Wednesday, December 5, 2018


विद्यार्थ्यानी सकारात्म विचाराने परीक्षेला सामोरे जावे
- डि.वाय.एस.पी अश्विनी शेडगे
      
 नांदेड, दि. 5 :- स्पर्धा परीक्षेला सामोरे जातांना विद्यार्थ्यांनी सातत्य नियोजनपूर्वक अभ्यास  केल्यास यश हमखास मिळते, पण यासाठी स्वत:ला झोकू देऊन परीक्षेची तयारी करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन डि.वाय.एस.पी अश्विनी शेडगे  यांनी केले. त्या जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजीत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होत्या.
या शिबीराला संतोष ट्टमवार, कैलास तिडके  जिल्हा ग्रंथालय धिकारी आशिष ढोक यांची उपस्थिती होती. श्री. ट्टमवार यांनी गणित बुध्दीमता या विषयावर अभ्यासपुर्ण  असे मार्गदर्शन केले. तसेच महिला बालविकास अधिकारी श्री. तिडके यांनी या महिन्यात होणाऱ्या महिला बालविकास अधिकारी  परीक्षेबाबत मार्गदर्शन केले. प्रास्ताविक व्याखात्यांचा परिचय जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. ढोक यांनी करुन दिला. सुत्रसंचालन आभार मुक्तिराम शेळके यांनी मानले. शिबिराचे यशस्वी आयोजनासाठी आरती कोकुलवार, बाळू पावडे, रघुव, संजय कर्वे, कोडिंबा गाडेवाड यांनी सहाय्य केले.

Tuesday, December 4, 2018


कापूस, तूर पिकाचा कृषि संदेश 
            नांदेड, दि. 4 :- नांदेड जिल्हयात  काप, तुर पिकासाठी किड रोग सर्वेक्षण या प्रकल्पाअंतर्गत काम सुरु आहे. शेतकऱ्यां पुढील प्रमाणे किडी पासुन संरक्षणासाठी कृषि संदेश देण्यात आला आहे.
कापूस पिकावर कामगंध सापळयातील लुर बदलावे आणि सायपरमेथ्रीन 3 टक्के प्लस इंडोक्झाकार्ब 10 टक्के एस. सी 5 मिली प्रति 10 पाण्यात फवारावे.
 तुर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीसाठी प्रति हेक्टरी 5 कामगंध सापळे लावावेत. तसेच इमामेक्टीन बेंझोएट 5 एस.जी 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारावे. गुंडाळलेली पाने अळीसहीत ष्ट करावीत, असे आवाहन उप विभागीय कृषि अधिकारी आर. टी. सुखदेव यांनी केले आहे.
000000


नांदेड जिल्हयात शनिवारी  
राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन
नांदेड, दि. 4 :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड शनिवार 8 डिसेंबर 2018 रोजी जिल्हा न्यायालय नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय सहकार न्यायालय नांदेड येथे राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे.
            या राष्ट्रीय लोकन्यायालयात आज पर्यंत न्यायालयात प्रलंबित प्रकरणांपैकी एकुण 2 हजार 234 प्रकरणे त्यात 749 दिवाणी 1 हजार 485 फौजदारी प्रकरणे तडजोडीने मिटविण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. त्यात दिवाणी प्रकरण, मो. . दावा प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे तसेच इतर दिवाणी प्रकरणे, बॅंक कर्ज वसुली प्रकरण इत्यादी प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर फौजदारी प्रकरणेही जी तडजोड पात्र आहेत अशी प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत.
            याशिवाय, या लोकअदालतीत विद्युत कंपनी, विविध बॅंका, भारत संचार निगम यांचे थकीत बाकी येणे बाबतची दाखल र्व प्रकरणे तसेच, विविध मोबाईल कंपन्यांची ही थक रकमेबाबतची प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार अस आतापर्यंत 4 हजार 667 दाखल पूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आलेली आहेत.
            या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जिल्हा सरकारी वकिल  संजय लाठकर तसेच जिल्हयातील सर्व सन्माननीय विधीज्ञ आणि विविध विमा कंपनीचे अधिकारी, भूसंपादन अधिकारी, मनपा, महसुल विभागाचे अधिकारी यांचा सहभाग राहणार आहे. या लोकअदालतीत मोठया संख्यने प्रकरणात तडजोड होण्यासाठी सर्वांना सहकार्य करावे. संबंधित पक्षकारांनी यासंबंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन नांदेडचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. जी. मेहरे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव न्यायाधीश डी. टी. वसावे यांनी केले अस सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
000000

वृत्त क्रमांक   भरती परीक्षा सुधारणांवर उच्चस्तरीय समितीशी संवाद !   विद्यार्थी , उमेदवार व संबंधित घटकांनी उपस्थित राहावे   नांदेड, दि. 19 ...