Friday, January 22, 2021

 

आधुनिकतेची जोड देऊन

मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा

 नांदेड, (जिमाका) दि.22 :- शासनाच्या निर्णयानुसार येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये 1 ते 15 जानेवारी या कालावधीत "मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा" विविध कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला. यावर्षी कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयात ऑनलाईन पद्धतीने शिकविणे सुरू आहे. शासकीय तंत्रनिकेतनमध्ये विज्ञान विभागाच्या पुढाकाराने ऑनलाइन क्लासेस चालू आहे त्याच प्रकारे विविध स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे प्राचार्य डॉ. गोरक्ष  गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चित करण्यात आले. 

या पंधरवाडा काळात मराठी चारोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, मराठी हस्ताक्षर स्पर्धा गूगल मीटच्या सहाय्याने घेण्यात आल्या. समारोपाच्या प्रसंगी डॉ. दीपक कासराळीकर यांचे मराठी भाषेचे महत्व याविषयावर व्याख्यान ऑनलाइन पद्धतीने आयोजीत करण्यात आले होते. तंत्रज्ञान घेणारे विद्यार्थी मराठी भाषेच्या विविध स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर सहभागी होतात. यासाठी ऑनलाइन पद्धतीने पुढाकार घेतल्याबद्दल डॉ.कासराळीकर यांनी  संस्थेचे प्राचार्य व मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा  करणाऱ्या समितीचे अभिनंदन केले. 

प्राचार्य डॉ. गोरक्ष गर्जे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात दरवर्षी विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष सहभागाने विविध स्पर्धा घेऊन मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा करण्यात येतो. पण यावर्षी  कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या सहभागाचे मोठे आव्हान होते. निबंध स्पर्धेसाठी 24 स्पर्धक,हस्ताक्षर स्पर्धेसाठी 53 स्पर्धक, चारोळी  स्पर्धेसाठी 10 स्पर्धक आणि मराठी व्याख्यानासाठी  दोनशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने आपला सहभाग नोंदविला. याप्रमाणे मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा करण्यात आला, असे ते म्हणाले. ऑनलाइन पद्धतीने मराठी भाषासंवर्धन पंधरवाडा यशस्वी करण्यासाठी समन्वयक प्रा. सं. रा. मुधोळकर, सहायक  समन्वयक डॉ. . . जोशी, प्रा.. नं. यादव, निबंध स्पर्धेसाठी डॉ. दे. . कोल्हटकर, प्रा.. पू. राठोड, हस्ताक्षर स्पर्धेसाठी डॉ. . मा. डक, डॉ. सं. वि. बेट्टिगेरी चारोळी स्पर्धेसाठी प्रा.सा. . दूटाळ व्याखान आयोजन करण्यासाठी प्रा. . बा. दमकोंडवार व प्रा. वि. मं. नागलवार सहायक म्हणुन सं. . जगताप व शेख जावेद यांनी प्रयत्न केले.

00000

 

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीअंतर्गतचे

प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन 

 नांदेड, (जिमाका) दि.22 :- शिष्यवृत्तीच्या लाभापासून विद्यार्थी वंचित राहू नये याहेतूने दरवर्षीप्रमाणे सन 2020-21 यावर्षी शासनाच्या सर्व मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहेत. या शिष्यवृत्तीचे ऑफलाईन प्रस्ताव गटशिक्षणधिकारी यांच्यामार्फत दोन प्रतीत सोबत सॉफ्ट फाइल पेनड्राइव्हसह सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी 11 फेब्रुवारी 2021 पूर्वी जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद नांदेड या कार्यालयास सादर करावे. जेणेकरुन मागासवर्गीय विद्यार्थी हे शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहणार नाहीत. शिष्यवृत्ती योजनेच्या लाभापासून विद्यार्थी वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जाबाबदारी ही मुख्याध्यापकांची राहिल, असे आवाहन जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी यु. डि. तोटावाड यांनी केले आहे.  

