Wednesday, October 3, 2018


स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरात
शुक्रवारी टोंपे, तिडके यांचे व्याख्यान
            नांदेड दि. 3 :- स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय सेतू समिती, नांदेड वाघाळा शहर महानगरपालीका, जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्यावतीने उज्ज्वल नांदेड" हिमेअंतर्गत शुक्रवार 5 ऑक्टोंबर 2018 रोजी सकाळी 10.30 वाजेपर्यंत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यामध्ये  डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नांदेड येथे उपजिल्हाधिकारी सोपान टोपे हे पूर्व परीक्षेविषयी तर बालविकास प्रकल्प अधिकारी कैलास तिडके हे डिसेंबरमध्ये होणाऱ्या बाल विकास प्रकल्प अधिकारी स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. 
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या शिबिराउपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले आहे.
000000


आरोग्य शिबिरात
212 ज्येष्ठ नागरिकांची तपासणी
नांदेड, दि. 3 :- जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त 60र्षे वयोगटावरील जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी व उपचार शिबीर जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.पी. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गुरुगोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय नांदेड येथे नुकतेच घेण्यात आले. यावेळी 212 ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
यावेळी नांदेड शहर शाखेचे उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित फस्के, उत्तर मराठवाडा जेष्ठ नागरीक महासंघाचे अध्यक्ष अशोक तेरकर, महासंघाचे सचिव भागीरथी बच्चेवार, कोषाध्यक्ष जयवंतराव सोमवाड, सामाजिक कार्यकर्ते डॉ. तेलंग यांची प्रमुख उपस्थिती होती.
या शिबिरात 212 जेष्ठ नागरिकांचे महुमेह, उच्च रक्तदाब, मोतीबिंदू व मौखिक आरोग्याची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 69 जेष्ठ नागरिकांची ईसीजी काढण्यात आले.
शिबिरास अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. आय. भोसीकर, एनसीडी कार्यक्रमाचे नोडल ऑफीसार एच. आर. गुंटूरकर, डॉ. हनुमंत पाटील, डॉ. प्रदीप बोरसे, समुपदेशक सदाशिव सुवर्णकार, शितल उदगीरकर यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच प्रास्ताविक जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. एन. हजारी केले तर आभार डॉ. एच. के. साखरे यांनी मानले.
000000

शौर्यदिन उत्साहात साजरा  
सैनिकांचा जिल्हाधिकारी डोंगरे यांनी केला सत्कार
नांदेड, दि. 3 :- शौर्यदिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे नुकतेच करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी उपस्थित विरनारी, विरपिता व ऑपरेशनमधील अपंग माजी सैनिक, माजी सैनिकांचा सत्कार केला.
यावेळी विरनारी श्रीमती अरुणा टर्के, श्रीमती शितल कदम, श्रीमती ज्योती थोरात, विरपिता धोंडीबा जोंधळे, ऑन कॅप्टन प्रकाश कस्तूरे, ऑन कॅ. जाधव यांच्यासह  जवळपास 110 माजी सैनिक उपस्थित होते. तसेच कर्नल विकास शांडीले, कमान अधिकारी, 52 महा. बटालियन, एनसीसी व त्यांच्यासोबत 8 सेवारत सैनिक, मेजर बिक्रमसिंग थापा, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.  
जिल्हाधिकारी श्री डोंगरे यांनी  शौर्यदिनाचे महत्व सांगून विरमाता, वीरपत्नी  व  सर्व  माजी सैनिकांनी केलेल्या त्यागाबाबत व सेवेबाबत आभार व्यक्त केले. सैनिकांच्या अडीअडचणी असल्यास नि:संकोचपणे मांडव्यात असे आवाहन त्यांनी केले.  
यावेळी मेजर  बिक्रमसिंग थापा व मा सै ऑन कॅप्टन प्रकाश कस्तूरे  यांनी  सर्जीकल स्ट्राईक व भारताची सैन्य ताकद याची माहिती दिली. सुरुवातीला शहिद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली व दिपप्रज्वलन करण्यात आले.
प्रास्ताविकात जिल्हा सैनिक कल्याण संघटक कमलाकर शेटे यांनी शौर्य दिन साजरा करण्याबाबत शासनाची भुमिका सांगितली. सुत्रसंचालन माजी सैनिक अजय कानोले यांनी केले तर आभार माजी सैनिक पी. झगडे यांनी मानले. या कार्यक्रमास सैनिकी मुलांचे वसतिगृहातील विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
000000

Tuesday, October 2, 2018


नांदेड येथे कार्यशाळा संपन्न
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी
"युवा माहिती दूत" व्हावे - डॉ. जाधव

