Monday, December 15, 2025
वृत्त क्रमांक 1299
डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील
गट ड संवर्गातील 86 पदांची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर
नांदेड दि. 15 डिसेंबर :- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड या संस्थेमध्ये वर्ग- ४ (गट-ड) संवर्गातील विविध २१ संवर्गांतील एकूण ८६ पदांच्या पदभरती परीक्षेनंतर उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन, तांत्रिक तपासणी व सर्व संबंधित निकषांचा विचार करून अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात आली आहे. सदर अंतिम गुणवत्ता यादी सोमवार १५ डिसेंबर २०२५ रोजी महाविद्यालयाच्या https://www.drscgmcnanded.in अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित सर्व उमेदवारांनी अंतिम गुणवत्ता यादी या अधिकृत संकेतस्थळावर पाहावी व पुढील निवड प्रक्रियेबाबत वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी केले आहे.
या पदभरतीची २४ एप्रिल २०२५ रोजी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीस राज्यभरातून सुमारे 16 हजार 972 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले असून, या पदभरती प्रक्रियेस उमेदवारांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला होता.
सदर पदभरती प्रक्रियेअंतर्गत पात्र उमेदवारांसाठी ऑनलाईन पद्धतीने लेखी परीक्षा दिनांक २५ जुलै २०२५ ते ३१ जुलै २०२५ या कालावधीत महाराष्ट्रातील विविध अधिकृत परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती. परीक्षा प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक, निर्भीड व सुरळीतपणे पार पडावी यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर स्वतंत्र निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच गैरप्रकार टाळण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर सी.सी.टी.व्ही. कॅमेरे व सी.सी.टी.व्ही. जॅमर बसविण्यात आले होते. ही संपूर्ण प्रक्रिया शासनाच्या नियम व मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्यात आली.
या पदभरतीमुळे महाविद्यालय तसेच रुग्णालयातील मनुष्यबळात वाढ होणार असून, दैनंदिन प्रशासकीय कामकाज अधिक सक्षम होईल तसेच रुग्णसेवेला अधिक गती, गुणवत्ता व कार्यक्षमता मिळण्यास मोठा फायदा होणार आहे, असेही संस्थेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
0000
वृत्त क्रमांक 1298
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली
महिला बालविकास विभागाने रोखला बाल विवाह
नांदेड दि. 15 डिसेंबर :- जिल्ह्यात बाल विवाहाची कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ शहरी भागातील बालविकास प्रकल्प अधिकारी तसेच ग्रामीण भागात ग्रामसेवक, अंगणवाडी सेवीका, चाईल्ड हेल्प लाईन 1098 या टोल फ्री क्रमांक वर संपर्क साधावा. जेणे करुन भविष्यातील अनिष्ठ प्रथा रोखता येतील असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
जिल्ह्यात बालविवाह मुक्त भारत 100 दिवस अभियान जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शानाखाली सुरु आहे. अर्धापुर तालुक्यात एका 17 वर्षीय बालिकेचा बालविवाह होणार असल्याबाबत गोपनीय माहिती चाईल्ड लाईन 1098 ला प्राप्त झाली. ही तक्रार प्राप्त होताच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा बालसंरक्षण अधिकारी विद्या आळणे व चाईल्ड हेल्प लाईनचे कर्मचारी ऐश्वर्या शेवाळे, दिपाली हिंगोले यांनी पिडीत मुलीच्या घरी गृहभेट देऊन बालिकेचा आई व नातेवाईकांचे समुपदेशन केले. मुलीच्या वयाबाबत खात्री करुन बालविवाह दुष्परीणाम व बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 बाबत सविस्तर माहिती दिली. बालविवाह बेकायदेशीर असल्याचे मुलीच्या पालकाला समजावुन सांगण्यात आले. सदर मुलीला काळजी व संरक्षणाच्यादृष्टीने बालकल्याण समिती नांदेड यांच्या समोर हजर करण्यात आले. यावेळी पालकांकडून बालविवाह न करण्याबाबत हमीपत्र घेण्यात आले असुन सदरील बालविवाह रोखण्यात आला आहे.
