Tuesday, August 2, 2022

जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी  0.10 मि.मी. पाऊस

नांदेड (जिमाका) दि. 2 :- जिल्ह्यात मंगळवार 2 ऑगस्ट रोजी सकाळी 8.20 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 0.10 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 753 मिलीमीटर पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात मंगळवार 2 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणेकंसात एकूण पाऊस : नांदेड- 0.10 (712.80), बिलोली-00 (728), मुखेड- 0.40 (683.30), कंधार-00 (693.50), लोहा-00 (682.30), हदगाव-00 (709.30), भोकर-00 (881.10), देगलूर-0.90 (641.40), किनवट-0.10 (859.90), मुदखेड- 00 (894.20), हिमायतनगर-00 (1029.30), माहूर- 00 (680.30), धर्माबाद- 00 (877.40), उमरी- 00(918.90), अर्धापूर- 00 (679.90), नायगाव-00 (683.80मिलीमीटर आहे.

0000

 बारावी पुरवणी परीक्षेच्या

वेळापत्रकात अंशत: बदल

 

नांदेड (जिमाका) दि. 2 :-  राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जुलै-ऑगस्ट 2022 मध्ये घेण्यात येणारी इयत्ता बारावीची पुरवणी परीक्षा 21 जुलै ते 12 ऑगस्ट 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या वेळापत्रकातील अंशत: बदलाची सर्व संबंधित उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्य, विद्यार्थी, पालक व सर्व संबंधितानी याची नोंद घ्यावी. या तारखेबाबतचे सुधारित वेळापत्रक शिक्षण मंडळाच्या www.mahahsscboard.in  संकेतस्थळावर 1 ऑगस्ट पासून उपलब्ध करुन देण्यात आले आहे, असे आवाहन पुणे शिक्षण मंडळाच्या सचिव श्रीमती अनुराधा ओक यांनी केले आहे.

 

या वेळापत्रकानुसार उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी पुरवणी परीक्षेतील व्यावसायिक द्विलक्षी अभ्यासक्रम पेपर-1 व 2 या विषयांच्या अनुक्रमे 6 ऑगस्ट, 10 ऑगस्ट व 12 ऑगस्ट रोजी सकाळ व दुपार सत्रात आयोजित करण्यात आली. यातील विषयाच्या परीक्षेस श्रेणी सुधार योजनेअंतर्गत प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा एमएचटीसीईटी यांच्या मार्फत आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक प्रवेश परिक्षेस प्रविष्ठ होत असल्याने 6 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट व 12 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या विषयांच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे. त्यानुसार सुधारित वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.

 

