Monday, August 17, 2026

माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट रोजी राज्यभर जलसंधारण दिन साजरा करण्यात येणार आहे. शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारणाबाबत २१ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांत "महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर" या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या उपक्रमात राज्यातील नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले आहे.
मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने आयोजन करण्यात आलेल्या या उपक्रमाची थीम सेव सॉईल, सेव वॉटर, सीक्यूर टूमारो अशी असून पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा हे घोषवाक्य आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांत २१ ऑगस्ट रोजी कमाल तीन किलोमीटर (महा वॉकेथॉन) चालणे आणि मृद व जलसंधारणाची शपथ घेणे असे या कार्यक्रमाचे स्वरूप असल्याचे मंत्री संजय राठोड यांनी सांगितले.



 

No comments:

Post a Comment

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ #शेतकरीकर्जमाफी #शेतकरीकल्याण