Sunday, April 21, 2024

 वृत्‍त क्र. 372

75 टक्क्‍यापेक्षा जास्‍त मतदान टक्केवारी साध्‍य करणा-या केंद्राचा होणार सन्‍मान

·सर्वोकृष्‍ट कामगिरी करणा-या गाव, वार्ड, केंद्र व अधिकारी कर्मचारी सन्मानित होतील

नांदेड, दि. 21  एप्रिलः- लोकसभा निवडणुकीच्‍या अनुषंगाने नांदेड जिल्‍ह्यात स्‍वीप अंतर्गत मतदार जागृतीचे विविध उपक्रम सुरु आहेत. या उपक्रमाच्‍या अनुषंगाने सर्वोकृष्‍ट कामगिरी व उत्‍कृष्‍ट मतदान टक्‍केवारी करणा-या  गावांचा, वार्डचा त्‍याचप्रमाणे मतदानासाठी नियुक्‍त सर्वस्‍तरीय अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान करण्‍यात येणार आहे.

नांदेड जिल्‍ह्यात प्रत्‍येक विधानसभा मतदार संघातील सर्वोकृष्‍ट मतदान टक्‍केवारी असलेल्‍या तीन मतदान केंद्राचा सन्‍मान जिल्‍हास्‍तरावर करण्‍यात येणार आहे. यामध्‍ये बिलओ, मतदान कर्मचारी, मतदान केंद्रावरील पोलीस कर्मचारी , झोनल अधिकारी, झोनल पोलीस अधिकारी, बिलओ सुपरवायझर, त्‍या गावातील अथवा वार्डमधील गावस्‍तरीय व वार्डस्‍तरीय अधिकारी यांचा सन्‍मान करण्‍यात येणार आहे.

तसेच सर्वोकृष्‍ट कामगिरी करणारे मतदान केंद्र ज्‍या ठिकाणी स्थित आहे. त्‍या गावाच्‍या ग्रामसभेचा, वार्डच्‍या वार्ड सभेचा सन्‍मान करण्‍यात येणार आहे. तसेच 75 टक्‍के पेक्षा जास्‍त मतदान टक्‍केवारी साध्‍य करणा-या मतदान केंद्राचा प्रोत्‍साहनपर सत्‍कार करण्‍यात येईल. त्‍यामध्‍ये  तेथील बीएलओ, मतदान कर्मचारी, पोलीस कर्मचारी , झोनल  अधिकारी, झोनल पोलीस अधिकारी, बीएलओ पर्यवेक्षक तसेच स्‍थानिक ग्रामसभा,वार्डसभा यांचा सन्‍मान करण्‍यात येणार आहे. तसेच जिल्‍ह्यातील सर्वोकृष्‍ट मतदान टक्‍केवारी साध्‍य करणा-या तीन मतदान केंद्राचा विशेष पारितोषिक देवून सन्‍मान करण्‍यात येणार आहे, या संदर्भातील एक पत्र जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, यांनी सर्व कर्मचाऱ्यांसाठी जारी केले आहे. 

००००

वृत्‍त क्र. 371

 नवमतदार व चिमुकल्या खेळांडूनी केले नांदेडकरांना मतदान करण्‍याचे आवाहन

·       जिल्‍हाधिकारी यांच्‍या हस्‍ते वॉकथॉन रॅलीस हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ

 

नांदेडदि. 21 एप्रिलः- जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा कार्यालयाच्‍यावतीने रविवारी सकाळी 7.30 वाजता मतदान जनजागृतीसाठी "वॉकथॉन" रॅलीचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत यांच्‍या हस्‍ते "मी मतदान करणारच" या सेल्फी पॉईंटचे फित कापून व सेल्फी काढून शुभारंभ करण्‍यात आला. तसेच त्‍यांच्‍या हस्‍ते वॉकथॉन रॅलीस हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली.

