Monday, October 5, 2020

 

नांदेड कौठा येथे 30 एकरवर

आंतरराष्ट्रीय दर्जाचे अद्यावत क्रीडा संकुल  

-         पालकमंत्री अशोक चव्हाण 

नांदेड (जिमाका) दि. 5 :-जिल्ह्यातून विविध क्रीडा प्रकार, खेळांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडापटू तयार व्हावेत यासाठी त्यांना चांगल्या क्रीडा संकुलाची नितांत आवश्यकता आहे. जिल्ह्यातील क्रीडापटूंना यासाठी आता जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही. युवकांना क्रीडा सुविधांसह चांगले प्रशिक्षकही मिळावेत यासाठी आग्रही भुमिका मांडत नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी कौठा येथे 30 एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे अद्ययावत क्रीडा संकुल उभारण्याबाबत महत्वपूर्ण निर्णय आज जाहिर केला.   

क्रीडा संकुल विकासाबाबत आज नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवनात आयोजित केलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, जिल्हा परिषदेचे कृषि व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब कदम रावणगावकर, अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार उपस्थित होते.  

नांदेड येथे विविध खेळांसाठी एक अद्ययावत असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे जिल्हा क्रीडा संकुल असावे अशी अनेक दिवसांपासून विविध क्रीडा संघटना, खेळाडू, क्रीडाप्रेंमीची मागणी होती. ही मागणी विचारात घेऊन आज पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी निर्णय घेतला. सद्यस्थितीत नांदेड शहरात अद्ययावत क्रिकेटच्या स्टेडिअमचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. या कामाचाही यावेळी आढावा घेण्यात आला. क्रिकेटसमवेत इतर खेळांच्या विविध स्पर्धा व  सरावासाठी स्वतंत्र जिल्हास्तरावरील नवीन स्टेडिअम जिल्ह्यातील ग्रामीण खेळाडूंना नवी दिशा देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

नवीन कौठा येथे तीस एकर जागेमध्ये आता हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल आकार घेईल. यात सिन्थेटिक ॲथलेटिक्स मैदान, स्विमिंगपूल, बॅटमिंटन हॉल, फुटबॉल, हॉकी, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, जिमनॅस्टिकसाठी हॉल, ज्यूदो कराटे, पॉवर लिफ्टींग, बास्केट बॉल, स्केटिंग, आर्चरी, तॉयक्कोंदो, कुस्ती अशा विविध खेळांचे अद्ययावत व प्रमाणित आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान असतील. याचबरोबर क्रीडापटूंच्या अंगी आंतराष्ट्रीय दर्जाचे कसब यावे यादृष्टिने नियमित सराव शिबीर स्पर्धा घेण्यासाठी लागणाऱ्या अत्यावश्यक सेवासुविधांचाही समावेश राहिल.    

नवीन शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील क्रीडा विकासाबाबत आता स्वतंत्र समिती तयार करण्यात आली असून या समितीचे पदसिद्ध अध्यक्षपदी पालकमंत्री अशोक चव्हाण यांची नियुक्ती केली. सदर तीस एकर जागा या नवनिर्मित जिल्हा क्रीडा संकुलासाठी तात्काळ उपलब्ध करुन देण्याबाबत योग्यती प्रक्रिया करण्याचे निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना दिले. यात आवश्यकता भासल्यास मनपाने योग्य ती मदत करण्याबाबत आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनाही सांगितले. जागेची पाहणी करुन नियोजित आराखडा तात्काळ तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. शासकीय क्रीडा संकुल याचे व्यवस्थापन व त्याची निगा घेण्यासाठी व्यावसायिक तत्वावर विचार करण्याशिवाय पर्याय नाही. पुणे, मुंबई येथे विविध खेळांचे क्लब व तेथील व्यवस्थापन लक्षात घेता त्याच धर्तीवर नांदेड येथील हे क्रीडा संकुल राहील असेही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. 

याप्रसंगी स्टेडियम व्यवस्थापक रमेश चवरे, किशोर पाठक, डॉ. मनोज पैजणे, डॉ. आश्विन बोरीकर, प्रलोभ कुलकर्णी, विक्रांत खेडकर, जयपाल रेड्डी, बालाजी जोगदंड, प्रविण कुपटीकर, मंगेश कामतीकर, अलीम खान, इम्रान खान, प्रा. इंम्तियाज खान, रविकुमार बळवाड यावेळी आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या निर्णयाचे स्वागत विविध क्रीडा संघटना, पदाधिकारी, खेळाडू, क्रीडाप्रेमी यांनी केले व तात्काळ पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा सत्कार देखील केला. 

