Tuesday, January 4, 2022

वृत्त क्रमांक 7

 उच्च शिक्षण विभागाच्या शिष्यवृत्ती योजनेसाठी मुदतवाढ 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- केंद्रशासन  पुरस्कृत  अल्पसंख्याक विद्यार्थ्यासाठी पोष्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना, महाविद्यालयीन व  विद्यापीठीय विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती योजना, दिव्यांगजन विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणारी पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना या तीन योजना ऑनलाईन पध्दतीने सन 2021-22  साठी राबविण्यात येत आहे. या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्याना 15 जानेवारी 2022 पर्यत अंतिम मुदतवाढ देण्यात आलेली आहे. या शिष्यवृत्तीचे एनएसपी पोर्टलवरील अर्ज महाविद्यालयांनी आवश्यक असलेल्या कागदपत्राची तपासणी करुन अर्जावर विनाविलंब कार्यवाही करावी, असे आवाहन उच्च शिक्षण विभागाचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी ग. वा. पाटील यांनी केले आहे. 

नांदेड विभागांतर्गत स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली या जिल्ह्यातील शासकीय, अशासकीय, कनिष्ठ, वरिष्ठ, कला, वाणिज्य, विज्ञान अनुदानित,विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालये, अध्यापक महाविद्यालये तसेच व्यावसायिक महाविद्यालयातील सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात, एन.एस.पी. पोर्टलद्वारे केंद्रशासन  पुरस्कृत  अल्पसंख्याक विद्यार्थ्यासाठी पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना, महाविद्यालयीन व विद्यापीठीय विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती योजना, दिव्यांगजन विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणारी पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना या तीन योजनांची ऑनलाईन पध्दतीने अंमलबजावणी करण्यात येते.

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...