Monday, April 8, 2024

 






वृत्‍त क्र. ३१8

नांदेड लोकसभा संदर्भिकेचे जिल्‍हाधिकाऱ्यांच्या हस्‍ते प्रकाशन 

नांदेड दि. 8 एप्रिल :- १६-नांदेड लोकसभा निवडणूक २०२४ ची परिपूर्ण माहिती असलेली लोकसभा संदर्भिका नांदेडचे आज जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. जिल्हा निवडणूक विभागासाठी जिल्हा माहिती कार्यालयामार्फत ही निर्मिती करण्यात आली. लोकसभा संदर्भिका नांदेडच्‍या माध्‍यमातून 1951 ते 2019 पर्यतचे नांदेड लोकसभा निवडणूक निकाल तसेच लोकसभा निवडणुकीसंदर्भातील सर्व अनुषंगिक संपर्काची माहिती माध्‍यमांना मिळणार आहे. या संदर्भिकेचे प्रकाशन आज जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या नियोजन भवनात पत्रकार परिषद आयोजित करण्‍यात आली होती. 

यावेळी संदर्भिका नांदेडचे प्रकाशन त्‍यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. यावेळी निवासी उपजिल्‍हाधिकारी महेश वडदकर, जिल्‍हा परिषदेचे अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्‍हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, विविध माध्‍यमाचे प्रतिनिधी आदीची उपस्थिती होती. 

नांदेड सं‍दर्भिकेत मतदार संघ नकाशा, निवडणूक आचारसंहितेत काय करावे याबाबतची पूर्ण माहिती, प्रमुख माध्‍यम प्रमाणिकरण व सनियंत्रण, माध्‍यम कक्ष, नांदेड, इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्र, (व्‍हीव्‍हीपॅट) भारत निवडणूक आयोग संपर्क, प्रमुख संपर्क अधिकारी, विविध कक्ष प्रमुख, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी , नांदेड जिल्‍ह्यातील मतदार संख्‍या, विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्र व अंतर्गत तहसिल व महसुली क्षेत्र, 1951 ते 2019 पर्यंतचे नांदेड लोकसभा निवडणूक निकाल, महाराष्‍ट्र राज्‍य निवडणूक कार्यक्रम, नांदेड लोकसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम 2024, नांदेड मिडीया सेंटर, तक्रार निवारण केंद्र याबाबतची माहिती या संदर्भिकेच्‍या माध्‍यमातून मिळणार आहे. नांदेड लोकसभा क्षेत्रातील प्रमुख अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक तसेच निवडणुकीतील जबाबदाऱ्यासोबत होणाऱ्या अधिकाऱ्यांचे कक्ष व त्यांचे क्रमांक याची यादी देखील यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.
 ००००





 वृत्‍त क्र. ३१७ 

भयमुक्त वातावरणात लोकसभा निवडणूक लढा ! 

निवडणूक निरीक्षकांचे उमेदवारांना आवाहन

प्रथम लेखे तपासणी १२ एप्रिल रोजी 

नांदेड दि. ८ एप्रिल : लोकसभा निवडणुकीदरम्यान कोणतीही अडचण असेल, दबाव असेल, किंवा भीती असेल, काही मदत हवी असेल तर जिल्हा प्रशासनासोबत चार निरीक्षक आपल्या सोबतीला आहे. 24 तास आम्ही इथे कार्यरत आहे. आमच्या सगळ्यांचे दूरध्वनी आपल्याकडे आहेत. कधीही मदत मागा, आदर्श आचारसंहितेच्या पालन करा,असे आवाहन निवडणूक रिंगणात उरलेल्या उमेदवारांना पक्ष निरीक्षक व जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले. 

लोकसभा निवडणुकीतील अर्ज मागे घेण्याच्या आजच्या दिवशी 16 -नांदेड मतदार संघातून 43 उमेदवारांनी माघार घेतली आहे त्यामुळे आता 23 उमेदवार रिंगणात आहेत. या 23 रिंगणात असणाऱ्या उमेदवारांसोबत व त्यांच्या प्रतिनिधी सोबत सर्वसामान्य निरीक्षक शशांक मिश्र, खर्च निरीक्षक डॉ. दिनेशकुमार जांगिड, खर्च निरीक्षक मग्पेन भुटिया यांच्यासह जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, खर्च कक्षाचे प्रमुख तथा महानगरपालिकेचे मुख्य लेखा अधिकारी डॉ. जनार्दन पक्वान्ने यांच्यासह खर्चविषयक समित्यांचे प्रमुख उपस्थित होते. 

