Thursday, February 12, 2026
Tuesday, February 10, 2026
वृत्त क्र. 192
बालविवाह मुक्त भारत अभियानासाठी ‘मुक्तीरथ’द्वारे जनजागृती
जिल्हाधिकारी
राहुल कर्डिले यांच्या हस्ते हिरवी झेंडी
नांदेड,
दि. १० फेब्रुवारी :-जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय व जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान, नांदेड
यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या बालविवाह मुक्त भारत अभियान अंतर्गत
‘मुक्तीरथ’ला आज मंगळवारी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून
मार्गस्थ करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बालविवाह मुक्त भारत अभियानांतर्गत स्वाक्षरी मोहिमेत सहभाग नोंदवून बालविवाह निर्मूलनाचा संदेश दिला. मुक्तीरथाच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध ठिकाणी जनजागृती करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
००००००
वृत्त क्र. 191
पहिल्या
पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत
—
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
नांदेड,
दि. १० फेब्रुवारी :- जिल्ह्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेतील पहिला इंग्रजी विषयाचा
पेपर आज ११२ परीक्षा केंद्रावर झाला.या परीक्षा केंद्रांवर बैठे पथकांमार्फत झूम वेबकास्टद्वारे
संपूर्ण वेळ परीक्षेचे नियंत्रण ठेवण्यात आल्याने पहिला पेपर सुरळीत पार पडला अशी माहिती
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली.
०००००
वृत्त क्र. 190
सुरक्षित इंटरनेट दिन साजरा
प्रशिक्षण व उपक्रम
🔗 https://www.staysafeonline.in/pledge
🔗 https://assessment.isea.app/instructions/sid2026
कार्यक्रमाचे उद्दिष्ट
व परिणाम
मुख्य उद्दिष्टे :
००००००
आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते संपूर्णता अभियान २.० चा शुभारंभ
वृत्त क्र. 189
आमदार भिमरावजी केराम
यांच्या हस्ते संपूर्णता अभियान २.० चा शुभारंभ
नांदेड,
दि. १० फेब्रुवारी:-आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत संपूर्णता अभियान २.० चा शुभारंभ
आज आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते पंचायत समिती किनवट येथे करण्यात आला आहे.
1.
ICDS च्या SNP कार्यक्रमांतर्गत ०६ महिने ते ०६ वर्षापर्यंतच्या लाभार्थी बालकांना
पूरक पोषण आहार वितरण करणे
2.
प्रत्येक अहवाल महिन्यातील नोंदीत सर्व बालकांची कार्यक्षमता मोजणे
3.
प्रत्येक अंगणवाडीस शौचालय सुविधा उपलब्ध करणे
4.
प्रत्येक अंगणवाडीस पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करणे
5.
प्रत्येक शाळेत मुलींसाठी शौचालय सुविधा उपलब्ध करणे
6.
सर्व गोवंशिय जनावरांचे लाळ व खुरकत रोगाविरुद्ध लसीकरण करणे
सदर
शुभारंभ कार्यक्रमास सर्व विभागप्रमुख, सहा.प्रशासन अधिकारी श्री टोम्पे, कनिष्ठ प्रशासन
अधिकारी अल्केश शिरसेटवार, सर्व विस्तार अधिकारी, RGSA तालुका व्यवस्थापक अभिजित गरड,
कनिष्ठ सहाय्यक अंकुश राठोड, सर्व अंगणवाडी पर्यवेक्षिका, पशुधन विकास अधिकारी, सर्व
पशुवैद्यकीय कर्मचारी, अंगणवाडी सेविका, सर्व कार्यालयीन कर्मचारी यांची उपस्थिती होती.
यावेळी आमदार श्री. केराम यांनी ICDS विभागाने संपूर्णता अभियानाच्या शुभारंभाचे औचित्य साधून तयार केलेल्या पोषण आहार जनजागृती संदर्भात तयार केलेल्या स्टॉल ला भेट देऊन पाहणी केली व विभागाचे कौतुक केले.
००००००
वृत्त क्र. 188
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र
परीक्षेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना
नांदेड,
दि. १० फेब्रुवारी:- उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेचे कामकाज सुरळीत,
पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली
जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) स्थापन करण्यात आला
आहे.
परीक्षा कालावधीत नियंत्रण कक्ष सतत कार्यरत राहणार असून, परीक्षेच्या पारदर्शकतेसह विद्यार्थ्यांना भयमुक्त वातावरणात परीक्षा देता यावी, यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
०००००
वृत्त क्रमांक तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वाराचे राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष हरदीप सिंग गिल यांनी घेतले दर्शन नांदेड ...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 974 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “ स्वस्थ नारी , सशक्त परिवार ” राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ “ स्वस्थ नारी , ...
-
अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी 192 धारकांची प्रतिक्षा यादी घोषित आक्षेपाबाबत 30 ऑक्टोंबरची मुदत नांदेड , ( जिमाका ) दि. 22 :- ...

.jpeg)



.jpeg)


.jpeg)

.jpeg)

.jpeg)

.jpeg)





.jpeg)