या शिष्यवृत्तीमध्ये सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना इयत्ता पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावीच्या मुलींसाठी (अनु.जाती, विजाभज / विमाप्र, इमाव स्वतंत्रपणे), अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती योजना, शिक्षण फि परिक्षा फि योजना (अनु.जाती, जमाती, विजाभज/विमाप्र स्वतंत्रपणे), गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना इयत्ता पाचवी ते दहावी (अनु.जाती, जमाती व विजाभज/विमाप्र स्वतंत्रपणे), भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना अनु. जाती इयत्ता नववी व दहावी, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना विद्यावेत, तर इयत्ता पहिली ते दहावीमध्ये शिकणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती योजना, पहिली ते दहावीमध्ये शिकणाऱ्या विजाभज (डिएनटी) च्या विद्यार्थ्यांना डॉ. आंबेडकर मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेचा समावेश आहे.

00000

शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 22 :-  सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांनी भारत सरकार शिष्यवृती व शिक्षण फी परीक्षा फी तसेच व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता या योजनेंतर्गत शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी महाडीबीटी MAHADBT पोर्टल सुरु झाले आहे. जिल्ह्यातील सर्व शासनमान्य अनुदानित, विनाअनुदानीत, कायम विनाअनुदानीत महाविद्यालयाचे प्राचार्य व महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी www.mahadbtmahait.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज त्वरीत व्यवस्थीत भरावेत. तसेच सन 2019-20 या वर्षातील ज्या विद्यार्थ्यांना Re-apply पर्याय आलेला असेल त्यांनी पुन्हा अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले आहे.

00000


 

मंडप / पेंडॉल तपासणी पथक गठीत

नांदेड (जिमाका) दि. 22 :- मा. उच्च न्यायालय मुंबई येथे उपस्थित जनहित याचिका संदर्भात सार्वजनिक सण, उत्सव, समारंभाप्रसंगी उभारण्यात येणाऱ्या मंडप / पेंडॉल तपासणीच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातर्गत नांदेड महानगरपालिका हद्दीत मंडप / पेंडॉलची तपासणी करण्यासाठी सहा तपासणी पथके गठीत करण्यात आली आहेत. यासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास नागरिकांनी तपासणी पथकाच्या सदस्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.   

