Friday, January 22, 2021

 

अकराव्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त

मतदार जागृतीसाठी सायकल रॅलीचे आयोजन

नांदेड, (जिमाका) दि. 22 :- मा. भारत निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार 11 वा राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदार जागृतीसाठी जिल्हास्तरावरील मुख्य कार्यक्रमाच्या अनुषंगाने सोमवार 25 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7 वा. महात्मा फुले पुतळा आय.टी.आय. कॉर्नर ते जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड या मार्गावर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या सायकल रॅलीत नवमतदारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

मा.भारत निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार 11 वा राष्ट्रीय मतदार दिवस 25 जानेवारी 2021 रोजी नांदेड जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय तसेच सर्व मतदान केंद्रावर साजरा करण्यात येणार असून त्याचे नियोजन करण्यात आले आहे. मुख्य कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भासले हे उपस्थित राहणार आहेत. मुख्य कार्यक्रमात उपस्थितांना राष्ट्रीय मतदार दिनाची शपथ देण्यात येईल. यावर्षी मा. भारत निवडणूक आयोगाने Making Our voters Empowered, Vigilant, Safe and Informed हा विषय घोषित केलेला आहे. कोविड -19 या महामारीच्या संदर्भात केंद्र व राज्यात सरकारकडून निर्धारीत केलेल्या मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन यावर्षीचा 11 वा राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात येणार आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...