृत्तपत्रीयकात्रणांसोबतत्याच्यादोन प्रतीनसल्यासप्रवेशिकारद्दहोईल. मूळ लेखनावरलेखकाचेनावनसल्यासज्यानियतकालिकातहालेखप्रसिद्धझालाअसेलत्यानियतकालिकाच्यासंपादकांचादाखलाजोडलेल्याप्रवेशिकांचाचविचारकेलाजाईल.

पत्रकारांच्यातसेचवृत्तपत्रछायाचित्रकारांच्यागटातभागघेणाऱ्यास्पर्धकांनीशासनअथवाशासकीयमहामंडळाच्यासेवेतनसल्याचेप्रतिज्ञापत्रप्रवेशिकेसोबतजोडणेआवश्यकआहे.

            अर्जदारानेराज्यवविभागीयपातळीवरीलप्रवेशिकानागपूरआणिऔरंगाबादयेथीलसंचालक(माहिती), अमरावती, नाशिक, पुणे, कोल्हापूर, कोकणविभागयेथीलविभागीयउपसंचालक(माहिती) किंवाजिल्हामाहितीअधिकारीयांच्याकडेथेटपाठवाव्यात. प्रवेशिकेसोबतजिल्हामाहितीअधिकारीकिंवापत्रकारसंघटनांच्याशिफारसपत्राचीआवश्यकतानाही.

मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दूयाचारहीभाषेतीलराज्यस्तरीयपुरस्कारांसाठीतसेचराज्यपातळीवरीलशासकीयगटवविभागीयपातळीवरीलमराठीभाषेतीलपुरस्कारपात्रविजेत्यांचीनिवडकरण्यासाठीमाहितीवजनंसपर्कमहासंचालनालयातर्फेपरीक्षकांचीसमितीनियुक्तकरण्यातयेईल. समितीचीरचना,स्पर्धावस्पर्धेतीलपुरस्कारासंबंधीशासनाचेनिर्णयअंतिमराहतील.

            ज्यानियतकालिकांचाखपवजनमानसावरीलप्रभावचांगलाआहे,अशाचनियतकालिकांतीलमजकूरस्पर्धेच्या प्रवेशिकेसाठीपात्रठरेल.

            जेपत्रकारबृहन्मुंबई, नवीमुंबई(कोकण), कोल्हापूर, नागपूर, अमरावती, नाशिक, पुणेआणिऔरंगाबादयाविभागातवास्तव्यकरीतअसतील,त्यांनात्याविभागासाठीअसलेल्याविभागीयस्पर्धेतचभागघेतायेईल.मात्रत्यांचेलेखणअन्यकोणत्याहीविभागातीलवृत्तपत्रातप्रसिद्धझालेअसेलतरीतेग्राह्यमानण्यातयेतील.

            गोवावबेळगावयेथीलपत्रकारांनाकोल्हापूरविभागीयस्पर्धेत (सिंधुदुर्गआणिसांगलीजिल्ह्यांसह) सहभागघेतायेईल. दिल्लीयेथीलपत्रकारांनी आपल्याप्रवेशिकाथेटकिंवामहाराष्ट्रपरिचयकेंद्रामार्फतमुख्यालयात माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, मंत्रालय मुंबई-32 येथे पाठवाव्यात.

            शासकीयगटातीलस्पर्धेसाठीएकचप्रवेशिकापाठविण्याचीमुभाराहील. प्रवेशिकासंबंधीविभागाच्यासंचालककिंवाउपसंचालकांनावबृहन्मुंबईच्याप्रवेशिकामाहितीवजनसंपर्कमहासंचालनालयातवेगवेगळ्यापाठवाव्यालागतील.

            2021यावर्षातदैनिकवृत्तपत्रात, नियतकालिकातप्रसिद्धझालेल्यालेखांचीकात्रणेप्रवेशिकेसोबतजोडणेआवश्यकआहे.

            प्रवेशिकाराज्यस्तर किंवाविभागीयस्तरासाठीआहे.तसेच,कोणत्याभाषेकरिताआहेयाबाबतचास्पष्टउल्लेखअसावा. स्पर्धेसाठीपाठविलेलीप्रवेशिका,त्यासोबतजोडलेलीलेखांचीकात्रणे निटनेटकीअसणेअत्यावश्यकआहे. अस्ताव्यस्त, खाडाखोडअसणारीकिंवावाचतायेणारनाहीत, अशीप्रवेशिकारद्दकरण्यातयेईल.एकाचपत्रकारालासलगदोनवर्षपुरस्कारप्राप्त झाला असल्यासतिसऱ्यावर्षीत्याचीप्रवेशिकाविचारातघेतलीजाणारनाही.