तपासणी पथकातील सदस्याचे नाव, पदनाम कार्यालयीन दुरध्वनी व मोबाईल क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. पथक क्रमांक एक क्षेत्रिय कार्यालय क्र. 1 कार्यक्षेत्र नांवाशमनपा क्षेत्रीय कार्यालय क्र. 1 (तरोडा सांगवी) अंतर्गत संपूर्ण क्षेत्रात : संजय जाधव क्षेत्रीय अधिकारी 9011000939, एस.एन.ननावरे व अनिरुध्द. काकडे पो.नि.पो.स्टे विमानतळ नांदेड 02462-221100/ 8805186113, 9923131121. अभिमन्यु सोळंके पो.नि.पो.स्टे.भाग्यतनगर नांदेड 02462-261364 9422242568.नितीन तोरणेकर प्र.कार्यालय अधिक्षक 8888801952. श्याम कानोटे प्र.वसुली पर्यवेक्षक 9975826610. साहेबराव ढगे प्र.वसुली पर्यवेक्षक 8888801975. म.मकसुद अहेमद लिपीक 8766869099. विश्वनाथ बी. कल्याणकर स्वच्छता निरीक्षक 9011000969. आनंदा गायकवाड प्र.स्वच्छता निरीक्षक 9011027194.गणेश मुदीराज प्र.स्वच्छता निरीक्षक 8308847094. पथक क्रमांक दोन क्षेत्रिय कार्यालय क्र.2 अशोकनगर कार्यक्षेत्र नांवाशमनपा क्षेत्रीय कार्यालय क्र.2 अंतर्गत संपूर्ण क्षेत्रात : मीर्झा फरहतउल्ला बेग प्र.क्षेत्रीय अधिकारी 9011000950. अभिमन्युय सोळंके पो.नि.पो.स्टे.भाग्यनगर नांदेड 02462-261364 / 9422242568. एस.एन.ननावरे व अनिरुध्द. काकडे पो.नि.पो.स्टे. विमानतळ नांदेड 02462-221100 / 8805186113, 9923131121. राजेश जाधव प्र.कार्यालय अधिक्षक 8888801953. वसंत कल्याणकर प्र.वसुली पर्यवेक्षक 8888801943.रणजित पाटील प्र.वसुली पर्यवेक्षक 9011001005. उत्तम नारनाळे लिपीक 9822261979. शेख नईम शे.गफुर प्र.स्वच्छता निरीक्षक 9822202081. रतन रोडे प्र.स्वच्छता निरीक्षक 8888801917. विजय वाघमारे प्र. स्वच्छता निरीक्षक 8669037443. सतिश मुक्कापल्ले प्र.स्वच्छता निरीक्षक 7774977737. पथक क्रमांक तीन क्षेत्रिय कार्यालय क्र.3 शिवाजीनगर कार्यक्षेत्र नांवाशमनपा क्षेत्रीय कार्यालय क्र.3 अंतर्गत संपूर्ण क्षेत्रात राजेश चव्हाण प्र. क्षेत्रीय अधिकारी 9595333181. अनंत नरुटे पो.नि.पो.स्टे . शिवाजी नगर नांदेड 02462-256520 / 9823802677.अभिमन्यु सोळंके पो.नि.पो.स्टे.भाग्यनगर नांदेड 02462-261364/ 9422242568. किशोर नागठाणे प्र.कार्यालय अधिक्षक 9890729587. वामन भानेगावकर प्र. वसुली पर्यवेक्षक 7620568868. परसराम गाढे प्र. वसुली पर्यवेक्षक 8888801918. रामदास हांडे प्र. वसुली पर्यवेक्षक 8888801929. राजेश क-हाळे लिपीक 9011000989. सुरेश पि.पाशमवाड स्वच्छता निरीक्षक 9011000974. संजय जगतकर स्वच्छता निरीक्षक 8380046629. बालाजी देसाई स्वच्छता निरीक्षक 8308847691. पथक क्रमांक चार क्षेत्रीय कार्यालय क्र.04 वजिराबाद कार्यक्षेत्र नांवाशमनपा क्षेत्रीय कार्यालय क्र.04 अंतर्गत संपूर्ण क्षेत्रात डॉ. मोहम्द रईसोद्दीन प्र. क्षेत्रीय अधिकारी 8888892063.साहेबराव नरवाडे पो.नि.पो.स्टेस.इतवारा नांदेड 02462-236510 9561045306.प्रशांत देशपांडे पो.नि.पो.स्टेस.नांदेड ग्रा. 02462-226373 / 9823258261, 8208517627. घनश्याम परडे प्र. कार्यालय अधिक्षक 9975826610. रमेश वाघमारे प्र.वसुली पर्यवेक्षक 8888801985. अजहर अली जुल्फेककार अली प्र.वसुली पर्यवेक्षक 8888801988. लक्ष्मपण मारोती सुनेवाड प्र.वसुली पर्यवेक्षक 8888801984. अशोक दासरे लिपीक 9765377255. पुंडलीक मोरे लिपीक 9822360258.गोविंद खंडुजी थेटे स्वच्छता निरीक्षक 9011000972. वसीम हुसेन तडवी स्वच्छता निरीक्षक 8888847122.मोहन लांडगे प्र.स्वच्छता निरीक्षक 9370373846.स.जाफरअली स.नबी प्र.स्वच्छता निरीक्षक 8380046631. पथक क्रमांक पाच क्षेत्रीय कार्यालय क्र. 5 क्षेत्रिय कार्यालय क्र. 5 इतवारा कार्यक्षेत्र नावाश मनपा क्षेत्रीय कार्यालय क्र. 5 अंतर्गत संपूर्ण क्षेत्रात मल्हार मोरे प्र. क्षेत्रीय अधिकारी 9011000950. साहेबराव नरवाडे पो.नि.पो.स्टे. इतवारा नांदेड 02462-236510 / 9561045306. प्रशांत देशपांडे पो.नि.पो.स्टे. नांदेड (ग्रा) 02462-226373 / 9823258261, 8208517627 पाळ तोटावाड प्र. कार्यालय अधिक्षक 9921986989,.अब्दुल हबीब अ.रशीद वसुली पर्यवेक्षक 8888801998. गणेश कोंडावार लिपीक 8087315765. एम.ए.समी.एम.ए सत्तार स्वच्छता निरीक्षक 9011000978. दयानंद कवले प्र.स्वच्छता निरीक्षक 9011000975. रुपेश विठ्ठलराव सरोदे प्र.स्वच्छता निरीक्षक 8380046631. विजेंद्र जोंधळे प्र.स्वच्छता निरीक्षक 8668351324. पथक क्रमांक सहा क्षेत्रीय कार्यालय क्र. 6 सिडको कार्यक्षेत्र नांवाशमनपा क्षेत्रिय कार्यालय क्र.6 इतवारा अंतर्गत संपूर्ण क्षेत्रात रावण सोनसळे प्र.क्षेत्रीय अधिकारी 8888801961. प्रशांत देशपांडे पो.नि.पो.स्टेर.नांदेड (ग्रा) 02462-226373 / 9823258261, 8208517627. विलास गजभारे प्र.कार्यालय अधिक्षक 9890327546. दिपक पाटील प्र.वसुली पर्यवेक्षक 8888802012. सुधीरसिंह बैस प्र.वसुली पर्यवेक्षक 7775956400.प्रभु गिराम लिपीक 9921038641. राहुलसिंह चौधरी प्र.वसुली पर्यवेक्षक 7558333322. किशन वाघमारे प्र.स्वच्छता निरीक्षक 8888801992. अर्जुन बागडी प्र.स्वच्छता निरीक्षक 8888588067 यांचा तपासणी पथकातील सदस्य म्हणून समावेश आहे.  