0000
वृत्त क्रमांक 1297
नगरपरिषद-नगरपंचायत क्षेत्रातील आठवडी बाजार
मतदान व मतमोजणीच्या दिवशी राहतील बंद
नांदेड दि. 15 डिसेंबर :- जिल्ह्यात नगरपरिषद व नगरपंचायत सुधारित सार्वत्रिक निवडणुक-2025 च्या अनुषंगाने नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रात मतदानाच्या दिवशी व मतमोजणी दिवशी भरणारे आठवडी बाजार बंद राहणार आहेत. हे सर्व आठवडी बाजार हे सोमवार 22 डिसेंबर 2025 या रोजी भरविण्यात यावेत, अशा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी मार्केट अँड फेअर अॅक्ट, 1862 चे कलम 5 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन निर्गमीत केला आहे.
नांदेड जिल्ह्यातील निवडणुक निर्णय अधिकारी तसेच सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे शनिवार 20 डिसेंबर 2025 रोजी मतदानाच्या दिवशी व रविवार 21 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणीच्या दिनांकास आदेशात नमुद केलेल्या नगरपरिषद व नगरपंचायतक्षेत्रात भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेशीत केले आहे.
शनिवार 20 डिसेंबर रोजी मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार भरणाऱ्या ठिकाणाची नावे निरंक आहेत. तर रविवार 21 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणीच्या दिवशी आठवडी बाजार भरणाऱ्या ठिकाण बिलोली, धर्माबाद, मुदखेड, किनवट या नगरपरिषदेचा यात समावेश आहे. देगलूर, हदगाव, नगरपंचायत हिमायतनगर, कंधार, कुंडलवाडी, मुखेड, उमरी, भोकर, लोहा या नगपरिषद निरंक आहेत. या नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रात भरणारे सर्व आठवडी बाजार हे सोमवार 22 डिसेंबर 2025 या रोजी भरविण्यात यावेत. हा आदेश 11 डिसेंबर 2025 रोजी निर्गमीत करण्यात आला आहे.
00000
दि. 15 डिसेंबर, 2025
पत्रकार परिषद निमंत्रण
प्रति ,
मा. संपादक / प्रतिनिधी
दैनिक वृत्त पत्र / दूरचित्रवाणी / इलेक्ट्रॉनिक मिडीया
नांदेड जिल्हा
महोदय,
मौ. माळेगाव यात्रा ता. लोहा येथील श्री. खंडेरायाची यात्रा दि. 18 डिसेंबर 2025 पासून सुरु होत असून, जिल्हा परिषद, नांदेड व पंचायत समिती, लोहा यांच्यामार्फत आयोजित कार्यक्रमाच्या प्रसिध्दीसाठी जिल्हा परिषदेच्या मा. मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांची उद्या मंगळवार 16 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजता कै. यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद, नांदेड येथे पत्रकार परिषद आयोजित केली आहे.
तरी कृपया, आपण या पत्रकार परिषदेस उपस्थित रहावे, ही विनंती.
पत्रकार परिषद दिनांक :- 16.12.2025(मंगळवार)
वेळ :- दुपारी 3.00 वा.
स्थळ :- कै. यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद, नांदेड
प्र. जिल्हा माहिती अधिकारी,
नांदेड
१३ डिसेंबर 2025
वृत्त क्रमांक 1296
कुस्ती, पशु व कृषी स्पर्धांच्या बक्षिसात भरीव वाढ – आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर
कलावंतांचा सन्मान करण्यात येणार यात्रेत स्वच्छतेवर भर
नांदेड, १३ डिसेंबर:- दक्षिण भारतातील ग्रामीण भागात भरणाऱ्या मोठ्या यात्रांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र माळेगाव येथील श्री खंडोबा यात्रेचे वैभव अधिक वाढविण्यासाठी यावर्षी कुस्ती, कृषी व पशु स्पर्धांच्या बक्षीस रकमेत भरीव वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली.
माळेगाव येथे आज आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली यात्रेच्या पूर्वतयारीसंदर्भात आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.
बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सूरज गुरव, उपविभागीय अधिकारी नरवटे, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी जगताप, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, यात्रा सचिव डी.बी. गिरी, अभियंता राहुल रावसाहेब, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजकुमार पडीले, जिल्हा कृषी अधिकारी डॉ. निलकुमार ऐतवडे, गटविकास अधिकारी कुलकर्णी आदी उपस्थित होते.