 

यावेळी मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडेजिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरेउपशिक्षणाधिकारी रामचंद्र पाचंगेविस्तार अधिकारी रुस्तुम आडे आदींची उपस्थिती होती. या वॉकथॉन रॅलीस ए एम सी गुलाम सादिक‍डि एम सी कारभारी दिवेकरडी वाय ई संघरत्न सोनसळेक्षेत्रीय अधिकारी रावन सोनसळेरमेश चवरेसंजय जाधवनिलावती डावरेसी ए ओ तुकाराम भिसेसीए एफओ जनार्धन पकवाणेमाता गुजरीजी विसावा उद्यानचे अधिक्षक बेगसहाय्यक आयुक्त सुधीर हिंगोलेडॉ. बडीडॉ. बिसेनराजेश फटाळे (सर्व मनपा कार्यालय)क्रीडा अधिकारी संजय बेतीवारक्रीडा अधिकारी प्रवीण कोंडेकरराज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकरश्रीमती शिवकांता देशमुखचंद्रप्रकाश होनवडजकरवरिष्ठ लिपीक संतोष कनकावारश्रीमती सारिका आचणेडॉ. राजेश पावडेप्रलोभ कुलकर्णीरवी ढगेसाईनाथ चिद्रावारसाईराज मुदीराज हे सर्व स्वीप सदस्य आदी मान्यवर व नांदेड जिल्हयातील विविध एकविध खेळ संघटनेचे खेळाडू (मुले-मुली) व पदाधिकारी विविध शासकीय- निमशासकीय कार्यालयाचे अधिकारी/ कर्मचारी विविध पोलिस भरती अकॅडमीचे मुले-मुलीप्रशिक्षणार्थी आदीनी उपस्थित राहुन उर्स्‍फूत प्रतिसाद दिला.

 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रलोभ कुलकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन क्रीडा अधिकारी संजय बेतीवार यांनी मानले. या वॉकथॉन रॅलीस डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह स्टेडियम परीसर येथून सुरुवात होऊन स्टेडीयम मुख्यद्वार मार्गे आयटीएम कॉलेज- महात्मा फुले पुतळा आयटीआय चौक-मार्गे शिवाजीनगरबसस्टॅड- वजिराबाद चौकछ. शिवाजी महाराज पुतळामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यत काढण्‍यात आली. शेवटी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत मतदानाची प्रतिज्ञा नवमतदार खेळाडूंना देण्यात आली व रॅलीचा समारोप करण्यात आला. ही वॉकथॉन रॅली जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत करण्यात आली होती. यासाठी क्रीडा अधिकारी संजय बेतीवारक्रीडा अधिकारी प्रवीण कोंडेकरराज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकरश्रीमती शिवकांता देशमुखचंद्रप्रकाश होनवडजकरवरिष्ठलिपीक संतोष कनकावारसंजय चव्हाण तसेच हनमंत नरवाडेआकाश भोयरबंटी सोनसळेशेख इक्रममोहन पवारसुभाष धोंगडेचंद्रकांत गव्हाणेविद्यानंद भालेरावसोनबा ओव्हाळायश कांबळे आदीनी सहकार्य केले.

0000





 

Saturday, April 20, 2024

 


16-नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे शुक्रवार 26 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार आहे. या मतदानाच्या दिवशी सर्व मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजवावा
असे  आवाहन राज्य निवडणूक सदिच्छा दूत डॉ. सान्वी जेठवाणी यांनी केले आहे.

वृत्‍त क्र. 370

मतदानाला 5 दिवस बाकी ;मोबाईलचा जपून वापर करा !

नांदेडमध्ये पुन्हा एक गुन्हा दाखल ; आतापर्यंत 6 गुन्हे दाखल

पोलीस प्रशासनाने तपासली साडेचार हजारावर अकाउंट

मॉनिटरींगची संख्या वाढली ;सोशल मिडियावर करडी नजर

नांदेड दि. 20 एप्रिलः नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी अवघे पाच दिवस बाकी असून सोशल मीडियावरील अकाउंट तपासण्याची गती पोलिसांनी वाढविली आहे. आतापर्यंत साडे चार हजारावर अकाऊंट तपासण्यात आले आहे.सामाजिक स्वास्थ बिघडवणाऱ्या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या काळात महापुरुषांची बदनामी,विटंबना करण्याचा प्रयत्न करणे, समाजात तेढ निर्माण करणे अशा पद्धतीच्या पोस्ट माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीच्या सोशल मिडिया सेलकडून तपासल्या जात आहे. काल या संदर्भात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी 5 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. काल आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.