शनिवार 6 ऑगस्ट 2022 रोजी सकाळ सत्र 10.30 ते 1 या कालावधीत होणाऱ्या व्यावसायिक द्विलक्षी  अभ्यासक्रम पेपर-1 या विषयाचा सांकेताक A-1, A-2, A-3 ची परीक्षा सुधारित वेळापत्रकानुसार सोमवार 22 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10.30 ते 1 यावेळेत होईल. शनिवार 6 ऑगस्ट 2022 रोजी सकाळ सत्र 10.30 ते 1.30 या वेळेत व्यावसायिक द्विलक्षी अभ्यासक्रम पेपर-1 मधील A-4,A-5,A-7,A-8,A-9,B-9,C-1,C-2,D-9  या विषय व सांकेताकांची परीक्षा सुधारित वेळापत्रकानुसार सोमवार 22 ऑगस्ट 2022 रोजी सकाळ सत्र 10.30 ते 1.30 या कालावधीत  होणार आहे. शनिवार 6 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 ते 12.30 या कालावधीत व्यावसायिक द्विलक्षी अभ्यासक्रम पेपर-1 मधील B-2, B-4, B-5  या विषय व सांकेताकाची परीक्षा सोमवार 22 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 12.30 यावेळेत होणार आहे. शनिवार 6 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 3 ते 6 यावेळेत शिक्षणशास्त्र (78) E-3,E-6,F-6,F-8,G-1,G-2,G-3,G-4,G-5,G-6,G-8,G-9 या विषयाची परीक्षा सोमवार 22 ऑगस्ट रोजी दुपार सत्र 3 ते 6 या वेळेत होणार आहे. बुधवार 10 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 ते 1 या दरम्यान होणारी व्यावसायिक द्विलक्षी अभ्यासक्रम पेपर-2 मधील A-1,A-2,A-3 या विषयाची परीक्षा मंगळवार 23 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10.30 ते 1 या कालावधीत होणार आहे. बुधवार 10 ऑगस्ट 2022 रोजी सकाळ सत्र 10.30 ते 1.30 या कालावधीत  होणारी व्यावसायिक द्विलक्षी अभ्यासक्रम पेपर-2 मधील A-4,A-5,A-7,A-8,A-9,B-9,C-1,C-2,D-9 या अभ्यासक्रमाची परीक्षा मंगळवार 23 ऑगस्ट 2022 रोजी सकाळ सत्र 10.30 ते 1.30 या कालावधीत होणार आहे. बुधवार 10 ऑगस्ट रोजी सकाळ सत्र 10.30 ते 12.30 या कालावधीत व्यावसायिक द्विलक्षी अभ्यासक्रम पेपर—2 मधील B-2,B-4,B-5 या विषयाची मंगळवार 23 ऑगस्ट रोजी सकाळ सत्र 10.30 ते 12.30 या कालावधीत होईल. बुधवार 10 ऑगस्ट 2022 रोजी दुपार सत्र 3 ते 5 या कालावधीत व्यावसायभिमूख ग्रंथालय आणि माहितीशास्त्र (85) या विषयाची परीक्षा मंगळवार 23 ऑगस्ट 2022 रोजी दुपार सत्र 3 ते 5 या कालावधीत होईल. शुक्रवार 12 ऑगस्ट 2022 रोजी सकाळ सत्र 10.30 ते 1.30 या वेळेत बालविकास (43) संरक्षणशास्त्र (77) या विषयाची बुधवार 24 ऑगस्ट 2022 रोजी सकाळ सत्र 10.30 ते 1.30 या सुधारित वेळेत होईल. शुक्रवार 12 ऑगस्ट 2022 दुपार सत्र 3 ते 6 या कालावधीत कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान (75) पशुविज्ञान आणि तंत्रज्ञान (76) या विषयाची परीक्षा बुधवार 24 ऑगस्ट 2022 रोजी दुपार सत्र 3 ते 6 या कालावधीत होईल असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

Monday, August 1, 2022

 जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी  4.70 मि.मी. पाऊस


नांदेड (जिमाका) दि.
 1 :- जिल्ह्यात सोमवार 1 ऑगस्ट रोजी सकाळी 8.20 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 4.70 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 752.90 मिलीमीटर पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात सोमवार 1 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणेकंसात एकूण पाऊस : नांदेड- 17.40 (712.70), बिलोली-1.40 (728), मुखेड- 1.80 (682.90), कंधार-00 (693.50), लोहा-7.10 (682.30), हदगाव-5.50 (709.30), भोकर-7 (881.10), देगलूर-2 (640.50), किनवट-0.70 (859.80), मुदखेड- 0.40 (894.20), हिमायतनगर-00 (1029.30), माहूर- 0.50 (680.30), धर्माबाद- 3.30 (877.40), उमरी- 1.10(918.90), अर्धापूर- 2.30 (679.90), नायगाव-16.80 (683.80मिलीमीटर आहे.

0000

 नांदेड जिल्ह्यात 6 व्यक्ती कोरोना बाधित

 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 74 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 4, किनवट 1 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 1 असे एकूण 6 अहवाल कोरोना बाधित आढळले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 3 हजार 182 एवढी झाली असून यातील 1 लाख 420 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 70 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणात 7  व नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गंत गृह विलगीकरणातील 4 असे एकूण 11  रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 56, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील 12, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2 असे एकुण 70 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 13 हजार 57
एकुण निगेटिव्ह स्वॅब-
 7 लाख 92 हजार 487
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती-
 1 लाख 3 हजार 182
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या-
 1 लाख 420
एकुण मृत्यू संख्या-2
 हजार 692
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण
 97.32 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-02
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 02
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-70
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-00
0000

 नांदेड जिल्ह्यातील 125 शाळांमध्ये

बालविवाह निर्मूलन जनजागृती कार्यक्रम

 

नांदेड (जिमाका) दि.  1 :- शालेय विद्यार्थ्यांना बालविवाहाचे दुष्परिणाम सांगून त्याबाबत जाणीव आणि जनजागृती निर्माण करण्यासाठी नांदेड जिल्ह्यात विशेष उपक्रम हाती घेतला आहे. महिला व बालविकास विभाग, युनिसेफ, आणि एसबीसी 3 मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड जिल्ह्यातील 125 जिल्हा परिषद शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.यातून जिल्ह्यातील 3 लाख विद्यार्थी व 6 लाख पालकांपर्यंत बालविवाह निर्मूलनाच्या संदेश पोहचणार आहे.


