Wednesday, December 15, 2021

 नांदेड जिल्ह्यात 1 व्यक्ती कोरोना बाधित तर 2 कोरोना बाधित झाले बरे

नांदेड (जिमाका) दि. 15 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 591 अहवालापैकी 1 अहवाल कोरोना बाधित आले आहे. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 515 एवढी झाली असून यातील 87 हजार 840 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 20 रुग्ण उपचार घेत असून 1 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे.आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे मुखेड 1 असे एकुण 1 बाधित आढळला आहे.

आज जिल्ह्यातील 2 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात किनवट तालुक्यातर्गत 1, खाजगी रुग्णालय 1 असे एकूण 2 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 20 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 16, खाजगी रुग्णालय 3 अशा एकूण 20 व्यक्ती उपचार घेत आहेत.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 87 हजार 130

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 83 हजार 107

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 515

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 840

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 655

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.4 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-04

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-20

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-1

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

 शिकाऊ अनुज्ञप्ती नुतनीकरण करण्यासाठी

अर्जदारांचे उजळणी प्रशिक्षण  

नांदेड (जिमाका) दि. 15 :-चालक अनुज्ञप्ती नुतनीकरण तसेच शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी अर्जदारांसाठी प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे 1 डिसेंबर पासून बंद करण्यात आलेले रस्ता सुरक्षा संबंधित तसेच वाहतूक चिन्ह व सुरक्षित वाहतूक नियमावली उजळणी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. हे उजळणी प्रशिक्षण पहिले सत्र सकाळी 11 ते दुपारी 2  तर दुसरे सत्र दुपारी 2 ते 5 यावेळेत घेण्यात येणार आहे.  

चालक अनुज्ञप्ती नुतनीकरण ड्राईव्ही लायन्स नुतनीकरण तसेच शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणीसाठी येणाऱ्या सर्व अर्जदारांनी अर्ज दाखल करण्याआधी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

00000

 पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा दौरा 

नांदेड (जिमाका) दि. 15 :- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. गुरुवार 16 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10 वा. नांदेड येथून मोटारीने मंठा जि. जालनाकडे प्रयाण करतील. सोईनुसार जाफ्राबाद येथून मोटारीने नांदेडकडे प्रयाण करतील.

00000

Tuesday, December 14, 2021

 सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री

संजय बनसोडे यांचा दौरा 

नांदेड (जिमाका) दि. 14 :- राज्याचे पर्यावरण व वातावरणीय बदल, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल. 

बुधवार 15 डिसेंबर 2021 रोजी सोईनुसार उदगीर येथून मोटारीने देगलूर कडे प्रयाण. सायं. 5 वा लक्ष्मीकांत दिगंबरराव पद्मवार यांच्या 51 व्या अभिष्टचिंतन सोहळ्यास उपस्थिती. स्थळ- यशवंतनगर उदगीर रोड देगलूर. सोईनुसार देगलूर येथून मोटारीने लातूर कडे प्रयाण करतील.

00000

 नांदेड जिल्ह्यात एक व्यक्ती कोरोना बाधित तर 3 कोरोना बाधित झाला बरा 

नांदेड (जिमाका) दि. 14 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 503 अहवालापैकी अँटिजेन तपासणीद्वारे 1 अहवाल कोरोना बाधित आला आहे. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 514 एवढी झाली असून यातील 87 हजार 838 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 21 रुग्ण उपचार घेत असून एका बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये अँटिजेन तपासणीद्वारे उमरी तालुक्यात एक बाधित आढळला आहे. आज जिल्ह्यातील 3  कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात किनवट तालुक्यातर्गत 1, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणातील 2 असे एकुण 3 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 21 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 15, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 1, खाजगी रुग्णालयात 4 अशा एकुण 21 व्यक्ती उपचार घेत आहेत.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 56 हजार 539

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 82 हजार 521

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 514

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 838

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 655

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.4 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-2

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-21

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-1 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

 अनुज्ञप्ती साठी मेडिकल प्रमाणपत्र

ऑनलाईन अपलोड करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 14 :- येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात अनुज्ञप्तीच्या कामकाजासाठी 1 डिसेंबर 2021 पासून ऑनलाईन मेडिकल प्रमाणपत्र स्विकारण्यात येत आहेत. अर्जदाराने हस्तलीखीत मेडीकल प्रमाणपत्र घेऊन येऊ नयेत ती ऑनलाईन अपलोड करावीत, असे आवाहन सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 

या अनुज्ञप्तीचे कामकाजासाठी नमुना 1 (अ) मेडिकल प्रमाणपत्र एमबीबीएस डॉक्टरांमार्फत ऑनलाईन पद्धतीने देण्याची सुविधा राष्ट्रीय सुचना केंद्रामार्फत विकसीत करण्यात आली आहे. अर्जदारांची तपासणी संबंधित डॉक्टरांमार्फत करून नमूना 1 (अ) मेडिकल प्रमाणपत्र अपलोड करण्यात येणार आहे. 

ऑनलाईन मेडिकल प्रमाणपत्र उपलब्ध असलेले डॉक्टर पुढीलप्रमाणे आहेत. डॉ. एच. एम. अळने- अक्षय क्लिनिक डॉक्टर लाईन नांदेड, डॉ. मोहम्मद रिझवान- पॉप्युलर हॉस्पिटल ईदगाह कमानी जवळ देगलूर नाका नांदेड, डॉ. अजिंक्य डी पुरी- ओम क्लिनिक वाईबाजार ता. माहूर, डॉ. अब्दुल राफे अब्दुल कादीर- हेल्थ केअर क्लिनिक हाताई नई मशीद नांदेड, डॉ. प्रशांत खंडागळे- अविरत मॅटर्निटी हॉस्पिटल गंगोत्री निवास सरस्वतीनगर मुखेड या डॉक्टरांकडून मेडिकल प्रमाणपत्र करुन घ्यावे. जेणे करुन अर्जदाराला शासनाचे सुविधा देणे शक्य होईल, असेही सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहे.

0000

 जप्त केलेल्या साहित्याचा शुक्रवारी

नांदेड तहसिल कार्यालयात लिलाव 

नांदेड (जिमाका) दि. 14 :- नांदेड तालुक्यात गोदावरी नदी परीसरातील पथकामार्फत धाडी टाकून जप्त केलेल्या साहित्यांचा लिलाव शुक्रवार 17 डिसेंबर 2021 रोजी नांदेड तहसिल कार्यालयात सकाळी 11 वा. घेण्यात येणार आहे. 

नांदेड तालुक्यात धाडी टाकून जप्त केलेल्या साहित्यात 3 चेंजर, लोखंडी पाईप 25 नग, लोखंडी टाक्या 34, गुडगुडया  3 यांचा समावेश आहे. सदर साहित्य नांदेड तहसील कार्यालयाच्या परिसरात असून नागरिकांनी हे साहित्य तपासून लिलावात भाग घ्यावा, असे आवाहन तहसिलदार नांदेड यांनी केले आहे.

00000 

वृत्त क्रमांक   स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त नांदेडसाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक – पालकमंत्री अतुल सावे •‘स्वच्छ नांदेड – सुंदर नांदेड’ मोहिमे...