Friday, October 16, 2020

 

209 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

105 बाधितांची भर तर सात जणांचा मृत्यू    

नांदेड (जिमाका) दि. 16 :- शुक्रवार 16 ऑक्टोंबर 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 209 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 105 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 57 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 48 बाधित आले. 

आजच्या एकुण 896 अहवालापैकी 762 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 17 हजार 897 एवढी झाली असून यातील  15  हजार 601 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 1 हजार 709 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 47 बाधितांची प्रकृती अती गंभीर स्वरुपाची आहे. 

या अहवालात सात जणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. मंगळवार 13 ऑक्टोंबर रोजी तरोडा नाका नांदेड येथील 52 वर्षाचा एक पुरुषाचा खाजगी रुग्णालयात तर 15 ऑक्टोंबर रोजी गणराज नगर नांदेड येथील 63 वर्षाचा एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात तर भावसार चौक, नांदेड येथील 65 वर्षाची एक महिला हदगाव येथील 60 वर्षाची एक महिला, इतवारा नांदेड येथील 68 वर्षाची एक महिला यांचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे तर दुर्गा नगर अर्धापुर येथील 62 वर्षाचा एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे तर 16 ऑक्टोंबर रोजी वाळकी बाजार हदगाव येथील 75 वर्षाची एक महिलेचा हदगाव कोविड केअर सेंटर येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 476 झाली आहे.  

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 2, धर्माबाद कोविड केंअर सेंटर 5, नायगाव कोविड केंअर सेंटर 6, मुखेड कोविड केंअर सेंटर 6, हदगाव कोविड केंअर सेंटर 5, बिलोली कोविड केंअर सेंटर 3, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 11, अर्धापूर कोविड केंअर सेंटर 6, भोकर कोविड केंअर सेंटर 6, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन/होम आयसोलेशन 138, उमरी कोविड केंअर सेंटर 4, खाजगी रुग्णालय 17 असे एकूण 209 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 90.12 टक्के आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 38, अर्धापुर तालुक्यात 1, हिमायतनगर तालुक्यात 1, किनवट तालुक्यात 1, हदगाव तालुक्यात 2,नायगाव तालुक्यात 1, हिंगोली 2, कंधार तालुक्यात 2, भोकर 2, लोहा 1, माहूर 1, मुखेड 2, परभणी 3, असे एकुण 57 बाधित आढळले.  

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 26, अर्धापूर तालुक्यात 1,  लोहा तालुक्यात 3, भोकर तालुक्यात 1, बिलोली तालुक्यात 1, हिंगोली 1, नांदेड ग्रामीण 5, मुदखेड तालुक्यात 1, किनवट तालुक्यात 1, मुखेड तालुक्यात 2, धर्माबाद तालुक्यात 6, असे एकूण 48 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 1 हजार 709 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 158, एनआरआय व पंजाब भवन, महसूल भवन/होम आयसोलेशन एकत्रित  997, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 48, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड (नवी इमारत) येथे 40, हदगाव कोविड केअर सेंटर 11, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 26, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 31, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 30,  मांडवी कोविड केअर सेंटर 7, देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 10, लोहा कोविड केअर सेंटर येथे 15, बारड कोविड केअर सेंटर 2, मुदखेड कोविड केअर सेटर 9, माहूर कोविड केअर सेंटर 22, किनवट कोविड केअर सेंटर येथे 29, धर्माबाद कोविड केअर सेंटर 14, उमरी कोविड केअर सेंटर 35, कंधार कोविड केअर सेंटर येथे 8, अर्धापूर कोविड केअर सेंटर 15, भोकर कोविड केअर सेंटर 11,  खाजगी रुग्णालयात दाखल 190 , हिमायतनगर कोविड केअर सेंटर 1 झाले आहेत. 

शुक्रवार 16 ऑक्टोंबर रोजी 5.30 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 68, आयुर्वेदिक शासकीय महाविद्यालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 90, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 85 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 97 हजार 750,

निगेटिव्ह स्वॅब- 76 हजार 698,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 17 हजार 897,

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 15 हजार 601,

एकूण मृत्यू संख्या- 476,

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 90.12

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-25,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 3,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 344, 

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 709,

आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 47.  

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. 

0000

 

 

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1133 नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत  भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी  नां...