Thursday, June 13, 2019

जातप्रमाणपत्र, नॉनक्रिमीलीअर प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने



नांदेड, दि. 13 :- नांदेड तहसिल कार्यालयाकडून निर्गमीत होणारे जात प्रमाणपत्र व नॉनक्रिमीलीअर प्रमाणपत्र शनिवार 15 जून 2019 पासून ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. त्यामुळे सेतू सुविधा चालकांनी जात प्रमाणपत्र व नॉनक्रिमीलीअर ऑफलाईन प्रमाणपत्र घेऊ नये. या ऑनलाईन सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसिलदार किरण अंबेकर यांनी केले आहे.
0000

योगा दिन सर्व तालुक्यांमध्ये साजरा होणार -- विनोद तावडे



मुंबई, दि. 13 : गेल्या चार वर्षांपासून 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी हा दिवस राज्यातील सर्व 288 तालुक्यांमधील तालुका क्रीडा संकुलामध्ये साजरा करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यांमध्ये किमान 5 हजार विद्यार्थी सहभागी होणार असल्याचे शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
आज सिडनहॅम महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनासंदर्भात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
श्री. तावडे म्हणाले, या वर्षीचा पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिन राज्यातील सर्व 36 जिल्ह्यातील 288 तालुक्यांमध्ये साजरा करण्यात येणार आहे. या योग दिनामध्ये प्रत्येक तालुक्यातील किमान 5 हजार विद्यार्थी (शाळा/महाविद्यालये/एनएसएस/एनसीसी/स्काऊट गाईड) असे जवळपास 15 लाख विदयार्थी सहभागी होणार आहेत. केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयामार्फत देण्यात आलेला योगबाबतचा प्रोटोकॉल यावेळी विदयार्थी करणार आहेत. राज्यातील योग शिकविणाऱ्या संस्थांच्या मार्गदर्शनाखाली योग दिन साजरा होणार आहे.21 जून रोजी साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे.याशिवाय 21 जून रोजी नांदेड येथे रामदेवबाबा यांच्यामार्फत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 1.50 लाख नागरिक सहभागी होणार आहेत.
ज्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे उदाहरणार्थ मुंबई, कोकण किंवा पुणे अशा ठिकाणी पाऊस पडल्यास विद्यार्थ्यांना योग कुठे करता येईल, याबाबतही तयारी करण्यात येणार आहे. आयुष मंत्रालयामार्फत योगासाठी सकाळी 7 ते 8 ही वेळ देण्यात आली असल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षितता याला सुध्दा प्राधान्य देण्यात आल्याचे श्री. तावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
००००

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नांदेडमध्ये राज्यस्तरीय कार्यक्रम



मुख्यमंत्री फडणवीस राहणार उपस्थित
मुंबई, दि. 13 : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त यावर्षी नांदेडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून योगसत्राचे संचालन योगऋषी स्वामी रामदेव बाबा करणार आहेत.
स्वस्थ महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमास पतंजली योगपीठाचे सहकार्य मिळणार आहे. एक लाखापेक्षा अधिक लोकांना एकाचवेळी योगासने करता येतील अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. यानिमित्ताने शिक्षण, क्रीडा, युवक कल्याण आणि वैद्यकीय क्षेत्रात योगाचे महत्त्व आणि त्याचा अवलंब याबाबत धोरण ठरविण्याबाबत शासन विचाराधीन असून छत्तीसगढ आणि हरियाणा राज्यांनी निर्माण केलेल्या योग आयोगाचाही अभ्यास करण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे संयुक्त राष्ट्र संघाने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस घोषित केला असून जगभरातील 177 देश हा दिवस उत्साहाने साजरा करीत आहेत. योगाला आता वैद्यकीय चिकित्सा व जीवनपद्धतीच्या स्वरुपात जगभरातील लोक स्वीकारत आहेत.
-----000-----

