Thursday, February 12, 2026

वृत्त क्र. 193

'महा पशुधन एक्स्पो-२०२६' च्या लोगोचे

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते अनावरण

नांदेड दि. 12 फेब्रुवारी : राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत 13 ते 15 फेब्रुवारी 2026 या कालावधीत बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे महा पशुधन एक्स्पो-२०२६ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक अखिल भारतीय पशु-पक्षी महा पशुधन एक्स्पो-2026 प्रदर्शनाच्या लोगोचे अनावरण काल 11 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांच्या हस्ते झाले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सुनिल गिरी उपस्थित होते.

लोगो अनावरणप्रसंगी जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी पशुपालन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. परळी वैजनाथ येथे होणारे हे महा प्रदर्शन देशातील जातीवंत पशुधन आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम ठरणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकरी व पशुपालकांना दुग्ध व्यवसायातील जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त पशुपालक, तरुण उद्योजक व शेतकरी बांधवांनी या प्रदर्शनास मोठ्या संख्येने भेट देऊन आपले उत्पन्न वाढवावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सुनिल गिरी यांनी या महा पशुधन एक्स्पोमध्ये राज्यातील तसेच राज्याबाहेरील जातीवंत गायी, म्हशी, शेळ्या-मेंढ्या तसेच विविध पक्ष्यांच्या प्रजातींचे दर्शन घडणार आहे. याशिवाय आधुनिक डेअरी फार्मिंग, चारा नियोजन, दुग्ध प्रक्रिया उद्योगांचे भव्य स्टॉल्स उभारण्यात येणार असून पशुधनाचे आरोग्य, लसीकरण व वैज्ञानिक संगोपन या विषयांवर तज्ज्ञ पशुवैद्यकांची विशेष व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.

तरी जिल्ह्यातील सर्व पशुपालक, शेतकरी व नागरिकांनी या महा पशुधन एक्स्पो-२०२६ मध्ये सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

