( कृपया सोबतच्या वृत्तास वृत्तपत्रातून प्रसिद्धी द्यावी ही विनंती.)
Friday, July 5, 2024
वृत्त क्र. 561
हिंगोली समाज कल्याण सहायक आयुक्तांना मारहाण
वृत्त क्र. 560
महिलांच्या योजना, कायदे आणि संरक्षण संदर्भात
जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीच्या बैठकीत आढावा
नांदेड, दि. 5 जुलै :- नांदेड जिल्ह्यातील महिलांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना आहेत. त्या योजनांची अंमलबजावणी करण्यात यावी. जिल्ह्यातील विद्यार्थीनीपासून ते गृहिणी पर्यंत, परितक्तापासून कामगार महिलांपर्यंत सर्वांना विविध योजनांचा लाभ मिळावा, यासाठी योजनांची सर्वदूर प्रसिद्धी व लाभ देण्याचे लक्षांश वाढविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले.
यासोबतच राज्य शासनाच्या “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सामुहिक सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असेही निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले. महिला व बालविकास विभागाच्या जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीची पुनर्रचित बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली 4 जुलै रोजी करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव श्रीमती दलजीत कौर जज, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आर. पी. काळम, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी श्रीमती रेणुका तम्मलवार, तसेच जिल्ह्यातील प्रांत अधिकारी हे ऑनलाईनद्वारे उपस्थित होते.
या बैठकीमध्ये महिलांसाठी असणाऱ्या वैयक्तिक व सामूहिक योजनांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये हुंडा पद्धतीच्या विरोधात जनजागृती करणे, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करणे, अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमाच्या प्रकरणांचा आढावा, महिला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांचा आढावा, देहविक्री करणाऱ्या महिलांच्या विविध मागण्यांचा आढावा, अपराधी परिविक्षा अधिनियमाची चर्चा, मिशन शक्ती, एक छत्री योजनेंतर्गत योजनांची चर्चा, पोलीस स्टेशन आवारात समुपदेशन केंद्रांचा आढावा, महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंध अधिनियम, राज्याचे मिशन वात्सल्य अभियान संदर्भात चर्चा करण्यात आली.
मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान राबविण्याबाबत जिल्हयातील महिलांच्या संदर्भात असणाऱ्या शासकीय विविध योजना लोकाभिमुख करुन त्याची अंमलबजावणी करावी. महिला व बाल विकास विभागाच्या विविध बैठकीत वेगवेगळ्या विभागाची जबाबदारी निश्चित करुन महिला व बालकांच्या संदर्भात योग्य ते जबाबदारीने काम करण्याच्या सुचना संबंधित विभागाला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केल्या.
प्रास्ताविक जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती आर. पी. रंगारी यांनी केले तर विविध विषयांच्या अनुषंगाने सादरीकरण जिल्हा बालसंरक्षण अधिकारी श्रीमती विद्या आळणे यांनी केले. बैठकीस समितीतील अशासकीय सदस्य, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, विविध सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
00000
वृत्त क्र. 559
कृषि विभागाचे विविध कृषि पुरस्कार
· कृषि व संलग्न क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेले
शेतकरी, व्यक्ती, गट, संस्थांना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 5 जुलै :- राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत सन 2023 या वर्षांमध्ये कृषि व संलग्न क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या व्यक्ती, गट, संस्था यांच्याकडून विविध कृषि पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. जिल्ह्यातील जास्तीतजास्त शेतकरी, गट, संस्था, व्यक्तींनी कृषी पुरस्कार प्रस्ताव आपल्या नजीकच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.