Wednesday, June 12, 2019

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त
नांदेडमध्ये राज्यस्तरीय कार्यक्रम
मुख्यमंत्री फडणवीस राहणार उपस्थित
मुंबईदि. 11 : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त यावर्षी नांदेडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून योगसत्राचे संचालन योगऋषी स्वामी रामदेव बाबा करणार आहेत.
स्वस्थ महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमास पतंजली योगपीठाचे सहकार्य मिळणार आहे. एक लाखापेक्षा अधिक लोकांना एकाचवेळी योगासने करता येतील अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. यानिमित्ताने शिक्षणक्रीडायुवक कल्याण आणि वैद्यकीय क्षेत्रात योगाचे महत्त्व आणि त्याचा अवलंब याबाबत धोरण ठरविण्याबाबत शासन विचाराधीन असून छत्तीसगढ आणि हरियाणा राज्यांनी निर्माण केलेल्या योग आयोगाचाही अभ्यास करण्यात येणार आहे.
            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे संयुक्त राष्ट्र संघाने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस घोषित केला असून जगभरातील 177 देश हा दिवस उत्साहाने साजरा करीत आहेत. योगाला आता वैद्यकीय चिकित्सा व जीवनपद्धतीच्या स्वरुपात जगभरातील लोक स्वीकारत आहेत.
-----000-----

Monday, June 10, 2019


जिल्हाधिकारी कार्यालयात
          आज पेन्शन अदालत
नांदेड, दि. 10 :- जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार 11 जून 2019 रोजी पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे.   
जिल्ह्या महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अडचणी निवारण्यासाठी मंगळवार 11 जून 2019 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत उपस्थित राहून तक्रारीचे निवेदने दयावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.  
0000


Friday, June 7, 2019


जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 
नांदेड, दि. 7 :- जिल्ह्यात 23 जून 2019 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 9 जून 2019 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 23 जून 2019 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
00000


शासकीय तंत्रनिकेतच्यावतीने
मुख्याध्यापकांचा मेळावा संपन्न
नांदेड दि.7 :- तंत्रशिक्षण संचालनालय, शासकीय तंत्रनिकेतन, नांदेड शिक्षण विभाग नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यध्यापकांचा जिल्हास्तरीय मेळावा आज कुसूम सभागृहात पार पडला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी बी. आर. कुंडगीर (माध्यमिक), उपशिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे, उपशिक्षणाधिकारी गिरीष आळंदे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. जी. व्ही. गर्जे हे होते.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. जी. व्ही. गर्जे यांनी जागतिक स्तरावर आजही अभियांत्रिकी क्षेत्रातच रोजगार जास्‍त प्रमाणात उपलब्ध असल्याचे प्रतिपादन केले . तसेच विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून अभियांत्रिकी पदविका शिक्षण महागडे नसल्याचे सांगितले.
शिक्षणाधिकारी श्री. कुंडगीर यांनी उपस्थित मुख्याध्यापकांना दहावीनंतर तंत्रनिकेतन प्रवेशाची माहिती घेवून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना याबाबत मार्गदर्शन करण्याच्या सुचना दिल्या. शाळा लवकरच सुरु होणार असून त्याबाबतचे नियोजन करण्याबाबत त्यांनी उपस्थित मुख्याध्यापकांना सांगितले. दहावीनंतर पदविका प्रवेशाबाबत ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे सादरीकरण समन्वयक प्रा. ए. बी. दमकोंडवार व डॉ. एस. एस. चौधरी यांनी केले.
प्रवेशाच्या अनुषंगिक माहिती उपप्राचार्य पी. डी. पोपळे यांनी दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. ए. ए. जोशी यांनी व प्रास्ताविक विभाग प्रमुख आर. एम. सकळकळे यांनी तर आभार प्रदर्शन विभाग प्रमुख एस. एम. कंधारे यांनी केले . कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मेहन केली. यावेळी जिल्हाभरातून चारशेहून जास्तीत जास्त मुख्याध्यापक उपस्थित होते.
00000

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...