            प्रत्येकगट वभाषेसाठीसंबंधितपत्रकारांनीएकचप्रवेशिकापाठवावी. एकापेक्षाजास्तप्रवेशिकापाठविल्यासत्याचाविचारकेलाजाणारनाही.

विकास योजना संदर्भातील

समाज माध्यम(सोशल मीडिया) पुरस्कार

            हीस्पर्धावृत्तविषयक/चालू घडामोडीविषयक संकेतस्थळेवब्लॉग या समाज माध्यमात प्रसारितमराठीभाषेतीलवृत्तविषयक विशेषत: शासकीय मजकुरासाठीआहे. या दोन माध्यमांचा प्रभावी वापर करणाऱ्या पत्रकारितेच्या क्षेत्रातील व्यक्तींना या पुरस्कारासाठी सहभाग घेता येईल. समाज माध्यमातील पत्रकारिता ही स्पर्धेच्या संबंधित वर्षातील असावी. हे लेखन किमान एक वर्षापासून सुरु असावे. या माध्यमाचा वापर करताना केंद्र शासनाने विहीत केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब केलेला असावा. प्रवेशिका पाठविताना अर्जदाराने व त्यांचे नामनिर्देशन ज्या व्यक्ती/संस्था/संघटना करतील त्यांनी संकेतस्थळ व ब्लॉग या समाज माध्यमांद्वारे करण्यात आलेल्या प्रसिद्धींची उदाहरणे व ती कोणत्या तारखेस प्रसारित झाली त्यांच्या मुद्रीत प्रती (प्रिंट आऊट) सादर कराव्यात.  विविध पुरस्कारासाठी असलेल्या अटी या गटासाठी लागू राहतील.

स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार

            केंद्र शासनाचे स्वच्छ भारत अभियान आणि राज्य शासनाचे स्वच्छ महाराष्ट्र अभियानप्रभावीपणे राबविले जात आहे. आपल्या लेखनातून लोकांमध्ये स्वच्छता विषयक जनजागृती करणाऱ्या पत्रकारांसाठी ही स्पर्धा आहे. या स्पर्धेत मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू भाषेतील वृत्तपत्रांमध्ये लेखन करणाऱ्या पत्रकारांना तसेच ईलेक्ट्रॉनिक्स माध्यमांमधील पत्रकारांना सहभागी होता येईल.

स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, महाराष्ट्र स्वच्छता अभियान (नागरी), संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, हगणदारीमुक्त गाव योजना, घन कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचऱ्यामधून बायोगॅस तसेच वीज निर्मिती इत्यादी बाबत लेखण केलेले असावे.शासनस्तरावरुन राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता विषयक योजनांची प्रसिद्धी, स्वच्छता अभियान लोकसहभाग वाढविण्यासाठी लेखनाद्वारे करण्यात आलेले प्रयत्न, स्वच्छतेचे महत्व पटविण्यासाठी करण्यात आलेल्या जनजागृतीपर लेखन यांचा या स्पर्धेत अंतर्भाव होईल. स्पर्धेसाठी असणाऱ्या सर्व अटी या गटासाठी लागू राहतील.

इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांसाठी स्पर्धा

        इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांसाठी पु.ल.देशापांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार देण्यात येतो. ही स्पर्धा मराठी भाषेतील वृत्तकथेसाठी असून दूरदर्शन, खाजगी चित्रवाहिन्या, स्थानिक केबल न्यूज व शासकीय उपक्रम यांना यामध्ये सहभाग घेता येईल. वृत्तकथाचित्रे ही स्पर्धेच्या संबंधित वर्षात तयार केलेली व प्रसारित झालेली असावीत. वृत्तकथा किमान 3 मिनिटे असावी. प्रवेशिका पाठवितांना संबंधित प्रतिनिधीचीमाहितीतसेच वृत्तकथा कोणत्या तारखेस प्रसारित झाली, याबाबतचे संबंधित संस्था प्रमुख/संपादक यांचे प्रमाणपत्रजोडलेले असावे. स्थानिक केबलच्या बाबतीत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांचे नोंदणीपत्र सादर करणे आवश्यक आहे.

