Sunday, May 4, 2025

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना_समाज कल्याण विभाग #नांदेड






 

स्टँड अप इंडिया योजना_समाज कल्याण विभाग #नांदेड






 

वृत्त क्रमांक 469

जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यातून

विकास कार्य गतिमान करू :  खा. डॉ. अजित गोपछडे

नांदेड दि. 4 मे :- राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून सर्वसामान्यांचा विकास साधण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने आगामी काळात विकास कामे पूर्ण होतील असा विश्वास खासदार अजित गोपछडे यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच संपन्न झालेल्या नांदेड जिल्हा प्रशासन विकासकार्य आढावा बैठकीत खा. डॉ. गोपछडे बोलत होते. लोकांच्या अनेक प्रश्नांची माहिती घेऊन प्रशासनास अवगत केले. कडक उन्हाळ्यामुळे  नांदेड शहरातील आणि जिल्ह्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची सूचना केली.

ग्रामीण भागात सध्या खरीप हंगामाची पूर्व तयारी चालू झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून शेतकरी बांधवांना योग्य वेळी मदत व्हावी म्हणून जिल्ह्यातील मालगुजारी तलावातला गाळ तात्काळ काढावा यासाठी मनरेगा आणि लोकसहभागातून ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावेत.तसेच शहरी भागात नालेसफाई चे काम वेळेत पूर्ण करावेत. पावसाळ्यात वृक्षारोपण योजनेत सर्व वयोगटातील नागरिकांना सहभागी करावे. मातृवंदन योजना, आयुष्मान आरोग्य मंदिर, अंगणवाडी, आशा सेविकांचे प्रश्न सोडविणे, कुपोषण मुक्ती बाळासोबत आईची पण झाली पाहिजे, बालिका शिक्षण बसव्यवस्था दुरुस्त करावी, बालिका पंचायत व्यवस्थेस प्रोत्साहन देणे,पूण्यश्लोक अहिल्यादेवी त्रिशताब्दी निमित्त महिला सक्षमीकरण आणि सर्वांगीण उन्नती,  प्रधानमंत्री सूर्य घर  योजना, गोदावरी शुद्धिकरण, नांदेड शहरातील रहदारी समस्या उपाययोजना, आगामी 20 वर्षासाठी होलीसिटी सर्वांगीण विकास आराखडा, जिल्हा परिषद नवीन इमारत मिनी सचिवालय बांधकाम प्रस्ताव तयार करणे, जीर्ण झालेल्या पोलीस वसाहतींचे बांधकाम, आपत्ती व्यवस्थापन केंद्र स्थापन करणे, तरोडेकर चौक ते मुथा चौक फ्लायओवर तयार करणे, कैन्सर, मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल निर्माण, कायदा सुव्यवस्था याबाबतीत अनेक उपयुक्त दिशानिर्देश जिल्हाप्रशानास दिले.

खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी 100 दिवसीय प्रशासकीय मूल्यमापनात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, मनपा आयुक्त महेश डोईफोडे, अपर पोलीस अधिक्षक डॉ. खंडेराय  धरणे यांचे शाल देऊन विशेष अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. प्रशासकीय मुल्यांकनात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सर्व विभागांचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे देखील विशेष अभिनंदन केले.
000



 Startups in #WAVESummit



 डिजिटल माध्यमातून प्रचार प्रसिद्धीसाठी योग्य डेटा (माहिती) असणे आवश्यक असून जाहिरात प्रकियेत डेटा केंद्रबिंदू आहे. कोणत्याही प्रसिद्धी मोहिमेसाठी अचूक डेटा असणे महत्त्वाचे आहे. अचूक डेटा मिळविण्यासाठी शोध घेणे, योग्य नियोजन, योजना आणि मूल्यमापन आवश्यक आहे, असे ग्रुप एम साऊथ एशियाचे मुख्य धोरण अधिकारी एम. ए. पार्थसारथी यांनी सांगितले.

जिओ वर्ल्ड सेंटर येथील जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद, २०२५ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'डाटा ड्रिव्हन इनसाईट अँड मेजरमेंट इन ऍडव्हर्टायझिंग' या विषयावर श्री. पार्थसारथी बोलत होते.

 सिनेमामध्ये एखाद्या विषयाची मांडणी करताना दिग्दर्शकाचा दृष्टिकोन जसा आहे, त्याच पद्धतीच्या फ्रेममधून दिग्दर्शक सिनेमा प्रेक्षकापर्यंत नेतो. आपल्या सिनेमातून नेमका काय संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा आहे याची जबाबदारी दिग्दर्शक म्हणून खूप महत्त्वाची असते, असे प्रतिपादन रिची मेहता यांनी केले.

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटर मध्ये आयोजित वेव्हज २०२५ दृकश्राव्य आणि मनोरंजन समिटमध्ये ‘बिहाइंड द फ्रेम : मास्टरिंग द आर्ट ऑफ द सिनेमा’ या विषयावर आयोजित मास्टरक्लासमध्ये रिची मेहता बोलत होते.

 समाजमाध्यमांतील इनफ्लुएंसर्सने स्वतःची खरी ओळख जपणे गरजेचे असल्याचे मत ‘बेस्ट प्रॅक्टिसेस फॉर सोशल मीडिया ॲडव्हर्टायझिंग फॉर इन्फ्लुएंसर’ या परिसंवादात व्यक्त करण्यात आले.

बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित वेव्हज २०२५ दृकश्राव्य आणि मनोरंजन समिटमध्ये या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.

यामध्ये सहभागी सहेली सिन्हा म्हणाल्या, इन्फ्लुएंसरने जबाबदारीने विविध ब्रँडसोबतची भागीदारी केली पाहिजे. ब्रँडसोबत केलेली भागीदारी ही केवळ जाहिरात करणे एवढेच नसून ती एक मोठी जबाबदारी आहे. कारण ग्राहक प्रभावी व्यक्तींवर विश्वास ठेवून त्यांनी जाहिरात केलेल्या गोष्टी विकत घेत असतात. त्यामुळे इन्फ्लुएंसरने स्वतः त्या गोष्टीची माहिती, अनुभव घेऊन मगच त्याबाबत इतरांना सांगण्याची पारदर्शकता जोपासणे आवश्यक आहे. जाहिरात करताना नेहमी अटी व शर्ती आणि त्या-त्या समाज माध्यमांचा वापर करण्यासाठीच्या सूचना, नियमावली पाळण्यास प्राधान्य दिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
शिबानी अख्तर यांनी समाजमाध्यमांतील इन्फ्लुएंसरने प्रामाणिकपणास महत्त्व द्यावे. प्रामाणिक कंटेंट दीर्घकाळ टिकतो आणि विश्वास निर्माण करतो. आरोग्यासारख्या संवेदनशील विषयांवर ब्रँडिंग करताना विशेष सतर्कता बाळगली पाहिजे, असेही यावेळी सांगितले.

  वृत्त  भरती परीक्षा सुधारणांवर चर्चेसाठी उपस्थित राहण्याचे विभागीय आयुक्तांचे आवाहन २१ सप्टेंबर रोजी उच्चस्तरीय समिती भेट देणार  छत्रपती स...