Wednesday, October 9, 2024

 वृत्त क्र. 923 

क्रीडा व युवक कल्याण मंत्री

संजय बनसोडे यांचा नांदेड दौरा

नांदेड दि. 9 ऑक्टोबर : राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे हे 10 ऑक्टोबर नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. 

गुरूवार 10 ऑक्टोबर 2024 रोजी मुंबई येथून विमानाने श्री गुरू गोविंद सिंगजी विमानतळ नांदेड येथे दुपारी 2.05 वा. आगमन. दुपारी 2.10 वा. हेलिकॉप्टरने श्री साई गणेश मिलिटरी फाउंडेशन येथील हेलिपॅड रुद्धा पाटी ता. अहमदपूर जिल्हा लातूरकडे प्रयाण करतील.  

0000

 वृत्त क्र. 922   

कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा नांदेड दौरा

नांदेड दि. 9 ऑक्टोबर : राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे हे 10 ऑक्टोबर रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. 

गुरूवार 10 ऑक्टोबर 2024 रोजी मुंबई येथून विमानाने श्री गुरू गोविंद सिंगजी विमानतळ नांदेड येथे दुपारी 2.05 वा. आगमन. दुपारी 2.10 वा. हेलिकॉप्टरने श्री साई गणेश मिलिटरी फाउंडेशन येथील हेलिपॅड रुद्धा पाटी ता. अहमदपूर जिल्हा लातूरकडे प्रयाण करतील.  

0000

 वृत्त क्र. 921 

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण कार्यक्रमासाठी

शहरात दोन वाहनतळाची व्यवस्था 

नांदेड दि. 9 ऑक्टोबर :- मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमासाठी प्रत्येक तालुक्यातून विविध योजनाचे लाभार्थी यांना ने-आण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने 249 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. 

 वाहनतळास जाण्याचे असे आहेत मार्ग 

या बसेससाठी नांदेड शहरात दोन वाहनतळाची व्यवस्था केली आहे. नांदेड मनपा, नांदेड, अर्धापूर, भोकर, मुदखेड, हिमायतनगर या तालुक्यासाठी 170 बसेससाठी वाहनतळाची व्यवस्था नांदेड शहरातील शासकीय तंत्रनिकेतन मैदान येथे केली आहे. तर यशवंत महाविद्यालयाच्या मैदानावर हदगाव, नायगाव, बिलोली, उमरी, धर्माबाद, मुखेड, देगलूर, कंधार व लोहा या तालुक्यासाठी एकूण 129 बसेस पार्किंगची व्यवस्था केली आहे. नांदेड येथील वाहतुकीला कोणताही अडथळा होवू नये यासाठीही नियोजन केले आहे.   

नांदेड तालुक्यासाठी 60 बसेस व अर्धापूर तालुक्यासाठी 15 बसेस व्यवस्था केली असून या बसेसनी नमस्कार चौक-महाराणा प्रताप चौक-वसंतराव नाईक चौक-आनंदनगर चौक-शासकीय तंत्रनिकेतन मैदान येथे वाहनतळाकडे येण्याचा मार्ग असेल. मुदखेड तालुक्यासाठी 20 बसेसची व्यवस्था असून वाजेगांव-देगलूर नाका-बाफना टी पॉईन्ट-महाराणा प्रताप चौक–वसंतराव नाईक चौक-आनंद नगर चौक –शासकीय तंत्र निकेतन मैदान नांदेड येथे पोहोचायचे आहे. 

भोकर तालुक्यासाठी 15 बसची व्यवस्था असून त्यांचा मार्ग नमस्कार चौक-महाराणा प्रताप चौक-वसंतराव नाईक चौक-आनंद नगर चौक-शासकीय तंत्रनिकेतन मैदान येथे वाहनतळाकडे येण्याचा मार्ग असेल. उमरी तालुक्यातील 6 बसेस व मुखेड तालुक्यासाठीच्या 20 बसेस आणि देगलूर तालुक्यासाठी 10 बसेस व कंधार तालुक्यासाठी 15 बसेस, लोहा तालुक्यातील 20 बसेससाठी यशवंत महाविद्यालया मैदान नांदेड येथे वाजेगाव-देगलूर नाका-बाफना-अबचलनगर कमान-यात्री निवास पोलीस चौकी-हिंगोली गेट ओव्हर ब्रिज-अण्णाभाऊ साठे चौक-व्हीआयपी रोड-कुसुमताई सभागृह यशवंत महाविद्यालय मैदान नांदेड येथे पार्क करायच्या आहेत. 

