Tuesday, January 4, 2022

वृत्त क्रमांक 6

नांदेड जिल्ह्यात 29 व्यक्ती कोरोना बाधित

तर एक कोरोना बाधित झाला बरा 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 812 अहवालापैकी 29 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 22 तर अँटिजेन तपासणीद्वारे 7 अहवाल बाधित आला आहे. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 601 एवढी झाली असून यातील 87 हजार 887 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 59 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 18, नांदेड ग्रामीण 1, हिमायतनगर 1, मुखेड 1, मुंबई 1, तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 3, मुदखेड 2, लोहा 1, मुंबई 1 असे एकुण 29 बाधित आढळले आहे. आज जिल्ह्यात नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणातील एका कोरोना बाधिताला औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली.  आज 59 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 6, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 48, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1, खाजगी रुग्णालय 4 अशा एकुण 59 व्यक्ती उपचार घेत आहेत.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 92

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 95 हजार 906

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 601

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 887

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 655

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-4

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-59

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

वृत्त क्रमांक 5

 बचतगटातील महिला जेव्हा शाळेतील सत्काराने भारावून जातात

 

·  पर्यावरण विभागाच्यावतीने पर्यावरण जागृतीसाठी कापडी पिशव्यांचे वाटप  

       

नांदेड (जिमाका) दि. 4 :- पर्यावरणाच्या ऱ्हासाला कारणीभूत असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या पासून मुक्ती देण्याच्या उद्देशाने पर्यावरण विभाग महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांच्यावतीने कापडी पिशव्यांची मोहिम मोलाची आहे. या मोहिमेंतर्गत महिलांच्या हाताला काम मिळावे, या उद्देशाने बचतगटांना कापड देवून कापडी पिशव्यांची निर्मिती हा अत्यंत अभिनव उपक्रम असल्याचे प्रतिपादन रोहयोच्या उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी केले. कापडी पिशव्यांचा वापर व त्याचे महत्त्व शालेय विद्यार्थ्यांपर्यंत रुजावे, पर्यावरण संतुलनाचा हा विचार घराघरात पोहचावा या उद्देशाने आज नांदेड जिल्ह्यात विष्णुपूरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेपासून कापडी पिशवी वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी रोहयोच्या उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, महाराष्ट्र प्रदुषण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी राजेंद्र पाटील, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी चंदनसिंग राठोड, जिल्हा समुपदेशक बालासाहेब कच्छवे, मुख्याध्यापक एन. एस. दिग्रसकर आदी उपस्थित होते.

 

महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाने प्लॉस्टिक बॅगला मुक्ती मिळावी व कापडी पिशव्या वापरण्याची सवय तळागाळापर्यंत पोहचावी या उद्देशाने विशेष मोहिम हाती घेतली. यात माविमच्या अंतर्गत महिला बचतगटांना पिशव्या शिवण्याचे काम देऊन पर्यावरण संतुलनासह रोजगार निर्मितीलाही चालना दिली. नांदेड येथील साबेर महिला बचतगटातील महिलांनी हे काम अत्यंत कुशलतेने करून पिशव्यांची उपलब्धता वेळेच्या आत करून दिली. या अभिनव उपक्रमातील शिलेदार ठरलेल्या साबेर महिला बचत गटातील सुफिया शेख तय्यब अन्सारी यांचा उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्या हस्ते प्रातिनिधीक सत्कारही करण्यात आला. सुमारे सात वेगवेगळ्या बचत गटांकडून 30 हजार कापडी पिशव्या शिऊन घेण्यात आल्याची माहिती माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी चंदनसिंग राठोड यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली. 