0000



 

सन 2019 चा जीवनरक्षा पदक पुरस्कार

 पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते प्रदान 

नांदेड (जिमाका) दि. 5 :- नायगाव तालुक्यातील मांजरम येथील शिवराज रामचंद्र भंडारवाड यांना सन 2019 चा जीवनरक्षा पदक पुरस्कार घोषित झाला आहे. इयत्ता 10 मध्ये शिकणाऱ्या या बालविराने स्वत:च्या जीवाचा पर्वा न करता जिगरबाज कामगिरीने पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या दोन व्यक्ती व 40 शेळयांचा जीव वाचविण्याचे शौर्य दाखविले आहे. या बालविराला हा पुरस्कार आज डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवनात  पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. 

या पुरस्कार वितरणाच्या वेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.सचिन खल्लाळ, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर.पी. काळम, सहाय्यक लेखा अधिकारी, जी.आर. धुमे, परिविक्षा अधिकारी बी.पी. बडवणे यांची उपस्थिती होती. 

भारत सरकार, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जीवनरक्षा पदक पुरस्कार शिवराज रामचंद्र भंडारवाड यांना घोषित झालेला होता. या पुरस्काराचे स्वरुप सन्मानपत्र, पदक व 1 लाख रुपयाचा धनादेश असे आहे. हा पुरस्कार ज्या मुलांनी शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, नाविण्यपुर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपुर्ण कामगिरी केलेली आहे, त्यांना दिला जातो. त्यांच्या या धाडसाचे कौतुक व्हावे व समाजातील इतर बालकांनाही त्याच्यापासून प्रेरणा मिळावी म्हणून हा पुरस्कार महत्वाचा आहे.

00000




 

शेतकऱ्यांबाबत भेदभाव सहन करणार नाही

-         पालकमंत्री अशोक चव्हाण

 

पिक विमा कंपन्यांच्या चौकशीसाठी

समिती स्थापन करण्याचे दिले निर्देश

         

नांदेड (जिमाका) दि. 5 :- मोठ्या कष्टातून शेतकरी पेरणीसाठी आर्थिक तरतूद करतो. नैसर्गिक आपत्तीचा धोका शेवट पर्यंत असल्याने पीक हाती येईपर्यंत त्याच्या जीवात-जीव नसतो. संभाव्य धोके लक्षात घेऊन मोठ्या मुश्कीलीने तो पीक विम्याची रक्कम उभी करतो. एवढे सारे करुनही केवळ तांत्रिक चुकांपायी शेतकऱ्यांना जर पीक विमा मिळत नसेल तर ही सारी प्रक्रियाच गांभीर्याने तपासून पहावी लागेल, असा संतप्त इशारा सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिला.

 

नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवनात आयोजित केलेल्या पीक विमा, अतिवृष्टी नुकसान आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, जिल्हा परिषदेचे कृषि व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब कदम रावणगावकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

पीक विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई देतांना जवळ-जवळच्या गावातही वातावरण बदलाचे तांत्रिक कारण देत भेदभाव करुन विमा देणे सोयीने टाळल्याच्या अनेक शेतकऱ्यांनी लेखी तक्रारी माझ्याकडे दिल्या आहेत. यात बारड, मुदखेड, वसरणी, आष्टी, हदगाव, लिंबगाव, तरोडा, अर्धापूर, दाभड, निवघा, मुगट आदी गावातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश आहे. सदर तक्रारीमध्ये मी तपास केला असता त्यात तथ्य दिसून येते. अवघ्या दहा किलो मीटरच्या परिघात उष्णता व हवेच्या वेगाचा फरक दाखवून शेतकऱ्यांना विम्याच्या लाभापासून डावले आहे. याचबरोबर काही ठरावीक दिवसांच्या नोंदी जाणीवपूर्वक विमा कंपनीने घेण्याचे टाळले असे गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केले आहेत.

