Thursday, January 30, 2020


नांदेड जिल्ह्याच्या 315 कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मंजूरी
औरंगाबाद, दिनांक 30 (विमाका) :- जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2020-21 करीता 255 कोटी नांदेड जिल्हा नियोजन विभागामार्फत प्रारुप आराखड्याच्या सादरीकरणानंतर राज्याचे वित्त आणि‍ नियोजन तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 315 कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्याची मागणी मंजूर केली. 155 कोटीची अतिरिक्त मागणी 2020-21 या वर्षासाठी करण्यात आली होती. यातील 60 कोटीचा निधी मंजूर करुन एकूण 315 कोटींच्या प्रारुप आराखड्यास मंजूरी देण्यात आली. 
या आढावा बैठकीसाठी नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण, आरोग्यमंत्री राजेश टोपे, उस्मानाबादचे खासदार ओम राजेनिंबाळकर, आमदार बालाजी कल्याणकर, राजेश पवार, विक्रम काळे, अमर राजूरकर, अप्पर मुख्य सचिव (नियोजन) देबाशीष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, जिल्हा नियोजन अधिकारी संजय कोलगणे, तसेच नांदेड जिल्ह्याचे विविध विभागाचे विभाग प्रमुख यांची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण उपक्रमाची पॉवर पॉईंट सादरणीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली.
******






No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...