नांदेड, दि. 2 :- शासकीय योजना गावा-गावातील वंचित लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी "युवा माहिती दूत" या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एन. जाधव यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि राष्ट्रीय सेवा योजनाच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथील यशवंत महाविद्यालयाच्या ग्रंथालय सभागृहात जिल्हास्तरीय "युवा माहिती दूत" कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. जाधव बोलत होते.
यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम समन्वयक प्रा. डॉ. डी. डी. पवार, नांदेडचे जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलूरकर, राष्ट्रीय सेवा योजनाचे नांदेड जिल्हा समन्वयक प्रा. गोपाळ बडगीरे तसेच जिल्ह्यातील महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते.
"युवा माहिती दूत" या  महाराष्ट्र शासनाच्या अभिनव उपक्रमाचे कौतूक करुन प्राचार्य डॉ. जाधव म्हणाले की, शासनाच्या जनहिताच्या अनेक योजना आहेत. त्याची माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळत नाही. या पार्श्वभुमीवर युवा माहिती दूत हे ॲप डाउनलोड करुन अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहचविण्याची सुवर्णसंधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. राष्ट्रीय सेवा योजनाच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांनी आपल्या महाविद्यालयात या ॲप्लीकेशन विषयी विद्यार्थ्यांना माहिती दयावी, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाचे रासेयोचे कार्यक्रम समन्वयक डॉ. डी. डी. पवार यांनीही राष्ट्रीय सेवा योजनाने केलेल्या सामाजिक कार्याची माहिती देत "युवा माहिती दूत" या उपक्रमाची अंमलबजावणी सुव्यवस्थीत करण्यासाठी पुढाकार घेतला असल्याचे सांगून सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वेच्छेने यामध्ये सहभागी व्हावे, असेही ते म्हणाले. जिल्हा समन्वयक प्रा. गोपाळ बडगीरे यांनी प्रास्ताविकात उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलूरकर यांनी सादरीकरणाद्वारे "युवा माहिती दूत" या उपक्रमाविषयी तपशीलवार विवेचन केले. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने तयार केलेल्या तीन चित्रफितीद्वारे उपक्रमाची माहिती देण्यात आली. यावेळी प्राध्यापकांनी उपस्थित केलेल्या शंकाचे निरसन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन यशंवत महाविद्यालयाचे रासयोचे कार्यक्रम अधिकारी डॉ. शिवराज बोकडे यांनी केले. यावेळी सहभागी कार्यक्रम अधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात वरिष्ठ महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी, प्राध्यापक तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.
000000

Monday, October 1, 2018


हवामानावर आधारित पीक विमा

योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे

नांदेड, दि. 1:-  शासन निर्णय दि. 28 सप्टेंबर 2018 अन्वये नांदेड जिल्ह्यातील सन 2018-19 मध्ये प्रधानमंत्री फसल बीमा योजने अंतर्गत राज्यात पुनर्रचित हवामानावर आधारित पीक विमा योजना अंबिया बहाराकरीता लागु करण्यात आली आहे. योजना कार्यन्वयीत करणारी यंत्रणा / कंपनी ही भारतीय कृषि पिक विमा कंपनी, मुंबई आहे. सदरची योजना अधिसुचित पीकांसाठी कर्जदार शेतकऱ्यांसाठी सक्तीची राहील आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना  एैच्छिक राहिल. दि. 28 सप्टेंबर 2018 च्या शासन निर्णयानुसार सदरच्या पिक विमा भरण्याची अंतिम मुदत द्राक्ष पिकासाठी 15 ऑक्टोंबर 2018, केळी, मोसंबी पिकासाठी 31 ऑक्टोंबर2018,  आंबा पिकासाठी 31 डिसेंबर 2018  पर्यंत आहे.

विमा हप्ता दर

अ. क्र.
फळपिक
विमा संरक्षित
रक्कम (नियमित) रुपये
गारपीट विमा
संरक्षित रक्कम
रुपये
शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम रु.
नियमित
गारपीट
1
द्राक्ष
3,08,000/-
1,02,667/-
15400
5133
2
मोसंबी
77,000/-
25,667/-
7315
1283
3
केळी
1,32,000/-
44,000/-
19,000
2200
4
आंबा
1,21,000/-
40,333/-
26,620
2017

 

योजना अंमलबजावणी वेळापत्रक अधिसुचित मंडळे

            सदरची योजना जिल्ह्यामध्ये खाली दर्शविल्याप्रमाणे अधिसुचित फळपिकांसाठी, अधिसुचित महसुल मंडळांना लागु राहिल.