 

शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीशी निगडीत हा एैरणीचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे आम्ही अधिक गंभीर आहोत. जिल्ह्यातील विविध मंडळात असलेल्या या हवामान तपासणी यंत्राची अवस्था, त्यातून नोंदली जाणारी हवामानाची आकडेवारी व केवळ याच्या आधारे पिक विमा कंपन्यांकडून ठरविली जाणारी नुकसान भरपाई व सोईचे अहवाल या साऱ्या व्यवस्थेबाबत असलेल्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी शासन निर्णयाप्रमाणे चौकशी समिती गठीत करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले. या समितीत शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषदेचे कृषि सभापती, सर्व उपविभागीय अधिकारी, गृह पोलीस उपअधिक्षक, विमा प्रतिनिधी यांचा समावेश करण्याबाबत सुचविले. ही समिती येत्या दहा दिवसात मंडळ निहाय वस्तुस्थिती दर्शक अहवाल सादर करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

एकमेकाशेजारी असलेल्या गावात हवामानात दाखविण्यात येत असलेला बदल किती योग्य ठरवणार असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला. बऱ्याच शेजारी असलेल्या गावात हवामानातील बदल दाखवून भेदभाव झाल्याच्या तक्रारीबाबत त्या-त्या गावांच्या एरिअल अंतराबाबतचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार करावा, असेही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी निर्देश दिले.

00000







Sunday, October 4, 2020

 263 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी 122 बाधितांची भर तर सहा जणांचा मृत्यू


नांदेड (जिमाका) दि. 4 :- रविवार 4 ऑक्टोंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 263 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 122 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 23 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 99 बाधित आले.

आजच्या एकुण 874 अहवालापैकी 735 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 16 हजार 321 एवढी झाली असून यातील 12 हजार 808 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 2 हजार 987 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 55 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

या अहवालात एकुण सहा बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. गुरुवार 1 ऑक्टोंबर रोजी पंकजनगर नांदेड येथील 82 वर्षाच्या एका महिलेचा, शनिवार 3 ऑक्टोंबर रोजी शामनगर नांदेड येथील 43 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात तर कंधार तालुक्यातील शिराढोण येथील 60 वर्षाच्या एका पुरुषाचा, लेबर कॉलनी नांदेड येथील 55 वर्षाच्या एका महिलेचा, हदगाव येथील 52 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे तर मुखेड तालुक्यातील वर्ताळा येथील 75 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 426 झाली आहे.

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल नांदेड 13, बिलोली कोविड केअर सेंटर 3, भोकर कोविड केअर सेंटर 6, हदगाव कोविड केअर सेंटर 2, माहूर कोविड केअर सेंटर 1, धर्माबाद कोविड केअर सेंटर 8, मुखेड कोविड केअर सेंटर 30, अर्धापूर कोविड केअर सेंटर 5, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी नांदेड 15, एनआरआय / पंजाब भवन / महसूल भवन / होमआयसोलेशन 129, हिमायतनगर कोविड केअर सेटर 1, खाजगी रुग्णालय 27, कंधार कोविड केअर सेटर 1, किनवट कोविड केअर सेटर 5, लोहा कोविड केअर सेटर 17 असे 263 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 12, किनवट तालुक्यात 1, कंधार 1, धर्माबाद 1, यवतमाळ 2, नांदेड ग्रामीण 3, हदगाव 1, नायगाव 1, हिंगोली 1 असे एकुण 23 बाधित आढळले.

तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 57, मुदखेड तालुक्यात 1, हदगाव 3, कंधार 2, नायगाव 4, धर्माबाद 5, उमरी 1, नागपूर 1, नांदेड ग्रामीण 12, हिमायतनगर 1, माहूर 1, लोहा 2, किनवट 3, परभणी 3, हिंगोली 2, जालना 1 असे एकूण 99 बाधित आढळले.

जिल्ह्यात 2 हजार 987 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 204, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन, होम आयशोलेशन एकत्रित 1 हजार 833, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 60, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवीन इमारत) 37, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 15, नायगाव कोविड केअर सेंटर 57, बिलोली कोविड केअर सेंटर 23, मुखेड कोविड केअर सेंटर 66, देगलूर जैनब रुग्णालय कोविड केअर सेंटर 35, लोहा कोविड केअर सेंटर 26, हदगाव कोविड केअर सेंटर 24, भोकर कोविड केअर सेंटर 22, कंधार कोविड केअर सेंटर 23, मुदखेड कोविड केअर सेटर 18, माहूर कोविड केअर सेंटर येथे 18, किनवट कोविड केअर सेंटर येथे 48, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 54, उमरी कोविड केअर सेंटर 40, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 1, खाजगी रुग्णालयात 322 बाधित, बारड कोविड केअर सेंटर 4, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 49, लातूर येथे संदर्भित 2, औरंगाबाद 2, मुंबई 2, आदिलाबाद येथे 2 संदर्भित झाले आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
एकुण घेतलेले स्वॅब- 86 हजार 529,
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 67 हजार 230,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 16 हजार 321,
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 12 हजार 808,
एकूण मृत्यू संख्या- 426,
उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 81 टक्के,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-7,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-10,
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 436,
आज रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 2 हजार 987,
आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 55.