धार्मिक ग्रंथ व महिलांविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट टाकणे, विशिष्ट समाजाला धमकावणे, गर्भित इशारे देणे,विशिष्ट धर्माविरुद्ध गैरसमज पसरविणे,तेढ निर्माण करणारे, भीतीदायक फोटो प्रसारित करणे,लोकांच्या भावना भडकतील, ठेच पोहचतील अशा पद्धतीची भाषा वापरणे, निवडणूक काळात लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणे, अशा अनेक गोष्टींवर सोशल मीडिया सेल लक्ष ठेवून आहे.

काल नांदेड शहरातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये  गु.र.न.141/24 Sec.295(A),505(1)(C),505 (2) भादवी गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वी हिमायतनगर, मुखेड ,माहूर व अर्धापूर ( अर्धापूरमध्ये एकूण दोन गुन्हे ) या ठिकाणी समाज माध्यमांवरून तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकल्याबद्दल गुन्हे दाखल झाले होते. शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे आता हा सहावा गुन्हा दाखल झाला आहे.

उमेदवारांचे खाते तपासल्या जाते

निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांनी त्यांचे सर्व फेसबुक  व अन्य समाज माध्यमावरील अकाउंट प्रतिज्ञापत्रात सादर केले आहे. त्यांच्या फेसबुक व अन्य सोशल अकाउंटवरून जाहिरात करताना त्यांना माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण कक्षाची परवानगी घेणे आवश्यक आहे. अशा काही पोस्ट परवानगी न घेता आढळल्यास त्याचा सर्व खर्च उमेदवाराच्या खर्चाच्या तपशीलात जमा केला जाणार आहे.

तसेच या निर्धारित सोशल मीडिया अकाउंट वरून कोणत्याही परिस्थितीत आदर्श आचारसंहितेचा भंग होता कामा नये. त्यामुळे उमेदवारांनी देखील आपले सोशल अकाउंट हँडल करणाऱ्यांना योग्य सूचना देणे आवश्यक आहे. 

संपर्क साधा

आक्षेपार्ह पोस्ट आढळल्यास समाज माध्यम कक्षाकडे तक्रार करण्याची, संबंधित पोस्ट फॉरवर्ड करण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. नांदेड पोलीस प्रशासनाने 8308274100 हा नंबर दिला असून यावर आक्षेपार्ह पोस्ट कोणी केली असेल तर माहिती देण्याचे आवाहन सेलचे प्रमुख गंगाप्रसाद दळवी यांनी केले आहे.

00000

  वृत्‍त क्र. 369

 वृत्‍त क्र. 368

नायगाव तालुक्यातील स्वयंसहाय्यता समूहातील महिलांचा मतदान जागृतीसाठी पुढाकार

नांदेड, दिनांक, 20 एप्रिल-  श्रीमंत-गरीब, स्त्री-पुरुष असा भेद न ठेवता भारतीय राज्यघटनेने मतदानाचा सर्वांना समान अधिकार दिला आहे. त्यासाठी सर्वांनी मतदान करावे यासाठी नायगाव तालुक्यातील उमेद महाराष्ट्र जीवनोन्नती अभियानातील स्वयंसहायता समूहातील महिलांनी जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी पुढाकार घेतला आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत व मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या मार्गदर्शनात नांदेड लोकसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. शुक्रवार दिनांक 19 एप्रिल रोजी नायगाव येथील शासकीय समाजकल्याण वस्तीगृहात मतदान जनजागृती निमित्त उमेदच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी तालुक्यातील उमेदच्या समुदाय संसाधन व्यक्ती, बँक सखी, पशु सखे, कृषी सखी असे एकूण साठ महिला उपस्थित होत्या.

यावेळी उमेदचे तालुका अभियान व्यवस्थापक अमोल जोंधळे यांनी मतदानाचे महत्त्व, हक्क व जबाबदारी याविषयी मार्गदर्शन करून प्रत्येक गावातून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी पुढाकार घेऊन ग्रामस्थांना मार्गदर्शन करावे असे आवाहन केले. मतदान प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

00000



 वृत्‍त क्र. 367

पूर्ण दिवस सुटी द्या... नाहीतर किमान 2 तास मतदानाला वेळ द्या !