00000

 

भोकर तालुक्यातील पिडित कुटूंबियांचे

पालकमंत्र्यांनी घरी जाऊन केले सांत्वन

नांदेड (जिमाका) दि. 22 :- भोकर तालुक्यातील दिवशी बु. येथील पिडित कुटुंबियाच्या घरी आज पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी भेट घेऊन परिवाराचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर व पदाधिकारी उपस्थित होते. 

यातील आरोपी बाबु उखंडू सांगेराव याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याल फाशीची शिक्षा जोपर्यंत होणार नाही तो पर्यंत मी स्वस्थ बसणार नाही असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. या कुटुंबियांच्या मदतीसाठी शासन तत्पर असल्याचे ते म्हणाले.

00000



 

 

मराठवाड्यातील रस्ते विकासाचा अनुशेष मार्गी लावू

-         सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

 आसना नदीवरील जुन्या पुलाची पूर्नबांधणी व रुंदीकरण कामाचे भूमिपूजन   

 नांदेड, (जिमाका) दि.22 :- मराठवाड्यातील रस्ते विकासाचा अनुशेष मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढला हे सत्य कुणाला नाकारता येणार नाही. विशेषत: ग्रामीण भागातील रस्त्याची जी दैना झाली आहे ती लक्षात घेवून महाविकास आघाडी शासनाने हे काम प्राधान्याने पूर्ण करण्याचे ठरविले आहे. मराठवाड्याला न्याय देण्याची जबाबदारी मी स्विकारलेली असून मराठवाड्याचा अनुशेष आम्ही एकजूटीतून पूर्ण करु असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमच्या एकत्रित विचारातून तिंघाची जी शक्ती एकत्र झाली आहे ती जनतेला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री  (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

नांदेड जिल्ह्यातील नांदेड-अर्धापूर (पूर्व वळण रस्ता) मार्गावरील आसना नदीच्या जूनापूल व पोच मार्गाचे दुरुस्ती व रुंदीकरणाचा शुभारंभ पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, महापौर सौ. मोहिनी येवनकर, आमदार अमर राजूरकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहन हंबर्डे, माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, गणपतराव तिडके, गोविंद नागेलीकर, दत्ता कोकाटे, हरिहरराव भोसीकर, उपमहापौर मसुद अहेमद खान, गुरुद्वाराचे संतबाबा सुखदेवसिंघजी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे आदी उपस्थित होते. 