            प्रवेशिकेसोबत संबंधित वृत्तकथेची सीडी/कॅसेट थेट त्या त्या विभागातील उपसंचालक /जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे तर मुंबईकरिता उपसंचालक (वृत्त), यांच्या नावाने मुंबई येथील मुख्यालयातील पत्त्यावर पाठवावे.

                                छायाचित्रकार पुरस्कार

तोलारामकुकरेजाउत्कृष्टवृत्तपत्रछायाचित्रकारपुरस्कारस्पर्धा, हीमराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दूभाषेतीलवृत्तपत्रातीलपूर्णवेळछायाचित्रकारांसाठीआहे. यातसामाजिकसंदेशदेणारीछायाचित्रे, समाजातीलप्रश्नमांडणारीछायाचित्रे, शासकीययोजनांचाप्रचारआणिप्रसारासाठीपुरकठरतीलअशीछायाचित्रेयांच्यासहप्रवेशिकासादरकरतायेईल.

            महाराष्ट्रशासनाच्याविविधलोकोपयोगीयोजनांवरीलछायाचित्रग्राह्य धरण्यात येईल. मात्रहेछायाचित्रमूळस्वरुपातीलअसावे. फोटोप्रतनसावी. स्पर्धेसाठी असणाऱ्या सर्व अटी या गटासाठी लागू राहतील. 

केकीमूसउत्कृष्टछायाचित्रकारपुरस्कार, शासकीयगट (मावज)

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामध्ये छायाचित्रकार म्हणून काम करणारे कर्मचारी या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात.

पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार

विविधविकास कामांची दखल, आपल्या अग्रलेखांद्वारे घेणाऱ्या पत्रकार/संपादकांना, पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार देण्यात येईल.

या स्पर्धेसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू भाषेतील संपादकांना सहभाग घेता येईल. या स्पर्धेसाठी लिहिलेले अग्रलेख हे स्पर्धेच्या संबंधित वर्षातील असावे.

            प्रवेशिका पाठविताना अर्जकर्त्याने वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या किमान 25 अग्रलेखांची कात्रणे त्याच्या प्रसिद्धीच्या तारखेच्या माहितीसह सादर करावे.

            इतर पुरस्कारांसाठी असलेले इतर सर्व नियम व अटी या पुरस्कारासाठीही लागू असतील.

0000


वृत्त क्रमांक 8

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी 

अर्ज करण्यास 28 फेब्रुवारी पर्यत मुदतवाढ 

नांदेड (जिमाका) दि. 4:- अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थी शासकीय प्रवेशास पात्र असुन प्रवेश मिळालेला नाही. अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक रक्कम देण्यात येते. ही रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जाचा विहित नमुना http://sjsa.maharashtra.gov.in किंवा http://maharashtra.gov.in संकेतस्थळवर उपलब्ध आहे. पात्र विद्यार्थ्यांनी 28 फेब्रुवारी 2022 रोजी कार्यालयीन वेळेपर्यंत, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ग्यानमाता शाळेसमोर, नमस्कार चौक, नांदेड येथे अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे, सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले आहे. 

योजनेच्या अटीं व शर्ती तसेच अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध आहे. नांदेड महानगरपालिका क्षेत्रामध्ये तसेच नांदेड महानगरपालिकेच्या हद्दीपासून 5 कि.मी.परिसरातील महाविद्यालये, शैक्षणिक संस्था या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम व खर्चाची बाब पुढीलप्रमाणे आहे.  भोजन भत्ता 28 हजार, निवास भत्ता 15 हजार, निर्वाह भत्ता 8 हजार,  प्रति विद्यार्थी एकुण देय रक्कम 51 हजार. वरील रकमेव्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रति वर्ष रुपये 5 हजार व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रति वर्ष 2 हजार रुपये इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात देण्यात येईल. वरील एकुण देय रक्कमेतून भारत सरकार शिष्यवृत्ती अंतर्गत दिला जाणारा निर्वाह भत्ता कपात करण्यात येईल. 

विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावा. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. विद्यार्थी कोणत्याही शासकीय वस्तीगृहात प्रवेशित नसावा. शासकीय वस्तीगृहात प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास  विद्यार्थ्याने प्रवेश  घेतलेला असावा. विद्यार्थ्यास इयत्ता 10 वी व 12 वी,पदवी,पदविकामध्ये किमान 50 टक्के पेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे. या योजनेमध्ये दिव्यांग (अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील) विद्यार्थ्यांसाठी 3 टक्के आरक्षण असेल व गुणवत्तेची मर्यादा 40 टक्के असेल. विद्यार्थ्याच्या पालकाचे उत्पन्न 2 लाख 50 हजारापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्याने ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे तेथील स्थानिक रहिवाशी नसावा. याप्रमाणे निकष आहेत. 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी नांदेड महानगरपालिका क्षेत्रामध्ये असलेली महाविद्यालये तसेच नांदेड महानगरपालिका हद्दीपासून 5 कि.मी. परिसरात असलेली महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनीच अर्ज करावा. विद्यार्थ्याने ज्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतला आहे तो अभ्यासक्रम हा दोन वर्षापेक्षा कमी कालावधीचा नसावा.  विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती 75 टक्के पेक्षा जास्त असणे बंधनकारक असेल. विद्यार्थ्यांची निवड विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल. या योजनेसाठी खास बाब सवलत लागु राहणार नाही. 

विद्यार्थ्याने खोटी माहिती अथवा कागदपत्रे देऊन लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण न केल्यास अथवा नोकरी व व्यवसाय करत असल्यास आणि इतर मार्गाने या योजनेचा लाभ घेऊन गैरवापर केल्याचे  निदर्शनास आल्यास तो कार्यवाहीस पात्र राहील तसेच त्यास दिलेल्या रक्कमेची 12 टक्के व्याजासह वसुली करण्यात येईल. अपुर्ण भरलेले, आवश्यक कागदपत्र सादर न केलेले अर्ज रद्द समजण्यात येतील. अपात्र, त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांना वेगळे कळविण्यात येणार नाही यांची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यावी, असेही समाज कल्याण कार्यालयाने कळविले आहे.

00000

वृत्त क्रमांक 7

 उच्च शिक्षण विभागाच्या शिष्यवृत्ती योजनेसाठी मुदतवाढ 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- केंद्रशासन  पुरस्कृत  अल्पसंख्याक विद्यार्थ्यासाठी पोष्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना, महाविद्यालयीन व  विद्यापीठीय विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती योजना, दिव्यांगजन विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणारी पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना या तीन योजना ऑनलाईन पध्दतीने सन 2021-22  साठी राबविण्यात येत आहे. या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्याना 15 जानेवारी 2022 पर्यत अंतिम मुदतवाढ देण्यात आलेली आहे. या शिष्यवृत्तीचे एनएसपी पोर्टलवरील अर्ज महाविद्यालयांनी आवश्यक असलेल्या कागदपत्राची तपासणी करुन अर्जावर विनाविलंब कार्यवाही करावी, असे आवाहन उच्च शिक्षण विभागाचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी ग. वा. पाटील यांनी केले आहे. 

नांदेड विभागांतर्गत स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली या जिल्ह्यातील शासकीय, अशासकीय, कनिष्ठ, वरिष्ठ, कला, वाणिज्य, विज्ञान अनुदानित,विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालये, अध्यापक महाविद्यालये तसेच व्यावसायिक महाविद्यालयातील सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात, एन.एस.पी. पोर्टलद्वारे केंद्रशासन  पुरस्कृत  अल्पसंख्याक विद्यार्थ्यासाठी पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना, महाविद्यालयीन व विद्यापीठीय विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती योजना, दिव्यांगजन विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणारी पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना या तीन योजनांची ऑनलाईन पध्दतीने अंमलबजावणी करण्यात येते.