कामगार, मजूर, वेटरपासून , मेकॅनिकपर्यंत सर्वाना 26 एप्रिलला सवलतीचे आदेश

26 एप्रिल मतदानाचा दिवस

नांदेड, दि. 20 एप्रिलः- येत्या शुक्रवारी अर्थात 26 एप्रिल रोजी नांदेड जिल्ह्यात लोकसभेसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे या दिवशी अत्यावश्यक सेवेपासून तर कर्मचाऱ्यांपर्यंत आणि कामगारांपासून शेतमजूर, मेकॅनिक, वेटर या सर्वांना एक तर पूर्ण दिवसाची सुट्टी द्या. अथवा मतदान करण्यासाठी दोन तासाची सवलत द्या, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाने सर्व कामगार आस्थापनांना दिले आहे.

यासंदर्भात कामगार आयुक्त कार्यालय व जिल्हा उद्योग कार्यालयामार्फत सर्व आस्थापनाची नुकतीच एक बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये छोट्या आस्थापनावर असणाऱ्या रोजंदारी कामगारांपासून नियमित वेतन घेणाऱ्या पगारी नोकरदारापर्यंत सर्वांना ही सवलत मिळाली पाहिजे असे स्पष्ट करण्यात आले आहे.

नांदेड लोकसभा मतदार संघात 26 एप्रिल रोजी मतदान होत आहे. नांदेड लोकसभा मतदान क्षेत्रात असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणा-या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्‍यांना निवडणुकीच्‍या दिवशी शुक्रवार 26 एप्रिल 2024 रोजी मतदानाचा हक्‍क बजावण्‍यासाठी भरपगारी सुट्टी देण्‍याबाबत शासन परिपत्रक निर्गमित झाले आहे.

या परिपत्रकानुसार सर्व आस्‍थापना, कारखाने, दुकाने इत्‍यादींच्‍या मालकांनी, व्‍यवस्‍थापकांनी कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्‍हा उद्योग केंद्राचे महाव्‍यवस्‍थापक अमोल इंगळे व सहायक कामगार आयुक्‍त मोहसिन अ. सय्यद यांनी केले आहे.

ही सुट्टी सर्व आस्‍थापना, कारखाने,दुकाने, इत्‍यादीना लागू राहील. उदा. राज्‍य शासन, केंद्र शासन व खाजगी कंपन्‍या या मधील आस्‍थापना, सर्व दुकाने व इतर आस्‍थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्‍यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्‍थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्‍या, शॉपिग सेंटर, मॉल्‍स,रिटेलर इ. अपवादात्‍मक परिस्‍थीतीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्‍यादीना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्‍य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्‍क बजावण्‍यासाठी सुट्टी ऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता येईल.

मात्र त्‍याबाबत त्‍यांनी संबंधित महानगरपालिका आयुक्‍त अथवा जिल्‍हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्‍यक राहील. कोणत्‍याही परिस्थितीत कामगारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्‍थापना मालकांनी घेणे आवश्‍यक राहील.

सर्व आस्‍थापना,कारखाने, दुकाने इत्‍यादींच्‍या मालकांनी , व्‍यवस्‍थापनाने या आदेशाचे अनुपालन होईल याची खबरदारी घ्‍यावी. मतदारांकडून मतदानासाठी योग्‍य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्‍त न झाल्‍याने मतदान करणे शक्‍य न झाल्‍याबाबची तक्रार आल्‍यास , त्‍यांच्‍या विरुध्‍द योग्‍य ती कारवाई करण्‍यात येईल . अशा तक्रारीचे निवारण करण्‍यासाठी जिल्‍हास्‍तरीय दक्षता समिती स्‍थापन करण्‍यात आली आहे.तक्रार निवारणासाठी नोडल अधिकारी म्‍हणून सहाय्यक कामगार आयुक्‍त मोहसीन अ. सय्यद (मो.क्र.7276216066) तसेच जिल्‍हा उद्योग केंद्राचे महाव्‍यवस्‍थापक अमोल इंगळे यांचा मो. क्र.  +91 9607052810 यांच्‍याशी संपर्क साधावा असेही आवाहन करण्‍यात आले आहे.

0000

वृत्त क्रमांक   जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण नांदेड (जिमाका), दि. 17: मराठवाडा मुक्ती संग्राम ...