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
00000

Saturday, October 3, 2020

 

154 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

140 बाधितांची भर तर आठ जणांचा मृत्यू 

नांदेड (जिमाका) दि. 3 :- शनिवार 3 ऑक्टोंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 154 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 140 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 39 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 101 बाधित आले. 

आजच्या एकुण 651 अहवालापैकी 501 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 16 हजार 199 एवढी झाली असून यातील 12 हजार 545 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 3 हजार 135 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 33 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. 

या अहवालात एकुण आठ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. शुक्रवार 2 ऑक्टोंबर रोजी गवळीपुरा नांदेड येथील 27 वर्षाच्या एका महिलेचा, बजरंग नगर नांदेड येथील 68 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात येथे तर भोकर येथील 70 वर्षाच्या एका पुरुषाचा, वसरणी नांदेड येथील 60 वर्षाच्या एका पुरुषाचा तर शनिवार 3 ऑक्टोंबर रोजी नाथनगर नांदेड येथील 83 वर्षाच्या एका महिलेचा, इंदिरानगर नांदेड येथील 65 वर्षाच्या एका पुरुषाचा, हडको नांदेड येथील 70 वर्षाच्या एका पुरुषाचा, सोमेश कॉलनी नांदेड येथील 86 वर्षाच्या एका महिलेचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 420 झाली आहे. 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल नांदेड 14, बिलोली कोविड केअर सेंटर 4, भोकर कोविड केअर सेंटर 18, हदगाव कोविड केअर सेंटर 15, माहूर कोविड केअर सेंटर 1, धर्माबाद कोविड केअर सेंटर 10, मुखेड कोविड केअर सेंअर 17, निजामाबाद येथे संदर्भित 1, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी नांदेड 9, एनआरआय / पंजाब भवन / महसूल भवन / होमआयसोलेशन 47, हिमायतनगर कोविड केअर सेटर 5, खाजगी रुग्णालय 10, अकोला येथे संदर्भित 1, लातूर येथे संदर्भित 1, औरंगाबाद येथे संदर्भित 1 असे 154 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 30, भोकर तालुक्यात 1, हिंगोली 2, यवतमाळ 1, नांदेड ग्रामीण 3, कंधार 1, औरंगाबाद 1 असे एकुण 39 बाधित आढळले. 

तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 52, अर्धापूर तालुक्यात 13, कंधार 8, बिलोली 1, धर्माबाद 4, देगलूर 6, यवतमाळ 1, वाशिम 1, मुदखेड 1, नायगाव 2, माहूर 1, लोहा 4, किनवट 5, उमरी 1, हिंगोली 1 असे एकूण 101 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 3 हजार 135 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 218, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन, होम आयशोलेशन एकत्रित 1 हजार 863, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 66, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवीन इमारत) 54, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 18, नायगाव कोविड केअर सेंटर 54, बिलोली कोविड केअर सेंटर 56, मुखेड कोविड केअर सेंटर 84, देगलूर जैनब रुग्णालय कोविड केअर सेंटर 42, लोहा कोविड केअर सेंटर 29, हदगाव कोविड केअर सेंटर 35, भोकर कोविड केअर सेंटर 27, कंधार कोविड केअर सेंटर 21, मुदखेड कोविड केअर सेटर 18, माहूर कोविड केअर सेंटर येथे 19, किनवट कोविड केअर सेंटर येथे 47, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 57, उमरी कोविड केअर सेंटर 42, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 6, खाजगी रुग्णालयात 306 बाधित, बारड कोविड केअर सेंटर 12, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 54, लातूर येथे संदर्भित 1, औरंगाबाद 2, मुंबई 2, आदिलाबाद येथे 2 संदर्भित झाले आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 86 हजार 96,

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 65 हजार 997,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 16 हजार 199,

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 12 हजार 545,

एकूण मृत्यू संख्या- 420,

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 80 टक्के,

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-6,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 4,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 1 हजार 391,

आज रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 3 हजार 135,

आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 33. 

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

00000 

Friday, October 2, 2020

 

216 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

158 बाधितांची भर तर सहा जणांचा मृत्यू 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- शुक्रवार 2 ऑक्टोंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 216 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 158 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 31 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 127 बाधित आले. 

आजच्या एकुण 852 अहवालापैकी 678 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 16 हजार 59 एवढी झाली असून यातील 12 हजार 391 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 3 हजार 182 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 38 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. 