यावेळी निवडणुकीदरम्यान उमेदवारांनी खर्चाच्या नोंदी कशा ठेवाव्यात कोणत्या खर्चाच्या नोंदी ठेवाव्यात , दैनंदिनी कशी बनवावी यासह खर्चाच्या अनेक बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले. 

उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाच्या नोंदवहीच्या तपासणीसाठी कै. डॉ. शंकरराव चव्हाण, नियोजन भवन, कॅबिनेट बैठक कक्ष, तळमजला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रथम तपासणी 12 एप्रिल सकाळी 11 ते सहा वाजता, द्वितीय तपासणी 18 एप्रिल 2024 रोजी सकाळी 11 ते 6 तर तृतीय तपासणी 22 एप्रिल ला सोमवारी 11 ते 6 या कालावधीत होणार आहे. या बैठकींना तपासणीसाठी उमेदवारांना उपस्थित राहणे अनिवार्य आहे.उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी या बैठकींना उपस्थित न राहिल्यास, लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 10 क अन्वये तो निवडणूक आयोगाकडून तीन वर्षाच्या कालावधीसाठी अपात्र ठरतो, असेही या वेळी स्पष्ट करण्यात आले. 

यावेळी सर्वसाधारण निरीक्षक व अन्य निरीक्षकांनी उमेदवारांशी संवाद साधून त्यांच्या कुठल्याही  अडचणीला सोडवण्यात येईल,असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

०००००






 वृत्‍त क्र. ३१६ 

नांदेड लोकसभेसाठी 23 उमेदवार रिंगणात

43 उमेदवारांनी घेतले अर्ज मागे 

नांदेड दि. 8 एप्रिल  16- नांदेड लोकसभा निवडणुकीच्‍या छाननीमध्‍ये पात्र ६६ उमेदवारापैकी एकूण 43 उमेदवाराने अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे 23 उमेदवार सध्या पात्र आहे. 16-नांदेड लोकसभा मतदारसंघामध्‍ये 23 अंतिम उमेदवार निश्चित झाले आहेत. उमेदवारांची नावे व पक्ष चिन्‍ह पुढीलप्रमाणे असल्‍याची माहिती मुख्‍य निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे. 

अर्ज परत घेण्‍याच्‍या शेवटच्‍या दिवशी जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन रिंगणात असलेल्‍या उमेदवारांची माहिती दिली. जिल्‍ह्यामध्‍ये २६ एप्रिल २०२४ रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मोठ्यासंख्‍येने जनतेने लोकशाहीच्‍या या महोत्‍सवात आपल्‍या मतदाधिकाराचे कर्तव्‍य म्‍हणून कार्यवहन करावे, असे आवाहन जिल्‍हाधिका-यांनी केले. यावेळी जिल्‍ह्यातील कायदा, सुव्‍यवस्‍था, आदर्श आचारसंहिता तसेच १६ मार्च पासून वेगवेगळ्या विभागात झालेली कार्यवाही तसेच निवडणुकीची तयारी याबाबतची माहिती दिली.   

