Thursday, April 8, 2021

1 हजार 227 कोरोना बाधित बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी नांदेड जिल्ह्यात 1 हजार 450 व्यक्ती कोरोना बाधित 26 जणांचा मागील तीन दिवसांत मृत्यू कोरोनाबाबत जनजागृतीसाठी जागरुक नागरिकांना योगदान देण्याचे आवाहन

 

1 हजार 227 कोरोना बाधित बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी  

नांदेड जिल्ह्यात 1 हजार 450 व्यक्ती कोरोना बाधित

 26 जणांचा मागील तीन दिवसांत मृत्यू

कोरोनाबाबत जनजागृतीसाठी जागरुक नागरिकांना योगदान देण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 7 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 5 हजार 263 अहवालापैकी 1 हजार 450 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 686 तर अँटिजेन तपासणीद्वारे 764 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 52 हजार 342 एवढी झाली असून यातील 40 हजार 118 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 10 हजार 979 रुग्ण उपचार घेत असून 189 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

दिनांक 4 ते 7 एप्रिल या चार दिवसांच्या कालावधीत 26 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 996 एवढी झाली आहे.   दिनांक 4 एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे भोसी येथील 41 वर्षाचा पुरुष, एस.पी. ऑफिस परिसर नांदेड येथील 55 वर्षाची महिला, तथागत नगर येथील 65 वर्षाची महिला, पांडूरंग नगर येथील 52 वर्षाची महिला, मुखेड कोविड रुग्णालय येथे वरवंट ता. कंधार येथील 59 वर्षाचा पुरुष, दिनांक 5 एप्रिल रोजी  तिरुमला कोविड रुग्णालय येथील सोमेश कॉलनी येथील 78 वर्षाची महिला, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे पांगरगाव ता. मुदखेड येथील 55 वषाची महिला, गाडीपुरा येथील 55 वर्षाची महिला, हडको नांदेड येथील 75 वर्षाची महिला, तथागत नगर येथील 70 वर्षाचा पुरुष, बळीरामपूर येथील 60 वर्षाचा पुरुष, लहानगाव ता. अर्धापूर येथील 45 वर्षाचा पुरुष, कोळंबी ता. नायगाव येथील 61 वर्षाचा पुरुष, दिनांक 6 एप्रिल रोजी शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय येथे सिडको येथील 72 वर्षाचा पुरुष, आनंद नगर नांदेड येथील 77 वर्षाचा पुरुष, दिनांक 7 एप्रिल रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे तरोडा नांदेड 74 वर्षाचा पुरुष, 50 वर्षाची महिला, श्रीनगर नांदेड येथील 73 वर्षाचा पुरुष, ख्वाजा नांदेड येथील 60 वर्षाची महिला, कालगल्ली येथील 71 वर्षाचा पुरुष, मरळक येथील 61 वर्षाचा पुरुष, हदगाव कोविड रुग्णालय येथे कामरी ता. हिमायतनगर येथील 70 वर्षाची महिला, पारवा ता. हदगाव येथील 62 वर्षाची महिला, जुना सराफा देगलूर येथील 84 वर्षाची महिला, तिरुमला कोविड रुग्णालय येथे पुयनी येथील 70 वर्षाचा पुरुष यांचा समावेश असून असे एकूण 26 रुग्ण उपचारादरम्यान मृत पावले.

 

आज रोजी 1 हजार 227 बाधितांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी 6, मनपा अंतर्गत एन.आर.आय. भवन व गृह विलगीकरण 822, कंधार तालुक्याअंतर्गत 6, किनवट कोविड रुग्णालय 19, हिमायतनगर तालुक्याअंतर्गत 3, अर्धापूर तालुक्याअंतर्गत 23, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 20, उमरी तालुक्यातंर्गत 34, नायगाव तालुक्याअंतर्गत   11, मुखेड कोविड रुग्णालय 45, देगलूर तालुक्याअंतर्गत   30, खाजगी रुग्णालय 114, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 4, हदगाव कोविड रुग्णालय 19, माहूर तालुक्याअंतर्गत  8, बिलोली तालुक्याअंतर्गत  32, लोहा तालुक्याअंतर्गत  31 असे एकूण 1 हजार 227 बाधितांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76.64 टक्के आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 289, बिलोली 6, हिमायतनगर 45, मुदखेड 8, परभणी 4, नांदेड ग्रामीण 31, देगलूर 43, कंधार 1, मुखेड 50, यवतमाळ 2, अर्धापूर 16, धर्माबाद 16, किनवट 17, नायगाव 39, हिंगोली 7, भोकर 10, हदगाव 51, लोहा 26, उमरी 24, बिदर 1 असे  एकूण 686 बाधित आढळले.

