Wednesday, April 7, 2021

अत्यावश्यक सेवांमध्ये चिकण मटण अंडी व मासे दुकानांचा अंतर्भाव

                            अत्यावश्यक सेवांमध्ये चिकण मटण अंडी व मासे दुकानांचा अंतर्भाव

 

नांदेड, (जिमाका) दि. 7 :- महाराष्ट्र शासनाने कोविड-19 रोगाचा प्रादुर्भाव खंडीत करण्यासाठी (ब्रेक द चेन) अभियानातर्गंत दिलेल्या आदेशामध्ये आणखी काही बाबीचे स्पष्टीकरण करण्यात आले आहे. यात पशुसंवर्धन विभागाशी निगडीत खालील बाबी अंर्तभूत आहेत.

1.       अत्यावश्यक सेवामध्ये दुध व दुग्धजन्य पदार्थ (डेअरी) आणि फुडशॉपचा समावेश करण्यात आला आहे. यात चिकन, कोंबडया, मटण, अंडी, मासे दुकानाचा अंतर्भाव करण्यात आला आहे. जनावरांसाठी आवश्यक असणारे पशु/कुकुट खाद्य, चारा आदिचाही समावेश केला आहे.

2.      हवामान व मान्सून पुर्व उपक्रमाच्या व्यवस्थापनेच्या दृष्टीने पशुसंवर्धन विभागामार्फत दरवर्षी व्यापक प्रमाणात जनावरांचे मान्सून पुर्व लसीकरण केले जाते. या उपक्रमाला अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करण्यात आले आहे.

3.      जनसामान्यांना पुरविण्यात येणाऱ्या सेवामध्ये पशुसंवर्धन विभागाच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयाचा समावेश केला आहे.

4.    माल वाहतूक सेवेमध्ये वाहतूक व पुरवठा शृंखला सुरु ठेवण्यात आली असून यात दुध, दुग्धजन्य पदार्थ, अंडी, मांस, मासे व जनावरांचा चारा या वस्तु व त्यांचेवर प्रक्रीया करण्यासाठी लागणाऱ्या कच्या मालाची वाहतूक व त्यांच्या साठवणुकीसाठी गोदामे चालविणे याबाबींचा अत्यावश्यक सेवेत अंतर्भाव होतो.

5.     सर्व प्रकारचे उत्पादन उद्योग सुरु ठेवण्यात आले आहे. यात अन्न प्रक्रीया , डेअरी, पशुखाद्य व चारा प्रक्रीया, औषध निर्मिती, लस निर्मिंती, वैद्यकीय उपकरणे निर्मिंती तसेच या सर्वांना सहाय्यभूत ठरतील अशा सेवा, त्यांची वाहतूक आणि त्यांचे विक्रेते व त्यांच्या सेवा समाविष्ठ केल्या आहेत.

या सेवा उपलब्ध करीत असताना संबंधितानी शासनाद्वारे तसेच स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या निर्देशाचे काटेकोर पालन करावे असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

00000

 

 


No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...