आज एकूण 66 पात्र उमेदवारापैकी आज 43 जणांनी माघार घेतली त्‍यामूळे 23 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामध्‍ये  चिखलीकर प्रतापराव गोविंदराव (भारतीय जनता पार्टी)- चिन्‍ह कमळ, पांडुरंग रामा अडगुळवार (बहुजन समाज पार्टी) चिन्‍ह- हत्‍ती, चव्हाण वसंतराव बळवंतराव (इंडियन नॅशनल काँग्रेस) चिन्‍ह- हात, अब्दुल रईस अहेमद (देश जनहीत पार्टी) चिन्‍ह-शाळेचे दप्‍तर, अविनाश विश्वनाथ भोसीकर (वंचित बहुजन आघाडी) चिन्‍ह-शिट्टी ,  कौसर सुलताना (इंडियन नॅशनल लीग) चिन्‍ह-शिवण यंत्र, राहुल सुर्यकांत एंगडे (बहुजन मुक्ती पार्टी) चिन्‍ह-खाट, रुक्मिणीबाई शंकरराव गीते (भारतीय प्रजा सुराज्य पक्ष) चिन्‍ह-ऑटो रिक्‍शा, सुशीला निळकंठराव पवार (समनक जनता पार्टी) चिन्‍ह-गॅस सिलेंडर, हरी पिराजी बोयाळे (बहुजन भारत पार्टी) चिन्‍ह-जहाज. तर अपक्षांमध्‍ये  कदम सुरज देवेंद्र (अपक्ष) चिन्‍ह-फुगा, कल्पना संजय गायकवाड (अपक्ष) चिन्‍ह-माईक, गजानन दत्तरामजी धुमाळ (अपक्ष) चिन्‍ह-कपाट, जगदीश लक्ष्मण पोतरे (अपक्ष) चिन्‍ह-टेबल, देविदास गोविंदराव इंगळे (अपक्ष) चिन्‍ह-ऊस शेतकरी, नागेश संभाजी गायकवाड (अपक्ष) चिन्‍ह-एअर कंडिशनर, निखिल लक्ष्मणराव गर्जे (अपक्ष) चिन्‍ह-हिरा, भास्कर चंपतराव डोईफोडे (अपक्ष) चिन्‍ह-सफरचंद, महारुद्र केशव पोपळाईतकर (अपक्ष) चिन्‍हपेन ड्राईव्‍ह, राठोड सुरेश गोपीनाथ (अपक्ष) चिन्‍ह-रोड रोलर, लक्ष्मण नागोराव पाटील (अपक्ष) चिन्‍ह-बेबी वॉकर, साहेबराव भिवा गजभारे (अपक्ष) चिन्‍ह-पेनाची निब सात किरणांसह, ज्ञानेश्वर रावसाहेब कपाटे (अपक्ष) चिन्‍ह-बांगड्या यांचा समावेश आहे.  

माघार घेतलेले उमेदवार- मोहनराव आनंदराव वाघमारे, शेख मोईन शेख रशीद (ऑल इंडिया मजलीस- ए-इन्कलाब ए- मिल्लत), सय्यद तनवीर (बहुजन महापार्टी), अकबर अख्‍तर खॉन, अक्रम रहेमान सय्यद, अनवर अ. कादर अ. कादर शेख, अमजत खा सरवर खान, अरुण भागाजी साबळे, अशफाक अहमद, असलम इब्राहीम शेख, शे. इमरान शे. पाशा, इरफान फहरुख सईद, मो. इलियास अब्दुल वहिद मोहमद, खान अलायार युसुफ खान, अ. खालेद अ. रफीक, जफर अली खाँ महेमुद अली खाँ पठाण, जुल्फेखान जिलानी सय्यद, तबस्सुम बेगम, तुकाराम गणपत बिराजदार, थोरात रविंद्र गणपतराव, नय्यर जहाँ मोहम्मद फेरोज हुसैन, नागोराव दिगंबर वाघमारे, प्रमोद किशनराव कामठेकर, फहाद सलीम शेख सलीम शेख, मजीद अ. अकबर, महमंद तौफीक महमंद युसुफ, महमद मुबीन शे. पाशा, महमद सलीम महमद इकबाल, अॅड. मारोतराव कान्होबाराव हुक्के पाटील, मोहम्मद नदीम मोहम्मद इक्बाल, मोहम्‍मद वसीम, मोहम्मद सिद्दीक शेख संदलजी, युनुस खान, युनुसखॉं युसुफखाँ, रमेश दौलाती माने, लतीफ उल जफर कुरेशी, अॅड. विजयसिंह चौव्‍हाण, विनयमाला गजानन गायकवाड, वैशाली मारोतराव हुक्‍के पाटील, शाहरुख खमर, शिवाजी दत्तात्रय गायकवाड, साहेबराव नागोराव गुंडीले, ज्ञानेश्वर बाबूराव कोंडामंगले़ हे आहेत अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने यांनी दिली आहे.