मागील वर्षभराचा काळ हा कोरोनामुळे आर्थिकदृष्ट्या राज्य सरकारलाही अत्यंत आव्हानात्मक होता. एका बाजुला कोरोनापासून जनतेची सुरक्षितता, ज्यांना कोरोनाची बाधा झाली त्यांना त्यांच्या गावाजवळच उपचाराची सुविधा आणि याअनुषंगाने शासकिय, वैद्यकीय सेवा-सुविधा विकासाची कामे यामुळे इतर विकास कामावर इच्छा असूनही सुरवात करता आली नाही. जनजीवन सुरळीत सुरु झाल्यानंतर आता राज्याचा अर्थकारणाचा गाडा हळूहळू सुधारत असून यापुढच्या कालावधीत विविध विकास कामे पूर्ण करण्यावर आम्ही शर्थीचे प्रयत्न करु, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. 

नांदेड जिल्हा कृषिप्रधान असल्याने स्वाभाविकच कृषीपूरक उद्योगावर आधारित होणारी वाहतूक ही मोठ्याप्रमाणात आहे. यात ऊसाचे कारखाने लक्षात घेता ऊसाची वाहतूक जास्त आहे. रस्त्याचा विकास केवळ महानगरे डोळ्यापुढे ठेवून नव्हे तर ग्रामीण भागही विकासाशी जुळला जावा म्हणून मी दक्षता घेत आहे. नांदेड जिल्ह्यातील रस्ते विकासाच्या कामाबाबत या जिल्ह्याचा भूमिपुत्र असल्याने जिल्ह्याच्या विकासासाठी मी कटीबद्ध असून आजवर जो अनुशेष निर्माण झाला तो लवकर पूर्ण करील असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. 

राज्यातील समृद्धी महामार्गाशी नांदेडला जोडता यावे यादृष्टिने मी विचार केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करुन तात्काळ त्याला होकार दिला. याबाबत आम्ही निर्णय घेतला असून आता   नांदेड ते जालना पर्यंतचा 194 किमीचा स्वतंत्र मार्ग तयार केला जाईल. हा संपूर्ण मार्ग सिमेंट काँक्रेटचा असून यास 6 हजार 500 कोटी रुपये खर्च येईल. यामुळे नांदेड येथून मुंबईला जाणे अधिक सुखकर होईल व नांदेडच्या विकासाला चालना मिळेल. या नव्या महामार्गासमवेत आजच्या घडीला जो जुना महामार्ग आहे त्या नांदेड ते औरंगाबाद मार्गावरील ज्या-ज्या ठिकाणी छोटे-छोटे रस्त्याचे तुकडे काम करायचे बाकी आहे, अशा रस्त्यांच्या दुरुस्तीची कामेही पूर्ण करता यावीत यासाठी अर्थसंकल्पात खास निधी उपलब्ध करुन देऊ असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. 

नाशिकमध्ये ज्याप्रमाणे महानगरातून जाणाऱ्या मार्गावर उड्डाणपूल उभारला आहे त्याचधर्तीवर नांदेडमध्ये आपल्या बाफना उड्डाणपूलापासून सूतगिरणीपर्यंत नवीन उड्डाणपूल प्रस्तावित केला आहे. तरोडा गावठाण शिवमंदिर ते महादेव पिंपळगाव हा नवीन रस्ताही आपण करु. माजी पालकमंत्री डी. पी. सावंत यांचाही या मार्गासाठी न्याय्य आग्रह होता. याचबरोबर तरोडा-महादेव पिंपळगाव-दाभड असा मार्ग विकसित कसा केला जावू शकतो याचे नियोजन व यासाठी लागणारी पूर्वतयारी सुरु केल्याचे सुतोवाचही त्यांनी केले.