या अहवालात एकुण सहा रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. गुरुवार 1 ऑक्टोंबर रोजी जुना मोंढा नांदेड येथील 55 वर्षाच्या एका पुरुषाचा, बिलोली तालुक्यातील बडूर येथील 30 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे तर भोकर येथील 48 वर्षाच्या एका पुरुषाचा व टिळकनगर नांदेड येथील 91 वर्षाच्या एका पुरुषाचा तर शुक्रवार 2 ऑक्टोंबर रोजी पुर्णारोड नांदेड येथील 72 वर्षाच्या एका पुरुषाचा, वैभवनगर नांदेड येथील 87 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 412 झाली आहे. 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल नांदेड 15, बिलोली कोविड केअर सेंटर 1, नायगाव कोविड केअर सेंटर 9, मुखेड कोविड केअर सेंटर 26, लोहा कोविड केअर सेंटर 8, धर्माबाद कोविड केअर सेंटर 2, किनवट कोविड केअर सेंअर 8, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी नांदेड 17, मुदखेड कोविड केअर सेंटर 3, एनआरआय / पंजाब भवन / महसूल भवन / होमआयसोलेशन 109, उमरी कोविड केअर सेटर 1, खाजगी रुग्णालय 14, लातूर येथे संदर्भित 1 असे 216 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 21, किनवट तालुक्यात 1, कंधार 1, बिलोली 1, सोलापूर 1, नांदेड ग्रामीण 2, देगलूर 1, नायगाव 1, हिंगोली 1, बीड 1 असे एकुण 31 बाधित आढळले. 

तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 56, अर्धापूर तालुक्यात 6, कंधार 7, बिलोली 3, हदगाव 2, धर्माबाद 6, भोकर 1, देगलूर 1, नागपूर 1, नांदेड ग्रामीण 21, मुदखेड 4, मुखेड 10, माहूर 2, लोहा 1, किनवट 1, उमरी 1, हिंगोली 1, रायगड 1 असे एकूण 144 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 3 हजार 182 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 237, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन, होम आयशोलेशन एकत्रित 1 हजार 885, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 81, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवीन इमारत) 33, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 15, नायगाव कोविड केअर सेंटर 55, बिलोली कोविड केअर सेंटर 30, मुखेड कोविड केअर सेंटर 99, देगलूर जैनब रुग्णालय कोविड केअर सेंटर 52, लोहा कोविड केअर सेंटर 45, हदगाव कोविड केअर सेंटर 45, भोकर कोविड केअर सेंटर 26, कंधार कोविड केअर सेंटर 22, बारड कोविड केअर सेंटर 12, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 51, मुदखेड कोविड केअर सेटर 26, माहूर कोविड केअर सेंटर येथे 20, किनवट कोविड केअर सेंटर येथे 59, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 61, उमरी कोविड केअर सेंटर 40, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 11, खाजगी रुग्णालयात 267 बाधित, हैद्राबाद येथे संदर्भित 1, औरंगाबाद 1, निजामाबाद 1, लातूर 2, अकोला 1, मुंबई 2, आदिलाबाद येथे 2 संदर्भित झाले आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 85 हजार 447,

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 65 हजार 513,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 16 हजार 59,

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 12 हजार 391,

एकूण मृत्यू संख्या- 412,

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 80 टक्के,

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-8,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 3,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 1 हजार 372,

आज रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 3 हजार 182,

आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 38. 

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

00000

 

 हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका

अभ्यासक्रमाकरीता अर्ज करण्याचे आवाहन

 

            औरंगाबाद, दि. 1-(विमाका):-  केंद्र शासनाच्या भारतीय हातमाग  तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2020-21 या  शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहा सत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राकरिता महाराष्ट्र राज्यातून बरगढ (ओडिशा) आर्थिक दृष्टया दुर्बल घटकातील 1 जागेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्याकरिता प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर/सोलापूर/मुंबई/औरंगाबाद यांचेमार्फत विहित नमुन्यात प्रवेश अर्ज दि. 9 आक्टोबर पर्यंत मागविण्यात येत आहे. प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालय वेबसाईट http.www.dirtexmah.gov.in वर उपलब्ध आहे. तसेच सदर अर्जाचा नमुना सर्व प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग यांचे कार्यालयात देखील उपलब्ध आहे आयुक्त  वस्त्रोद्योग, महाराष्ट्र राज्य नागपूरच्या                       डॉ. माधवी खोडे यांनी पत्रकान्वये कळविले आहे.

**********

वृत्त क्रमांक   जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण नांदेड (जिमाका), दि. 17: मराठवाडा मुक्ती संग्राम ...