 00000





 

Sunday, April 7, 2024

वृत्‍त क्र. ३१5

लोकसभेसाठी अर्ज परत घेण्याची आज शेवटची तारीख 

शनिवारी एका पात्र उमेदवाराची माघार , 
सोमवारी ३ वाजेपर्यंत एकूण उमेदवार ठरणार 

नांदेड दि. ७ एप्रिल – १६- नांदेड लोकसभा निवडणुकीच्‍या छाननीमध्‍ये पात्र ६६ उमेदवारापैकी शनिवारी एका उमेदवाराने अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे 65 उमेदवार सध्या पात्र असून सोमवारी ८ एप्रिलला तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे.त्‍यामुळे ८ एप्रिल नंतर 16-नांदेड लोकसभा मतदारसंघामध्‍ये अंतिम उमेदवारी निश्चित होणार आहेत. शनिवारी अपक्ष उमेदवार मोहनराव आनंदराव वाघमारे यांनी अर्ज परत घेतला आहे. शुक्रवारी छाननी केल्यानंतर 9 अर्ज रद्द झाले होते. एकूण 92 अर्ज दाखल झाले होते. त्‍यापैकी 9 अर्ज रद्द करण्‍यात आले. 66 उमेदवारांनी हे अर्ज दाखल केले होते.

 शुक्रवारी अपात्र झालेल्या उमेदवारांमध्‍ये विष्‍णु मारूती जाधव, अलिमोद्दीन मोहियोद्दीन काझी, माधवराव मुकींदा गायकवाड, आनंदा धोंडिबा जाधव, सुरेश दिगांबर कांबळे, दिगांबर धोंडिबा वाघमारे, आनंदा कुंडलिकराव बोकारे, सोपान नेव्‍हल पाटील यांचा समावेश आहे. तर शनिवारी अपक्ष उमेदवार मोहनराव आनंदराव वाघमारे यांनी अर्ज परत घेतला आहे. पात्र उमेदवारामध्ये चिखलीकर प्रतापराव गोविंदराव (भारतीय जनता पार्टी), पांडुरंग रामा अडगुळवार (बहुजन समाज पार्टी), वसंतराव बळवंतराव चव्हाण (इंडियन नॅशनल काँग्रेस), अब्दुल रईस अहेमद (देश जनहीत पार्टी), अविनाश विश्वनाथ भोसीकर (वंचित बहुजन आघाडी), कौसर सुलताना (इंडियन नॅशनल लीग), राहुल सुर्यकांत एंगडे (बहुजन मुक्ती पार्टी), रुक्मिणीबाई शंकरराव गीते (भारतीय प्रजा सुराज्य पक्ष), शेख मोईन शेख रशीद (ऑल इंडिया मजलीस- ए-इन्कलाब –ए- मिल्लत), सय्यद तनवीर (बहुजन महापार्टी), सुशीला निळकंठराव पवार (सम्‍यक जनता पार्टी), हरी पिराजी बोयाळे (बहुजन भारत पार्टी) यांचा समावेश आहे. तर अपक्षांमध्‍ये अकबर अख्‍तर खॉन, अक्रम रहेमान सय्यद, अनवर अ. कादर अ. कादर शेख, अमजत खा सरवर खान, अरुण भागाजी साबळे, अशफाक अहमद, असलम इब्राहीम शेख, शे. इमरान शे. पाशा, इरफान फहरुख सईद, मो. इलियास अब्दुल वहिद मोहमद, कदम सुरज देवेंद्र, कल्पना संजय गायकवाड, खान अलायार युसुफ खान, अ. खालेद अ. रफीक, गजानन दत्तरामजी धुमाळ, जगदीश लक्ष्मण पोतरे, जफर अली खाँ महेमुद अली खाँ पठाण, जुल्फेखान जिलानी सय्यद, तबस्सुम बेगम, तुकाराम गणपत बिराजदार, थोरात रविंद्र गणपतराव, देविदास गोविंदराव इंगळे, नय्यर जहाँ मोहम्मद फेरोज हुसैन, नागेश संभाजी गायकवाड, नागोराव दिगंबर वाघमारे, निखिल लक्ष्मणराव गर्जे, प्रमोद किशनराव कामठेकर, फहाद सलीम शेख सलीम शेख, भास्कर चंपतराव डोईफोडे, मजीद अ. अकबर, महमंद तौफीक महमंद युसुफ, महमद मुबीन शे. पाशा, महमद सलीम महमद इकबाल, महारुद्र केशव पोपळाईतकर, अॅड. मारोतराव कान्होबाराव हुक्के पाटील,मोहम्मद नदीम मोहम्मद इक्बाल, मोहम्‍मद वसीम, मोहम्मद सिद्दीक शेख संदलजी, युनुस खान, युनुसखॉं युसुफखाँ, रमेश दौलाती माने, राठोड सुरेश गोपीनाथ, लतीफ उल जफर कुरेशी, लक्ष्मण नागोराव पाटील, अॅड. विजयसिंह चौव्‍हाण, विनयमाला गजानन गायकवाड, वैशाली मारोतराव हुक्‍के पाटील, शाहरुख खमर, शिवाजी दत्तात्रय गायकवाड, साहेबराव नागोराव गुंडीले, साहेबराव भिवा गजभारे, ज्ञानेश्वर बाबूराव कोंडामंगले, ज्ञानेश्वर रावसाहेब कपाटे यांचा समावेश आहे. 

लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज परत घेण्‍याची अंतिम मुदत 8 एप्रिल आहे. उद्या सोमवारी सकाळी 9.45 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज परत घेता येणार आहेत,अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने यांनी दिली आहे.
 00000

वृत्‍त क्र. ३१4

 परस्‍पराच्‍या सण- उत्‍सवात सहभागी होवून सर्वांचा आनंद द्विगुणित करु या 

– जिल्‍हाधिकारी 

 शांतता समिती बैठकीमध्‍ये जिल्‍हाधिकारी व जिल्‍हा पोलीस अधिक्षकांचे आवाहन 

 डिजे वापरण्‍यास मनाई व अनाधिकृत होर्डीग लावता येणार नाही 

 आदर्श आचारसंहिता भंग होणार नाही याकडे लक्ष वेधण्याचे आवाहन 

नांदेड दि. ७ एप्रिल :- एप्रिल व मे महिन्‍यात हिंदू, मुस्लिम, शिख, बौध्‍द, जैन व अन्‍य सर्व धर्मियांचे उत्‍सव येत आहेत. नांदेड जिल्‍हा सर्वधर्म समुदायाच्‍या सण उत्‍सवाचे केंद्र आहे. सोबतच २६ एप्रिलला मतदान होणार आहे. अशा वेळी दुस-यांच्‍या धर्माचे स्‍वातंत्र्य अबाधित राखण्‍याचे कर्तव्‍य निभावत आपण परस्‍पराच्‍या सण उत्‍सवात सहभागी होवून सर्वांचा आनंद द्विगुणित करु या, असे आवाहन जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.  

जिल्‍हा परिषदेच्‍या यशवंतराव चव्‍हाण सभागृहात ते जिल्‍हास्‍तरीय शांतता समितीच्‍या बैठकीत बोलत होते. यावेळी जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्‍हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्‍ण कोकाटे, मनपा आयुक्‍त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अतिरिक्‍त पोलीस अधिक्षक अभिनाष कुमार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कीर्तीका सी.एम., निवासी उपजिल्‍हाधिकारी महेश वडदकर, उपविभागीय अधिकारी विकास माने, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्‍यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख, पोलीस अधिकारी व विविध सामाजिक संघटना, संघटनेचे पदाधिकारी सहभागी  झाले होते.

 येणा-या दिवसात प्रत्‍येक आठवड्यात महत्‍वाचे सण, उत्‍सव आहेत. त्‍यातच 26 एप्रिलला लोकसभेचे मतदान आहे. त्‍यामुळे आदर्श आचारसंहिता लागू आहे.  आचारसंहितेचे पालन करताना सण, उत्‍सव मर्यादेत साजरे करावेत. 24 ते 27 एप्रिल या कालावधीत कोणतीही मिरवणूक काढण्‍यास मनाई करण्‍यात आली आहे. रस्‍त्‍यांवर अन्‍नदान करताना ताजे अन्‍न देण्‍यात यावे. शांतता समितीच्‍या विविध धर्मीय सदस्‍यांनी सूचविल्‍याप्रमाणे प्रशासन या काळामध्‍ये डिजे वापरायला पायबंद घातला आहे. तसेच निवडणुकीची आचारसंहिता सुरु असल्‍याने कोणत्‍याही प्रकारचे अनाधिकृत होर्डीग लावले जाणार नाही, आदर्श आचार संहितेचा भंग होणार नाही याची काळजी प्रत्‍येकांनी घ्‍यावी.यासंदर्भात कायदा मोडल्‍यास कारवाई केली जाईल असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