जिल्ह्यात कृषि आणि संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कार्य करणाऱ्या, कृषि उत्पादन आणि उत्पन्न वाढीसाठी योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा तसेच कृषि विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्था, गटांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, जिजामाता कृषिभूषण पुरस्कार, सेंद्रिय शेती कृषिभूषण पुरस्कार, उद्यान पंडित पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार व कृषि विभागामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात येते. या विविध कृषि पुरस्काराचे प्रस्ताव तयार करण्याबाबतच्या अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
00000
वृत्त क्र. 558
महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या
इयत्ता 5 व 8 वीसाठी विद्यार्थ्यांच्या नाव नोंदणीस अंतिम मुदतवाढ
नांदेड, दि. 5 जुलै :- महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वी परीक्षेसाठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नावनोंदणी प्रवेश अर्जासाठी अंतिम मुदतवाढ 15 जुलै पर्यंत देण्यात आली आहे. अर्ज 5 जुलै ते 15 जुलै 2024 रात्री 11.59 वाजेपर्यंत या कालावधीत स्विकारण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनी अंतिम मुदतीत प्रवेश अर्ज करावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या प्र. सचिव शैलेंद्र पाटील यांनी केले आहे.
ऑनलाईन नावनोंदणी प्रवेश अर्ज भरण्यास व कागदपत्रे स्विकारण्यास ही अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतचा तपशील पुढील प्रमाणे आहे. ऑनलाईन नावनोंदणी अर्ज भरण्यासाठी शुक्रवार 5 ते सोमवार 15 जुलै 2024 रोजीच्या रात्री 11.59 वाजेपर्यंत तर शनिवार 6 ते शुक्रवार 19 जुलै 2024 या कालावधीत विद्यार्थ्यांना मूळ अर्ज, विहित शुल्क व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेला संपर्क केंद्र शाळेमध्ये जमा करावे लागतील. बुधवार 24 जुलै 2024 रोजी संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज विहित शुल्क, मूळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळात जमा करतील. या कालावधीमध्ये मुक्त विद्यालय मंडळाच्या इयत्ता 5 वी 8 वीसाठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी http:/msbos.mh-ssc.ac.in या संकेतस्थळाचा वापर करावा. अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्या वाचून अर्ज भरण्यास सुरूवात करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
00000
वृत्त क्र. 557
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 5 जुलै :- केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत बाल शक्ती पुरस्कार दिला जातो. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार ज्या मुलांनी (वय 5 पेक्षा अधिक व 18 वर्षापर्यंतच्या) शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केली आहे त्यांना हा पुरस्कार दिला जातो. नांदेड जिल्ह्यातील जास्तीत जास्त मुलांचे प्रस्ताव https://awards.gov.in या संकेतस्थळावर 31 जुलै 2024 पर्यंत करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 करीता केंद्र शासनाने अर्ज मागविले आहेत. हे अर्ज https://awards.gov.in या संकेतस्थळामार्फत ऑनलाईन पद्धतीने स्विकारले जाणार आहेत. ज्या मुलांचे वय 5 वर्षापेक्षा अधिक व 31 जुलै 2024 रोजी 18 वर्षापेक्षा कमी आहे व ज्या मुलांनी शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केली आहे त्यांचे प्रस्ताव वरील संकेतस्थळावर स्वत: मुले किंवा त्यांच्यावतीने राज्य सरकार, केंद्र शासित प्रदेश, जिल्हाधिकारी/जिल्हादंडाधिककारी
0000
वृत्त क्र. 556
जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
नांदेड, दि. 5 जुलै :- नांदेड जिल्ह्यात 6 जुलै 2024 चे सकाळी 6 वाजेपासून ते 20 जुलै 2024 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 6 जुलैच्या सकाळी 6 वाजेपासून ते 20 जुलै 2024 रोजी मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
00000
वृत्त भरती परीक्षा सुधारणांवर चर्चेसाठी उपस्थित राहण्याचे विभागीय आयुक्तांचे आवाहन २१ सप्टेंबर रोजी उच्चस्तरीय समिती भेट देणार छत्रपती स...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 974 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “ स्वस्थ नारी , सशक्त परिवार ” राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ “ स्वस्थ नारी , ...
-
अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी 192 धारकांची प्रतिक्षा यादी घोषित आक्षेपाबाबत 30 ऑक्टोंबरची मुदत नांदेड , ( जिमाका ) दि. 22 :- ...

