कर्जमुक्त शेतकरी, समृद्ध महाराष्ट्र!
Saturday, July 18, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६
#कर्जमुक्तीयोजना#महाराष्ट्रशासन #महाकर्जमुक्ती
#शेतकरी
#शेतकरीकर्जमुक्ती
#कर्जमुक्तीयोजना२०२६
#MahaDGIPR
#GovernmentScheme
वृत्त क्रमांक
नांदेड जिल्ह्यात धनादेश अनादराची 23 प्रकरणे तडजोडीने निकाली; २९ लाख ४४ हजार रुपयांची वसुली
नांदेड, दि. 18 : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नरेंद्र के. ब्रम्हे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड मुख्यालयासह जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये धनादेश अनादर (चेक बाऊन्स) प्रकरणांसाठी विशेष लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते.
विशेष लोकन्यायालय यशस्वी होण्यासाठी वकील आणि बँक अधिकाऱ्यांसमवेत पूर्वनियोजित बैठका घेण्यात आल्या. तसेच तालुकास्तरीय न्यायाधीशांशी आभासी (ऑनलाईन) पद्धतीने संवाद साधून नियोजन करण्यात आले.
या विशेष लोकन्यायालयामध्ये नांदेड जिल्ह्यातील एकूण 23 धनादेश अनादराची प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. या माध्यमातून 29 लाख 44 हजार 156 रुपये इतक्या रकमेची वसुली करण्यात आली.
लोकन्यायालयामुळे संबंधित पक्षांचा वेळ, श्रम आणि खर्चाची बचत होऊन न्यायदानाची प्रक्रिया अधिक सुलभ व जलद होते. विशेष लोकन्यायालयाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा व तालुका न्यायालयांतील न्यायाधीश, कर्मचारी, शिपाई, जिल्हा न्यायालयाचे अधीक्षक, व्यवस्थापक तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातील सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शरद जी. देशपांडे यांनी या विशेष लोकन्यायालयाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.
००००
Friday, July 17, 2026
वृत्त
क्रमांक
नांदेड
येथील स.नं. 86/1, 86/2 व 93 या मिळकतीमधील
नगर भूमापन क्रमांकामध्ये
ज्या व्यक्तींची नावे नमूद आहेत त्यांना सुनावणीच्या दिवशी उपस्थित राहण्याचे आवाहन
नांदेड
दि. 17 जुलै :- मौजे नांदेड येथील स.नं. 86/1, 86/2 व 93 या मिळकतीमधील नगर भूमापन क्रमांकामध्ये ज्या
व्यक्तींची नावे नमूद आहेत त्यांनी
निश्चित करण्यात आलेल्या सुनावणी दिवशी उपविभागीय अधिकारी
नांदेड यांच्या कार्यालयात अभिलेखाच्या प्रमाणित प्रतीसह आपले म्हणणे सादर
करण्यासाठी संबधित मालमत्ता धारकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी
(सा) तथा प्राधिकृत अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड
यांनी केले आहे.
मा. उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांनी रिट याचिका क्र. 14958/2025 मध्ये 17 मार्च 2026 रोजी दिलेल्या आदेशानुसार प्राथमिकदृष्ट्या असे निदर्शनास आले आहे की, सर्वे नं. 86/1, 93 ही जमीन गुरुद्वाराच्या नावे पट्टेदार म्हणून नोंद आहे तसेच सर्वे नं. 86/2 ही जमीन शासन मालकीच्या आहेत.
स.नं. स.नं. 86/1,86/2 व 93 च्या महसूल अभिलेखामध्ये खाजगी व्यक्तींची नावे कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता समाविष्ट करण्यात आलेली आहेत. या बेकायदेशीर नोंदींची तपासणी करून योग्य ती कार्यवाही करण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 चे कलम 53 अंतर्गत नोटीस जारी करण्यात आलेली आहेत.
सदर नोटीस व संबधितांची यादी ही जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्या http://nanded.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर तसेच तहसिल कार्यालय नांदेड, तलाठी कार्यालय नांदेड, मंडळ अधिकारी नांदेड शहरी कार्यालय व गुरुव्दारा बोर्ड कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
मौजे
नांदेड येथील स.नं. 86/1, 86/2 व 93 या मिळकतीमधील
नगर भूमापन क्रमांकामध्ये ज्या व्यक्तींची नावे नमूद आहेत त्यांनी उपरोक्त
संकेतस्थळावर किंवा वरील कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आलेल्या
यादीची पाहणी करावी. तसेच निश्चित करण्यात आलेल्या सुनावणी दिवशी उपविभागीय
अधिकारी नांदेड यांच्या कार्यालयात अभिलेखाच्या प्रमाणित प्रतीसह आपले म्हणणे सादर
करण्यासाठी संबधित मालमत्ता धारकांनी उपस्थित राहावे, असेही आवाहन करण्यात आले
आहे.
00000
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६
#कर्जमुक्तीयोजना#महाराष्ट्रशासन #महाकर्जमुक्ती
#शेतकरी
#शेतकरीकर्जमुक्ती
#कर्जमुक्तीयोजना२०२६
#MahaDGIPR
#GovernmentScheme
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६
#कर्जमुक्तीयोजना#महाराष्ट्रशासन #महाकर्जमुक्ती
#शेतकरी
#शेतकरीकर्जमुक्ती
#कर्जमुक्तीयोजना२०२६
#MahaDGIPR
#GovernmentScheme
वृत्त क्रमांक स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त नांदेडसाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक – पालकमंत्री अतुल सावे •‘स्वच्छ नांदेड – सुंदर नांदेड’ मोहिमे...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 974 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “ स्वस्थ नारी , सशक्त परिवार ” राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ “ स्वस्थ नारी , ...
-
अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी 192 धारकांची प्रतिक्षा यादी घोषित आक्षेपाबाबत 30 ऑक्टोंबरची मुदत नांदेड , ( जिमाका ) दि. 22 :- ...