यंदा कुस्ती, कृषी आणि पशुसंवर्धन विभागाच्या स्पर्धांसाठी जवळपास ५० लाख रुपयांची वाढीव तरतूद करण्यात आली आहे. कृषी विभागाच्या फळपिके व मसाला पिक स्पर्धेत गटात प्रथम बक्षीस ७ हजार, द्वितीय ६ हजार, तृतीय ५ हजार रुपये तसेच उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात येणार आहे. पशुसंवर्धन विभागात लाल कंधारी ब्रिड चॅम्पियन नर व मादी गटासाठी प्रत्येकी १ लाख २१ हजार रुपये, देवणी नर व मादी गटासाठी प्रत्येकी ७१ हजार रुपये तसेच लाल कंधारी स्पर्धेत नर व मादी गटासाठी प्रत्येकी ५१ हजार रुपये बक्षीस ठेवण्यात आले आहे. या विभागासाठी एकूण ११ लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे असे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सांगितले.
माळेगाव यात्रा कुस्तीसाठी प्रसिद्ध असून, यंदा कुस्ती स्पर्धेच्या बक्षिसात प्रत्येकी १० हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. प्रथम क्रमांकासाठी ६१ हजार, द्वितीय ५१ हजार, तर तृतीय ४१ हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे. लोकनाट्य मंडळांना प्रत्येकी ७१ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम दिली जाणार आहे. शंकरपट स्पर्धेत प्रथम ६१ हजार, द्वितीय ५१ हजार, तृतीय ४१ हजार रुपये पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.
यात्रेदरम्यान येणाऱ्या विविध कलावंतांचा सन्मान करण्यात येणार असून, यात्रा प्लास्टिकमुक्त व स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासन व ग्रामपंचायतींनी विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
माळेगाव यात्रेसाठी दरवर्षी जिल्हा परिषदेला २ कोटी रुपयांचा निधी मिळावा, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी करण्यात आली असून, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री व इतर मंत्र्यांना यात्रेचे निमंत्रण देण्यात आल्याची माहिती आमदार चिखलीकर यांनी दिली.
यात्रेच्या नियोजनाबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, वीजपुरवठा व पाणीपुरवठा सुरू असून आमदार निधीतून दोन डीपी, २५ पोल व हायमास्ट दिवे बसविण्यात आले आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. तलाव फुटल्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यात्रेदरम्यान कडेकोट पोलीस बंदोबस्त, आरोग्य सुविधा व स्वच्छतेची विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना माळेगाव यात्रेचे महत्त्व समजावे यासाठी जिल्हाभरातील शाळांच्या सहली आयोजित करण्याच्या सूचनाही आमदारांनी दिल्या.
चौकट
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी यात्रेच्या नियोजनाची माहिती देताना सांगितले की, यंदा सीसीटीव्ही कॅमेरे वाढविण्यात आले असून तलाव परिसरात सहा जीव रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. पाणीपुरवठा, आरोग्य सेवा तसेच सहा फिरती व दहा दुरुस्त केलेली सार्वजनिक शौचालये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यात्रेचे आयोजन सुरळीत पार पाडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा यात्रा सचिव डी.बी. गिरी यांनी केले. या बैठकीला विविध खात्यांचे विभाग प्रमुख, मंदिर समिती व ग्रामपंचायत पदाधिकारी आदींची उपस्थिती होती.
००००
दि.१२ डिसेंबर 2025
वृत्त क्रमांक 1295
जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
नांदेड दि. 12 डिसेंबर : नांदेड जिल्ह्यात 13 डिसेंबर 2025 चे 6 वाजेपासून ते 27 डिसेंबर 2025 मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 13 डिसेंबर 2025 चे सकाळी 6 वाजेपासून ते 27 डिसेंबर 2025 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील.