नांदेडच्या विकासासाठी पालकमंत्री म्हणून अशोक चव्हाण यांनी अतिशय दक्ष भूमिका बजावली आहे. आसना नदीवरील या पुलावर वेळोवेळी होणारी वाहतुकीची कोंडी व रस्ते अपघात लक्षात घेता येथे नवीन पुलाची नितांत गरज होती. ही गरज ओळखून हा पूल मंजुरीसह लवकर पूर्ण होत असल्याचा विशेष आनंद असल्याचे आमदार मोहन हंबर्डे यांनी सांगितले. मागील पाच वर्षापासून या पुलावरील काम रखडले असल्यामुळे अनेकवेळा वाहतुकीच्या कोंडीसह नांदेडकरांना अनेक संकटाचा सामना करावा लागत होता. आता या नव्या पुलामुळे रस्त्याच्या कोंडीसह विकासाचा नवा मार्ग खुला झाला असल्याचे आमदार अमर राजूकर यांनी सांगितले. नांदेड जिल्ह्यातील सर्व मतदारसंघाला त्यांनी समान न्याय दिला असून समग्र नांदेड जिल्हा विकासाची जबाबदारी पालक या नात्याने सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी स्विकारली असल्याचे गौरोद्गार आमदार बालाजी कल्याणकर यांनी काढले.  

भोकर येथे विविध विकास कामाचा शुभारंभ सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते आज करण्यात आला. यात प्रामुख्याने हदगाव-तामसा-भोकर-उमरी-लोहगाव रस्त्याचे भूमिपूजन. शासकीय विश्रामगृह भोकर येथील इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन. भोकर-मुदखेड रस्त्याचे भूमिपूजन. भोकर नगरपरिषद अंतर्गत 12 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन. प्रस्तावित भोकर वळण मार्गाचे भूमिपूजन. आयटीआय प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन. नवीन शासकीय धान्य गोदामाचे बांधकामाचे भूमिपूजन या कार्यक्रमाचा यात समावेश होता. 

या भोकरच्या विविध विकास कामांचा शुभारंभानिमित्त पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली विशेष जाहिर कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी भोकर येथील विविध विकास कामाबाबत कटीबद्धता व्यक्त करुन मी सर्वांसोबत असल्याची ग्वाही दिली.  यावेळी आमदार  अमर राजूरकर, जिल्हा परिषदेचे कृषि व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब रावणगावकर व इतर मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. भोकर व नांदेड येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे यांनी प्रस्ताविक करुन विविध विकास कामांची तांत्रिक माहिती दिली.

स्व. सुधाकरराव डोईफोडे यांच्या स्मृतींना

पालकमंत्र्यांनी दिला उजाळा

मराठवाड्याच्या रेल्वे विकासासाठी व मराठवाड्यातील विकासाचा अनुशेष दूर व्हावा यासाठी आयुष्यभरआग्रही भूमिका मांडणारे ज्येष्ठ संपादक स्व. सुधाकरराव डोईफोडे यांचा आज स्मृती दिन होता. या स्मृतीदिनाचात्यांनी आवर्जून उल्लेख करत मराठवाड्याचा विकासासाठी त्यांनी वेळोवेळी जी भूमिका घेतली त्याचे समरणकरुन कृतज्ञता व्यक्त केली.  

   00000






Thursday, January 21, 2021

 

सरपंच पदाचे आरक्षण सोडत

28 व 29 जानेवारीला होणार

नांदेड (जिमाका) दि. 21 :- नांदेड जिल्ह्यातील नांदेड, भोकर, हदगाव, किनवट, धर्माबाद, बिलोली, देगलूर व कंधार या तालुक्याचे सरपंच पदाचे आरक्षण कार्यक्रम गुरुवार 28 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11 वा. तसेच अर्धापूर, मुदखेड, हिमायतनगर, माहूर, उमरी, नायगाव खै., मुखेड व लोहा या तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण कार्यक्रम शुक्रवार 29 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11 वा. सर्व संबंधित तालुका मुख्यालयी होणार आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (सामान्य) शरद मंडलीक यांनी दिली आहे.   

0000

वृत्त क्रमांक मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन नांदेड (जिमाका), दि. 16 :- मराठवाडा मुक...