तत्‍पूर्वी जिल्‍हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्‍ण कोकाटे यांनी संबोधित केले. दुस-यांचे सण उत्‍सव साजरा होतो म्‍हणून नाराज होणारे अशा काळात घातक ठरतात. प्रत्‍येकाला आपआपल्‍या धर्म पंथानुसार सण उत्‍सव साजरे करण्‍याची मुभा घटनेने दिली आहे.  त्‍यामुळे सर्वाच्‍या आनंदात सहभागी होणे एखादी घटना घडली तर जमाव जमवून कायदा हातात घेण्‍यापेक्षा पोलीसांची मदत घ्‍या. संयम ठेवा. अफवा पसरु देऊ नका,रस्त्यांवर अन्नछत्र, पाणी वाटप वाहतुकीला अडथळा होईल, असे उघडू नका, असे आवाहन त्‍यांनी केले. सोबतच या काळात आदर्श आचारसंहिता सुरु असल्‍यामुळे ठिकठिकाणी नाकाबंदी तसेच तपासणी सुरु राहिल. पोलीसांना सहकार्य करण्‍याचे आवाहन त्‍यांनी केले.

यावेळी सिईओ मीनल करनवाल, मनपा आयुक्‍त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी देखील संबोधित केले. प्रशासनातर्फे यावेळी पुढील 14 एप्रिलपर्यत शहरातील प्रमुख रस्‍त्‍यांची डागडुजी करण्‍यात येईल, उत्‍सवाच्‍या काळात 24 तास विद्युत पुरवठा सुरळीत असेल, अन्‍न व औषधी प्रशासनामार्फत ठिकठिकाणी होणा-या अन्‍नछत्र व भंडारा मध्‍ये ताजे अन्‍न देण्‍यासाठी संबंधिताना निर्देशित करण्‍यात येईल. पाणी पुरवठा सुरळीत राहील. तसेच मिरवणूक रस्‍त्‍यांची स्‍वच्‍छता, फिरते शौचालय, रस्‍त्‍यावरील झाडाची कटाई याकडे लक्ष देण्‍यात येईल असे स्‍पष्‍ट करण्‍यात आले. यावेळी विविध धार्मिक समुदायातील मान्यवरांनी शासनाकडे आपल्‍या मागण्‍या मांडल्‍या व विविध सूचना केल्‍या. निवासी उपजिल्‍हाधिकारी महेश वडदकर यांनी सभेचे सूत्रसंचालन केले.

या महिन्यातील सण - उत्सव

९ एप्रिल   : गुढीपाडवा

११ एप्रिल : रमजाण ईद

१४ एप्रिल :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

१४ एप्रिल : बैसाखी

१७ एप्रिल : रामनवमी

२१ एप्रिल : महावीर जयंती

२६ एप्रिल : लोकसभा मतदान

00000




















Saturday, April 6, 2024

वृत्‍त क्र. ३१३ 

नांदेड लोकसभेसाठी 66 पैकी एका पात्र उमेदवाराची माघार ;

अर्ज मागे घेण्यासाठी सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंत अंतिम मुदत 

नांदेड दि. ६ एप्रिल – 16 नांदेड लोकसभा निवडणुकीच्‍याI छाननीमध्‍ये पात्र 66 उमेदवारापैकी शनिवारी एका उमेदवाराने अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे 65 उमेदवार सध्या पात्र असून सोमवारी ८ एप्रिलला तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे.त्‍यामुळे ८ एप्रिल नंतर 16-नांदेड लोकसभा मतदारसंघामध्‍ये अंतिम उमेदवारी निश्चित होणार आहेत. आज अपक्ष उमेदवार मोहनराव आनंदराव वाघमारे यांनी अर्ज परत घेतला आहे. 

चुकीचे प्रतिज्ञापत्र, सूचकांची संख्‍या, सुरक्षा रक्‍कम जमा न करणे आदी करणांवरून शुक्रवारी 9 अर्ज रद्द करण्‍यात आले. एका इच्‍छूक उमेदवाराचे दोन अर्ज रद्द झाले. एकूण 92 अर्ज दाखल झाले होते. त्‍यापैकी 9 अर्ज रद्द करण्‍यात आले. 66 उमेदवारांनी हे अर्ज दाखल केले होते. काही उमेदवारांनी एकापेक्षा अधिक अर्ज दाखल केले होते. अपात्र उमेदवारांमध्‍ये विष्‍णु मारूती जाधव, अलिमोद्दीन मोहियोद्दीन काझी, माधवराव मुकींदा गायकवाड, आनंदा धोंडिबा जाधव, सुरेश दिगांबर कांबळे, दिगांबर धोंडिबा वाघमारे, आनंदा कुंडलिकराव बोकारे, सोपान नेव्‍हल पाटील यांचा समावेश आहे. 