 

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 323, नांदेड ग्रामीण 28, अर्धापूर 29, भोकर 28, बिलोली 31, देगूलर 19, धर्माबाद 11, हदगाव 18, हिमायतनगर 3, कंधार 11, किनवट 83 , लोहा 42, माहूर 15, मुदखेड 27, मुखेड 12, नायगाव 37, उमरी 34, परभणी 8, यवतमाळ 9, हिंगाली 2, औरंगाबाद 1, पुणे 1 असे एकूण 764 व्यक्ती अँन्टिजेन तपासणीद्वारे बाधित आले आहेत.

 

जिल्ह्यात 10 हजार 979 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 244, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 112, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 199, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 146, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 123, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 209, देगलूर कोविड रुग्णालय 56, जैनब हॉस्पिटल कोविड केअर सेंटर 82, बिलोली कोविड केअर सेंटर 277, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 14, नायगाव कोविड केअर सेंटर 139, उमरी कोविड केअर सेंटर 44, माहूर कोविड केअर सेंटर 21, भोकर कोविड केअर सेंटर 25, हदगाव कोविड रुग्णालय 32, हदगाव कोविड केअर सेंटर 69, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 103, कंधार कोविड केअर सेंटर 14, धर्माबाद कोविड केअर सेंटर 80, मुदखेड कोविड केअर सेंटर 11, अर्धापूर कोविड केअर सेंटर 47, बारड कोविड केअर सेंटर 40, मांडवी कोविड केअर सेंटर 7, महसूल कोविड केअर सेंटर 112, एनआरआय कोविड केअर सेंटर 140, पंजाब भवन कोविड केअर सेंटर 152, नांदेड मनपाअंतर्गत गृहविलगीकरण 4 हजार 423, नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 2 हजार 506, खाजगी रुग्णालय 1 हजार 552 असे एकूण 10 हजार 979 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

आज रोजी सांयकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 10, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 7, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 6 खाटा उपलब्ध आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 3 लाख 55 हजार 194

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 95 हजार 750

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 52 हजार 342

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 40 हजार 118

एकुण मृत्यू संख्या-996

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76.64 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-7

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-47

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-365

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-10 हजार 979

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-189.

00000

कार्यालये, संस्था व इतर आस्थापनेत महिला संरक्षणासाठी तक्रार निवारण समिती गठीत करणे अनिवार्य

 

                                  कार्यालये, संस्था व इतर आस्थापनेत महिला संरक्षणासाठी

 तक्रार निवारण समिती गठीत करणे अनिवार्य

नांदेड (जिमाका) दि. 8 :- ज्या आस्थापनेवर 10 किंवा त्यापेक्षा जास्त अधिकारी-कर्मचारी असतील अशा कार्यालयीन किंवा कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळापासून संरक्षणासाठी स्वंतत्र अधिनियम करण्यात आलेला आहे. महिलाचे संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 नुसार प्रत्येक कार्यालयीन/कामाच्या ठिकाणी तक्रार निवारण समिती गठीत करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यानुसार शासकीय /निमशासकीय, खाजगी कार्यालय, संघटना, शासन अनुदानित संस्था, महामंडळे, आस्थापना, संस्था, शाखा अशा कार्यालयासह खाजगी क्षेत्र, संघटना  आणि इतर निर्देशित केलेल्या संस्थामध्ये अशी तक्रार निवारण समिती गठीत करणे अनिवार्य आहे.

इतर संस्थामध्ये खाजगी उपक्रम, इंटरप्रायजेस, अशासकीय संघटना, सोसायटी, ट्रस्ट, उत्पादक, पुरवठादार संस्था, वितरण व विक्री यासह वाणिज्य, व्यावसायिक संस्था, शैक्षणिक संस्था, करमणूक केंद्र, औद्योगिक संस्था, आरोग्य संस्था, रुग्णालये, सुश्रुषालये, क्रीडा संस्था, प्रेक्षकागृहे, क्रीडा संकुल, वित्तीय कामकाज पार पाडणाऱ्या संस्था किंवा सेवा पुरवठादार व इतर कामाच्या ठिकाणी तक्रार निवारण समिती गठीत करण्यात यावी.

यापुर्वी समिती गठीत केलेली असेल, तर ती अद्यावत, पुनर्गठीत (बदलीने इतर ठिकाणी गेलेल्या, आलेल्या अधिकारी, कर्मचारी) यांच्या नावाचा त्यामध्ये उल्लेख करुन सदर समिती पदाधिकाऱ्याची नावे, संपर्क क्रमांकासह अहवाल पाठविण्यात यावा, असेही आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व मा. जिल्हाधिकारी,  कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त ई-मेल आयडी- iccdwcdned@gmail.com वर दि. 10 एप्रिल पर्यत पाठविण्यात यावी असे आवाहन महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती आर. पी. काळम यांनी केले आहे.