00000



 शीख परंपरेतील शस्त्रसंस्कृती : धर्म, शौर्य आणि सेवाभावाचा उत्सव

हिंद-दी-चादर श्री गुरू तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाचे आयोजन राज्यभर करण्यात आले होते. नागपूर आणि नांदेड येथे अल्पसंख्याक विकास विभाग, राज्यस्तरीय समन्वय समिती आणि शीख सिकलीगर, बंजार, लबाना, मोहयाल, सिंधी, वाल्मिकी, उदासीन व भगत नामदेव संप्रदाय समुदायाच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. यावेळी लाखोंच्या संख्येने भाविक राज्य, देशभरातून आले होते. कार्यक्रमाच्या माध्यमातून युवा पिढीपर्यंत गुरू तेग बहादुर यांचा शौर्याचा इतिहास पोहाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कार्यक्रमात प्रदर्शन भरविण्यात आले होते. यात विविध शस्त्र, नऊ समुदायात वापरण्यात येणाऱ्या वस्तु, ग्रंथ, गुरू नानक यांची माहिती आणि नऊ समुदायाचे गुरूंशी असलेले नाते त्यांचा इतिहास या प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडण्यात आला. २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी खारघर, नवी मुंबई येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
शीख उत्सव हा केवळ धार्मिक विधी नसून, ते शिख इतिहास, तत्त्वज्ञान आणि जीवनमूल्यांचा सामूहिक उत्सव आहे. या उत्सवांमध्ये कीर्तन, लंगर, सेवा यांसोबतच शिख समुदायाची शस्त्रसंस्कृती विशेषतः अधोरेखित होते. तलवार, कृपाण, चक्र, भाला यासारखी ऐतिहासिक शस्त्रे ही शिख परंपरेत केवळ युद्धसाधने नसून, ती धर्मरक्षण, आत्मसन्मान आणि मानवतेच्या सेवेसाठी सज्ज राहण्याची प्रतीके आहेत.
शीख धर्मात शस्त्रसंस्कृतीचा उद्गम
शीख धर्माचे संस्थापक श्री गुरु नानक देवजी यांनी शांतता, समता आणि सत्य यांचा संदेश दिला. मात्र समाजातील वाढते अन्याय, अत्याचार आणि छळ पाहता पुढील गुरूंनी संरक्षणासाठी शस्त्रधारणेचा मार्ग स्वीकारला. सहावे गुरु श्री गुरु हरगोबिंद साहिब यांनी ‘मिरी–पीरी’ संकल्पना मांडून आध्यात्मिकतेबरोबरच सामाजिक न्यायाची जबाबदारी स्वीकारली. याच काळात शिख समाजात शस्त्रसंस्कृतीचा औपचारिक आरंभ झाला.
शस्त्र म्हणजे आक्रमण नव्हे, तर संरक्षण
शीख परंपरेत शस्त्र उचलणे म्हणजे आक्रमण नव्हे, तर अन्यायाविरुद्ध उभे राहणे होय. शस्त्रधारणा ही नैतिक जबाबदारी आहे. निरपराधांचे रक्षण करणे, अत्याचार थांबवणे आणि धर्मस्वातंत्र्य टिकवणे होय. ही भूमिका शीख धर्माला इतर धर्मांपेक्षा वेगळी आणि अधिक मूल्याधिष्ठित बनवते.
ऐतिहासिक शस्त्रे आणि त्यांचे प्रतीकात्मक अर्थ
शीख उत्सवांमध्ये प्रदर्शित केली जाणारी ऐतिहासिक शस्त्रे त्यांच्या प्रतीकात्मक अर्थामुळे विशेष महत्त्वाची ठरतात. तेग (तलवार) : अन्यायाचा प्रतिकार आणि धैर्य, कृपाण : न्याय, करुणा आणि संरक्षण, चक्र (चक्रम) : सज्जता, शिस्त आणि युद्धकौशल्य, भाला/बर्छा : जागरूकता आणि सामूहिक सुरक्षा, धनुष्य-बाण : संयम आणि अचूकता, या शस्त्रांचा उपयोग करताना नैतिकता आणि संयम पाळणे ही शीख परंपरेची खास ओळख आहे.
श्री गुरु तेग बहादुर साहिब : शस्त्रांपलीकडील शौर्य
शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादुर साहिब यांनी शस्त्रांचा उपयोग न करता, बलिदानाच्या शौर्याने धर्मस्वातंत्र्याचे रक्षण केले. त्यांच्या नावातील ‘तेग’ ही तलवार नसून, न्यायासाठी उचललेली नैतिक धार होती. त्यांच्या शहादतीमुळे शीख शस्त्रसंस्कृतीला नैतिक अधिष्ठान मिळाले.
खालसा पंथ आणि शस्त्रसंस्कृतीचा उत्सवी आविष्कार
१६९९ मध्ये श्री गुरु गोबिंद सिंग यांनी खालसा पंथाची स्थापना केली. यानंतर शस्त्रधारणा ही शीख ओळखीचा अविभाज्य भाग बनली. पंच ककारांपैकी कृपाण हे केवळ शस्त्र नसून, ते सदाचार, सेवा आणि सज्जतेचे प्रतीक आहे. शिख उत्सवांमध्ये निहंग शस्त्रप्रदर्शन, गटका (शस्त्रकला) प्रात्यक्षिके, शस्त्रांची पूजा व सन्मान, या माध्यमातून परंपरा जिवंत ठेवली जाते.
शस्त्रसंस्कृती आणि सेवाभाव
शीख शस्त्रपरंपरा सेवाभावाशी घट्ट जोडलेली आहे. ‘देग तेग फतेह’ हा मंत्र याच तत्त्वज्ञानाचे प्रतीक आहे. देग (लंगर, सेवा) आणि तेग (संरक्षण) या दोन्हींचा समतोल म्हणजेच शिख जीवनदृष्टी होय.
आजच्या काळातील शीख उत्सव आणि संदेश
आजच्या शांततामय समाजात शस्त्रांचा प्रत्यक्ष उपयोग मर्यादित असला, तरी शीख उत्सवांमधील शस्त्रसंस्कृती ही स्वाभिमानाची जाणीव करून देते. अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची प्रेरणा देते. शांतता ही सामर्थ्यावर आधारित असते, हे अधोरेखित करते. शीख उत्सवांमध्ये शस्त्रांचे दर्शन हे केवळ ऐतिहासिक स्मरण नसून, ते शौर्य आणि सेवाभावाचा उत्सव आहे. शीख शस्त्रसंस्कृती आपल्याला शिकवते की शक्ती ही विध्वंसासाठी नव्हे, तर न्याय, संरक्षण आणि मानवतेच्या सेवेसाठी असावी.
०००
संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली


 विशेष लेख : त्याग आणि बलिदानाचे मूर्तिमंत रूप

श्री गुरु तेग बहादुरजी हे शीख समुदायाचे गुरु होते, ज्यांची शहादत केवळ एका धर्म किंवा समुदायापुरती मर्यादित नसून, संपूर्ण मानवतेसाठी त्याग, धैर्य आणि धार्मिक स्वातंत्र्याचे प्रतीक आहे. जेव्हा एका आध्यात्मिक गुरूंनी अन्याय, अत्याचार आणि धार्मिक दडपशाहीसमोर झुकण्याऐवजी आपले मस्तक अर्पण केले; मात्र आपल्या तत्त्वांशी कोणतीही तडजोड केली नाही. त्यामुळे त्यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आपल्याला त्या ऐतिहासिक क्षणाची आठवण होणे साहजिकच आहे. या ऐतिहासिक शौर्याची गौरवगाथा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी नागपूर, नांदेड नंतर आता 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी नवी मुंबई येथे भव्य शहीदी समागम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे जीवन धैर्य, त्याग, करुणा आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या सर्वोच्च आदर्शांचे प्रतीक आहेत. त्यांचा जन्म इसवी सन 1 एप्रिल 1621 रोजी अमृतसर येथे झाला. ते सहावे शीख गुरु हरगोबिंद साहिबजी यांचे धाकटे पुत्र होते. बालपणी इतर मुले खेळात रमलेली असताना श्री गुरु तेग बहादुर साहिबजी एकांतात बसून ईश्वरचिंतन व साधनेत आनंद अनुभवत असत. त्यामुळेच पुढे त्यांचे जीवन बाह्य वैभवापेक्षा अंतःशक्ती आणि नैतिक दृढतेचे उदाहरण ठरले.
श्री गुरु तेग बहादुर साहिबजींनी बालपणी शस्त्र व शास्त्र या दोन्हींचे शिक्षण घेतले. युद्धकौशल्य, घोडेस्वारी आणि तलवारबाजी यात त्यांनी प्रावीण्य मिळवले; मात्र कधीही हिंसा किंवा सत्तेच्या लालसेकडे त्यांचे मन वळले नाही. तरुणपणी त्यांनी दीर्घकाळ ध्यान व तपस्येचे जीवन स्वीकारले.
इसवी सन 1664 मध्ये श्री गुरु तेग बहादुर साहिबजी शिखांचे नववे गुरु झाले. त्या काळात भारतातील सामाजिक व धार्मिक वातावरण अत्यंत तणावपूर्ण होते. तत्कालीन शासकाच्या धोरणांमुळे धार्मिक असहिष्णूता वाढत होती. अनेक ठिकाणी धार्मिक आस्थांवर कठोर निर्बंध लादले जात होते. अशा परिस्थितीत श्री गुरु तेग बहादुर साहिबजींचे गुरु-पद स्वीकारणे ही केवळ आध्यात्मिक जबाबदारी नव्हे, तर एक मोठे ऐतिहासिक आव्हान होते. आयुष्याच्या या काळात पंजाबपासून बंगाल, बिहार, आसाम तसेच पूर्व भारतातील अनेक भागांत त्यांनी भ्रमण केले. या यात्रांचा उद्देश ईश्वर एकच आहे आणि सर्व मानव समान आहेत, हे ते शिकवत. सत्य, करुणा आणि प्रेमाचा मार्ग स्वीकारणे हीच खरी भक्ती आहे, असा त्यांचा संदेश होता.
कोणत्याही व्यक्तीला आपल्या श्रद्धेनुसार जगण्याचा अधिकार आहे आणि कोणतीही सत्ता हा अधिकार हिरावून घेऊ शकत नाही, असे श्री गुरु तेग बहादुरजींनी ठामपणे सांगितले. ही बाब तत्कालीन शासकांच्या दरबारापर्यंत पोहोचताच श्री गुरु तेग बहादुरजींना दिल्लीला बोलावण्यात आले. तत्कालीन शासकांचा धर्म स्वीकारल्यास त्यांचे प्राण वाचतील आणि मान-सन्मान व सुविधा मिळतील, असे सांगण्यात आले. पर्यायाने चमत्कार दाखवण्याची मागणीही करण्यात आली. मात्र गुरुजींनी दोन्ही प्रस्ताव नाकारले. धर्मांतर म्हणजे आत्म्याशी द्रोह, तर चमत्कार दाखवणे म्हणजे ईश्वराच्या नावाचा अपमान, असे त्यांचे मत होते. जीवनाची किंमत मोजावी लागली तरी सत्य आणि विवेकाचा मार्ग स्वीकारण्याचा त्यांनी निर्धार केला.
इसवी सन 1675 मध्ये दिल्लीच्या चांदणी चौकात गुरु तेग बहादुरजींना सार्वजनिकरित्या शहीद करण्यात आले. त्यांच्या समोरच त्यांचे तीन परम शिष्य भाई मती दास, भाई सती दास आणि भाई दयाल दास यांचा अमानुष छळ करण्यात आला, तरीही गुरु तेग बहादूरजी ठाम राहिले. त्यांनी मृत्यू स्वीकारला; पण आपल्या तत्त्वांशी तडजोड केली नाही. भारतीय इतिहासात धार्मिक स्वातंत्र्यासाठी दिलेले हे एक अद्वितीय व अनुपम बलिदान आहे.
श्री गुरु तेग बहादुर साहिबजींच्या शहादतीचा दूरगामी परिणाम झाला. या बलिदानाने हे स्पष्ट केले की भारताची आत्मा सहिष्णुता, विविधता आणि धार्मिक स्वातंत्र्यात दडलेली आहे. त्यांचे पुत्र गुरु गोबिंद सिंहजींनी या शहादतीतून प्रेरणा घेऊन खालसा पंथाची स्थापना केली आणि अन्याय, अत्याचार व असत्याविरुद्ध संघटित संघर्षाचा मार्ग खुला केला. अशा प्रकारे गुरु तेग बहादुरजींचा त्याग येणाऱ्या पिढ्यांसाठी धैर्य आणि आत्मसन्मानाचा शाश्वत स्रोत ठरला.
आजच्या काळात, जेव्हा जगातील अनेक भागांत धार्मिक असहिष्णुता, हिंसा आणि द्वेष वाढत आहेत, तेव्हा श्री गुरु तेग बहादुर साहिबजींचा संदेश अधिकच सुसंगत ठरतो. सत्यासाठी उभे राहणे हेच खरे धैर्य आहे, हे त्यांचे जीवन शिकवते. संस्कृतीचे रक्षण तलवारीने नव्हे, तर धैर्य, करुणा आणि सत्यनिष्ठेने होते, त्यामुळे श्री. गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे नाव भारतीय उपखंडात सदैव अमर दीपसारखे प्रज्ज्वलित राहील...
(डॉ. अमरजीत कौंके हे पंजाबी व हिंदी भाषेतील प्रख्यात लेखक असून त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत.)
संपर्क : 9814231698 पटियाला, पंजाब
(गुरुद्वारा जन्मस्थान: शिरोमणी संत नामदेव, नरसी नामदेव, हिंगोली यांच्या सौजन्याने)
0000



