Friday, January 31, 2020


लोकशाही पंधरवाडा निमित्ताने
जनजागृती रॅलीचे आज आयोजन
नांदेड दि. 31 :- लोकशाही पंधरवाडा 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2020 या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. लोकशाही, निवडणूक व सुशासन ही संकल्पना जनमाणसात रुजुन मतदारांचा लोकशाही बळकट करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेत सहभाग वाढविणे, मतदार यादीत नाव समाविष्ट आहे किंवा नाही याची खात्री करण्यासाठी सुचीत करणे, मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आदीसाठी जनजागृती व्हावी यासाठी शनिवार 1 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 8 वा. रॅलीचे आयोजन करण्यात आले  आहे.
ही रॅली शनिवार 1 फेब्रुवारी 2020 रोजी महात्मा फुले पुतळा, आयटीआय कॉर्नर पासून सुरु होऊन शिवाजीनगर, कलामंदिर, वजिराबाद चौरस्ता ते बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे समारोप होईल, असे उपजिल्हाधिकारी (सामान्य) नांदेड यांनी कळविले आहे.
00000


विभागीय स्तरावरील लोकशाही दिन
महिला लोकशाही दिनाचे 10 फेब्रुवारीला आयोजन
औरंगाबाद, दि. 31:- (विमाका), विभागीय स्तरावरील लोकशाही दिन विभागीय महिला लोकशाही दिनाचे फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी दिनांक 10 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 11.00 वाजता आयोजन करण्यात आले आहे.
तक्रार करण्यासाठीचे अर्ज विहित वेळेत नमुना प्रप्रत्र-1() मध्ये दोन प्रतीत आवश्यक त्या कागदपत्रासह विभागीय आयुक्त कार्यालयाचे आवक शाखा प्रमुख (नायब तहसीलदार) यांच्याकडे  स्विकारण्यात येणार आहे. विहित नमुना अर्जही  प्रप्रत्र-1() आवक शाखेत  उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच विभागीय महिला लोकशाही दिनासाठी पिडीत महिलांनी विहीत नमुन्यातील मुदत पुर्व अर्ज विभागीय उप आयुक्त, महिला बाल विकास, खोकडपुरा औरंगाबाद तथा सदस्य सचिव यांच्याकडे सादर करावे.
अर्जाच्या दोन प्रती विभागीय लोकशाही दिनाच्या दिवशी विभागीय आयुक्त यांच्याकडे पुन्हा सादर कराव्यात.तसेच ज्यांनी यापुर्वीच्याविभागीय स्तरावरील लोकशाही दिनी तक्रार अर्ज दिलेले असतील परंतू त्यावर अद्याप कार्यवाही झाली नाही अशा प्रकरणात त्यांना पुन्हा अर्ज देता येणार नाही.
जिल्हा स्तरावरील लोकशाही दिन कार्यक्रमात ज्या प्रश्नांची सोडवणूक होवू शकली नाही किंवा या प्रश्नाबाबत जिल्हास्तरीय लोकशाही दिनांत तक्रारदाराचे समाधान झाले नाही असे सर्व प्रश्न  विभागीय स्तरावरील लोकशाही दिनामध्ये घेण्यात येणार आहे, असे विभागीय आयुक्त कार्यालयाने जारी केलेल्या प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
000000


नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका पोटनिवडणूक
मतदान, मतमोजणी परिसरात 144 कलम
नांदेड, दि. 31 :- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका प्रभाग क्र. 13 पोटनिवडणूक 2020 करिता गुरुवार 6 फेब्रुवारी 2020 रोजी मतदानाच्या दिवशी व  शुक्रवार 7 फेब्रवारी 2020 रोजी मतमोजणीच्या दिवशी नांदेड शहरातील सर्व मतदान केंद्र व मतमोजणी केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया कलम 144 लागु करण्यात आले आहे.  
फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका प्रभाग क्र. 13 पोटनिवडणूक 2020 ची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी 6 फेब्रुवारी 2020 रोजी ज्या ठिकाणी मतदान होणार आहे त्या ठिकाणापासून दोनशे मीअर परिसरातील व 7 फेब्रुवारी 2020 रोजी ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे अशा मतमोजणी केंद्रापासून 200 मीटर परिसरातील सर्व पक्षकारांचे मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे, निवडणुकीच्या कामव्यतीथ्रकत खाजगी वाहन, संबंधीत पक्षाचे चिन्हाचे प्रदर्शन व निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त व्यक्तीस प्रवेश करण्यासाठी प्रतिबंधीत करण्यात आले आहे.  
हा आदेश नांदेड शहरात 6 फेब्रुवारी 2017 रोजी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका प्रभाग क्र. 13 पोटनिवडणूक 2020 च्या मतदानांच्या दिवशी मतदान केंद्रावर मतदान सुरु झाल्यापासून ते संपेपर्यंत आणि 7 फेब्रुवारी 2020 रोजी मतमोजणी केंद्रावर मतमोजणी सुरु झाल्यापासून ते मतमोजणी संपेपर्यंत अंमलात राहील.  हा आदेश 29 जानेवारी 2020 रोजी निर्गमीत करण्यात आला आहे.
000000


कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव
भारतीय पारंपरिक औषध पद्धतींच्या
आधारे प्रतिबंधात्मक सूचना जारी   
नांदेड दि. 31 :- कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारतीय पारंपरिक औषध पद्धतींच्या आधारे प्रतिबंधात्मक सूचना जारी केल्या आहेत.
व्यक्तिगत स्वच्छता सांभाळणे गरजेचे. साबण पाण्याने आपले हात किमान 20 सेकंदापर्यंत धुवावेत. शडांग पनिया या प्रकियेने बनवलेला काढा एका बादलीत भरून ठेऊन तो तहान लागली असता प्यावा. (मुष्ट, परपट, उशीर, चंदन, उदीच्च आणि नागर यांच्या भूकटीचा एक लिटर पाण्यात वापर करून ते निम्मे होईपर्यंत उकळावे, म्हणजे ही प्रक्रिया पूर्ण होते).
हात न धुता आपल्या डोळे, नाक आणि तोंडालगत हात लावू नये. आजारी माणसांचा संसर्ग टाळावा.
आजारपणात घरातच रहावे. खोकला किंवा शिंका आल्या असतांना तोंड कपड्याने झाकावे, नंतर हात स्वच्छ धुवावेत. ज्या वस्तूंना स्पर्श झाला आहे त्या वस्तू साफ कराव्यात. प्रवासात किंवा कामकाजाच्या ठिकाणी एन 95 हा मास्क वापरणे सोयीचे ठरेल. कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचा संशय आल्यास ताबडतोब मास्क लावणे सुरू करावे आणि जवळच्या रुग्णालयाशी संपर्क साधावा. आरोग्य व आहार आणि योग्य जीवनपद्धती यामुळे रोगप्रतिबंधकारक क्षमता वाढते. दिवसातून दोन वेळेला कोमट पाण्याबरोबर 5 ग्रॅम अगस्त्य हरितकी घ्यावी. ही सर्व माहिती केवळ उपयुक्त माहिती म्हणून दिली आहे. तिचा वापर करण्यासाठी नोंदणीकृत आयुर्वेद वैद्यांकडून योग्य तो सल्ला घ्यावा.
आयुष मंत्रालयाच्या सांगण्यानुसार 28 जानेवारी रोजी झालेल्या होमिओपॅथी विषयक केंद्रीय होमिओपॅथी संशोधन परिषदेच्या वैज्ञानिक सल्लागार मंडळाच्या बैठकीत कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजनेचा विचार करण्यात आला. तज्ञ गटाने आरसेनिकम अल्बमकिस या होमिओपॅथी औषधाचा वापर याकामी होऊ शकतो असे म्हटले आहे. कोरोना विषाणूंच्या संसर्गावर युनानी पद्धतीच्या उपचारांचे नियोजनही करण्यात आले आहे.
000000