पर्यावरण संतुलनासह अनेक समाज उपयोगी उपक्रमात शालेय विद्यार्थ्यांचे योगदान अत्यंत महत्वाचे असते. विद्यार्थी असूनही शालेय मुले खऱ्या अर्थाने लोकशिक्षकाची भूमिका आपल्या वर्तनातून समाजापर्यंत पोहोचू शकतात. प्लॉस्टिक कॅरीबॅगपासून मुक्ती घेण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांचा पुढाकार मोठा बदल देऊ शकतो, अशा विश्वास जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी व्यक्त केला. आपल्या भवतालाला, परिसराला समजून त्याला पूरक असे आपले वर्तन ठेवणे हे खरे शिक्षण असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्र प्रदुषण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी राजेंद्र पाटील, जिल्हा समुपदेशक बालासाहेब कच्छवे यांचेही यावेळी समयोचित भाषण झाले. यावेळी 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थी व विद्यार्थींनीचे लसीकरण मोहिमेचाही शुभारंभ करण्यात आला.

00000




Monday, January 3, 2022

 प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे

माहूर, हिमायतनगर येथे शिबिराचे आयोजन

 

·         शिबिराला येतांना कोरोना लस प्रमाणपत्र आवश्यक

 

नांदेड (जिमाका) दि. 3:- प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने 17 जानेवारी रोजी हिमायतनगर तर 19 जानेवारी रोजी माहूर या तालुक्याच्या ठिकाणी पक्के अनुज्ञप्ती चाचणी संबंधी शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे.

 

या दिनांकास स्थानिक सुट्टी जाहीर झाल्यास अथवा आपत्कालीक परिस्थिती निर्माण झाल्यास शिबिराच्या तारखेमध्ये बदल होऊ शकतो. या शिबीरासाठी 4 जानेवारी रोजी कार्यालयीन वेळेत अपॉईंटमेंट खुल्या होतील. सर्व अर्जदारांनी उपलब्ध अपॉईंमेंट घेऊन कोरोना लस घेतल्याच्या प्रमाणपत्रासह शिबीरास उपस्थित रहावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000

 नांदेड जिल्ह्यात 10 व्यक्ती कोरोना बाधित

तर एक कोरोना बाधित झाला बरा 

नांदेड (जिमाका) दि. 3 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 720 अहवालापैकी 10 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 10 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आला आहे. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 572 एवढी झाली असून यातील 87 हजार 885 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 32 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 8, नायगाव तालुक्यातंर्गत 1, ठाणे 1 असे एकुण 10 बाधित आढळले आहे. आज जिल्ह्यात नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणातील एका कोरोना बाधिताला औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली.  आज 32 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 3, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 21, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 3, खाजगी रुग्णालय 5 अशा एकुण 32 व्यक्ती उपचार घेत आहेत.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 99 हजार 281

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 95 हजार 128

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 572

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 885

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 655

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.3 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-5

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-32

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2

 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

Sunday, January 2, 2022

वृत्त क्रमांक 2

 नांदेड जिल्ह्यात 9 व्यक्ती कोरोना बाधित

तर एक कोरोना बाधित झाला बरा 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 836 अहवालापैकी 9 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 8 तर अँटिजेन तपासणीद्वारे 1 अहवाल बाधित आला आहे. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 564 एवढी झाली असून यातील 87 हजार 884 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 25 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 4, देगलूर तालुक्यातंर्गत 2, लोहा 1, लातूर 1 ता अँटिजेन तपासणीद्वारे लोहा 1 असे एकुण 9 बाधित आढळले आहे. आज जिल्ह्यात नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणातील एका कोरोना बाधिताला औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली.  आज 25 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 2, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 13, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 5, खाजगी रुग्णालय 5 अशा एकुण 25 व्यक्ती उपचार घेत आहेत.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 98 हजार 561

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 94 हजार 423

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 564

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 884

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 655

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.4 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-06

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-25

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

  वृत्त  भरती परीक्षा सुधारणांवर चर्चेसाठी उपस्थित राहण्याचे विभागीय आयुक्तांचे आवाहन २१ सप्टेंबर रोजी उच्चस्तरीय समिती भेट देणार  छत्रपती स...