हदगाव तालुक्यासाठीच्या  20 बसेससाठी नमस्कार चौक-महाराणा प्रताप चौक-वसंतराव नाईक चौक-अण्णाभाऊ साठे चौक-व्हीआयपी रोड-कुसूमताई सभागृह–यशवंत महाविद्यालय मैदानाकडे यावे. हिमायतनगर तालुक्याच्या 10 बसेससाठी नमस्कार चौक-महाराणा प्रताप चौक-वसंतराव नाईक चौक-आनंद नगर चौक-शासकीय तंत्रनिकेतन मैदान येथे वाहनतळाकडे येण्याचा मार्ग असेल.बिलोली तालुक्यातील 12 बससाठी व धर्माबाद तालुक्यासाठीच्या 6 व नायगांव तालुक्यातील 20 बसेसचा मार्ग वाजेगांव –देगलूर नाका-बाफना-अबचलनगर कमान-यात्री निवास पोलीस चौकी-हिंगोली गेट ओव्हर ब्रिज-अण्णाभाऊ साठे चौक –व्हीआयपी रोड-कुसूमताई सभागृह यशवंत महाविद्यालयाचे मैदान असे राहील.

00000

 वृत्त क्र. 920

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील वसतिगृहाचे उद्घाटन

·         नांदेड येथील दोन वसतीगृहाचा समावेश


नांदेड दि. 9 ऑक्टोबर :  शासकीय मुलांचे वसतीगृह, काळेश्वर नगर, विष्णुपूरी नांदेड व शासकीय मुलीचे वसतीगृह दिपनगर नांदेड या दोन वसतीगृहासोबत महाराष्ट्रातील 44 वसतीगृहाचे उद्घाटन केंद्रीय परिवहन, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज दुपारी नागपूर येथून दुरदश्य प्रणालीद्वारे संपन्न झाले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे हे उपस्थित होते.


यावेळी महाज्योती, नागपूर या प्रशिक्षण संस्थेमार्फत प्रशिक्षण घेवून भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय वन सेवेमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राज्यामध्ये प्रथमच इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरु करण्यात आली आहेत. या वसतिगृहामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी प्रवेश घेवून लोकसेवा, राज्यसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परिक्षेत उत्तीर्ण होतील याबाबत त्यांनी शुभेच्छा दिल्या.


तसेच नांदेड येथे दोन वसतीगृहाचे दुरदश्य प्रणालीद्वारे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या वसतीगृहातील प्रवेशित मुलांनी वसतिगृहामध्ये वास्तव्य करीत शिस्त ठेवावी. अटी व शर्तीचे पालन करावे. राज्यामध्ये प्रथमच विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गासाठी वसतिगृह सुरु झाले असल्याने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी वसतिगृहात प्रवेश घ्यावा असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक शिवानंद मिनगिरे यांनी केले. तसेच गुणानुक्रमे प्रवेशासाठी पात्र असलेल्या मुला-मुलींना वसतीगृहात प्रवेश निश्चित करण्यासाठी पत्र देण्यात येऊन शुभेच्छा दिल्या. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

00000

वृत्त क्र. 919

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नांदेड दौरा 

नांदेड दि. 9 ऑक्टोबर :  महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. 

गुरुवार 10 ऑक्टोबर 2024 रोजी मुंबई येथून विमानाने श्री गुरु गोविंद सिंगजी विमानतळ येथे दुपारी 2.05 वाजता आगमन. दुपारी 2.10 वाजता हेलिकॉप्टरने लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील रुध्दा पाटी येथील हेलिपॅडकडे प्रयाण. सायंकाळी 4.50 वाजता हेलिकॉप्टरने  श्री गुरु गोविंद सिंगजी विमानतळ नांदेड येथे आगमन. सायंकाळी 5 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान, नवा मोंढा, नांदेड येथे आगमन. सायंकाळी 5 वाजता मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान जिल्हास्तरीय कार्यक्रमास  उपस्थिती. सायंकाळी 7.25 वाजता श्री गुरु गोविंद सिंगजी विमानतळ नांदेड येथे आगमन. सायंकाळी 7.30 वाजता विमानाने मुंबईकडे ते प्रयाण करतील. 

00000












मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दरमहा रु. १५०० मिळत आहेत.


















 







महाराष्ट्र सरकारची युवा कार्यप्रशिक्षण योजना : रोजगारासाठी तयारी, आत्मनिर्भरतेकडे वाटचाल!












 

  विशेष वृत्त एसआयआरच्या पुढील टप्प्यातील प्रक्रिया सुलभ, पारदर्शक व सर्वसमावेशक ठेवा – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम पुढील टप्प्...