0000

वृत्त क्रमांक 6

नांदेड जिल्ह्यात 29 व्यक्ती कोरोना बाधित

तर एक कोरोना बाधित झाला बरा 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 812 अहवालापैकी 29 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 22 तर अँटिजेन तपासणीद्वारे 7 अहवाल बाधित आला आहे. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 601 एवढी झाली असून यातील 87 हजार 887 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 59 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 18, नांदेड ग्रामीण 1, हिमायतनगर 1, मुखेड 1, मुंबई 1, तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 3, मुदखेड 2, लोहा 1, मुंबई 1 असे एकुण 29 बाधित आढळले आहे. आज जिल्ह्यात नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणातील एका कोरोना बाधिताला औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली.  आज 59 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 6, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 48, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1, खाजगी रुग्णालय 4 अशा एकुण 59 व्यक्ती उपचार घेत आहेत.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 92

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 95 हजार 906

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 601

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 887

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 655

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-4

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-59

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

वृत्त क्रमांक 5

 बचतगटातील महिला जेव्हा शाळेतील सत्काराने भारावून जातात

 

·  पर्यावरण विभागाच्यावतीने पर्यावरण जागृतीसाठी कापडी पिशव्यांचे वाटप  

       

नांदेड (जिमाका) दि. 4 :- पर्यावरणाच्या ऱ्हासाला कारणीभूत असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या पासून मुक्ती देण्याच्या उद्देशाने पर्यावरण विभाग महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांच्यावतीने कापडी पिशव्यांची मोहिम मोलाची आहे. या मोहिमेंतर्गत महिलांच्या हाताला काम मिळावे, या उद्देशाने बचतगटांना कापड देवून कापडी पिशव्यांची निर्मिती हा अत्यंत अभिनव उपक्रम असल्याचे प्रतिपादन रोहयोच्या उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी केले. कापडी पिशव्यांचा वापर व त्याचे महत्त्व शालेय विद्यार्थ्यांपर्यंत रुजावे, पर्यावरण संतुलनाचा हा विचार घराघरात पोहचावा या उद्देशाने आज नांदेड जिल्ह्यात विष्णुपूरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेपासून कापडी पिशवी वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी रोहयोच्या उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, महाराष्ट्र प्रदुषण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी राजेंद्र पाटील, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी चंदनसिंग राठोड, जिल्हा समुपदेशक बालासाहेब कच्छवे, मुख्याध्यापक एन. एस. दिग्रसकर आदी उपस्थित होते.

 

महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाने प्लॉस्टिक बॅगला मुक्ती मिळावी व कापडी पिशव्या वापरण्याची सवय तळागाळापर्यंत पोहचावी या उद्देशाने विशेष मोहिम हाती घेतली. यात माविमच्या अंतर्गत महिला बचतगटांना पिशव्या शिवण्याचे काम देऊन पर्यावरण संतुलनासह रोजगार निर्मितीलाही चालना दिली. नांदेड येथील साबेर महिला बचतगटातील महिलांनी हे काम अत्यंत कुशलतेने करून पिशव्यांची उपलब्धता वेळेच्या आत करून दिली. या अभिनव उपक्रमातील शिलेदार ठरलेल्या साबेर महिला बचत गटातील सुफिया शेख तय्यब अन्सारी यांचा उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्या हस्ते प्रातिनिधीक सत्कारही करण्यात आला. सुमारे सात वेगवेगळ्या बचत गटांकडून 30 हजार कापडी पिशव्या शिऊन घेण्यात आल्याची माहिती माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी चंदनसिंग राठोड यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली. 

पर्यावरण संतुलनासह अनेक समाज उपयोगी उपक्रमात शालेय विद्यार्थ्यांचे योगदान अत्यंत महत्वाचे असते. विद्यार्थी असूनही शालेय मुले खऱ्या अर्थाने लोकशिक्षकाची भूमिका आपल्या वर्तनातून समाजापर्यंत पोहोचू शकतात. प्लॉस्टिक कॅरीबॅगपासून मुक्ती घेण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांचा पुढाकार मोठा बदल देऊ शकतो, अशा विश्वास जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी व्यक्त केला. आपल्या भवतालाला, परिसराला समजून त्याला पूरक असे आपले वर्तन ठेवणे हे खरे शिक्षण असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्र प्रदुषण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी राजेंद्र पाटील, जिल्हा समुपदेशक बालासाहेब कच्छवे यांचेही यावेळी समयोचित भाषण झाले. यावेळी 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थी व विद्यार्थींनीचे लसीकरण मोहिमेचाही शुभारंभ करण्यात आला.

00000




पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी Maharashtra DGIPR ...