पात्र उमेदवार चिखलीकर प्रतापराव गोविंदराव (भारतीय जनता पार्टी), पांडुरंग रामा अडगुळवार (बहुजन समाज पार्टी), वसंतराव बळवंतराव चव्हाण (इंडियन नॅशनल काँग्रेस), अब्दुल रईस अहेमद (देश जनहीत पार्टी), अविनाश विश्वनाथ भोसीकर (वंचित बहुजन आघाडी), कौसर सुलताना (इंडियन नॅशनल लीग), राहुल सुर्यकांत एंगडे (बहुजन मुक्ती पार्टी), रुक्मिणीबाई शंकरराव गीते (भारतीय प्रजा सुराज्य पक्ष), शेख मोईन शेख रशीद (ऑल इंडिया मजलीस- ए-इन्कलाब ए- मिल्लत), सय्यद तनवीर (बहुजन महापार्टी), सुशीला निळकंठराव पवार (सम्‍यक जनता पार्टी), हरी पिराजी बोयाळे (बहुजन भारत पार्टी) यांचा समावेश आहे. 

तर अपक्षांमध्‍ये अकबर अख्‍तर खॉन, अक्रम रहेमान सय्यद, अनवर अ. कादर अ. कादर शेख, अमजत खा सरवर खान, अरुण भागाजी साबळे, अशफाक अहमद, असलम इब्राहीम शेख, शे. इमरान शे. पाशा, इरफान फहरुख सईद, मो. इलियास अब्दुल वहिद मोहमद, कदम सुरज देवेंद्र, कल्पना संजय गायकवाड, खान अलायार युसुफ खान, अ. खालेद अ. रफीक, गजानन दत्तरामजी धुमाळ, जगदीश लक्ष्मण पोतरे, जफर अली खाँ महेमुद अली खाँ पठाण, जुल्फेखान जिलानी सय्यद, तबस्सुम बेगम, तुकाराम गणपत बिराजदार, थोरात रविंद्र गणपतराव, देविदास गोविंदराव इंगळे, नय्यर जहाँ मोहम्मद फेरोज हुसैन, नागेश संभाजी गायकवाड, नागोराव दिगंबर वाघमारे, निखिल लक्ष्मणराव गर्जे, प्रमोद किशनराव कामठेकर, फहाद सलीम शेख सलीम शेख, भास्कर चंपतराव डोईफोडे, मजीद अ. अकबर, महमंद तौफीक महमंद युसुफ, महमद मुबीन शे. पाशा, महमद सलीम महमद इकबाल, महारुद्र केशव पोपळाईतकर, अॅड. मारोतराव कान्होबाराव हुक्के पाटील,मोहम्मद नदीम मोहम्मद इक्बाल, मोहम्‍मद वसीम, मोहम्मद सिद्दीक शेख संदलजी, युनुस खान, युनुसखॉं युसुफखाँ, रमेश दौलाती माने, राठोड सुरेश गोपीनाथ, लतीफ उल जफर कुरेशी, लक्ष्मण नागोराव पाटील, अॅड. विजयसिंह चौव्‍हाण, विनयमाला गजानन गायकवाड, वैशाली मारोतराव हुक्‍के पाटील, शाहरुख खमर, शिवाजी दत्तात्रय गायकवाड, साहेबराव नागोराव गुंडीले, साहेबराव भिवा गजभारे, ज्ञानेश्वर बाबूराव कोंडामंगले, ज्ञानेश्वर रावसाहेब कपाटे यांचा समावेश आहे. 

लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज परत घेण्‍याची अंतिम मुदत 8 एप्रिल आहे. उदया रविवारी सुट्टीचा दिवस आहे. सोमवारी सकाळी 9.45 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज परत घेता येणार आहेत अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने यांनी दिली आहे.

00000


  विशेष वृत्त एसआयआरच्या पुढील टप्प्यातील प्रक्रिया सुलभ, पारदर्शक व सर्वसमावेशक ठेवा – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम पुढील टप्प्...