अनुज्ञप्ती साठी मेडिकल प्रमाणपत्र
ऑनलाईन अपलोड करण्याचे आवाहन
नांदेड (जिमाका) दि. 14 :- येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात अनुज्ञप्तीच्या कामकाजासाठी 1 डिसेंबर 2021 पासून ऑनलाईन मेडिकल प्रमाणपत्र स्विकारण्यात येत आहेत. अर्जदाराने हस्तलीखीत मेडीकल प्रमाणपत्र घेऊन येऊ नयेत ती ऑनलाईन अपलोड करावीत, असे आवाहन सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
या अनुज्ञप्तीचे कामकाजासाठी नमुना 1 (अ) मेडिकल प्रमाणपत्र एमबीबीएस डॉक्टरांमार्फत ऑनलाईन पद्धतीने देण्याची सुविधा राष्ट्रीय सुचना केंद्रामार्फत विकसीत करण्यात आली आहे. अर्जदारांची तपासणी संबंधित डॉक्टरांमार्फत करून नमूना 1 (अ) मेडिकल प्रमाणपत्र अपलोड करण्यात येणार आहे.
ऑनलाईन मेडिकल प्रमाणपत्र उपलब्ध असलेले डॉक्टर
पुढीलप्रमाणे आहेत. डॉ. एच. एम. अळने- अक्षय क्लिनिक डॉक्टर लाईन नांदेड, डॉ. मोहम्मद रिझवान- पॉप्युलर हॉस्पिटल ईदगाह
कमानी जवळ देगलूर नाका नांदेड, डॉ. अजिंक्य डी पुरी- ओम क्लिनिक
वाईबाजार ता. माहूर, डॉ. अब्दुल राफे अब्दुल कादीर- हेल्थ
केअर क्लिनिक हाताई नई मशीद नांदेड, डॉ. प्रशांत खंडागळे-
अविरत मॅटर्निटी हॉस्पिटल गंगोत्री निवास सरस्वतीनगर मुखेड या डॉक्टरांकडून मेडिकल
प्रमाणपत्र करुन घ्यावे. जेणे करुन अर्जदाराला शासनाचे सुविधा देणे शक्य होईल,
असेही सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी
पत्रकात स्पष्ट केले आहे.
0000
No comments:
Post a Comment