"हिंद-दी-चादर" श्री गुरु तेग बहादुर साहिब जी की शहादत को समर्पित 350वें शहीदी समागम के अवसर पर संत ज्ञानी बाबा हरनाम सिंह जी खालसा के विचार। गुरु साहिब की महान शहादत हमें मानवता और धर्म की रक्षा की प्रेरणा देती है। आइए, इस ऐतिहासिक समागम का हिस्सा बनें।


 

"हिन्द-दी-चादर" श्री गुरु तेग बहादुर साहिब जी के 350वें शहीदी समागम के अवसर पर, कोंकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी जी ने सभी धर्मों और समुदायों को एकजुट होकर इस पावन कार्यक्रम में सहभागी होने का आह्वान किया है।



 

 तैयारियाँ अब ज़मीन पर दिखने लगी हैं। ओवे मैदान, खारघर में “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिब जी के 350वें शहीदी समागम के लिए काम तेज़ी से आगे बढ़ रहा है 28 फरवरी–1 मार्च 2026। आपकी उपस्थिति प्रार्थनीय है।




 श्री गुरु तेग बहादुर साहिब जी महाराज, जिन्होंने धर्म की रक्षा हेतु अपनी शहादत से इतिहास रच दिया। उनकी पावन वाणी और अंतिम श्लोक हमें हर संकट में प्रभु सिमरन की शक्ति का बोध कराते हैं। आइए, गुरु साहिब के चरणों में नतमस्तक होकर उनके बताए मार्ग पर चलने का संकल्प लें।




वृत्त क्रमांक   तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वाराचे  राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष हरदीप सिंग गिल यांनी घेतले दर्शन नांदेड ...