0000

महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त (पुर्व) परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

 

महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त (पुर्व) परीक्षा केंद्र

परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

नांदेड (जिमाका) दि. 8 :- महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा-2021 परीक्षा रविवार 11 एप्रिल 2021 रोजी नांदेड जिल्ह्यातील 66 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याचे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कळवले आहे. 

नांदेड जिल्ह्यातील विविध 66 विद्यालय, महाविद्यालयातील केंद्रावर सकाळी  11 ते दुपारी 12  या कालावधीत परीक्षा होणार असून त्यासाठी  18 हजार 816 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. परीक्षेचे कामकाज सुरळीत व शांततेत पार पडावे यासाठी परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरातील फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 च्या कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार परीक्षेच्या दिवशी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधित असलेले अधिकारी, कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच यावेळेत केंद्राच्या परिसरातील  100  मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे, असे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी आदेशात नमूद केले आहे.

00000

जालना-नांदेड समृद्धी जोडमहामार्गाचा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी घेतला आढावा

जालना-नांदेड समृद्धी जोडमहामार्गाचा

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी घेतला आढावा

 


मुंबई, दि. ८ : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या जालना-नांदेड या नियोजित महामार्गाच्या प्रगतीचा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज विस्तृत आढावा घेतला.

 

येथील सह्याद्री शासकीय
अतिथीगृहात
  झालेल्या आढावा बैठकीला श्री. चव्हाण यांच्यासह महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, सहव्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) उल्हास देबडवार, महामंडळाचे महाव्यवस्थापक (जमीन) डॉ. भारत बास्टेवाड आदी प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

 

मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीच्या १४ जानेवारी २०२१ रोजी झालेल्या बैठकीत या प्रकल्पाची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून समृद्धी महामार्ग उभारणाऱ्या महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळाकडे जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच या प्रकल्पासाठी सर्वेक्षण, तांत्रिक, अभियांत्रिकी व वित्तीय सुसाध्यता अहवाल आणि सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी मान्यता देण्यात आली होती. ही कामे सध्या प्रगतीपथावर असून, आजच्या आढावा बैठकीत यासंदर्भात अशोक चव्हाण यांना विस्तृत माहिती देण्यात आली.

 

या महामार्गासाठी सुमारे २ हजार हेक्टर इतके भूसंपादन करावे लागणार आहे. भूसंपादन व प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी तांत्रिक सल्लागार नियुक्त करण्याबाबतची निविदा कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी या बैठकीत सांगितले. या महामार्गासाठी पर्यावरण विभागाची मान्यताही घ्यावी लागणार आहे.

 

सुमारे १७८ किलोमीटर लांबीच्या या महामार्गासाठी सुमारे १२ हजार कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. नांदेड-औरंगाबादमधील प्रवासासाठी सध्या पाच ते सहा तासांचा कालावधी लागतो. हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर हे अंतर अवघ्या अडीच ते तीन तासात पूर्ण करणे शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे नांदेडसह परभणी व हिंगोली जिल्ह्याला मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाशी थेट द्रुतगती संपर्क मिळणार आहे. या तीनही जिल्ह्यातून मुंबई व औरंगाबाद येथे जाण्यासाठी कमी वेळ लागणार असून, त्यामुळे शेतकरी, व्यापारी, उद्योजक, प्रवासी अशा सर्वच घटकांना त्याचा लाभ होईल.

 

0000


Wednesday, April 7, 2021

नांदेड जिल्ह्यात 1 हजार 255 व्यक्ती कोरोना बाधित 26 जणांचा मृत्यू जनसहयोगातून आरोग्य जागराच्या मोहिमेत सहभाग घ्या

नांदेड जिल्ह्यात 1 हजार 255 व्यक्ती कोरोना बाधित

26 जणांचा मृत्यू

जनसहयोगातून आरोग्य जागराच्या मोहिमेत सहभाग घ्या

नांदेड (जिमाका) दि. 7 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 4 हजार 534 अहवालापैकी 1 हजार 255 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 506 तर अँटिजेन तपासणीद्वारे 749 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 50 हजार 892 एवढी झाली असून यातील 38 हजार 891 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 10 हजार 783 रुग्ण उपचार घेत असून 189 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