त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा,
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मो
0000
जिल्हा कारागृहात बंद्यांना मानवी हक्काबाबत मार्गदर्शन
नांदेड दि. 12 डिसेंबर :- आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिनानिमित्त 10 डिसेंबर 2025 रोजी जिल्हा कारागृहात मानवी हक्काबाबत बंद्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी अजय शिंदे, पोलीस उपअधीक्षक श्री. व्यंजने, विधी सेवा प्राधिकरणाचे ए.व्ही. सराफ, एच.व्ही.संतान, श्रीमती शितल गायकवाड यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी जिल्हा कारागृहाचे अधीक्षक संपत हामु आढे, तुरुंगाधिकारी श्रेणी-२ व इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्र कारागृह विभागाचे ब्रीदवाक्य सुधारणा व पुनर्वसन अंतर्गत महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे सचिव प्रदीप कुमार डोंगे, अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक सुहास वाकरे, महाराष्ट्र राज्य पुणे चे विशेष पोलीस महानिरीक्षक व कारागृह व सुधार सेवा योगेश देसाई यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
00000
क्रीडा सप्ताहानिमित्त विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन
क्रीडा सप्ताहात जास्तीत जास्त खेळाडूनी सहभागी व्हावे
नांदेड दि.१२ डिसेंबर :- आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने 12 ते 18 डिसेंबर 2025 या कालावधीत क्रीडा सप्ताह उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धांचे वेळापत्रक
12 डिसेंबर 2025
क्रीडा सप्ताह उद्घाटन व बास्केटबॉल स्पर्धा
सांय. 4.30 वा. जिल्हा क्रीडा संकुल, बास्केटबॉल कोर्ट, नांदेड
संपर्क : श्री. विष्णु शिंदे - 9767047525
13 डिसेंबर 2025
व्हॉलीबॉल स्पर्धा, सकाळी 7.30 वा.
महात्मा फुले हायस्कूल, विजयनगर, नांदेड
श्री. कवुटकर – 9763469298
स्केटिंग स्पर्धा सांय. 4.30 वा.
जिल्हा क्रीडा संकुल, स्केटिंग रिंक, नांदेड
श्री. इम्रान खान – 9975200071
14 डिसेंबर 2025
• कराटे स्पर्धा, सांय. 5 वा. पावडे मंगल कार्यालय परिसर, नांदेड
आकाश भोरे – 7841864287
• राज्य रस्सीखेच स्पर्धा
14 ते 16 डिसेंबर 2025, शारीरिक शिक्षण महाविद्यालय, कौठा
15 डिसेंबर 2025
• जिम्नॅस्टिक्स स्पर्धा, सांय. 4 वा.
किरण स्पोर्ट्स अकॅडमी, बांधकाम नगर, नांदेड. लक्ष्मण फुलारी – 8888827620
• बॅडमिंटन स्पर्धा
सांय. 4 वा. जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉल, नांदेड
महेश वाखरडकर – 9960052344
16 डिसेंबर 2025
• खो-खो स्पर्धा
सकाळी 7 वा. तालुका क्रीडा संकुल, सिडको, नांदेड
• राज्य रस्सीखेच स्पर्धा (दुसरा टप्पा)
16 ते 17 डिसेंबर 2025
17 डिसेंबर 2025
• रग्बी स्पर्धा
सकाळी 7.30 वा.
मंजुळाबाई किन्हाळकर मुलींचे विद्यालय, भोकर
• बेसबॉल स्पर्धा
सांय. 7 वा. डी. बी. कॉलेज, भोकर
बालाजी गाडेकर – 9921855097
18 डिसेंबर 2025
• टेबल टेनिस स्पर्धा
सांय. 5 वा. जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉल, नांदेड
हनमंत नरवाडे – 9604866253
• क्रिकेट स्पर्धा
सकाळी 8.30 वा.
इंदिरा गांधी मैदान, स्टेडियम परिसर, नांदेड. सुनील यादव – 9420455556
• फुटबॉल स्पर्धा
सांय. 5.00 वा. इंदिरा गांधी मैदान, स्टेडियम परिसर, नांदेड
अथर कुरेशी – 8600357361
लॉन टेनिस स्पर्धा
सकाळी 7 वा. नांदेड क्लब, स्नेहनगर
शरद कानडजे – 9158740456
समारोप कार्यक्रम
सांय. 4 वा. (18 डिसेंबर 2025)
वरील वेळापत्रकानुसार जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी क्रीडा सप्ताहात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : श्रीमती शिवकांता देशमुख (राज्य क्रीडा मार्गदर्शक)
००००००
मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण २०२६ प्रारूप मतदार यादीत आजच आपले नाव तपासा मतदार मदत क्रमांक १८०० २२ १९५० वर संपर्क करा #मतदारय...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 974 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “ स्वस्थ नारी , सशक्त परिवार ” राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ “ स्वस्थ नारी , ...
-
अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी 192 धारकांची प्रतिक्षा यादी घोषित आक्षेपाबाबत 30 ऑक्टोंबरची मुदत नांदेड , ( जिमाका ) दि. 22 :- ...






.jpeg)
%20(1).jpeg)