Monday, January 3, 2022

 प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे

माहूर, हिमायतनगर येथे शिबिराचे आयोजन

 

·         शिबिराला येतांना कोरोना लस प्रमाणपत्र आवश्यक

 

नांदेड (जिमाका) दि. 3:- प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने 17 जानेवारी रोजी हिमायतनगर तर 19 जानेवारी रोजी माहूर या तालुक्याच्या ठिकाणी पक्के अनुज्ञप्ती चाचणी संबंधी शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे.

 

या दिनांकास स्थानिक सुट्टी जाहीर झाल्यास अथवा आपत्कालीक परिस्थिती निर्माण झाल्यास शिबिराच्या तारखेमध्ये बदल होऊ शकतो. या शिबीरासाठी 4 जानेवारी रोजी कार्यालयीन वेळेत अपॉईंटमेंट खुल्या होतील. सर्व अर्जदारांनी उपलब्ध अपॉईंमेंट घेऊन कोरोना लस घेतल्याच्या प्रमाणपत्रासह शिबीरास उपस्थित रहावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...