दिनांक 3 ते 6 एप्रिल या चार दिवसांच्या कालावधीत 26 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 970 एवढी झाली आहे.   दिनांक 3 एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे अर्धापूर तालुक्यातील चांभरा येथील 65 वर्षाचा पुरुष, वात्सल्य नगर नांदेड येथील 46 वर्षाचा पुरुष, जुना मोंढा नांदेड येथील 62 वर्षाचा पुरुष, शिवाजी नगर नांदेड येथील 93 वर्षाचा पुरुष, दिनांक 4 एप्रिल रोजी चैतन्य नगर नांदेड येथील 65 वर्षाची महिला, अर्धापूर तालुक्यातील चांभरा येथील 75 वर्षाचा पुरुष, नांदेड येथील 70 वर्षाची महिला, किनवट तालुक्यातील इसलापूर येथील 65 वर्षाची महिला, चौफाळा नांदेड येथील 58 वर्षाची महिला, सिडको नांदेड येथील 42 वर्षाचा पुरुष, चैतन्य नगर नांदेड 75 वर्षाची माहिला, दिनांक 5 एप्रिल रोजी  शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड तालुक्यातील निळा येथील 70 वर्षाचा पुरुष, जुना मोंढा नांदेड येथील 60 वर्षाची महिला, देगलूर कोविड रुग्णालय देगलूर तालुक्यातील टाकळीझरी येथील 60 वर्षाचा पुरुष, नायगाव तालुक्यातील शेळगाव येथील 50 वर्षाची महिला, भगवती कोविड रुग्णालय वजिराबाद नांदेड येथील 32 वर्षाचा पुरुष, तरोडा बु. नांदेड येथील 40 वर्षाचा पुरुष, तिरुमला कोविड रुग्णालय नांदेड येथील 70 वर्षाची महिला, दिनांक 6 एप्रिल रोजी हदगाव कोविड रुग्णालय हदगाव येथील आझाद चौक येथील 57 वर्षाचा पुरुष, भक्ती कोविड रुग्णालय कल्याण नगर येथील 52 वर्षाचा पुरुष, गोदावरी कोविड रुग्णालय फरांदे नगर नांदेड येथील 72 वर्षाचा पुरुष, लोट्स कोविड रुग्णालय सुमेध नगर नांदेड येथील 68 वर्षाचा पुरुष, आश्विनी कोविड रुग्णालय विष्णुपूरी नांदेड येथील 73 वर्षाचा पुरुष, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथील गोकुळ नगर देगलूर येथील 52 वर्षाचा पुरुष, धर्माबाद येथील 43 वर्ष पुरुष, देगलूर येथील 76 वर्षाचा पुरुष असे एकूण 26 रुग्ण उपचारादरम्यान मृत पावले.

 

आज रोजी 1 हजार 142 बाधितांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी 15, मनपा अंतर्गत एन.आर.आय. भवन व गृह विलगीकरण 772, कंधार तालुक्याअंतर्गत 2, किनवट कोविड रुग्णालय 17, हिमायतनगर तालुक्याअंतर्गत 9, भोकर तालुक्याअंतर्गत 49, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 18, उमरी तालुक्यातंर्गत 21, नायगाव तालुक्याअंतर्गत   29 , मुखेड कोविड रुग्णालय 7, देगलूर तालुक्याअंतर्गत   7 , अर्धापूर तालुक्याअंतर्गत  12, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 12, हदगाव कोविड रुग्णालय 6, माहूर तालुक्याअंतर्गत   11, धर्माबाद तालुक्याअंतर्गत  11, लोहा तालुक्याअंतर्गत  28, खाजगी रुग्णालय 116 असे एकूण 1 हजार 142 बाधितांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76.41 टक्के आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 238, देगलूर 19, कंधार 36, मुदखेड 2, हिंगोली 3, नांदेड ग्रामीण 13, धर्माबाद 18, किनवट 9, मुखेड 32, यवतमाळ 1, अर्धापूर 9, हदगाव 60, लोहा 1, नायगाव 30, भोकर 20, हिमायतनगर 13, माहूर 1, परभणी 1 असे एकूण 506 बाधित आढळले.

 

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 268, बिलोली 21, हिमायतनगर 18, मुदखेड 6, कंधार 48, नांदेड ग्रामीण 30, देगलूर 39, किनवट 101, मुखेड 52, नायगाव 20, अर्धापूर 30 , धर्माबाद 13, लोहा 19, उमरी 26, हिंगोली 1, भोकर 23, हदगाव 26, माहूर 4, परभणी 3, यवतमाळ 1 असे एकूण 749 व्यक्ती अँन्टिजेन तपासणीद्वारे बाधित आले आहेत.

