Friday, February 27, 2026

"हिंद-दी-चादर" श्री गुरु तेग बहादुर साहिब जी के 350वें शहीदी समागम की भव्य तैयारियाँ! 🙏✨
श्रद्धा और सेवा का संगम, जहाँ हर कोना गुरु साहिब की महिमा से सजाया जा रहा है। आइए, इस पावन अवसर का हिस्सा बनें।
📍 ओवे मैदान, खारघर, नवी मुंबई
📅 28 फरवरी और 1 मार्च, 2026


 वृत्त क्रमांक  250

मराठीचा अभिमान जपू या ; मराठीतच संवाद साधू या – अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव

नांदेड, दि.२७ फेब्रुवारी:- मराठी साहित्यातील लखलखते नक्षत्र आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ ‘कुसुमाग्रज’ यांचा जन्मदिन २७ फेब्रुवारी रोजी ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या हस्ते जिल्हा ग्रंथालयात विविध विषयांवरील ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. ग्रंथालयात मराठी साहित्य, स्पर्धा परीक्षा, इतिहास, विज्ञान आदी विविध विषयांवरील ग्रंथांचे आकर्षक प्रदर्शन मांडण्यात आले होते.
यावेळी बोलताना अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी मराठी भाषेचा अभिमान बाळगून दैनंदिन व्यवहारात मराठीतच संवाद साधण्याचे आवाहन केले. मराठीतील मान्यवर लेखक व कवी यांचे स्मरण ठेवून स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासोबतच अवांतर वाचनाची सवय जोपासावी, असे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमात कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे तसेच ग्रंथालय शास्त्राचे जनक एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात कुसुमाग्रज तसेच इतर मराठी साहित्यिकांच्या साहित्याचे विशेष प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
या कार्यक्रमास स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी व अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात तहसीलदार विकास बिरादार, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी, प्रतिभा पापुलवार, अजय वट्टमवार, श्रद्धा रनखांबे, दिगांबर शिंदे, रघुवीर श्रीरामवार, राजू पाटील आदींचा सहभाग होता.
००००००




Thursday, February 26, 2026

धन-धन श्री गुरु तेग बहादूर साहिबजी! 🌸
मानवतेचे रक्षक आणि त्यागाची मूर्ती श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त नवी मुंबईत भक्तीचा सागर लोटणार आहे. पंथातील प्रसिद्ध कीर्तनकार आणि कथावाचक आपल्या रसाळ वाणीने संगतीला मंत्रमुग्ध करतील.



 

श्री गुरु तेग बहादुर साहिब जी के ३५० वा शहीदी समागम नवी मुंबई के खारघर में आयोजित होने जा रहे इस पावन अवसर का हिस्सा बनें।
आइए, गुरु साहिब के अद्वितीय त्याग और राष्ट्रीय एकता, धर्म, मानवता, की रक्षा के लिए दी गई उनकी शहादत को नमन करें।
यह समागम देश के सम्माननीय अतिथि और अनेक संत महंतों की उपस्थिति में संपन्न होने जा रहा है।
स्थान: ओवे मैदान, सेक्टर 29, खारघर, नवी मुंबई
दिनांक: 28 फरवरी और 1 मार्च 2026
समय: सुबह 8:00 से रात 10:00 बजे तक
आपकी उपस्थिति प्रार्थनीय है ।



 

"हिंद-दी-चादर" श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त त्यांच्या महान त्यागाला कोटी कोटी प्रणाम! 🙏 ज्यांनी धर्माच्या रक्षणासाठी आणि मानवाच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण अर्पण केले, त्या महापुरुषाच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊ या.
📍 स्थळ: ओवे मैदान, सेक्टर-२९, खारघर, नवी मुंबई.
🗓 दिनांक: २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६.



 

"हिंद दी चादर" - गुरु तेग बहादूर जी यांच्या त्यागाची आणि धैर्याची शौर्यगाथा. या चिमुरडीने सादर केलेली ही भावपूर्ण आदरांजली नक्कीच तुमच्या मनाला स्पर्श करेल. 🙏


 

गुरुंच्या चरणी लीन होऊन जनसेवेचा वसा जपणारे देवेंद्रजी.


 

वृत्त क्रमांक भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्सचा राज्यव्यापी संवाद • सहा विभागांना याच महिन्यात भेटी  • विद्यार्थी, उमेद...