Thursday, January 30, 2020


शिक्षक, अधिकाऱ्यांनी
नवोपक्रम स्पर्धेत भाग घेण्याचे आवाहन  
नांदेड, दि. 30 :- विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या गुणवत्तेसाठी नवोपक्रम स्पर्धा सन 2019-20 ही ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहे. सृजनात्मक कार्याची आवड असणाऱ्या नवोपक्रमशील शिक्षक व अधिकाऱ्यांनी या स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे संचालक दिनकर पाटील यांनी केले आहे.   
राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरु झाली आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये झपाट्याने शाळा प्रगत होताना दिसू लागल्या आहेत. शाळा-शाळांमध्ये अध्ययन अध्यापन प्रक्रिया अधिक आनंददायी व सुलभ होण्यासाठी काही नावेपक्रम राबवले जात आहेत. त्यामुळे सर्व शाळांमध्ये उत्साहाचे व चैतन्याचे वातावरण निर्माण झ्ज्ञाले आहे. प्रत्येक मूल प्रगत होण्यासाठी शिक्षक प्रयत्न करीत आहेत. त्यांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती राज्यातील सर्व शिक्षकांना व्हावी यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे मार्फत सन 2019-20 या वर्षासाठी राज्यस्तरीय नावोपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. समग्र शिक्षानुसार एमएससीईआरटीच्या कार्याची व्याप्ती पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक अशी झाली असल्याने या वर्षापासून ही स्पर्धा पुढील पाच गटात आयोजित करण्यात येत आहे.
पूर्व प्राथमिक स्तरावरील अंगणवाडी कार्यकर्त्या / सेविका व पर्यवेक्षिका, प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक, विषय सहाय्यक व विषयक साधन व्यक्ती. अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिकारी (केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी व अधिव्याख्याता व वरिष्ठ अधिव्याख्याता) ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येत आहे. सृजनात्मक कार्याची आवड असणाऱ्या नवोपक्रमशील शिक्षक व अधिकाऱ्यांनी या स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.  
नवोपक्रम स्पर्धेची उद्दिष्टे, नवोपक्रम अहवाल लेखन मुद्दे, स्पर्धेसाठी पात्रतेच्या अटी, स्पर्धेचे नियम, नवोपक्रम अहवालाचे मूल्यांकन, राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेची कार्यवाही, नवोपक्रम बँक आदी माहितीसठी येथील जिल्हा प्रशिक्षण व प्रशिक्षण संस्था श्रीनगर नांदेड येथे संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.  
00000


नांदेड जिल्ह्याच्या 315 कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मंजूरी
औरंगाबाद, दिनांक 30 (विमाका) :- जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2020-21 करीता 255 कोटी नांदेड जिल्हा नियोजन विभागामार्फत प्रारुप आराखड्याच्या सादरीकरणानंतर राज्याचे वित्त आणि‍ नियोजन तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 315 कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्याची मागणी मंजूर केली. 155 कोटीची अतिरिक्त मागणी 2020-21 या वर्षासाठी करण्यात आली होती. यातील 60 कोटीचा निधी मंजूर करुन एकूण 315 कोटींच्या प्रारुप आराखड्यास मंजूरी देण्यात आली. 
या आढावा बैठकीसाठी नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण, आरोग्यमंत्री राजेश टोपे, उस्मानाबादचे खासदार ओम राजेनिंबाळकर, आमदार बालाजी कल्याणकर, राजेश पवार, विक्रम काळे, अमर राजूरकर, अप्पर मुख्य सचिव (नियोजन) देबाशीष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, जिल्हा नियोजन अधिकारी संजय कोलगणे, तसेच नांदेड जिल्ह्याचे विविध विभागाचे विभाग प्रमुख यांची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण उपक्रमाची पॉवर पॉईंट सादरणीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली.
******






Wednesday, January 29, 2020


पोस्टर एक्जीबीशन शासकीय तंत्रनिकेतनमध्ये संपन्न
नांदेड, दि. 29 :- येथील शासकीय तंत्रनिकेत येथे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी एन्हॉरन्मेंट पब्लिक अवेरनेस बदल पोस्टर एक्जीबीशन विद्युत विभागातर्फे घेण्यात आले. त्याचे उद्घाटन संस्थेचे प्राचार्य डॉ. जी. व्ही. गर्जे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे उपप्राचार्य डॉ. पी. डी. पोपळे, विभाग प्रमुख डी. एम. लोकमनवार, व्ही. व्ही. सर्वज्ञ, एस. एम. कंधारे, डॉ. एस. टी. कांबळे, एस. एम. ढोले, एस. जी. कदम यांच्यासह संस्थेचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
सध्याच्या युगामध्ये वातावरणातील होणारे बदल आणि निर्माण होणारे प्रदूषण यामुळे पृथ्वीचे संतुलन बिघडत आहे. त्याचे परिणाम दिसून येत आहेत. यावर काय उपाय योजना करता येईल यासंदर्भात विद्यार्थ्यांनी त्यांच्या पोस्टरमधून दाखवण्याचा प्रयत्न केला. या एक्जिबिशनसाठी विद्युत विभागाचे प्राध्यापक एस. जी. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले. यामध्ये विद्युत विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
0000

  वृत्त  भरती परीक्षा सुधारणांवर चर्चेसाठी उपस्थित राहण्याचे विभागीय आयुक्तांचे आवाहन २१ सप्टेंबर रोजी उच्चस्तरीय समिती भेट देणार  छत्रपती स...