Friday, January 22, 2021

 

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीअंतर्गतचे

प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन 

 नांदेड, (जिमाका) दि.22 :- शिष्यवृत्तीच्या लाभापासून विद्यार्थी वंचित राहू नये याहेतूने दरवर्षीप्रमाणे सन 2020-21 यावर्षी शासनाच्या सर्व मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहेत. या शिष्यवृत्तीचे ऑफलाईन प्रस्ताव गटशिक्षणधिकारी यांच्यामार्फत दोन प्रतीत सोबत सॉफ्ट फाइल पेनड्राइव्हसह सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी 11 फेब्रुवारी 2021 पूर्वी जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद नांदेड या कार्यालयास सादर करावे. जेणेकरुन मागासवर्गीय विद्यार्थी हे शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहणार नाहीत. शिष्यवृत्ती योजनेच्या लाभापासून विद्यार्थी वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जाबाबदारी ही मुख्याध्यापकांची राहिल, असे आवाहन जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी यु. डि. तोटावाड यांनी केले आहे.  

या शिष्यवृत्तीमध्ये सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना इयत्ता पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावीच्या मुलींसाठी (अनु.जाती, विजाभज / विमाप्र, इमाव स्वतंत्रपणे), अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती योजना, शिक्षण फि परिक्षा फि योजना (अनु.जाती, जमाती, विजाभज/विमाप्र स्वतंत्रपणे), गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना इयत्ता पाचवी ते दहावी (अनु.जाती, जमाती व विजाभज/विमाप्र स्वतंत्रपणे), भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना अनु. जाती इयत्ता नववी व दहावी, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना विद्यावेत, तर इयत्ता पहिली ते दहावीमध्ये शिकणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती योजना, पहिली ते दहावीमध्ये शिकणाऱ्या विजाभज (डिएनटी) च्या विद्यार्थ्यांना डॉ. आंबेडकर मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेचा समावेश आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त  क्र.  112 राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे आज नांदेडमध्ये   जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक   नांदेड दि. 27 जानेवारी :- रा...