या कार्यक्रमाची सुरूवात नांदेड येथून झाली असून जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर- घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी जिल्ह्यातील महिला व स्वयंसेवक यांना प्रशिक्षण करून त्यांच्या मार्फत मोफत कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.

याबाबत नांदेड येथे 30 व 31 जुलै   रोजी दोन दिवशीय प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा महिला बालविकास अधिकारी मिलिंद वाघमारे, गजानन जिंदमवाड, एसबीसी 3 मुंबईच्या संस्थापक सीमा कोनाळे, स्मिता फुलझेले, प्रकल्प समन्वयक दिना सायमूल यांच्या मार्गदर्शनात सदर कार्यक्रम नांदेड, हिंगोली, परभणी, व जिल्ह्यातील 94 महिला व स्वयंसेविका व सामाजिक संस्थेचे पर्यवेक्षक यांच्या सहभागाने राबविण्यात येत आहे.

0000

Sunday, July 31, 2022

 नांदेड जिल्ह्यात 12 व्यक्ती कोरोना बाधित

तर कोरोना बाधित झाले बरे 

 

नांदेड (जिमाका) दि. 31 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 141 अहवालापैकी 12 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 12 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 3 हजार 176 एवढी झाली असून यातील 1 लाख 409 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 76 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 4, अर्धापूर 1, बिलोली 1, देगलूर 2, हदगाव 1, कंधार 1, लोहा 1, उमरी 1 असे एकुण 12 कोरोना बाधित आढळले आहे. 

 

आज जिल्ह्यात नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 4नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 1, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 1 असे एकुण 6 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. 

 

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 2, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 59,  नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 15 असे एकुण 76 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

0000

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त

पर्यावरणासाठी धर्मापुरीकर यांची अनोखी जागृती  

 

नांदेड (जिमाका) दि. 31 :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शासकीय, स्वायत्तता संस्था, सेवाभावी संस्था यांच्या समवेत अनेक जागरूक नागरिकही आपल्या अभिनव उपक्रमातून योगदान देत आहेत. यात व्यंगचित्राचे संग्राहक व अभ्यासक मधुकर धर्मापूरीकर यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. पर्यावरण विषयावर मोलाचा व मर्मभेदी संदेश देणाऱ्या जागतिक पातळीवरील व्यंगचित्रांचा संग्रह त्यांनी केला आहे. यातून निवडक व्यंगचित्रांना घेऊन सांभाळू या सृष्टीला या शिर्षकाखाली एक अभिनव प्रदर्शन त्यांनी नांदेडकरांच्या भेटीला दिले.

 

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका व वृक्षमित्र फाउंडेशन यांच्यावतीने नांदेड शहरात पर्यावरण संतुलनाबाबत सुरू असलेल्या विविध उपक्रमांना धरुन आज पर्यावरण महोत्सव साजरा करण्यात आला. या महोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी हे अभिनव प्रदर्शन डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह परिसरात आयोजित केले होते. याला नांदेडकरांनी भरभरून प्रतिसाद दिला.


एक नागरिक म्हणून प्रत्येकाच्या मनात देशाप्रती स्वाभीमान असतोच. या स्वाभिमानाला आपण ज्या भवतालात राहतो, त्या भवतालाला, पर्यावरणाला सावरून धरण्यासाठी आपल्याकडून प्रत्यक्ष कृतीचीही जोड आवश्यक असते. कोणत्याही माणसाला कृती पर्यंत पोहचविण्यासाठी खूप प्रोत्साहन द्यावे लागते. त्याच्या मनात जागृतीही करावी लागते. पर्यावरणाच्या बाबतीत जागतिक पातळीवर अतिशय सुंदर भाष्य करणारी अनेक व्यंगचित्र आहेत. त्याद्वारे पर्यावरणाच्या जागृतीचा एक विचार पोहचविण्याचा हा माझा प्रयत्न असल्याच्या भावना मधुकर धर्मापुरीकर यांनी बोलून दाखविल्या. हे प्रदर्शन हौसेपोटी जरी असले तरी ते स्वयंस्फूर्त व आपल्याकडून काही योगदान देता येईल का त्या विचारातून साकारल्याचेही त्यांनी सांगितले. एक दिवसीय असलेल्या या प्रदर्शनाला नांदेडकरांनी उत्स्फूर्त हजेरी दिली.

00000 








 



वृत्त क्रमांक   नांदेड तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण   22 सप्टेंबर रोजी जाहीर होणार नांदेड(जिमाका), दि. 19: नांदेड तालुक्...