अ.क्र.
अधिसुचित फळपिक
तालुके
अधिसुचित महसुल मंडळे
 
1
द्राक्ष
नांदेड
तरोडा बु., तुप्पा, वसरणी, लिंबगां, विष्णुपूरी.
अर्धापूर
अर्धापूर, दाभड, मालेगाव
मुदखेड
मुदखेड, मुगट, बारड
हदगाव
हदगाव, तामसा, मनाठा, आष्टी
लोहा
शेवडी बा.
भोकर
भोकर
देगलूर
मरखेल, हाणेगाव
2
मोसंबी
नांदेड
लिंबगाव, विष्णूपूरी
मुदखेड
बारड
अर्धापूर
मालेगाव
3
केळी
नांदेड
तरोडा बु., तुप्पा, वसरणी, लिंबगाव, विष्णुपूरी
अर्धापूर
अर्धापूर, दाभड, मालेगाव
मुदखेड
मुदखेड, मुगट, बारड
हदगाव
हदगाव, तामसा, मनाठा, आष्टी
लोहा
शेवडी बा.
भोकर
भोकर
देगलूर
मरखेल, हाणेगाव
किनवट
किनवट, बोधडी
4
आंबा
अर्धापूर
मालेगाव, दाभड
5
 
मुखेड
मुक्रमाबाद

 

प्रधानमंत्री फसल बिमा योजना हवामनावर आधारित फळपिक विमा आंबीया बहारामध्ये उपरोक्त अंतिम दिनांकापुर्वी जास्तीत जास्त संख्येने शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी व नजीकच्या बँकेशी तसेच संबंधित विमा कंपनीशी संपर्क साधावा असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे.

****



दुर्गादेवी मंडळांना वर्गणी गोळा करण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पध्दतीने परवानगी देणे चालु


 

नांदेड दि. 1 :- सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, नांदेड यांच्यामार्फत दुर्गादेवी मंडळांना वर्गणी गोळा करण्यासाठी ऑनलाईन व ऑलाईन या दोन्ही पध्दतीने परवानगी देणे चालु आहे. दुर्गा देवी मंडळांना परवानगी मिळण्यासाठी सर्व सभासदांचे आधार कार्ड  व पॅन कार्ड, सर्व सभासदांचे ई-मेल आयडी, सर्व सभासदांचे मोबाईल क्रमांक , जागामालकाचे संमतीपत्र, पोलीस स्टेशनचे नाहरकत पत्र, दुर्गादेवी मंडळाच्या स्थापनेबाबतचा ठराव, मागील वर्षाचा हिशोब पत्र या कागदपत्रांची आवश्यकता आहे.

तरी सर्व दुर्गा देवी मंडळांनी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पध्दतीने परवानगी घेवूनच वर्गणी गोळा करावी, असे आवाहन धर्मादाय आयुक्त, नांदेड यांनी केले आहे.

****

जिल्ह्यात राष्ट्रीय व्यवसाय नोंदवही सर्वेक्षण सुरु  

नांदेड दि. 1 :-  राज्य शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयातर्फे राष्ट्रीय व्यवसाय नोंदवही तयार करण्याबाबत सर्वेक्षण करण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यात या सर्वेक्षणाचे काम सुरु झाले आहे.  या सर्वेक्षणात कंपनी ॲक्ट 1956 , फॅक्ट्री ॲक्ट 1948 , शॉप ॲन्ड कमर्शीयल इस्टॅब्लिशमेंट ॲक्ट 1948, सोसायटीज रजिस्ट्रेशन ॲक्ट 1960 , को-ऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट 1960, खादी अँन्ड व्हिलेज इंडस्ट्रीज बोर्ड, डायरेक्टोरेट ऑफ इंडस्ट्रीज (डीआयसी) या सात कायद्यातंर्गत दि. 31 मार्च, 2015 पुर्वी नोंदणी झालेल्या आस्थापनांची माहिती संकलीत केली जाणार आहेत. यामध्ये आस्थापनाचालक, परवानाधारकांकडून त्यांचा पॅन क्रमांक , टॅन क्रमांक , आस्थापना क्रमांक , कर्मचारी संख्या याबाबतची माहिती सर्वेक्षण करणाऱ्या संबंधित अधिकारी / कर्मचारी यांना देण्याबाबत सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी अधिकारी जी. जी. चितळे यांनी केले आहे.

****

वृत्त क्रमांक   जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण नांदेड (जिमाका), दि. 17: मराठवाडा मुक्ती संग्राम ...