 

जिल्ह्यात 10 हजार 783 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 234, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 108, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 195, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 125, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 132, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 186, देगलूर कोविड रुग्णालय 52, जैनब हॉस्पिटल कोविड केअर सेंटर 106, बिलोली कोविड केअर सेंटर 259, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 17, नायगाव कोविड केअर सेंटर 96, उमरी कोविड केअर सेंटर 32, माहूर कोविड केअर सेंटर 20, भोकर कोविड केअर सेंटर 24, हदगाव कोविड रुग्णालय 45, हदगाव कोविड केअर सेंटर 52, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 116, कंधार कोविड केअर सेंटर 20, धर्माबाद कोविड केअर सेंटर 72, मुदखेड कोविड केअर सेंटर 11, अर्धापूर कोविड केअर सेंटर 26, बारड कोविड केअर सेंटर 40, मांडवी कोविड केअर सेंटर 8, महसूल कोविड केअर सेंटर 119, एनआरआय कोविड केअर सेंटर 200, पंजाब भवन कोविड केअर सेंटर 152, नांदेड मनपाअंतर्गत गृहविलगीकरण 4 हजार 660, नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 2 हजार 136, खाजगी रुग्णालय 1 हजार 540 असे एकूण 10 हजार 783 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

आज रोजी सांयकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 10, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 7, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 6 खाटा उपलब्ध आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 3 लाख 49 हजार 593

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 91 हजार 624

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 50 हजार 892

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 38 हजार 891

एकुण मृत्यू संख्या-970

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76.41 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-7

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-58

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-384

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-10 हजार 783

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-189.

00000

 


अत्यावश्यक सेवांमध्ये चिकण मटण अंडी व मासे दुकानांचा अंतर्भाव

                            अत्यावश्यक सेवांमध्ये चिकण मटण अंडी व मासे दुकानांचा अंतर्भाव

 

नांदेड, (जिमाका) दि. 7 :- महाराष्ट्र शासनाने कोविड-19 रोगाचा प्रादुर्भाव खंडीत करण्यासाठी (ब्रेक द चेन) अभियानातर्गंत दिलेल्या आदेशामध्ये आणखी काही बाबीचे स्पष्टीकरण करण्यात आले आहे. यात पशुसंवर्धन विभागाशी निगडीत खालील बाबी अंर्तभूत आहेत.

1.       अत्यावश्यक सेवामध्ये दुध व दुग्धजन्य पदार्थ (डेअरी) आणि फुडशॉपचा समावेश करण्यात आला आहे. यात चिकन, कोंबडया, मटण, अंडी, मासे दुकानाचा अंतर्भाव करण्यात आला आहे. जनावरांसाठी आवश्यक असणारे पशु/कुकुट खाद्य, चारा आदिचाही समावेश केला आहे.

2.      हवामान व मान्सून पुर्व उपक्रमाच्या व्यवस्थापनेच्या दृष्टीने पशुसंवर्धन विभागामार्फत दरवर्षी व्यापक प्रमाणात जनावरांचे मान्सून पुर्व लसीकरण केले जाते. या उपक्रमाला अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करण्यात आले आहे.

3.      जनसामान्यांना पुरविण्यात येणाऱ्या सेवामध्ये पशुसंवर्धन विभागाच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयाचा समावेश केला आहे.

4.    माल वाहतूक सेवेमध्ये वाहतूक व पुरवठा शृंखला सुरु ठेवण्यात आली असून यात दुध, दुग्धजन्य पदार्थ, अंडी, मांस, मासे व जनावरांचा चारा या वस्तु व त्यांचेवर प्रक्रीया करण्यासाठी लागणाऱ्या कच्या मालाची वाहतूक व त्यांच्या साठवणुकीसाठी गोदामे चालविणे याबाबींचा अत्यावश्यक सेवेत अंतर्भाव होतो.

5.     सर्व प्रकारचे उत्पादन उद्योग सुरु ठेवण्यात आले आहे. यात अन्न प्रक्रीया , डेअरी, पशुखाद्य व चारा प्रक्रीया, औषध निर्मिती, लस निर्मिंती, वैद्यकीय उपकरणे निर्मिंती तसेच या सर्वांना सहाय्यभूत ठरतील अशा सेवा, त्यांची वाहतूक आणि त्यांचे विक्रेते व त्यांच्या सेवा समाविष्ठ केल्या आहेत.

या सेवा उपलब्ध करीत असताना संबंधितानी शासनाद्वारे तसेच स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या निर्देशाचे काटेकोर पालन करावे असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

00000

 

 


वृत्त क्रमांक मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन नांदेड (जिमाका), दि. 16 :- मराठवाडा मुक...